शीळे अन्न खाणे

Submitted by एबी.... on 1 April, 2015 - 14:08

खूप दिवसांपासून हा प्रश्न आहे डोक्यात.....
अमेरिकेत आल्यापासून शिळं (की शीळं) बरेचदा खाल्ले जाते. विशेषतः नवर्याचा दुपारचा डबा... रात्री भाजी बनवून ठेवते, सकाळी पोळ्या बनवून, कधी पोळ्यासुद्धा रात्रीच. नवरा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खातो.

बरे नाही ना असे नेहेमी करणे?
इथे बरेच वेटरन्स आहेत (बराच काळ अमेरिकेत किंवा भारताबाहेर रहाण्याचा अनुभव असण्याच्या अर्थाने).
म्हणून विचारतेय,
क्रूपया मते, माहिती (शास्त्रीय द्रूष्ट्या किती बरोबर किती चूक), तुमच्या टिप्स/ट्रीक्स शेअर कराल का?

लेकीचा डबा ताजा असतो, क्वचितच आदल्या रात्रीचा पदार्थ फार आवडता असल्यास देते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही गोष्टीन्ना पर्याय नसतो.. त्यातले हे एक..
इथे गरम-गरम पदार्थ करून तेव्हाच्या तेव्हा खाणे (निदान दुपारच्या वेळेला) बहुतेकांना शक्य नाही.
तेव्हा थंड करण्यासाठी शीतपेटी, आणि गरम करण्यासाठी अतिसुक्श्म लहरींचा उपयोग करावाच लागतो.
हे चांगले नाही असे सगळेच म्हणतात. त्यामुळे अन्न जरा जास्तच अंगी लागून वजन वाढते असे म्हणतात.

उत्तर किंवा पर्याय अजून सापडलेला नाही..

कामावरून घरी गेल्यावर ताजी भाजी (ती ही कधीकधी फ्रोजन केलेल्या भाज्यांची) एकाने करावी, दुसऱ्याने सलाड, कोशिंबीर, फळं कापावी, किंवा पोरांना अंघोळी घाल्याव्या. विकांन्ताला भरपूर पोळ्याकरून झीप्लोक करून फ्रीज मध्ये टाकाव्या, बाहेर तयार मिळत असतील तर उत्तम. हव्या तेवढ्या गरम गरम छान लागतात. रात्रीचं जेवण इतकं जास्त करावं की उद्याचा डबा होऊन जाईल. हे शास्त्रीयदृष्ट्या उपाशी राहण्यापेक्षा किंवा बाहेरून आणलेल्या जेवणापेक्षा सत्त्वयुक्त आणि कमी fatty असतं असा अनुभव आहे. चांगल आहे की नाही हे त्याऐवजी जे मर्त्य माणूस करेल त्यावर ठरवा.

अमेरिकेत बरेच भारतीय नवरे दुपारी जेवायला घरी येतात. अर्थात त्यासाठी स्वतःची कार हवी, ऑफिस घरापासून जवळ हवं, ऑफिसचं रुटीन रोज ठराविक वेळी ब्रेक घेऊ शकण्याइतकं शिस्तीचं हवं आणि बायको (किंवा इंडियाहून आलेली आई/सासू) कोणीतरी दुपारी बाराच्या आत ताजं जेवण बनवून ठेवणारी व्यक्ती घरात हवी.

नवर्‍यानीच ताजे गरम खायला पाहिजे ही आजच्या काळात चुकीची कल्पना आहे. उलट नवर्‍यानी बायकोला गरम जेवण करून वाढायला पाहिजे! इसवीसन पूर्व काळातल्या कल्पना घेऊन जगणे सोडा.

हे एकंदरीत भलत्याच ठिकाणी चाललंय.. 'शिळे खाणे चांगले नाही... त्याला पर्याय काय?' असा प्रश्न आहे.
त्याला बायकानी काय करावे/ नवर्‍यानी काय करावे असे वळण लागले....

माझ्या घरी या.. संध्याकाळी गरमागरम ताजे जेवण करून खायला घालेन.. Proud

शिळं खाण्याचा आणि अमेरिकेत असण्याचा अर्थाअर्थी काय संबंध आहे हे कळले नाही.
भारतात नवरा बायको ९-६ काम करत असतांना नेमके अमेरिकेपेक्षा काय वेगळे असते?

