भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मूळ quote असे आहे An excuse is worse and more terrible than a lie, for an excuse is a lie guarded.

ह्याचा अर्थ सहज सोपा नि कोणालाही समजण्यासारखा आहे.

Excuses देणे हे खोटं बोलण्यापेक्षा अधिक वाईट असते कारण excuse देणे म्हणजे एकाप्रकारे (आवरणातले/छुपे) खोटे बोलणे असते.
ऋन्मेऽऽष, कायम आपल्या विधानांचा बचाव करणारी कारणे द्यावी लागणे आणि ती देणे ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत, ज्या तू सतत करतो आहेस. It is not good for you. Stop doing these.

जिज्ञासा तुम्ही अर्थ सांगितलात तोही किती अवघड मराठीत, थांबा मी जरा अजून सोपा करून सांगतो.

An excuse is worse and more terrible than a lie, for an excuse is a lie guarded. >> घोड्याची लाथ आपलं घोडचूक ही गाढवाच्या लाथेपेक्षा च्च्च्च्च्च गाढवपणा करण्यापेक्षा जास्त वाईट आणि ड्यांजर असते कारण घोडचूकीत गाढवपणा केलेलाच असतो.

असं सोप्या मराठीत सांगायचो हो कारण... लाथों के भूत ..... Proud

तर ऋन्मेष भाऊ तुमच्याच भाषेत सांगायचे झाले तर असे बघा.... मैत्रिणीच्या हातात आपला मोबाईल देणे हा गाढवपणा आहे पण तिला त्या फोनमध्ये दुसर्‍या मुलीचे फोटो सापडले की 'ही माझी लांबची बहीण' असे कारण देणे ही घोडचूक आहे कारण त्या दुसर्‍या मुलीचा नंबर फोनबुक मध्ये स्टोअर करण्याचा गाढवपणा तुम्ही आधीच केला आहे हे विसरलात. .:हाहा:

माफ करा पण ऋन्मेषचा काही जणांना राग आलाय हे खरे असले तरी केवळ तो उद्धटपणे बोलत नाहिये म्हणुन त्याला फारच ऊद्धट्पणे किंवा खवचट्पणे काहीजण बोलत आहेत. जर तो थांबत नाहिये तर इतर तरी थांबा. तसेही मायबोलीवर कोण आपली चुक कबुल करते? मग त्यानेच कबुल करावी हा आग्रह सोडला तर चालु शकेल की.

सुनिधी तुम्ही धाग्याला तर फुल सर्कलच देऊन टाकलात की

सलमान ने माणसं मारली पण तो आमचा हीरो आहे तर त्याची शिक्षा माफ करा, तो ग्रेट आहे.
ऋन्मेष ऊलटं सुलटं काहीही का बोलेनात पण ऊद्धट बोलत नाहीये तर ईतरांनी त्याला बोलू नका.

आता फुल सर्कल झालेच आहे तर 'ओह ऋन्मेष तुस्सी ग्रेट हो !!!' म्हणत मीही सगळ्यांनी आता थांबून घ्या असे सुचवतो.

सुनिधी धन्यवाद,

लोकहो, सलमानला अजून अंतिम शिक्षा झाली नाहीये. मोठ्या कोर्टात त्याच्यावर केस चालू आहे. त्या आधीच त्याला आरोपी म्हणने हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. याउपर सलमान तुमच्यावर बदनामीचा दावाही ठोकू शकतो हे लक्षात घ्या.

सलमानला अजून अंतिम शिक्षा झाली नाहीये. मोठ्या कोर्टात त्याच्यावर केस चालू आहे. त्या आधीच त्याला आरोपी म्हणने हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. याउपर सलमान तुमच्यावर बदनामीचा दावाही ठोकू शकतो हे लक्षात घ्या.

घाबल्लो बलं मी ! Uhoh

अ‍ॅड्मिनला विनंती साहेबांच्या पायाचा भमो वॉमॉ करुन मायबोलीवर दिसेल अशी व्यवस्था करावी.

सलमानला अजून अंतिम शिक्षा झाली नाहीये. मोठ्या कोर्टात त्याच्यावर केस चालू आहे. त्या आधीच त्याला आरोपी म्हणने हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. >>

अरे बाळा,
गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्तीला "आरोपी" असेच म्हटले जाते. म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे तो.
आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर "गुन्हेगार" म्हणजे आरोप सिद्ध झाल्यावर जो होतो तो.

कल्लं का?

याउपर सलमान तुमच्यावर बदनामीचा दावाही ठोकू शकतो हे लक्षात घ्या.>>

इश्श्य Blush

लोक हो
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गामा_पैलवान_५७४३२ | 14 May, 2015 - 22:08
उद्देश,

१.
>> असे कृत्ये करणार्या लोकांना सडवलेच पाहीजे

आसारामबापूंचा गुन्हा आजून सिद्ध व्हायचाय.

