Knight Rider BRM- नाईट रायडर २००

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

नाईट रायडर २०० !

भारतात मध्य मार्च पासून उन्हाचा चटका वाढतो आणि कुठलाही क्रिडा दिवसा करणे हा प्रकार नकोसा होतो, सायकलींगही त्याला अपवाद नाही, शिवाय १३ १/२ तास, २७ तास वगैरे अश्या उन्हात करणे म्हणजे भयंकरच. पण म्हणून सायकलींगच करायची नाही असे तरी का? म्हणून २८ मार्चला पुणे रॅन्डोनी नाईट रायडर आयोजीत केली.

२८ मार्च ला सध्यांकाळी ७ वाजता सुरू होऊन २९ मार्चला सकाळी ८:३० वाजता संपण्याची वेळ होती. मार्ग होता, पुणे विद्यापीठ - कात्रज - कापूरहोळ - चांदणी चौक - लोणावळा - रूपाली असे एकुण २०३ किमी.

२० तारख्येच्या आसपास मला मित्रांनी विचारले की जायचे का? मी नाही असे म्हणून मोकळा झालो. मला सांगा, कोण माणूस (पक्षी मीच) २९ तारखेची वल्डकप फायनल सोडून सायकलींगला जाईल? म्हणजे मॅच जरी ९ ला सुरू होणार असली तरी तयारी करणे आवश्यक असते, उदा रात्रभर तळमळणे - मग सकाळी ६ ला उठून उगाच बाहेर बघणे, झालेच तर दाढी करणे वगैरे आणि बायकोने मध्येच टिव्हीच्या आणि आमच्या वाढत्या आवाजाबद्दल कटकट करायल नको म्हणून तिला चहा वगैरे ( बेड टी) करून देणे इत्यादी इत्यादी, तर रात्रभर सायकल चालवल्यावर हे सर्व होणार नाहीच. म्हणून मी आपले.मला रेस्ट हवी असे सरळ सांगून येत नाही म्हणालो. तर रिप्लाय मिळाला - Rest is overrated.

मी जायचे नाही वर ठाम होतो, पण विराटने घपला केला आणि इंडियन बॅटिंग वॉज फॉलिंग लाईक अ सायकल स्टॅन्डला ( रेफ - सिध्दू ) सुरूवात झाली. फायनलाला आता काही जात नाहीत हे नक्की झाल्यावर (रहाणे आउट झाल्यावर ) मी रजिष्टर केले आणि What the heck, I am joining you guys असे म्हणून मोकळा झालो. मॅच हारल्याचे दु:ख कमी होऊन लगेच शनिवारच्या तयारीला लागा अशी उभारी मनाने घेतली.

शरीराची तयारी अशी काही करायची नव्हतीच. मनाचीच काय ती तयारी महत्वाची होती. मी ६०० च्या वेळी सकाळी ६ ते रात्री २:४५ पर्यंत आणि परत लगेच सकाळी ४:३० ते रात्री ८ पर्यंत सलग चालवली होती. पण ह्यावेळी सगळं रात्री असणार होतं. सुरूवात संध्याकाळी ७ ला होती. आणि जर लवकर संपविली नाही तर रात्रभर जागून सकाळी ८:३० पर्यंतच संपवणे भाग होते. त्यामुळे ती तयारी म्हणजे मनातल्या मनात इमॅजिनेशनची सुरू केली.

मग किती वाजेपर्यंत पूर्ण करता येईल ह्याचा आडाखा बांघला. आमच्या सध्याच्या अ‍ॅव्हेरेज स्पीड पेक्षा कमीचे अ‍ॅव्हरेज धरून + अगदी अर्धा पाऊन तास जेवनाचा व इतर अर्धातास असे पकडून ९ तासात मॅनेज करू असे वाटले. म्हणजे सकाळी ४ पर्यंत संपेल व घरी येऊन आराम करून निवांत मॅच बघता येईल असा विचार मी करत होतो.

शनिवार - ब्रेव्हेचा वार उजाड्ला. ४ वाजता आमच्या भागात पावसाला सुरू झाली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. पावसात हवी तेवढी स्पीड घेता येत नाही. शिवाय माझे टायर २५ चे आहेत. (रेस वाले, अगदी बारीक) म्हणजे घसरली की बसा बोंबलत. ती पण काळजी घ्यावी लागणार होती.