डोमेस्टिक हेल्प नाही हा मुद्दा होऊ शकतो पण अन्न टिकवण्याच्या आणि शिजवण्याच्या अनेक सोयीसुविधा, ऊपकरणे हाताशी असतांना हा शिळे खाण्याचा प्रश्न येत असेल तर नॉर्थ कोरिया मध्ये गेल्यावरही हे समीकरण कसे बदलणार?

त्यांच्या भारतातल्या घरात आई/वडिल्/सासू/सासरे/स्वयंपाकाची-बाई यापैकी कुणीतरी असल्याने नेहमी ताजे जेवण होत असेल.. त्यांनी विचारलेला प्रश्न वैयक्तिक वाटतो... ( अमेरिकेत आल्यापासून शिळं (की शीळं) बरेचदा खाल्ले जाते. विशेषतः नवर्याचा दुपारचा डबा.... )

शिळं या शब्दाला तसाही काही अर्थ राहिला नाहिये फ्रीझ आल्यापासून. सकाळ संध्याकाळ वेळ कुणाला असणार ताजे बनवायला. बरेच लोक आठवडाभराचे पण बनवून ठेवतात एकदम.
फ्रीझ मधून काढून गरम केलेले / खराब न झालेले अन्न ताजेच. Happy

उलट नवर्‍यानी बायकोला गरम जेवण करून वाढायला पाहिजे! >>>>>> आयला नवीन नवीन लग्नं झालय म्हणायचं की? लग्नाळू आहे म्हणायचं? Lol

बिनधास्त खा. जिवाला फार त्रास करुन घेऊ नका. नवरा बायको काम करत असतील, घरी लहान मुलं असतील तर ह्या देशात (जिथे कामवाल्यांची मदत नाही) घरातली/बाहेरची सगळी कामं स्वतःच मॅनेज करुन रोज दोन वेळा ताजा स्वयंपाक करुन खाणं फार अवघड आहे. दोघही काम करत नसला तरी कंटाळवाणं होऊ शकतंच.

माझी आजी अनेक वर्षं शिळी भाकरी आवडते म्हणून रात्री जास्तीची भाकरी करुन घेऊन सकाळी खाते. छान तब्येत आहे तिची! सगळे पाश्चात्य देश फ्रोझन फूड वर जगतात तरी लाईफ एक्स्पेटन्सी चांगली आहे. शिळ्या खाण्याला जस्टीफाय करत नाही आहे, पण वर तुम्ही लिहिलंय तसं शिळं/ताजं खाणं (रात्रीचं सकाळी वगैरे) काही वाईट नाही आहे आणि त्याने तब्येतीवर वाईट परिणाम झालेला मला तरी दिसला नाहीये. मी स्वतःही रोज रात्रीच २ वेळेचं जेवण बनवते आणि टुणटुणीत आहे :फिदी:.

उलट नवर्‍यानी बायकोला गरम जेवण करून वाढायला पाहिजे! >>>>>> आयला नवीन नवीन लग्नं झालय म्हणायचं की? लग्नाळू आहे म्हणायचं? >>> Lol

मिळतात की तिथे अमेरीकेत मदतीला बाई. पैसा असेल तर होतं की सब कुछ जगात.

मी ठेवली होती एक बाई.. ती मला आवडली नाही हि वेगळी गोष्ट. पण चांगली बाई मिळाली व ती सकाळी -संध्याकाळी येत असेल तर होइल ताजा डब्बा.

मी सकाळी ६ ला बोलवायचे. संध्याकाळी परत ६:३० ला. (घरी अडचण तशीच होती. सासरे हॉस्पिटलात, सासू घरीच आजारी, नवरा साबु बरोबर, मी कामाला, मुलं लहान वगैरे वगैरे,,,,,).
पण मेली, भयाण तिखट ओतायची हजारदा सांगून सुद्धा ते तेल सुद्धा ओतायची. काही दिवस ठेवली , नवीन ट्राय करण्यापेक्षा मग अडचण संपली तसे नमस्कार केला तिला.

सकाळी चुलीपाशी, रात्री चुलीपाशी रांधायचे दिवस संपले. चार ठाव स्वंयपाक कोणी करतात का रोज?(मी तरी करत नाही... ( चार ठाव=डाळ, भात, चपाती, एक भाजी, एक उसळ,कोशिंबीरी,पापड, लोणचं असा ठाव )).
मी चपाती -भाजी पण रोज करत नाही. (म्हणून तुम्ही करु नका सांगत नाहीये, जैसा देस , वैसा भेस बेस्ट आहे)) होइल सवय हळू हळू.

