भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ.>>> असाही अँगल असू शकेल असे खरेच वाटले नव्हते.

असाही अँगल असू शकेल असे खरेच वाटले नव्हते.<<< ज्यावेळी अपघात झाला तेव्हाच तसा अँगल फाईल झाला होता. एफ आय आरची कॉपी बघ. पंचनाम्यामध्येपण तेच नमूद केलेलं आहे. सलमान व्हीलवर नव्हता असे प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेले आहे. त्याच्यासोबत असलेल्या कॉन्स्टेबलची पण तीच साक्ष होती. ड्रायव्हरनं तशी साक्ष ऑलरेडी दिलेली आहे.

आता कोर्टात खुद्द सलमानच्या साक्षी चालू आहेत म्हणून मीडीयाला जाग आली आहे!!!

ओह ! मटाच्या बातमीत काही वेगळेच लिहिले आहे.

http://www.maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Salman/art...

'हिट अॅण्ड रन' खटल्यातील आरोपी व अभिनेता सलमान खान याचा ड्रायव्हर अशोक सिंग (४२) याने अपघाताच्या दिवशी सलमान नव्हे, तर मी गाडी चालवित होतो, अशी कबुली सोमवारी सेशन्स कोर्टापुढे दिली. पहिल्यांदाच ही धक्कादायक माहिती पुढे आल्याने खटल्याला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने अपघाताविषयी पोलिसात तक्रार केली होती व त्याने सलमान खान हा गाडी चालवित असल्याचे मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे दिलेल्या जबाबात म्हटले होते.

काँस्टेबलची ती साक्ष नव्हती.
त्याने स्वतः सलमान गाडी चालवत होता अशी तक्रार नोंदवली.
(टीबीने वारला बिचारा- काँस्टेबल!)
सलमान म्हणाला काँस्टेबल झोपला होता, माझ्या साईडचे दार लॉक झाल्याने मी ड्रायवर साईडने उतरायला गेलो तर चुकून काँस्टेबलला वाटले की मीच त्यावेळी गाडी चालवत होतो.
सगळे गाडीत चढले तेव्हा सलमान गाडी चालवत होता, पोलिस जागा होता, मग झोपला आणि मध्येच सलमानला बाजूला करून ड्रायवरला गाडी चालवायची हुक्की आली. आपल्या सहृदय सलूने त्याची इच्छा पूर्ण पण केली. तर ड्रायवरने हे प्रताप करून ठेवले बघा!

अरे पण त्याची गाडी अ‍ॅटोमॅटीक होती ना ? म्हणजे बिनड्रायव्हरची ?
कंपनीच्या रेप्युटेशनसाठी स्वतःवर घेतला होता का गुन्हा ?? की देवदास मोडचा अंमल झाल्याने त्यावेळी खुदखुशीची अंमळ इच्छा झालेली पण आता मात्र जान की समझ जाने के बाद उपरती झाली ?

काही असो,गेलेल्या जिवांची भरपाई कशानेही होणार नाही. असं कधीही होऊ नये पण समजा जर उद्या अशा गरीबाच्या ट्रकखाली एखाद्या उद्दाम सिनेअभिनेत्याची गाडी आली तर ?

पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ.>>
गुन्हा तो गुन्हाच , अश्या प्रकारे कायद्याची फसवणूक चुकिचिच की, भले ति नेक रिझन साठी असली तरी,मला हे अ‍ॅनेलिसिस पटलेच नाही, जे लोक मारले गेले त्यान्च्या न्यायाचे काय? अशा युक्तिवादामुळे आणी सेलेब्रिटी इन्ह्वोव असल्याने त्याना न्याय मीळालाय उशिर झालाच की!

बाकी सलमान अ‍ॅज पर्सन चान्गला असेल्/आहे.

संतोष मानेचा गुन्हा शाहरूख खानाने आपल्या शिरावर घ्यावा, म्हणजे सलमान खानला डाऊन करता येईल...

तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,>>

काही गरज नाहिये! फटाफटा शिन्का याव्या तसे धागे काढत सुटता, सर्व्हर स्पेस काय फुकटात मिळते का? माय्बोलिच व्यासपिठ फुकट मिळाले म्हणून आली शिन्क( शन्का) कि काढ धागा..

तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,>>

शिवाय असे वारंवार पोल काढवेत का यावरही एक पोल होउन जाउदे. होउदे खर्च.

माय्बोलिच व्यासपिठ फुकट मिळाले म्हणून >>>> रुन्मेश,होऊन जाऊ दे या विषयावर. प्राजक्तातै, तुमचा प्रतिसाद म्हणजे आपलं उंटावरची काडी बरं का. या आधी अनेक जणांनी कमालापमान करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला आहे. तर होऊ द्या दंगल

अवांतर: फेसबुक वर वाचलेली कमेंट -

हि केस अजुन काहि वर्ष चालली असती तर सलमान टांगा चालवत होता आणि घोड्याने दारु प्यालेली होती अशी नविन साक्श बाहेर येइल... Happy

राजस्थानमे काले हिरन शिकार के कथीत केस मे नया मोड सामने आया है !!