पाऊस जोरात पडू लागला. ६:१५ पर्यंत विद्यापीठ सर्कलला पोचणे आवश्यक होते. थोडा भर ओसरल्यावर मग निघालो आणि रिमझीम पावसात विद्यापीठ सर्कलला ६: ४० ला पोचलो. तिकडे सायकलीस्ट मेळावा लागला होता. कारण माझ्यासारखेच लोकं ( भारत सेमीला हारल्यामुळे येणारे) खूप होते. मग सर्वांचेच चेक , कार्ड इत्यादी सोपस्कार व्हायला ७:१५ वाजले. तिथे लिंबू भेटला, त्याला हाय म्हणतोय तोच ठिपसेही भेटले. मग आमची गँग आली. अभिषेक, सुधाकर, मिहिर, राकेश आणि मनोज. पैकी मनोज आज स्वंयसेवक असणार होता. आणि बाकीचे आम्ही राईड करणार होतो. ठिपसे मला म्हणाले, की तू फार फास्ट चालवतो, आज नको चालवू, सावकाश जा, पाऊस पडलाय, त्यांना मी म्हणालो, की आज सगळ्यांसोबत जाईल, उशीर झाला तरी ! लिटिल डीड आय नो की. ...

सर्कल पार करून आम्ही पाषाण कडे जाणार्‍या रस्त्यावर गेलो. एकुण ३५ जणांनी भाग घेतला, पैकी ३ आले नव्हते. ३२ सायकलीस्ट - ३ लुगड ब्रिगेड बाकी घोतर धारी!

आम्ही सर्व निघालो. पण २ मिनिटात पुढचा कोण आणि मागचा कोण? हे कळेणासे झाले कारण अंधार. मजल दर मजल करत मी निघालो. बावधन मार्गे चांदणी चौक पार करे पर्यंत अनेक सायकलिस्टला मागे टाकले. बावधनला वळून पाहिले तर मागे अर्जून होता.

सिंहगड फ्लायओव्हर पास केल्यावर खात्री पटली की पुढे कदाचित कोणीच नसावे, कात्रज घाट चढायला सुरूवात केली तर एक मिनमिनता दिवा दिसला. म्हणलं अपनेसे भी आगे है कोई. अर्जून आणि मी - आम्ही त्याला गाठले व CCD येईपर्यंत मागेही टाकले. मग पुढे कोणीच नव्हते. आम्हीच दोघे होतो. मला तेंव्हापासून घाईची लागली होती पण टेम्पो होता म्हणून मी दुर्लक्ष केले. कात्रज बोगद्यापर्यंत चढ आहे, तिथे एक हॉटेल आहे. तिथे थांबू हा विचार केला आणि घाट पार केला. तिथे येऊन मी आणि अर्जून दोघेही थांबलो. त्यालाही बायालॉजिकल ब्रेकची गरज होती.

पावसामुळे वारं जोरात वाहत होतं. गस्ट्री क्रॉस विंडंस मुळे चालवणे कठीण झाले होते. त्या ब्रेक मध्ये ७-८ एक मिनिटे गेली, तो पर्यंत मिहिर सहित ६-७ जण आम्हाला पास झाले. बोगदा ओलांडे पर्यंत मी परत २-३ जणांना मागे टाकले आणि उतारावर लागलो. तो तेथे परत पाऊस सुरू झाला. पण २ एक मिनिटेच. उताराचा फायदा घेऊन, त्याच वेगाने मी पेडल मारत उतरताना ३ अगदी तरूण मुलांना ( मे बी २०-२१ चे असतील) पास केले. पण त्यांना पास करतानाच त्या तिघांमध्ये काही तरी जबरदस्त केमिस्ट्री आहे हे जाणवले.

द गुड - ऑस्सम स्पीड .

आज पहिल्यांदाच रात्री ८:३० च्या सुमरास सायकलवरून खेड शिवापूर नाका ओलंडत होतो. तो अगदीच मोकळा होता. नाहीतर तिथे १९३७ गाड्या नेहमी असतात. तो ओलांडून मी आणि अर्जून लिटरली ४५ + च्या वेगात एक दोन कारला पास केले. इतके जोरात की कार मधील लोकांनी आम्हाला पास केल्यावर आम्ही परत त्यांना पास केले तर त्यांनी टाळ्या वाजवल्या.