नवरा काही म्हणाला नाही ना? म्हणाला तर त्यालाचा सांगा, 'तु कर , मी खाते'.

पण तुम्ही द्या अ‍ॅड सुलेखात.

इन ट्यून विथ द ट्यून
:HhGG:

You guys made my idle airport time...

Majha sadhya towel ikde. ..rumalane kahi honar naahi..

SHREE HAHAHAHA

वेका, सगळ्यात भारी प्रतिसाद.
हीचहायकिंग करताना टॉवेल हवाच, रोज ४२ वेळा खायला ही विसरू नको.

धन्यवाद सगळ्यांना वेळ काढून मतमतांतरे दिल्याबद्दल!

हो, भारतात दोन्ही वेळ मावशी यायच्या स्वयंपाकासाठी. मी नोकरी सोडल्यानंतरही (काही वर्षे झालीयेत ऑलरेडी)...

इथेही सध्या मी नोकरी करत नाहीये.. पण नवर्याच्या कामाच्या वेळा, माझ्या टाईम मॅनेजमेंटचा घोळ इ. कारणांमुळे सकाळी फार फार लवकर उठून पूर्ण स्वयंपाक जमत नाही. (म्हणा बुवा मला आळ्शी :-))
नवर्याची घरात मदत ऑल्मोस्ट शून्य! पुन्हा एकदा मी विषय देतेय का स्त्रीमुक्ती इ. बोलण्यास ;-)?
त्याला नसलेला वेळ मला दिसतोय ना पण. आणि त्याच्या अपेक्षा नाहीत मुळात. हे माझ्या डोक्यातले कीडे आहेत.
शेवटी नवरा हा प्राणि एक फॅमिली मेंबर आहेच ना? त्या अर्थाने काळजी करणे जुना विचार समजू नये...

तुम्हा आम्हा कोणासाठीही हे योग्य आहे की नाही असा प्रश्न आहे रादर....

अमेरीका-भारत असा भेद फक्त कामासाठी हेल्प मिळण्यावरूनच (फक्त जेवण बनवणे नाही, ओवरऑल हेल्प)

अन्नातील पोषणमूल्ये अगदीच वाया घालवतो का आपण फ्रीजात (कूक्ड फूड) ठेवून रोजच?

असो!

मी का तुम्हाला आळशी म्हणू?

बाकी यन्जेत असता आमच्या एरियात तर मावशींची सोय झाली असती. त्या पोळ्या आणि माया दोन्ही करतात. कधी मधी रागवतात, पनिसमेंट सुद्धा देतात. अगदी ट्डोपा होतं कधी कधी.

Proud

बुवा, Lol
आपल्या लाईफस्टाईलला जे जमेल, शक्य असेल ते करावं. रोज बाहेरचं काहीतरी मागवून खाण्यापेक्षा कालची भाजी पोळी खाणं उत्तम.

शीळे अन्न खाणे की अमेरिकेत शीळे अन्न खाणे? टायटलमुळे भारतात पण शीळे अन्न खाणे, बरे आहे की नाही हा प्रश्न पडला? अर्थात तोही योग्यच आहे. टायटलात नि कीवर्ड टाका "अमेरिका"

टीपापाचा फील आला नि मस्त वाटले, आय लव्ह टीपापा!!

माझ्या टाईम मॅनेजमेंटचा घोळ << टाईम मॅनेज करायचा प्रयत्न करा. पुर्व तयारी करुनठेवता येईल.
सगळा साग्रसंगित जेवणाचा घोळ घालण्या एवजी लिमीटेड आईटम्स बनवा. सॅलड ई. आधी बनवुन ठेवता येईल (ड्रेसिंग न घालता)
जमत असेल(परवडत असेल) तर हेल्प मिळते का बघा.
एक जण बाहेरच बघत असेल तर दुसर्याने घरातल बघायला काय हरकत आहे त्यात स्त्रीमुक्तीचा काय संबध आहे?

हे करून बघा.