पता चला है की उस मृतक हिरन के भाईने जज के सामने आके ये बयान दिया है की वस्तुतः वो गोली सलमान खान के नौकर रामलाल ने चलाई थी पर सलमान ने रामलालको बचाने के लिये ही ये मुआमला अपने सर पर लिया है, और उस इसके आगे, वोह हिरनके भाईने ये माँग की है की सलमान खानको छोडा जाय और रामलाल को इस मुआमले मे गिरफ्तार किया जाए !!

प्राजक्तातै, तुमचा प्रतिसाद म्हणजे आपलं उंटावरची काडी बरं का. या आधी अनेक जणांनी कमालापमान करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला आहे>>
नाही हा कमाल अपमान वाला शब्द नाही यापेक्षा उच्च सासदिय भाषेत मायबोलीवर अपमान केले जातात पण मी त्या लेव्हलला जाणार नाही
काड्या लावुन मजा बघत बसायला मला वेळही नाही , जे काही सान्गायच ते एका पोस्टीत सान्गितलय त्यापेक्षा अजुन लिहोत बसायला वेळ आणी intrest माझ्याकडे नाही!

अवंतिका मालिका आठवतेय का कोणाला? त्यातसुद्धा सेम असंच घडलं होतं.

बाकी ऋन्मेषना मायबोलीकरांची नाडी अचूक सापडलेली आहे. त्यांनी धाग्यातला ध म्हणायचा अवकाश, धागा नको धागा नको म्हणत मोर्चा येतो आणि प्रतिसादसंख्या फुगते. धाग्याचा टीआरपी वाढतो. लगे रहो.

काड्या लावुन मजा बघत बसायला मला वेळही नाही >>> उंटावरची काडी याचा अर्थ काड्या लावणे हे माहीत नव्हतं. नव्या माहीतीबद्दल धन्यवाद.

हि केस अजुन काहि वर्ष चालली असती तर सलमान टांगा चालवत होता आणि घोड्याने दारु प्यालेली होती अशी नविन साक्श बाहेर येइल.. >>> अगदी अगदी. २००२ साली जे कुणी प्राणी गुजरातेत मृत्यू पावले त्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि राज्य दुसरेच कुणी चालवत होते अशीही साक्ष येईल काही दिवसांनी.

कोण?
कुणाचा?
कशासाठी?

गुन्हा शिरावर घेतं याचं उत्तर इथे मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=pu2wULVZgKM

बरं हे उत्तर तुमच्या "राजश्री"नंच देऊन ठेवलंय आणि तेही फार पूर्वीच.

नंदिनी,
ज्यावेळी अपघात झाला तेव्हाच तसा अँगल फाईल झाला होता. एफ आय आरची कॉपी बघ. पंचनाम्यामध्येपण तेच नमूद केलेलं आहे. सलमान व्हीलवर नव्हता असे प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेले आहे. त्याच्यासोबत असलेल्या कॉन्स्टेबलची पण तीच साक्ष होती. ड्रायव्हरनं तशी साक्ष ऑलरेडी दिलेली आहे.आता कोर्टात खुद्द सलमानच्या साक्षी चालू आहेत म्हणून मीडीयाला जाग आली आहे!!!

>>>>>>>>>>>>>>

जर तेव्हाच हे क्लीअर झाले होते तर एवढे दिवस सारे सलमानचे नाव का घेत होते. आणि सलमानही काही यावर बोलत का नव्हता. आजच अचानक हि न्यूज का? सलमानने एवढे दिवस हि साक्ष का दिली नव्हती.. दिली असली तर मिडीयात चर्चा का नव्हती..

सलमानने आपल्या ड्रायव्हरला वाचवायला म्हणून हे एवढे दिवस लपवले हे कबूल करायला हरकत काय आहे.. सलमान नट म्हणून आवडत नसेल तरी एक माणूस म्हणून त्याकडे बघा..

सलमान नट म्हणून आवडत नसेल तरी एक माणूस म्हणून त्याकडे बघा.. >>
नंदिनी ला सल्लु आवडत नै .. अरे ऋन्मेष ... काहीही काय बोलतोय ते पन पब्लिक फोरम वर .. हे भगवान ये वाचनेसे पहेले मेरी आखे फुट क्यु नही गयी ... नंदिनी धाव..

सल्लु मेरेकु भी आवडता पण भारतरत्न म्हणजे काय हलवा आहे कुणालाही वाटत सुटायला .. कैच्याकै ..

हि न्युज तर माहितीच नव्हती .. च्यायला टिव्ही नसला कि हे अस होत .. असो . looking forward.. fingers crossed .. Happy

सल्लु मेरेकु भी आवडता पण भारतरत्न म्हणजे काय हलवा आहे कुणालाही वाटत सुटायला .. कैच्याकै ..+१

Pages