लोकप्रतिनिधींची निषेधार्ह कृत्ये (पक्षनिरपेक्ष)

Submitted by मिर्ची on 31 March, 2015 - 04:40

पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्‍या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.

वि.सू. - नकारात्मक गोष्टी वाचल्याने त्रास होणार्‍यांनी धाग्यापासून लांब रहावे. चिडचिड होणे, रक्त उसळणे असे आजार उद्भवल्यास धागाकर्ती जबाबदार नाही. Proud (स्वानुभव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग त्यांना दंड व्हायला पायजेल होता.

Driving without Helmet
First Offence: Fine up to Rs. 100; Subsequent Offence: Fine up to Rs. 300

बाकी, हेल्मेट न घातल्याने लोकांचं कसं नुकसान होतं समजलं नाई.

बसपा च्या सर्वेसर्वा असणा-या व्यक्तीने एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडून मतं खाण्यासाठी मेतकूट जमवलेलं आहे. निवडून न येईल असा उमेदवार द्यायचा, मतांमधे फाटाफूट करायची यामुळं त्या पक्षाचे नेते गंमतीने आम्हाला बिसपा फॅक्टरची मदत झाली असे म्हणत, पुन्हा बसपा म्हणजे बिजली सडक पाणी असे सांगून हशा घेत, त्यामुळे प्रकरण हसण्यावारी जाई.

पण राजकारण असेच चालते. ज्यांच्यातून विस्तव जात नाही असे म्हटले जाते नेमके त्यांच्यात मेतकूट असते. आठवा बारामतीतला व्हॅलेंटाईन डे... ज्याच्यामुळे विनाशर्त पाठिंब्याचा खुलासा झाला. आता विसरा ते धरण प्रकरणी चौकशी वगैरे.

या गोष्टींना सध्याच्या व्याख्येप्रमाणे भ्रष्टाचार म्हणता येत नसलं तरी खरं म्हणजे हा भ्रष्ट आचारच आहे.

http://www.amarujala.com/feature/national/how-bjp-became-largest-party-o...

आज दुपारी मला एक ०२० वरून सुरू होणा-या नंबरवरून फोन आलेला. फोन वरून पलिकडच्या बाईने विचारलं की आप बाळू पॅराजंपे बात कर रहे है ना ? मला आधी नीट कळालंच नाही म्हणून " क्या है ?? असं विचारताच ती म्हणाली क्या मेरी बात ........... ....... से हो रही है ? " मी म्हटलं जी हां,लेकीन काम क्या है " असं म्हणताच फोन खाडकन बंद.

च्यायला म्हटलं सदस्य तर नाही ना झालो मेंबरशिप ड्राईव्ह मधे ? म्हटलं फोन करून विचारावं आणि झापावं. तर तेव्हढ्यात ही बातमी वाचली आणि बेत रद्द केला. म्हटलं स्वतःहून फोन केला तर अध्यक्षच बनवतील पक्षाचा.

आंध्रप्रदेश सरकारकडून आमदारांना आयफोन्सची भेट.
१७५ MLA आणि ५० MLC, एका आयफोनची किंमत सुमारे ५३,००० रूपये.
२२५ x ५३,००० = १.१९ कोटी
करदात्यांना सुमारे १.२ कोटींचा भुर्दंड. राज्यात १७.५८४ कोटींची वित्तीय तूट आहे.

जेव्हा राजकारणातील एखादी व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचते तेव्हा तिने शब्द वापरताना जपून वापरावे लागतात परंतु हे साधे ज्ञान गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना नाही हे खालील प्रकारावरून वाटते आपल्या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या स्त्रियांना मागण्या तर दूरच राहिल्या त्यांच्या रंगावरून, प्रकृतीवरून सल्ले देणारा धन्य तो मुख्यमंत्री नि धन्य तो पक्ष

http://www.lokmat.com/storypage.php?newsid=5049985&catid=22

गिरीराजच्या वक्तव्यावर नायजेरियन सरकार ने पण टिका केली आहे मोदीच्या काही मंत्र्यांची लायकी काय आहे हे जगासमोर आली
जगात देशाचे नाव एतिहासिक बदनाम झाले
लाज वाटायला पाहीजे

अश्या बरळणार्या दोन चार जणांना जाहिर तंबी दिली पाहिजे मोदींनी. बाकिच्यांना वचक बसेल.

You expect Mr. Modi who called Mrs. Gandhi a jersey cow and rahul a hybrid calf to scold Mr. Giriraj singh? How naive you can be?

