वाईन्स, कॉकटेल्स फॅन क्लब.

Submitted by संपदा on 1 April, 2015 - 12:55

वाईन फूड पेअरिंग, वाईन चीज पेअरिंग, कॉकटेल्स, अल्कोहोलयुक्त डेझर्टस यासंबंधी चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा. आपल्या आवडत्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्कोहोलयुक्त डेझर्टस !! मागे एकदा कॉत्रेयु (उच्चार!!) सॉस विथ ऑरेंज क्रेपस खाल्ले होते. मस्त लागतात. नंतर कळाल कॉत्रेयु शराब होती है.

कॉकटेल रेसिपीजसाठी हे अ‍ॅप चांगलं वाटलं मला.

मी कॉकटेल्स फार रेसीपीज फॉलो करून नाही करत, मूडप्रमाणे आणि हाताशी उपलब्ध साहित्याप्रमाणे Happy करते.

तरीही

क्वाँत्रोचा उल्लेख आला आहे त्यावरून - मार्गरीटामध्ये टकिलासोबत मला ट्रिपल सेकऐवजी क्वाँत्रोचा स्वाद आवडतो. ग्रॅन्ड मार्निए ईव्हन बेटर (आणि स्वीटर). आणि ताजा लिंबाचा रस.

अर्धवट पिकलेल्या कैरीचा रस रममध्ये मिसळून त्यात ताजा पुदीना खलून केलेली मोहितो भारी लागते.

एकूणच तयार मिक्सेसपेक्षा ताजे ज्यूस कुठल्याही कॉकटेलमध्ये भारी लागतात. ताज्या लिंबांनातर पर्यायच नाही.

मार्टिनीज जिन-बेस्डपेक्षा वोडका-बेस्ड आवडते. लाइट - हॅन्गओव्हर नाही येत / कमी येतो.

इथे रेस्टॉरन्ट्समध्ये जी कॉकटेल्स सर्व्ह करतात ती मला भयंकर शुगरी वाटतात, त्यामुळे बाहेर जेवताना वाइनच बरी वाटते.

मॅन्चेगो चीज - तीन महिने वयाचं Happy - आवडतं. रेड / व्हाइट कुठल्याही वाइनबरोबर. गूडासुद्धा. पण त्यातली स्मोक्ड व्हरायटी नाही आवडत.

व्हाइट्समध्ये रीझलिंग्ज आवडतात - सहसा न्यूझीलंडच्या. थोडी फ्रूटी टेस्ट असते पण गोग्गोड नाही.
रेड्समध्ये आपल्या स्पायसी जेवणाबरोबर मागे शोनूने सजेस्ट केलेली बोज्यूले ही फ्रेन्च वाइन छान पेअर होते. ही थोडी चिल्ड हवी.
एरवी रेडमध्ये कॅबर्ने सुविनिऑन किंवा पिनोन्वा.
डेझर्ट वाइन्समध्ये मोस्कातो आवडते. स्पार्क्लिंग अ‍ॅस्टीपण.

बीअर 'ब्लू मून'. यात संत्र्याची फोड घालायची. मस्त स्वाद येतो. एरवी लिंबू. पण बीअर/एल्स हा प्रकार फारसा एक्सप्लोअर केलेला नाही.

वाइन पित, म्यूझिक ऐकत केलेला स्वैपाक जास्त चविष्ट होतो. Happy
(किंवा जेवताना आपल्याला चव कळत नाही आणि टीका ऐकू येत नाही असंही असेल. :P)

सांग्रिया!

हा प्रकार मी काही महिन्यांपूर्वी चाखला. आणि तद् नंतर प्रेमात पडलीय!

अजून घरी करून बघायचाय, केल्यानंतर रेसिपी शेअर करेन!

माझे एक आवडते कॉकटेल

नावः जिन रामगुंडम.

हिस्ट्री: माझ्या पहिल्याच स्क्रिप्ट्वर डॉक्युमेंटरी शूट होत होती रामागुंडम आंध्रा प्रदेश मध्ये. दिवसभर उन्हात बागडून मग ट्रेन ने घरी परत आले तेव्हा उन्हाळ्याचा कडेलोट झालाय असे वाट्त होते. मग हे बनवून एक घोट घेतला. हुश्श्य. तेव्हा असे घरोघरी एसी नसत कूलरही नसण्याचा काळ आणि आंध्रातला उकाडा. जीव गार गार पदार्थांसाठी अगदी तरसत असे.

साहित्यः जिन एक पेग, बर्फाचा चुरा, स्प्राइट, फ्रेश लिंबाचा रस व एक फोड.

