तडका- फसवा-फसवी दिन

Submitted by vishal maske on 31 March, 2015 - 21:33

फसवा-फसवी दिन,...

आपण फसु नयेत म्हणून
कुणी तयारीत बसले जातात
हलगर्जीपणामुळे कधी
कुणी सहज फसले जातात

कुठे फसवल्याचा हर्ष तर
कुठे फसल्याचा शीन असतो
फसणार्‍या अन् फसवणारांचा
हा फसवा-फसवी दिन असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा़झ्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले. सकाळी पेट्रोल भरायला गेलो तर २९ रुपये लिटर !!
टाकीच फुल्ल केली. एव्हढ्यातच म्हाडा आणि सिडकोच्या जाहीराती पाहील्या. सिडकोतर्फे वाशी, नवी मुंबई येथे साडेतीन लाखात ३ बीएचके आणि म्हाडातर्फे नरीमन पॉइंटला २ बीएचके पाच लाखात. प्रत्येकी एक एक बुक केला !

अच्छे दिन आ गये रे भैय्या, अब सुख आयो रे

आता चाललो बुलेट ट्रेनात बसून अहमदाबादला. सरकार फुकटात इंडस्ट्रीयल प्लॉट्स देत आहे आणि धंद्यासाठी स्वस्त लोन सुद्धा !!!

संपूर्ण भारतबर्षात आजपासून बुलेट ट्रेन सुरू !
जुमलाबाद एक्स्प्रेस नामकरण !

आमचा प्रतिनिधी
फेकू न्यूज

शी-दिन

ईईईई !!

तुम्ही अत्यंत बंडल लिहिता. हे तुम्हाला आजवर कुणी सांगितलं नसेल, तर आज ऐका.

आज कित्येक दिवसांनी आम्ही गुलमोहरावर काव्यसुमने वेचण्यास आलो असता अख्ख्या फोरमभर फुलांऐवजी तुम्ही पाचोळा पसरून ठेवला असल्याचे नजरेत आले आणि आम्ही 'एप्रिल फूल' ठरलो.

मराठी कविता व साहित्यावर दया करा व आपली लेखणी कृपया म्यान करा.

हे तुम्हाला पटणार नाहीच आणि तुम्ही व तुमचं पॅराजंपे हा फेकू आयडी खडूसरावांवर चिडाल. तुमच्या चिडण्याने खडूसरावांना काहीही फरक पडत नाही. तुमच्या प्रत्येक बाफवर आम्ही असेच सुनावत राहू.

खडूसराव, दु:खी दिसताय. पॅराजंपेंनी हाणलेलं दिसतंय तुमच्या वरिजिनलला. पर काय हाये सांगू का, येडछापपणा केला का न्हाय तर मंग बाळासाहेब हाणतातच वं. तुमच्या वरिजिनलला म्हणावं वाईच डोस्कं तपासून घ्या Wink
कवीचा लंबर हाये खाली. पॅराजंपेंना हितं काई काई लोक पर्सनली वळखतात. त्यांचा बी लंबर हाते लोकांकडं.
लंबर बघुनशानच प्रतिसाद दिल्तं नवकवीला.. कळ्ळं का ?
आता तुमचा लंबर टाका बघु हितं गपगुमान

निकाळजे, हा आयडी शोभतो. खरा वाचक हा आयडी तुमच्या स्वभावाला धरून नव्हताच. तर आता सोंग उघड झालं , आता भोआकफ.

म्हस्के घाबरू नका
मायबोलीवर सगळ्यांशी भांडण केलेले कवी आहेत ते. यांच्या जवळपास मनुष्य, प्राणी, कीटक किंवा कुठलाही जीव फिरकत नाही. तुमच्या कवितेला सर्वोत्कृष्ट म्हटल्याने त्यांचा बहुतेक जळफळाट झाला. आता आहे ते आहे, यांनी चांगली कविता लिहावी, तिलाही चांगली म्हणू. पण म्हणतात ना आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार ?

बाकी तुम्ही स्वतःच त्यांचे पाहुणे नसाल म्हणजे मिळवली. तसेच नवेच कुणीतरी दिसताय म्हणा ( फोन नंबर दिल्याने खात्री आहे. पण फोन नंबर देणा-यंनी कारकीर्द गाजवलेली आहे मायबोलीवर.)