अगदि बरोबर, पण याच 'मायलेकरांनी, मोदिंविरुध्द वापरलेली भाषा तुम्हाला आठवतच नसेल.

बॅक टु ट्रॅक. Happy
पंजाबमध्ये सुद्धा मुख्यमंत्री, स्पीकर्स, आमदार ह्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. ह्या बातमीनुसार वेतनवाढीचं बिल केवळ १० मिनिटात, बिनविरोध मंजूर झालं.
"Punjab’s decision to enrich its Chief Minister, Speaker, and the legislators will cost it more than Rs20 crore annually. And it took less than ten minutes for the State Assembly to take the decision. Four Bills, regarding hike in the salaries of Speaker, Deputy Speaker, Chief Minister, Deputy Chief Minister, Leader of Opposition, Ministers, MLAs, along with the pensions to the former legislators, were “unanimously” passed by the House within 10 minutes without any detailed discussion."

jersey cow >>> Sad तोंडून असं कुणाबद्दल गेलं तरी नंतरही माफी मागून टाकावी. प्रत्येकाच्या सुधारणेला नेहमीच वाव असतो. चुकांच्या वर उठून स्वतःला आणि सहकार्‍यांनाही अश्या चुका पुन्हा पुन्हा करण्यापासून रोखता येईलच.

सर्वच राजकारण्यांनीच हे पथ्य पाळले तर प्रत्यक्षात आणि सोशल मिडियावर चालणारे राजकारणाचे क्षुद्रपर्व अटोक्यात येईल.

भारतीय जनता पक्षाचे नगर जिल्ह्य़ातील खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने तंबाखूजन्य उत्पादनांमुळे कर्करोग होतो असे कुठलाही भारतीय अभ्यास सांगत नसल्याचा अहवाल दिला

http://www.loksatta.com/sampadkiya-news/no-indian-survey-linking-cancer-...

तंबाखूचे दुष्परिणाम सारे जग जाणत असताना असा अहवाल आलाय हेच नेते अच्छे दिन आणणार ह्याबाबत खात्री पटत चाललीय

तंबाखू विरुद्ध लढा देणा-या सुनीता तोमर या तरुणीचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले , त्याच वेळी सत्ताधारी पक्षाच्या निवडून आलेल्या खासदाराने असे वक्तव्य करणे धक्कादायक आहे.

तेलंगणामध्ये बाबुलोकांसाठी ५ कोटींपेक्षा जास्त खर्च करून २१ टोयोटा फॉर्चुनर्स खरेदी करण्यात येत आहेत.

"KCR has, however, not been able to keep his pre-election promises to farmers and other economically disadvantaged groups. He had promised loan waivers for farmers and housing projects for the homeless, all of which require much more investment than the state can afford."

दीलिप गान्धिचा निषेध .तम्बाखुने कर्करोग होतो हे जगजाहिर असताना असे विधान करने अत्यन्त चुकिचे आहे.

धीरज, एकटे दिलीप गांधीच नाहीयेत, त्यानंतर मुक्ताफळांचा पाऊस पडतोय.
श्यामचरण गुप्ता - "साखर खाल्ल्याने मधुमेह होतो, मग काय साखरेवर बंदी आणायची का?"
रामप्रसाद सरमाह - "रोज एक बाटली दारू आणि ६० सिगारेट्स ओढणार्‍या दोघांना मी ओळखतो. त्यातील एक ८६ व्या वर्षी मेला आणि दुसरा अजून जिवंत आहे"
'60 Cigarettes a Day Didn't Kill Someone I Know': Another BJP Lawmaker Defends Tobacco

श्यामचरण गुप्तांचा स्वतःचा शेकडो करोड रूपयांचा विडी-उद्योग आहे. पण ह्याचा पॉलिसीमेकिंगवर काही परिणाम होणार नाही असं ह्या महाशयांचं मत आहे !
He also denied that his ownership of a beedi (hand-rolled cigarettes) empire that's worth hundreds of crores may have influenced his opinion.

मूळात ज्याचा स्वतःचा एवढा मोठा तंबाखू-उद्योग आहे त्याला तंबाखूबंदीचा निर्णय ठरवणार्‍या समितीत घेणं हेच चूक आहे. सिरीयस कन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट.

किसीको खाने नही दूंगा म्हणत पक्षाचा उपाध्यक्ष कुणाला केलंय ?
मग कसल्या डोंबल्याच्या पॉलिसीची अपेक्षा ठेवताय ?