कृती: नॅपकिनमध्ये बर्फ ठेवुन त्याचा लाटण्याने ठेचून चुरा करायचा. उंच ग्लासात पहिले जिन. मग तो अर्धा पाउण ग्लास बर्फाचा चुरा. मावेल तेवढे स्प्राइट. वरून एक फोड लिंबाची पिळायची. एक चकती हवीतर मध्ये सोडायची. मग ग्लास कपाळाला डोळ्याला लावत. गार गार महसूस करत प्यायची.
चीअर्स.

उन्हाळ्याची खास पेये/ सेमीपेये..
१. ताजी हुर्राक(१ भाग) + लेमन फ्लेवर तान (गोव्यातलेच लिम्का टाइप सॉफ्टड्रिंक)(२ भाग) + एखादाच बर्फाचा खडा. बाकी प्रमाण आपापल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अ‍ॅडजस्ट करू शकता पण बर्फ बदाबदा घालून सगळी चव बिघडवून टाकू नये. गारवा मिळण्यापुरता एखादाच खडा असावा.
बरोबर माशाची तुकडी, बॉइल्ड एग्ज, बाइट साइझ ऑम्लेटस बेस्ट. पण चुरमुरा भेळ, भिजवलेल्या कडधान्याची भेळ किंवा बाकी नेहमीचा काही चकणा चालेल पण चकणा जेवायचा नाही. चखण्यापुरताच. Happy

२. जेली शॉटस - हे बच्चेकंपनीचे आवडते सेमीपेय (बच्चे हे अल्कोहोलमधे बच्चे असलेले पण वयाने सज्ञान या लोकांसाठी म्हणलेले आहे.) सेमीपेय कारण ते जिभेवर पाडून गिळून टाकायचे असले तरी क्वचित चावल्यासारखेही करावे लागते आणि सॉलिड स्टेटमधे असते.
जेली करण्याची तयार पाकिटे मिळतात ती आणून त्यातल्या पाण्याचे प्रमाणात अल्कोहोल अ‍ॅडजस्ट करायचे.
२ कप पाणी सांगितले असेल तर पाऊण कप व्होडका आणि सव्वा कप पाणी घ्यायचे.
पाऊण कप(किंवा पाकिटावरच्या पाण्याच्या प्रमाणे जे कॅल्क्युलेशन होईल ते) व्होडकामधे ५-६ पुदिना पाने अगदी बारीक खलून तो रस पानांच्या बारीक तुकड्यांसहीत घालायचा. आणि ती व्होडका गार करायला फ्रिजात (डिप नव्हे) ठेवायची.
पाणी उकळायचे. एका कोरड्या भांड्यात जेली पाकीटातली दोन्ही पाकीटे रिकामी करून कोरडीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. उकळलेले पाणी त्यात घालायचे. कोरडी पावडर लगेच विरघळते. सगळी पावडर विरघळून एक रंगीत द्रव तयार होतो. मग त्यात गार केलेली व्होडका हळूहळू घालायची. एका हाताने ढवळत रहायचे. सगळी व्होडका ओतून झाली की लगेच छोटे छोटे कप्स असतील त्यात एकेक डाव द्रावण भरायचे. सगळे कप्स भरले की फ्रिजात सेट करायला ठेवायचे. हे प्लास्टीक कप जेवढे छोटे तेवढे सेटींग पटकन होणार. साधारण तासाभरात शॉटस तयार होतात.

यावर्षी अगार अगार आणून आपल्याला हवा तसा फ्लेवर मॅनिप्युलेट करून बघायचा विचार आहे. सक्सेस झाल्यास देईन इथे.

जेली शॉट्स साठी व्होडका व्यतिरीक्त अजून कायकाय वापरता येईल? जेली पाकिटं प्लेन फ्लेवरची घ्यायची आहेत ना?

जेली पाकिटं प्लेन फ्लेवरची?
प्लेन आणि फ्लेवर?

कैरी, स्ट्रॉबेरी फ्लेवर उत्तम जातो.

धन्स मंजू ट्राय करेन.
अल्कोहोल आहे, साखर नाही घालणार त्यामुळे सेट होण्यावर काय परिणाम होईल की कसे ते माहित नाही म्हणून आधी ट्राय करून बघेन.

अगं प्लेन म्हणजे प्लेन. Happy कैरी फ्लेवर पाहिला नाही, पण घरात स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज आहे. ट्राय करून बघूया म्हटलं. (मी कॉकटेल्स बनवण्यात बर्‍यापैकी ढ आहे!!)

जेली शॉट्सची आयड्या इंटरेस्टिंग.
जेवण झाल्यावरही बार कॅबिनेटकडे आशेने बघत राहणाऱ्या मैत्रगणांना आईस्क्रीमवर (किंवा खाली) घालूनही देता येईल Happy

आईस्क्रीमवर नको...
दूध + अल्कोहोल होईल ते. वाट लागू शकते.