अगदीच नवीन लग्न झालेले नसेल तर थोडे लवकर म्हणजे सहा ला उठायचे. कणीक वीकांतालाच भिजवून ठेवायची. भाजी बनवायला एका साइडला ठेवायची व चार पोळ्या लाटायच्या. मोजून २० मिनिटे लागतात. बरोबर एक सलाड. इथे आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी असा बाफ आहे त्यावर खूप छान सूचना आहेत. चार बर्नरचा गॅस असेल तर अर्ध्यातासात स्वयंपाक होतो. बरोबर चितळेंचे श्रीखंड / आम्रखंड द्यायचे प्लास्टिक पॅक मधे. असा डबा मी स्वत:साठी बनवते आनी सव्वा आठला घर सोडते. रोजच. ( मी पाचलाच उठते ते सोडा, तुम्ही लहान आहात वयाने. झोप जास्त असेल. )

रानारानात गेली बाई शीळ हे जुने गाणे आठवले तुमच्या बाफाचे शीर्षक वाचून. Wink

मलाही शिळे अन्न खायचा कंटाळा येतो पण सकाळी उठुन स्वयंपाक करणेही जीवावर येते Biggrin त्यामुळे मी नोकरी करत नसले की (मी हंगामी, कंत्राटी कामगार आहे) शक्यतोवर ताजे खाते/ खाऊ घालते. पण तरीही सकाळी उठुन नवर्‍याला डबा करुन देणे जमत नाहीच... एके काळी सकाळी उठुन ताजा नाष्टा+डबे+फळं+ताक असे बरेच काही केले आहे त्यामुळे आता सकाळी उठल्याबरोबर ओट्यापाशी उभे रहाणे नको वाटते... पण तो अपराधी भाव मी प्रयत्नपूर्वक कमी केला आहे. नवर्‍याने सकाळी त्याच्यापुरते ऑमलेट करुन ऑ.ब्रेड डब्यात नेला तरी मला बरे वाटते. (झोपेत असले तरी ऑमलेटचा वास येतोच)
मी पुढील गोष्टी करते. कदाचित तुम्हाला उपयोग होईल.
आठवड्या भराची कणिक एकदम भिजवून रोज लागतील तेव्हढ्या पोळ्यांचे गोळे फ्रीज करुन ठेवायचे आणि एक सांज आधी ते फ्रीजरमधुन फ्रीज मध्ये काढुन ठेवायचे किंवा ओट्यावर ठेवायचे. थॉ होण्यासाठी लागणारा वेळ सीझन वर अवलंबुन आहे.
आदल्या दिबशी संध्याकाळी केलेला स्वयंपाक दुसर्‍या दिवशी डब्याला न्यायचा असेल तर स्वयंपाक झाल्यानंतर साधारण ३०-४५ मिनीटात दुसर्‍या दिवशीचे डबे भरुन फ्रीजमध्ये ठेवते. तेव्हढीच मनाची समजुत! तुम्हाला हवे असल्यास वेगवेगळे अन्न फ्रीजरमध्ये कसे साठवावे याबद्दल गुगल करा. बरीच माहिती उप्लब्ध आहे.
मी एकदा थॉ झालेले भाजी/वरण इत्यादी परत वापरत नाही. उरलेले परत फ्रीज करत नाही..चक्क टाकुन देते.
घरी असले की मुलांचा डबा ताजा बनवुन शाळेत मधल्या सुट्टीपूर्वी नेऊन देते. (गरम गरम वरण भात/पराठा/पोळी-भाजी रोल. मुले लहान असताना त्यांना मजा वाटते आणि मोठी झाली की तु.क. टाकतात. तु.क. कडे दुर्लक्ष करायचे.त्याच वेळी त्यांच्या शाळेत काही मदत हवी असल्यास करुन येते. शिक्षकही खुष असतात.
सकाळी मी एकटी घरी असले तर मुलांच्या डब्यासाठी केलेला स्वयंपाक असतोच. त्यांचा डबा नसला तरी मी काहीतरी वन डीश मील स्वतःपुरती करते.

काम करत असताना मात्र रात्रीचा स्वयंपाक डब्यात घेऊन जाणे/सँडविच सकाळी करुन डब्यात घेऊन जाणे/ बाहेर जेवणे/ ऑफिसजवळच्या दुकानातून सॅलड, ब्रेड घेऊन येणे आणि ते वेळेवर सँडविच किंवा नुसतेच सॅलड खाणे असे काही ना काही करावेच लागते. ऑफिसमध्ये न लाजता स्वतःचे नांव घातलेली जॅम आणि बटरची बाटली नेऊन ठेवते. कोणी तु.क. टाकले तरी त्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनाही ऑफर करते. Happy
स्वयंपाकाची पुर्व तयारी या विषयावर पुर्वी बरीच चरचा झाली आहे. त्याचा शोध घेऊन लाभ घ्यावा.