समस्त भारतवासियांसाठी आनंदाची बातमी जेवण नित पचत नसेल तर तंबाखू खा...

तंबाखूमुळे अन्नपचनास मदतच होते: दिलीप गांधी

http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4654774181017697584&Se...

आता मात्र ह्या सरकारची कीव येवू लागलीय

भक्तांनी आपापल्या घरी तंबाखूचे रोपटे लावावे आणि रोज सेवन करावे पचन योग्य होऊन सकाळचा परसाचा त्रास देखील कमी होईल. आणि तुम्ही वेळेवर कार्यालयात जाऊन राष्ट्रहित साठी जोमाने काम करू लागतील. तुमच्या या वाढलेल्या कार्यक्षमतेमुळे देश वेगात पुढे जाणार 5 वर्षात आपण जपान ला मागे टाकू मग रशिया मग चीन मग अमेरिका मग आपणच जगाचे अघोषित सम्राट सुवर्णयुगच अवतरणार.

बघा हे भाजप्ये किती लांबचा विचार करतात
व्यंकूची शिकवण ऐवजी भाजप्यांची शिकवण असा नविन धडा पाठ्यक्रमात समाविष्ट कराच
तर सुरूवात करा

एकटे दिलीप गांधीच नाहीयेत,
>>
दिलिप गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती . त्यात बीडी उद्योगाचे शहेनशाह सदस्य होते

आज खूप दिवसांनी टीव्ही पाहीला. या सरकारवर होणारी टीका आणि त्याला मोदींनी दिलेलं उत्तर हे स्वत" पद्मविभूषण रजत शर्मा सांगत होते. एक गोष्ट मान्य करायला पाहीजे , ती म्हणजे आरोपांना मोदी ज्या प्रकारे उत्तर देतात, त्यावरून भक्त आणि त्यांच्यावर विश्वास असणा-यांना ते जिंकून घेतात. काळ्या धनाचं उत्तर देतानाच काळ्या धनावरून टिंगल करणारेच कसे देशद्रोही आहेत असं प्रतिआक्रमण ते करतात. विरोधकांचे मुद्दे रास्त आहेतच. पण मोदी अर्धसत्य, मिथ्य आणि थोडी कामगिरी याचं बेमालूम मिश्रण बनवून अभिनिवेशाच्या जोरावर बाजी पलटवतात. प्रमुख विरोधी पक्षाकडेअसा वक्ता नाही आणि ज्या पक्षांकडे, संघटनांकडे मोदींपेक्षाही प्रभावी वक्ते आहेत त्यांच्याकडे मीडीया, पैसा आणि कॉर्पोरेट्स हे घटक नाहीत.

अडवाणींना यश न मिळण्याचे कारण मोदींनी ठळक केले.

हे निषेधार्ह कृत्य नाहीये. पण इथे लिहिण्याचं कारण म्हणजे आमदार, खासदार लोकांना नेमकी किती वैध कमाई असते ह्याबद्दल बर्‍याच जणांना माहीत नसतं, ते कळावं इतकंच. कॉर्पोरेट जगताशी स्पर्धा करतील इतकी कमाई ६ वी पास असलेले किंवा वरच्या प्रतिसादांमध्ये दिसत असलेली समाजहितविरोधी वक्तव्ये करणारे खासदार कमवत आहेत हे आवडत नाहीये.

Pay and perks of Indian MP, MLA and Prime Minister

तपशीलात लिहिलं आहे. करदात्यांच्या कष्टाच्या पैशातून एवढं मिळत असूनही अवैध मार्गाने कमवायची इच्छा काही संपत नाही !

७००० हेक्टर बिल्डरांच्या घशात?

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यातून आरे कॉलनीच्या ना विकास क्षेत्रातून (एनडीझेड) एक हजार एकर जमीन विकासासाठी खुली करण्यात आल्याचा वाद सुरू असतानाच मुंबईच्या विविध भागांतून तब्बल सात हजार हेक्टर जमीन 'एनडीझेड'मधून मोकळी करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आरे कॉलनीप्रमाणेच 'एनडीझेड'मधून वगळण्यात आलेली सात हजार हेक्टर जमीन भविष्यात बिल्डरांच्याच घशात जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Seven-Hundred-...

मौत के सौदागर ही मुक्ताफळं कोणाची होती आणि ती कितपत योग्य होती?
ते देखील कोणताही पुरावा नसताना!

Pages