२.
>> गामा तुमच्याबरोबर असे अाले तरी असेच व्हावे.

केवळ संशयावरून कुणालाही तुरुंगात डांबले तर तुम्हाला आनंद होतो. तुम्ही भारतीय न्यायव्यवस्थेचा उपमर्द करीत आहात.

आ.न.,
-गा.पै.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे साहेब देखील ऋन्मेषचे नातेवाईक आहे. जसा ऋन्मेष यांचा सन्मान चालू आहे तसाच यांचा देखील सन्मान करावा. Proud

चला, नव्या धाग्याची वेळ झाली.
विखारी प्रतिसाद देण्याऐवजी सुयोग्य विषय सुचवून कॉण्ट्रीब्यूट करा बरे.

मग समजेल, ऋन्मेऽऽष ह्या आयडी(ला आणि त्याच्या मालका)ला तुम्ही किती ओळखलेत ते.. Proud

ओके रुयामा, हा घे विखारी प्रतिसाद ज्याच्यातून वाट्टेल तितके 'सुयोग्य' विषय निघतील - "त्याच्या मालकाला शिझोफ्रेनियाची ट्रीटमेंट आवश्यक आहे."

सलमानला अजून अंतिम शिक्षा झाली नाहीये. मोठ्या कोर्टात त्याच्यावर केस चालू आहे. त्या आधीच त्याला आरोपी म्हणने हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. याउपर सलमान तुमच्यावर बदनामीचा दावाही ठोकू शकतो हे लक्षात घ्या. >> लोल Rofl हसून हसून गडाबडा लोळण.
ऋन्मेष, काय करू रे मी तुझं (कारेदुच्या नंदिनी नावाच्या म्हषीच्या टोनात वाचावे)

किती ती कातडी ओढून घ्यावी डोळ्यावर. गुन्हा केल्यावर सलमान पळून गेला याचाच अर्थ त्याने तो गुन्हा स्वतःशी कबूल केला. लोकप्रिय असल्याने लोकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा परिस्थितीपासून पलायन करण्याचा त्याचा निर्णय मानव्य सुलभ आहे. गुन्हा सिद्ध झाला आहे कोर्टात. आणि कोर्ट काय मुर्ख आहे का सलमानला उगिचच अडकवायला? आग असल्याशिवाय धूर निघत नाही.
आमच्यावर बरे असे दावे ठोकत नाही कुणी.

आणि गुन्हा सिद्ध झाला नाही (दुर्दैवाने) तर तो निव्वळ पावर आणि पैशाच्या जोरावर मिळवलेला नकारात्मक (अ)न्याय असेल. त्या केसमध्ये तर सर्व जनतेच्या मनातून तो उतरेल यात शंका नाही.

अहो, हायझेनबर्ग तसं नाही. पण एकंदर या वादाला पुर्णविराम मिळणार नाहीये तसेच दोन्ही पार्टींची मते एकमेकांना कळुनही तेचतेच लिहिण्याचे चक्र सुरु झाले होते व शेवटी फक्त मुद्दे मुद्द्याने खोडणे हा प्रकार न रहाता प्रतिसाद वेगळ्याच पातळीवर चालले होते असे जाणवले म्हणुन लिहिले.

गुन्हा केल्यावर सलमान पळून गेला याचाच अर्थ त्याने तो गुन्हा स्वतःशी कबूल केला.
>>>>
हा काही युक्तीवाद होऊ शकत नाही. कुठल्याही कोर्टात चालत नसावा. आपल्यावर आळ येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या भितीनेही लोक पळतात. उलट साधी माणसंच अश्या परिस्थितीत जास्त घाबरतात.

लोकप्रिय असल्याने लोकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा परिस्थितीपासून पलायन करण्याचा त्याचा निर्णय मानव्य सुलभ आहे.
>>>>>>>
एक्झॅक्टली, जी गोष्ट मानव्य सुलभ आहे त्यासाठी एखाद्याचा तिरस्कार करणे कितपत योग्य.

गुन्हा सिद्ध झाला आहे कोर्टात. आणि कोर्ट काय मुर्ख आहे का सलमानला उगिचच अडकवायला? आग असल्याशिवाय धूर निघत नाही.
>>>>>>>
एका कोर्टात सिद्ध झाला आहे पण केस वरच्या कोर्टात गेली आहे, याचा अर्थ अजूनही अंतिम निकाल लागला नाहीये.
आपण म्हणालात त्याच धर्तीवर असेही म्हणू शकतो की गुन्हा सिंद्ध झाला आहे तर कोर्ट काय मुर्ख आहे का जे त्याला अजूनही मोकळे सोडलेय?

Pages