Avg Speed.JPG

उजवीकडे जे स्पीड मध्ये २२.१, हार्ट रेट १५३ आणि कॅडन्स ७१ आहे, ते पूर्ण म्हणजे २०० किमी राईडचे आहे.

कात्रज टनेल ते कापूरहोळ मधील किमी वॉज जस्ट ब्लिस ! आणि इथे जे दाखवत आहे तो कात्रज ते कापूरहोळ चा दरम्यानचा स्नॅपशॉट. राईड सुरू झाल्यानंतर चे क्लॉक. तास १:१० ते १:५५ म्हणजे ह्या ४५ एक मिनिटाचा स्पीड मध्ये बघा ५० किमीला मी अनेकदा टच केले आणि कात्रज ते कंट्रोल पाँईट माझा अ‍ॅव्हरेज स्पीड हा नॉर्थ ऑफ ३८/ ४० होता. कॅडन्स चा चार्ट बघा. १०० ला खूपदा टच केले आहे. घाटाच्या उतारावर भेटलेला मोमेंटम मी ४० मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू शकलो. स्पीड आणि मध्ये जिथे चढ आहेत तिथे थोडा उतार आहे आणि जिथे व्हॅलि आहेत, तिथे चढ होता. हा रस्ताही रोलिंगच आहे. म्हणूनच लिहिले ऑस्सम स्पीड!!

अर्जून नंतर कंट्रोल पाँईटला थांबल्यावर म्हणाला, व्हॉट व्हॉज दिस? डीड वी डू ५५ + ? मी त्याला म्हणालो की बहुदा ४५ ते ५० ने आलो असू. पण खात्री नव्हती. म्हणूनच झुम इन करून हा स्नॅपशॉट बघीतला.

८:५५ ला आणि पहिल्या कंट्रोल पाँईटला होतो. ७:२० / २५ ला सुरू करून ४६ किमी, एका घाटासहित आम्ही केवळ दिड तासात आलो. ते पण एका ब्रेक नंतर) . पंच करे पर्यंतच्या ५-७ मिनिटात मिहिर पोचला. आम्ही तिघे, (मी, अर्जून आणि मिहिर) ७-८ मिनिटात तिथून निघालो. आणि तिथून निघे पर्यंत सुधाकर आणि राकेश देखील तिथे पोचले. त्यांना परत २२ एक किमी मागे गेल्यावर टोल नाक्याच्या पुढे विलास हॉटेल मध्ये जेवायला भेटू असे सांगून यु टर्न घेतला.

इथे अचानक मिहिर मागे पडला. आता कात्रज बोगदा लागे पर्यंत चढ असणार होता. गस्ट्री क्रॉस विंडसचा त्रास खूप होत होता. तितक्यात माझ्या मागे दुर्गाप्रसाद आला. तो म्हणाला मी तुझे व्हिल घेऊ का? ( व्हिल घेऊ का म्हणजे तुला ड्राफ्ट करू का? ) मी म्हणालो जरूर, नाही तरी अर्जून तेंव्हापासून आहेच. मग पुढे मी, मागे दुर्गाप्रसाद आणि त्याच्या मागे अर्जून असे आम्ही लाईन मध्ये निघालो. पहिले २ एक किमी मी ह्या दोघांना टो केले. मग दुर्गाप्रसाद म्हणाला की मी लिड घेतो, मग मी पाठीमागे आलो आणि आम्ही परत निघालो.

द बेस्ट

एखाद किमी झाला असेल, नसेल तोच मी ज्यांना कात्रज बोगद्यात पार केले ते तिघे तरूण आम्ही फाईल मध्ये पास होत होते. त्यांच्या स्पीड आमच्या तिघांपेक्षा किंचित जास्त होता मी दुर्गाप्रसादला ओरडून म्हणालो, आस्क हिम अ‍ॅन्ड टेक हिज व्हिल, त्या मुलांनी हो असे सांगीतले. आणि दॅट व्हॉज द बेस्ट पिरिएड ऑफ सायकलींग. आम्ही सहा लोकं, फाईल मध्ये, व्हिल टू व्हिल, पेडल टू पेडल, सेम पावर मध्ये मार्च करत होतो.

