व्यभिचार .. राजाराणीच्या कथेतील !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 April, 2015 - 13:03

व्यभिचार म्हणजे नक्की काय यावर इथे यन्न नंबर ऑफ टाईम्स चर्चा झाली असावी. पण तरीही बालमनाला पडलेले प्रश्न आजही कायम आहेत.

तीच ती आपल्या राजाराणीची कथा. जी कित्येक आयांनी आपल्या मुलांना मम्मम भरवताना सांगितली असावी.

आटपाट नगराचा एक राजा होता.

राजाला दोन राण्या होत्या.

एक आवडती, तर एक नावडती!

किमान दोन राण्या असल्याशिवाय राजाचे राजापण कसे सिद्ध होणार नाही!

कधी दोनाच्या जागी अनेक राण्या असायच्या, पण त्यातही एक पट्टराणी असायचीच.

तर ती पट्टराणी सर्वात आवडती का असायची हे बरेचदा कथेत सांगितलेले नसायचे.

पण जी सर्वात सुंदर असणार तीच पट्टराणी हे बालमनालाही समजू यायचे.

याउलट एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही.

पण ते एक असो!

आपण सोयीसाठी एक राजा आणि त्याची आवडती, नावडती अश्या दोन राण्यांचीच कथा घेऊ.

तर, या राजाराणीच्या "त्रिकोणी" कुटुंबाची कथा लहानपणी आनंद देऊन गेली खरी,

तरी वयात येता येता काही प्रश्न मनात सोडून गेली.

जिथे आज एकापेक्षा अनेक जोडीदारांबरोबर एकाच वेळी संबंध ठेवणे हा व्यभिचार समजला जातो,

तिथे या राजा-राण्यांच्या कथेत व्यभिचारी कोण?

० राजा -- जो आपल्या राजा असण्याचा गैरफायदा उचलत एकाच वेळी दोन दोन राण्यांशी संबध ठेवतो.
० आवडती राणी -- जी आपल्या सौंदर्याच्या जिवावर नावडतीचा हक्क मारते.
० नावडती राणी -- जी राजाला आपण आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्याशी संबंध जोडून राहते.
० आपण सारे -- जे एक राजा आणि दोन राण्यांच्या कथा अगदी लहान वयातच बालमनावर बिंबवतो.

स्त्री-पुरुष नात्यातील व्यभिचाराचा अर्थ कोणी ईथे उलगडून सांगेल का ...
की काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले चांगले जे वेळ पडल्यास त्यांची उत्तरे आपल्या सोयीने शोधता येतात..

......!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा नक्की का काढलायस?तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी की लोकांना समजावण्यासाठी?

@₹₹#%&&₹##&-₹%"₹#

दोन्ही..
जर लोकांना समजावण्यासाठी च असे म्हणालो तर याचा अर्थ होतो की मी शहाणा आहे आणि माझेच खरे. पण मला जे समजलेय वा वाटतेय ते खरेखोटे करणेही गरजेचे नाही का?

......

@ राजेश,
आपल्या पोस्टच्या शेवटी जो प्रश्न चिन्ह आपल्याला पडलाय तिथेच उत्तर लपलेय.

.......

ही चर्चा निरर्थक वाटते.

@#@@₹%₹##₹%&-%

हे आपण चर्चेच्या कुठल्या बाजूला उभे आहात त्यावर ठरते.

बाकी उदाहरणे शोधत आपल्या इजिप्तच्या ईतिहास पुराणापर्यंत का जावे लागले ?

ऋन्मेष तू अशा लोकाना का नाही विचारत, ज्याना या क्रियेचा सर्वान्गिण अनूभव आहे, जे यातुन तावुन सुलाखुन निघाले आहेत. मायबोलीकरान्ची नुसती मते जाणुन काय होणार? एक हो म्हणेल, दुसरा नाही म्हणेल. ज्याला अनूभव आहे त्यालाच विचार ना.

नाहीतर तुझ्या मनात नुसताच वैचारीक गोन्धळ उडुन, तू व्यथित होशील. बघ, एकदा नीट विचार करुन बघ.