सकाळी १ डबा करायला खरच फार वेळ लागत नाही पण....झोप आणि कंटाळा आडवा येतो.

एके काळी सकाळी उठुन ताजा नाष्टा+डबे+फळं+ताक असे बरेच काही केले आहे त्यामुळे आता सकाळी उठल्याबरोबर ओट्यापाशी उभे रहाणे नको वाटते...>>>>>> इतकं सगळं साग्रसंगीत केल्यावर पुढे (सिनेमात दाखवतात तसं) दाराच्या ओट्यासमोर नवर्‍याला टाटा करायला उभी राहिलीस असा समज झाला एक सेकंद. Lol नंतर लक्षात आलं किचनचा ओटा.

बुवा, रिसेंटली मैने प्यार किया पाहिलाय त्यामुळे तुमचे वर्णन ऐकून सुमन डोळ्यासमोर आली प्रेम ला टाटा करणारी Proud

ओट्याशी टाटा Lol
शंक्र्या हापिस्ची ब्याग, लंच, साप आणि कमंडलू सांभाळत गाडीत बसतोय, आणि घाईत pant घालायची विसरून आंघोळीचा animal प्रिंटचा टॉवेल गुंडाळून आलाय हे आमच्या चक्षुसमोर आले.

कोण ही टाटा करणारी पार्वती ?
हपिस ची ब्याग अन कमंडलू म्हटल्यावर बुवाच आले माझ्या डोळ्यासमोर Lol
अमा, श्रीखंड ! मज्जाय हो.मला लंच ला चारी ठाव पोळी भाजीचं जेवण नाही आवडत. जड होतं फार . काहीतरी वन डिश मील नेते लंच ला. सँडविच ,भाताचा प्रकार, नूडल्स, पास्ता, सूप्/चिली वगैरे. पोळी भाजी फक्त रात्री. तेही मी सुमारे पाउण तासापेक्षा जास्त स्वयपाक करण्यात घालवत नाही.

पार्वती... तीच ती नवर्‍याने टाकून दिलेली. नाच रे मोरा वर डान्स करणारी, सारखा सारखा त्याच झाडावर काय विचारणारी, मेरा नाम है चमेली ... .. चली आई है अकेली कोल्हापूरसे गाणारी, नका हो बाई जाऊ विनवणारी, विडी ओढायचे विचित्र डोहाळे लागलेली, वगैरे वगैरे !!!!

Biggrin

Biggrin
बुवा, मी तेव्हढी सती सावित्री/ सीता/पार्वती नाही हो... नवरा भोळा शंकर आहे ते सोडा Wink
पार्वती कोण बादवे?

मित, Biggrin

मलाही! मितच्या पोस्टीन्न्तर कळले, मला वाटल कुठल्याशा मराठी सिरियलातली आहे का ते!( आप्ली उशिरा पेटली हे सान्गायचा केवढा तो सोस!)

बुवा, मृण्मयी आणि मित Lol Lol

वत्सला, नवरा आंघोळीला गेल्यावर बेडवर शर्ट पँट टाय मोजे काढून ठेवणे आणि त्याने शर्ट पँट घातल्यावर शर्टाचं तुटलेलं बटण शिवून देऊन दाताने दोरा तोडलास की सिनेमा पूर्ण होईल बघ. Biggrin

, श्रीखंड ! मज्जाय हो.मला लंच ला चारी ठाव पोळी भाजीचं जेवण नाही आवडत. जड होतं फार >> मी पण मूड असलाकीच नेते. असे करता येइल हे त्यांना सांगायला उदाहरण दिले.

जडशीळ
कोकीळ
नीळ

बाकी सर्वच Happy

पार्वती Lol
नवरा आंघोळीला गेल्यावर बेडवर शर्ट पँट टाय मोजे काढून ठेवणे आणि त्याने शर्ट पँट घातल्यावर शर्टाचं तुटलेलं बटण शिवून देऊन दाताने दोरा तोडलास की सिनेमा पूर्ण होईल बघ >>> मंजुतै ..निघताना शर्टाच्या खिशात रूमाल ठेवायला विसरलीस Wink .

Pages