ड्राफ्ट कुणीही नाही करू शकत. ती टेक्निक असते. व्हिलला खरोखरी व्हिल लावावे लागते आणि त्याच स्पीड मध्ये समोरच्या लिड पेलटोन वर विश्वास ठेवून रस्त्यावर न बघता, समोरच्या व्हिल कडे बघत सायकल, त्याच स्पीडने चालवावी लागते. तो वळला, की आपण वळणार. जराही म्हणजे काही मिलिसेंकदचे दुर्लक्ष झाले की अ‍ॅक्सिडेंत होतो.

मॅन ! व्हॉट अ साईट ! इतके मॅच झाले होते की समोरचा वाकून पाणी पिऊ लागला की आम्ही उरलेले पाचही जण पाणी पिणार इत्यादी. नाक्यापर्यंतचे २० किमी अंतर खूप लवकर आणि ते पण गस्ट्री क्रॉस विंडसचा त्रास असताना पार झाले. नाका पार झाल्यावर पाणी घेऊन स्वंयसेवक उभे होते. तिथे पाणी रिफिल केले.

दुर्गाप्रसादने विचारले, पुढे असेच जाऊ या का? मी म्हणालो की, जेवायला थांबू एक किमीवर विलास हॉटेल आहे, तिथे तुम्ही सर्व या. पण ती लोकं म्हणाली की न जेवताच पार करू पण मी माझ्या मित्रांना, "आज पळून जाणार नाही, तुमच्यासाठी थांबेन" असे प्रॉमिस केले होते त्यामुळे मी त्यांना म्हणालो की मग तुम्ही लोकं जा. मी थांबतो.

रिफील ब्रेक मध्ये त्यामुलांना मी काही वेळ बोललो. ती लोकं फुल आयर्न मॅन करणार आहेत. नो वंडर ती टीम केमिस्ट्री त्यांच्या मध्ये होती. द बेस्ट पार्ट वॉज मी त्यांच्यापेक्षा लवकर पाँईटला आलो आणि पेडल टू पेडल त्यांना मॅच केले. आय फेल्ट ग्रेट. समटाईम्स यु जस्ट नीड दॅट किक ! त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यातील एक जण कोल्हापूरचा आहे.

Photo_3.jpg

अस्मादिक - बिल्ला नं ७७७ ! आम्ही जेंव्हा ब्रेक घेतला तेंव्हाचा फोटो. त्या उर्वरित ५ जणांसोबत !

Photo_4.jpg

तेंव्हा केवळ ९:४५ झाले होते आणि ६८ - ७० किमी झालेही होते. परत स्वंयसेवकांना माझ्या गँगला मी, विलास वर थांबतोय, तिथे पाठव असे सांगून निघालो. विलासला मी ९:५० ला पोचलो. अर्जूनही माझ्यासोबत थांबला. मग आम्ही ऑर्डर देऊन एकेकाची वाट बघत थांबलो. राकेश न थांबता निघून गेला. ( ६०० ची पुनरावृत्ती Happy ) त्याला आवज दिला पण काही फायदा झाला नाही. मग एकेक जण आला. आम्ही निवांत जेवलो.

तितक्यात एक मुलगी टेबलजवळ आली नी सुधाकरला लाडीक आवाजात म्हणाली, "तुम्ही १६ आहात का आज, मी मोजले " मला क्षणभर ती सुधाकरची बायकोच वाटली. विचारताना तिने " सांगा ना गडे" टाईप सुर तिने लावला होता. मग सुधाकर म्हणाला, की नाही, ३० आहोत. ती गेल्यावर तो म्हणाला की ती माझ्या ओळखीची नाही. म्हणलं बरय बॉ सुधाकर, तुला ह्या वयात मुली लाडीक पिपाण्या वाजवतात.

सर्वांन जेवून निघायला ११:१४ झाले. म्हणजे ह्या वेळात सगळेच जण निघून गेले असतील असे मला वाटले ते चूकीचे नव्हते. ९:५० ते ११:१४ (माझ्यासाठी) खूपच वेळ गेला. आम्ही निघालो. कात्रज पार केला. राकेशने कॉल करून सांगीतले की तो वारज्यात थांबलाय, तिथे येऊन भेटा. तो वारज्यापाशी भेटला. आम्ही तिघे निघालो कारण ह्या गडबडीत (अनेक कॉल येत होते) मी थांबत होतो आणि अर्जून पुढे जात होता. त्याला कॅच करणे अशक्य झाले.