आपल्या सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर परीकथा आवडत असतात. ती पूर्ण पांढऱ्या आणि काळ्या रंगातली पात्र , नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय होतो असे अधोरेखित करणारा भाबडा शेवट आणि कथेमध्ये सगळीकडे डोकावणारा एक निष्पापपणा . अर्थातच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा भाबडेपणा आपण कुठेतरी हरवून बसतो.परीकथा फक्त मुलांसाठी आहे असा एक प्रचलित समज आहे . पण फार कमी लोकांना माहित असेल की मानसशास्त्राचा जनक आणि मनाशी निगडीत अनेक सिद्धांत मांडून जगाला हादरे देणाऱ्या सिग्मंड फ्राईडने आपल्या अनेक अभ्यासाचे संदर्भ सिंड्रेला आणि इतर परीकथांमधून घेतले आहेत .फ्राईडच्या मते सिंड्रेलाचा अभ्यास करताना तिच्यापेक्षा कमी सुंदर असणाऱ्या आणि त्यामुळे एक गंड असलेल्या बहिणींची पण एक जी बाजू आहे तिचा अभ्यास करणे आवश्यक आहे . फ्राईडचा पूर्ण काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगात रंगवलेल्या पात्रांना पण विरोध होता .

<<<< @ राजेश,
आपल्या पोस्टच्या शेवटी जो प्रश्न चिन्ह आपल्याला पडलाय तिथेच उत्तर लपलेय. >>>>

हं, ते उत्तर आता बहुपत्नीत्व असलेल्या संस्कृतीतील पहिली पत्नीच देवू शकेल.

म्हणजे तुमचा मुद्दा आजच्या जमान्यातील बहुपत्नीत्व हा आहे तरं !

बावरा मन,

>> अर्थातच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा भाबडेपणा आपण कुठेतरी हरवून बसतो.परीकथा फक्त मुलांसाठी
>> आहे असा एक प्रचलित समज आहे .

अंशत: सहमत आहे. अगदी आपल्या भारतातच एक परीकथा गेली कित्येक दशके चालू होती. ती संपुष्टात आली तरी काही लोकं आपला भाबडेपणा विसरायला तयार नाहीत. Biggrin

आ.न.,
-गा.पै.

राजेश,
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्याकाळच्या स्त्रियांना ते चालत असावे यापुढे आपल्यालाच ते खरोखर चालत असावे की नाही हि शंका वाटल्याने तो प्रश्नचिन्ह आपण टाकला आहे.

थोडक्यात त्या स्त्रियांना ते चालत असावे हे आपणच आपल्या सोयीने ठरवले आहे.

@ रश्मी, माबोकरांना अंडरएस्टीमेट करू नका Happy

तसेच दारूच्या दुष्परीणामावर चर्चा करण्यासाठी दारू पिणारेच हवेत असे गरजेचे नसते. आयुष्यात बॅटही हातात न् पकडलेले देखील सचिनला निवृत्त कधी व्हायचे हा सल्ला देऊ शकतात Happy

@ रश्मी, माबोकरांना अंडरएस्टीमेट करू नका >>>>> म्हणजे काय? कोणाला तसला अनूभव येऊन त्यानी कोतबोत लिहीला आहे का?:फिदी:

ऋन्मेष मी हे गमतीत लिहीले होते, कारण मला खरच आता हसू येतय. तू, सचीन च्या मुद्द्याची आणी या गम्भीर विषयाची तुलना करतोस हे बघुन गम्मत वाटली. जरा तुझ्या कॉलनीतल्या कट्ट्यावर बसुन सचीन - विराटची फलन्दाजी हा विषय काढुन चर्चा कर आणी दुसर्‍या दिवशी त्याच लोकान्मध्ये या व्यभिचार या विषयावर चर्चा कर. काय रिझल्ट येतोय ते इथे कळव.

ज्यानी हातात बॅट घेतलेली नसते त्यानी सचीन धोनीला नावे ठेवली तरी त्यान्च्या आयुष्याच्या प्रश्न नसतो, पण ज्यानी हे ( व्यभिचार )भोगले आहे त्यान्च्या मात्र जीवन-मरणाचा प्रश्न असतो हे लक्षात घे. कुठलिही तुलना कुठेही करु नकोस.

का नको ?
>>>
नकोच असेही कुठे म्हटलेय मी. मत मांडण्यासाठी गरजेचे नाही इतकेच.

तू, सचीन च्या मुद्द्याची आणी या गम्भीर विषयाची तुलना करतोस हे बघुन गम्मत वाटली.
>>>>
तुम्ही तुलना चुकीच्या अर्थाने घेतल्याने गंमत वाटणे साहजिकच आहे. Happy

ऋन्मेष,

गंभीर विषयाचा धागा असा राजाराणीच्या कथेचा संदर्भ देऊन काढण्याची संकल्पना काही आवडली नाही. राजाराणीच्या कथेचा उल्लेख करून तुम्ही विचारलेले चार प्रश्न, हे तुमच्या दृष्टीने खरे प्रश्न आहेत की 'व्यभिचार म्हणजे काय' हा सर्वात शेवटी विचारलेला प्रश्न हा तुमच्या दृष्टीने खरा प्रश्न आहे? जर शेवटचा प्रश्न खरोखर पडलेला प्रश्न असेल तर आधीच्या राजाराणीच्या कथेची आवश्यकता समजत नाही. जर राजाराणीच्या कथेत व्यभिचार होता की नव्हता असा प्रश्न असेल तर आजच्या युगात व्यभिचार म्हणजे काय हे विचारण्यात काही राम वाटत नाही.