आणि जेली शॉटसना जी अल्कोहोलची टेस्ट येते ती अजिबात दुधाबरोबर जाणारी नसते तेव्हा असा गोपाळकाला करू नका.

हे मी ट्राय केलेले हुर्राकचे जेली शॉटस.
मँगो फ्लेवर(तोच होता घरात) बरोबर केले होते.
अगार अगार बरोबर केले असते तर अजून मज्जा आली असती.
hurrak-jelly-shots!.jpg

प्लम, पेअर्स रेड वाईनमध्ये थोडीशी उकळून थंड केली की आईसक्रीम, सॉर्बे, पुडिंग्स इ. थंड पदार्थांवर घालून खाऊन बघा. अफलातून लागतात.
रेड वाईनमध्ये लवंग, दालचिनी, वेलची घालून उकळायची, आटवली तर उत्तमच :). मग ते मिश्रण थंड करून हव्या त्या डेझर्टवर घालून खायचे. ह्या मिश्रणाबरोबर संत्र्यांचा फ्लेवर फार मस्त मॅच होतो. हवंतर संत्र्याची साल वाईन उकळताना घालायची किंवा ताज्या संत्र्याच्या फोडी आईसक्रीम आणि हा सॉस घालून खायचा.

ह्म्म हे करून बघायला हवे.

वाईन्सचे ठिक जात असावे पण जेली शॉटसची जी चव होते तयार ते समहौ मला तरी आईस्क्रीम बरोबर जाईल असं वाटत नाहीये.

बादवे वाईन अशी उकळल्यावर त्यातले अल्कोहोल किती टिकत असेल?

किती अल्कोहोल उरते त्याची कल्पना नाही पण व्हॅनिला आईसक्रीमबरोबर फार मस्त लागते. बर्‍यापैकी कॉमनली केली जाणारी कृती आहे ही.

हे जेली शॉट्स काही रेस्टॉरेंट्स मधे ( भारतात नाही पाहिले) थोड्या जाडया सीरींज( मायनस द नीडल Happy ) मधे सेट करतात ..मग घेताना सुटक्न सीरींज डायरेक्ट उघडलेल्या तोंडात .. खरोखरचा शॉट लागतो ..पार आतल्या घशा ला .. मस्त गारेगार वाटतं..

व्होडका पाणी पुरी हा एक प्रकार मस्त होतो.<<< येस्स. माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. पण चेन्नईला आल्यापासून बर्‍याच दिवसांत खाल्ला नाही. Sad Sad

चेन्नई अतिशय बेक्कार जागा आहे याबाबतीत.

परवाच्या रवीवारी कोरीगस्सी सोबत केलेले कोंबडशेपूट →

कलिंगडाच्या (टरबूज) बारीक फोडी करून बिया काढून डायरेक्ट फ्रीजरमधे टाकणे.
त्याचा बर्फ झाल्यावर मिक्सरमधे फिरवून घेणे.

कोलिन्स ग्लासात (सरळ उभा उंच ग्लास, सुमारे ३०० मिलि साईज) थोडा पुदिना, लिंबाचा रस अन आल्याचा तुकडा, चिमूटभर मीठ मडल करणे (छोट्या लाकडी मुसळीने चेचणे) ग्लासच्या कडांना मी मीठ लावून घेतले होते. (ग्लासच्या कडेवर लिंबाची फोड घासून ग्लास मिठात उपडा करणे.मीठ चिकटते, त्यानंतर हा ग्लास वापरायची वेळ येईपर्यंत फ्रिजात ठेवतात)

यात ६०-९० मिलि व्होडका, क्रश केलेले फ्रोझन कलिंगड सुमारे पाऊण हाईटपर्यंत, वर सोडा. पुदिन्याच्या पानाने गार्निश करून मग सर्व्ह केले. शक्य होईल तेव्हा फोटू टाकण्यात येईल.

नंदिनी चेनै च काय सांगतेस, दोस्त कंपनी असली तर मंगळावर मण मजा येते.
कॉकटेल्स , बनवायची , पेश करायची , आस्वाद घेत गप्पा हाणायच्या . पुढच्या कॉकतेल्स साठी कल्पना सोचायच्या. Lol

मी इथे पूर्वी टाकलेल्या कोंबडशेपट्यांच्या रेस्पीजची रिक्षा.
कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा
लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

अरभाटाने टाकलेल्या कोंबडशेपट्या..
हॉट व्हिस्की
बर्निंग बुधवार

Pages