द बॅड

चांदणी चौकात मिहिर मला म्हणाला की तो क्विट करतोय. त्याला म्हणालो मी तुला टो करतो, तू मागे रहा. पण तरी तो नको म्हणाला. मी हसत मिहिरला म्हणालो, की एखादी मुलगी आपल्या स्पीडला मॅच होणारी असेल तर मोटिव्हेशन मिळाले असते तुला. कारण उघड होतं, आम्ही नेहमी फिनिश चांदणी चौक किंवा बाणेरला करतो आणि आता पुणे ओलांडून परत लोणावळ्याला जायचे आहे आणि बाणेर आले की कसे घर आल्यासारखे वाटते, इनफॅक्ट तो विचार मी कात्रज मध्ये केला होता. पण माझ्या बुद्धीने तो उधळून लावला. पण मिहिरनेही तोच विचार केला. आम्ही सोबत राईड करताना तो म्हणाला की तू जा, मी नाही येत आता. मी त्याला बाय म्हणून निघालो. राकेशलाही सांगीतले. . परत लिटिल डीड आय नो की ....

चांदणी चौक ओलांडला आणि बाणेर कडे लागलो, तितक्यात पाषाण तलावापाशी स्वंयसेवकांनी आम्हाला थांबविले. आम्ही दोघे थांबलो. तिथे एक मुलगी थांबली होती. फरहादांनी मला विचारले की हीला सोबत घेऊन जाशील का? मी विचारले स्पीड काय? तिचा मित्र म्हणाला की खूप आहे. (खूप आहे ला खरचं काही अर्थ नसतो, किती आहेला असतो) मग मी राकेश कडे बघितले. तो पाणी भरण्यात मश्गूल होता. मी म्हणालो, ठिक आहे स्पिड मॅच असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही.

मी थांबलो तेंव्हा रात्रीचे ११:५० झाले होते. ९० किमी ऑलरेडी संपले होते. म्हणजे राईड टाईम ७:१५ ते ११:५० - सव्वातास ब्रेक घेऊनही सब ४ तासात आम्ही ९० संपवले होते आणि आता खूप मोठ्या ब्रेकची गरज नव्हती. म्हणजे अजून सव्वा चारतासात ११० सहज झाले असते. थोडक्यात ४ ऐवजी ४:३० झाले असते. अजूनही प्लान काही वाईट नव्हता. ९:३० तासात फिनिश झाले असतेच.

आम्ही तिघे, राकेश, कल्याणी आणि मी निघालो. वाकड प्लायओव्हर पास करून एक दिड किमी गेलो न गेलो तर माझे पाठीमागचे टायर फ्लॅट झाले. १०-११ मिनिटा आम्ही ते फिक्स केले. कल्याणीने मला खूप मदत केली. तिला पंक्चर काढण्याचा खूप अनुभव होता बहुदा. आणि माझी रोडी BRM मध्ये पहिल्यांदाच पंक्चर झाली होती. आम्ही परत निघालो. तो पर्यंत सुधाकरही आला. त्याला हाक मारून थांबवले.

जाताना गप्पा मारत निघालो. कल्याणीने ऑलरेडी डेक्कन क्लिफ हँगर टीम रिले रेस मध्ये भाग घेऊन, पुणे गोवा अंतर ३० तासात पार केले आहे असे सांगीतले. तसेच ती आता भारतातील इस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट अशी एक १५०० किमीची रेस आहे ( BRM नाही) त्यातही भाग घेणार आहे आणि RAAM ( रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका) मध्येही भाग घेणार आहे असे तिने सांगीतले. माझा तिच्या बद्दलचा आदर १००० टाईम्स वाढला.

पहिला चढ आला. जनरली चढ आला की मी ग्रूप पासून ब्रेक अवे होतो. मला लवकर चढायला आवडते. राकेश, सुधाकर आणि कल्याणी मागे पडले आणि मी सोलो पुढे निघालो. म्हणलं जर डेक्कन क्लिफ केली असेल तर ही मला लवकर कॅच करेल. बट नो. ते तिघेही चढावर मागे पडले होते. मग मी देहूरोड कॉर्नवर येऊन थांबलो.