तुम्ही हा धागा असा काही कन्स्ट्रक्ट केला आहेत की:

१. त्यावर गंभीरपणे काही म्हणावे असे बहुतेकांना वाटणार नाही

आणि

२. कोणीही काहीही म्हणाले तरी त्यावर प्रत्युत्तर द्यायला तुमच्याकडे एक कोणतेतरी मत असेलच.

एवढे करूनही काही नवीन मिळाले असते तर आवडले असते, पण सत्तर एक प्रतिसाद झाले, अजून काही खास नवीन वाचायला मिळाले नाही.

क्षमस्व!

नकोच असेही कुठे म्हटलेय मी. मत मांडण्यासाठी गरजेचे नाही इतकेच.

>>>

का गरजेचे नाही. आहे की.

२. कोणीही काहीही म्हणाले तरी त्यावर प्रत्युत्तर द्यायला तुमच्याकडे एक कोणतेतरी मत असेलच>>>>> याला म्हणतात सौ सुनारकी एक लोहारकी. बेफिकीर, अचूक नस पकडलीत तुम्ही ऋन्मेषची. एकतर या बाबाजीची रास तुळ असेल, नाहीतर याला वाद घालण्यात फार रस असेल. आता बघा, या दोन्ही पोस्टवर उत्तर येते की नाही ते. माझी पोस्ट डावलेल कदाचीत.:फिदी:

नव्या धाग्यासाठी विषयः

एम.एन.सी संस्कृती व्यभिचाराला पूरक ठरते का?

आयटीतल्या वातावरणाचा व्यभिचार वाढण्यात काही हात आहे का?

अप्पाकाका.:राग::फिदी::अरेरे:

साती,
मी काय लिहिलं ते कुणीतरी ओळखेल असे वाटले होते....

माझा प्रतिसाद..

मग काय ठरलं शेवटी ?.... असा होता !

अजूनही तोच आहे !!!

slowly but steadily progressing towards a sterling century.
'उगच धागे काढतो' म्हणणार्‍या प्रतिसादांचीच संख्या ५० असेल.

<< slowly but steadily progressing towards a sterling century.
'उगच धागे काढतो' म्हणणार्‍या प्रतिसादांचीच संख्या ५० असेल. >>

प्रतिसाद दिले म्हणजे प्रतिवाद करायला आलेला धागालेखक पुन्हा उपप्रतिसाद देण्यातच थकून जाईल आणि तेवढेच नव्याने धागे टाकण्याचे प्रमाण कमी होईल असा 'सुज्ञ' विचार त्यामागे असावा.

चेतन, धागालेखकाला प्रतिसादातूनच नव्या धाग्याची प्रेरणा मिळते हो Sad Proud

नेटचे स्वकमाइचे पैसे देउन, एव्हढा बहुमुल्य वेळ देउन स्वत:चा छळ का म्हणुन करुन घ्यायचा...
I quit माबो 11.JPG

P.S. डु आय शोधणार्‍यांसाठी सुवर्ण संधी.. आयडी हवा असल्यास विपु करा पासवर्ड सांगितला जाइल
-धन्यवाद

ऋन्मेष च्या धाग्यावर त्याला नावं ठेवत ठेवत मोठ मोठे प्रतिसाद लिहीणा-यात सर्वात अग्रणी चेसुगु यांचंच नाव आदराने घ्यावं लागेल. अर्थात त्यांच्या लेखांप्रमाणेच प्रतिसादही शेंडाबुडखाहीन असल्याने जंप करण्यावाचून गत्यंतर नसतं.

वाचणा-याला एव्हढा कंटाळा येत असेल तर टंकणा-याला किती येत असेल !!! बोटारीयाचा पेशंट आहे ब्वॉ !

<< चेतन, धागालेखकाला प्रतिसादातूनच नव्या धाग्याची प्रेरणा मिळते हो >>

नक्कीच सहमत. कोणी काही विधान केलं की "तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे" हे या धागालेखकाचं आवडतं वाक्य ठरलेलंच.

प्रतिसाद दिले म्हणजे प्रतिवाद करायला आलेला धागालेखक पुन्हा उपप्रतिसाद देण्यातच थकून जाईल आणि तेवढेच नव्याने धागे टाकण्याचे प्रमाण कमी होईल असा 'सुज्ञ' विचार त्यामागे असावा.>>>>:हहगलो: डोळ्यात खरच पाणी आले हसून हसून.:फिदी:

Pages