मुंबईतून मराठी माणूस गायब होत असतानाच मराठी माणसाचा व्यापारही परप्रांतीयांनी हिरावून घेतला. आता ती वेळ आलीय कि पुन्हा बाळकडु प्यायची पण हे बाळकडु खळ आणि खट्याकच नसून व्यापारी जगतात पुन्हा उभ राहाण्याच असलं पाहिजे.
मराठी माणूस आणि उद्योगधंदा हे न जुळणार गणित आता बदलायला पाहिजे. मुंबई आपली आहे ती आपलीच राहण्यासाठी व्यवसायात आपली पाळेमुळे घट्ट करावी लागणार. आपला माणूस १६ ते १६ हजार पगारात नोकरीला चिटकून बसला, ३० ते ३५ हजार पगार घेणारे आम्हीच शहाणे आमच्यापेक्षा मोठा कोणीच नाही अशा थाटात वावरायला लागला. हीच उद्दामगिरी कायम राहिली तर मराठी माणूस हा इतर भाषिकांचा नोकरदार बनून राहील यात काही शंका नाही.
आपल्यात असणारी कि कचकुमता, संकुचितपणा बाजूला सारून पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभ राहण्याचा प्रयत्न झाला पाहिजे
अहो म्हणतात ना कि,
गणिताची (कोणत्याही क्षेत्रात) भव्य इमारत उभी करायची असेल तर, वर्गमुळाचा (संयम, आत्मविश्वास आणि त्या क्षेत्राचा अभ्यास) भक्कम पाया उभारावा लागतो.
लेखन – गणेश पावले
९६१९९४३६३७
मी उद्योजक होणारच!, समूह
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.