ते आल्यावर परत पुढे निघालो. ऑल ऑफ अ सडन त्या उतारावर कल्याणीने मोमेंटम पकडला आणि ती जोरात जाऊ लागली, आय वॉज गेम फॉर इट आणि मी ड्रॉप्स मध्ये जाऊन जबरदस्त पेडलिंग करत अवघ्या काही सेकंदात तिला मागे टाकले आणि २ किमी लांब येऊन वाट पाहू लागलो. ती आली, तिला विचारले , काय झाले, तू माझे व्हिल का सोडलेस ? ती म्हणाली तिला ड्राफ्टींग करता येत नाही. तिचा तो सडन बर्स्ट अर्ध्या किमीच्या आत संपला. आम्ही तिघे जात राहिलो. तळेगावच्या खिंडीत मी वर येऊन तिघांची वाट बघत थांबलो.

द ड्रॅग

राकेश दमला होता, पण मी त्याला म्हणालो वडगाव आल्याशिवाय ब्रेक घेऊ नको. कॅरी ऑन. त्याच्याकडचे पाणी संपत आले होते. वडगाव २ किमी असताना कल्याणी म्हणाली की वडगाव आले, ब्रेक घ्यायचा का? मी तिला विचारले, तू थकलीस का? काही खाल्लस की नाही? त्यावर ती म्हणाली तिने काहीही खाल्ल नाही. म्हणजे जेंव्हा आम्ही लोकं मस्त सव्वा तास जेवत बसलो, तेंव्हा कल्याणी सलग चालवत होती. न खाता. आणि आता १ वाजल्यानंतर कुठेही काही मिळत नव्हते. आणि ती थकत होती. मी तिला खजूर आणि इनर्झाल दिले. तिने ग्लुकोज आणले होते, ते तिला घेऊ नको असे सांगीतले. आणि भरपूर पाणी प्यायला सांगीतले. तर तिच्याकडे एकच बाटली आणि त्यातले पाणी संपलेले होते. मग माझ्या बाटलीतले दिले. प्रोटिन आणि कार्ब बार देऊ केले पण तिला ते नको होते.

लुक्ड लाइड शी वॉज टोटली अनप्रिपेअर्ड . म्हणजे ती आली, पण काही न खाता. सायकलीचे इंजिन हे आपण स्वतः असतो. आणि योग्य तो खुराक घेतला नाही की सगळेच संपले आणि शी डीड दॅट. शिवाय पाण्याची एकच बाटली. मी तिला बिचारले की कधी पासून सायकल चालवत आहेस. तिने सांगीतले फेब पासून ! मग तिच्या पुढच्या (जी जाऊ इच्छिनार्‍या रेसेस, जसे भारतातील इस्ट-वेस्ट कोस्ट आणि अमेरिकेतील रॅम) साठी तू काय करशील? अशी विचारणा केली. चढ कसा अ‍टॅक करायचा, इंटर्व्हल म्हणजे काय, बेस बिल्डींग इत्यादी इत्यादी मी तिला सांगत राहिलो आणि आम्ही दोघे हळू हळू जात राहिलो.

समहाऊ मॅथ डिडन्ट वर्क. खूप वेळ गेल्यावरही आम्ही फार पुढे गेलोच नाही. राकेशला मी सांगीतले की तू आता जोरात जा आणि पाणी शोध. मी कल्याणीसोबत तिच्या स्पिडने येतो मागून, कल्याणी म्हणाली, की माझ्यामुळे निदान एवढ्या जोरात जाऊ शकते अन्यथा एकटी असली असती तर अजून स्लो गेली असती. आम्ही दोघांनी आणखी एक स्टॉप घेतला. तिथे सुधाकर येऊन मिळाला. वाटेत मी परत तिला पाणी दिले थोडे पुढे गेल्यावर एक टपरी दिसली. तिथे पाणी घेतले आणि आम्ही कामशेत घाट चढला. पावने तीन वाजले होते. आता लोणावळा १५ किमी होता. राकेशही इथे होता तो ही भेटला. परत येणारे काही लोकं परतीच्या वाटेवर दिसू लागले. म्हणजे गेल्या पावने तीन तासात सुरू केल्यापासून आम्ही केवळ ४० एक किमी आलो होतो !!!!!! आणि त्या आधी पावणे चार तासात ९० किमी. आम्ही जाम स्लो झालो होतो. कल्याणी भूकेने कळवळत होती पण काही करता येण्यासारखे नव्हते. ३:४० ला आम्ही लोणावळ्याला पोचलो.

आणि मी ४ वाजता रूपालीवर असण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि मिडवे मध्ये पाषाणला असताना त्या वेळेच्या आसपास पोचणार असे वाटतही होते. पण आता? एव्हरीथिंग चेंजड आणि इट वॉज लाईक बीग टाईम वॉर्प अ‍ॅन्ड वि आर गोईंग नो व्हेअर. राकेश म्हणाला मी क्विट करतो आणि लोकलने घरी जातो. मी त्याला परावृत्त केले. १५० झाले अजून ५० व्हायचे आहेत आणि ४:३० तास आहेत, तर करू. दोन तीनदा सांगीतल्यावर त्याने ऐकले. आम्ही लोणावळा स्टॅन्ड वर वडापाव, चहा घेतला. चौघेही फ्रेश झालो. आणखी दोघे तो पर्यंत लोणावळ्याला येऊन पोचले. आता आम्ही सहा जण होतो. राकेश, कल्याणी, अनिकेत, राज, सुधाकर आणि मी.

परतीच्या प्रवासाला लागलो. आय न्यु की आता आपण ७:३० ७ ला. पोचू फर्गेट अबाउट एव्हरी थिंग, जस्ट राइड अ‍ॅन्ड गिव्ह कंपनी टू द गर्ल.

आता माझ्याशिवाय चार जण असल्यामुळे मी ५ एक किमी जोरात जाऊ आणि तिथे वाट पाहू जायचे ठरवले. आणि निघालो. थांबलो न थांबलो तोच अनिकेत आला नी म्हणाला, ती लोकं पाठीमागे आहेत. थोड्यावेळात सुधाकर आला नी म्हणाला की ती तुला विचारतेय तू कुठे आहेस, बहुदा आमच्यासोबत ती कम्फर्टेबल नाही. मग मी ठरवले (परत एकदा) की पुढे जायचे नाहीच. सोबतच. कल्याणीदेखील म्हणाली, मागे पुढे नको सोबत रहा. मग ती आणि मी परत सोबत निघालो. मी राकेश, सुधाकरला म्हणालो की तुम्ही व्हा पुढे, मी आता सोबतच येईल. ती लोकं मग पुढे मागे असे करत होती. अनिकेत आणि मी पिनारेलो आणि कस्टम बाईक बद्दल बोलत वेळ घालवत होतो.

कल्याणी मला मध्येच विचारायची, किती किमी, आता चढ आहे का? मग मी, झालं आता फ्लॅट आहे, उजाडेल इतक्यात असे काही म्हणून वेळ मारून नेत होतो. मला आठवलं की माझ्याकडे लाईफ सेव्हर केळं आहे. तिला मग एक केळं दिलं त्यानेही तिला एनर्जी आली. ती क्विट करते म्हणाली. मी म्हणालो, आता कुठे क्विट करणार, वडगाव मध्ये रेल्वे पण नाही. जस्ट राईड, हँग इन देअर आता फक्त ३५ किमी. तिचा पाय दुखत होता. मग तिला बाईकवरचा व्यायाम सांगीतला. मध्येच कुठेतरी तिला मी विचारले की बाई, तू काहीच प्रिपेअर न करता आली आहेस, निदान बाईक शॉर्ट तरी घातली आहेस का? त्याचे तिलाही हसू आले. ( हा प्रश्न विचारावा की नाही ह्यावर मी विचार केला, दोन तीनदा ओठावर येऊनही थांबवला होता. न जाणो तिला काय वाटेल ते, पण तिने स्पोर्टिंगली घेतले.)

६:१० ला आम्ही देहूरोडला पोचलो. आता फक्त २७ किमी. रावेत रोड घेऊन, पिंपळे सौदागरहून औंधमार्गे जायचे होते. आम्ही पवना नदीच्या गोल्डन गेट ब्रिज जवळ येत होतो. आता उजाडले होते आणि माझ्यातला सायकलिस्ट मला काही गप्प बसू देईना.

रावेत ते पवना नदीचा ब्रिज हा मार्ग ६ पदरी आहे. खरेतर पार औंध येईपर्यंत सुंदर मोठा रस्ता आहे. मी स्प्रिंट मारायचे ठरवले. राकेश म्हणाला गो फॉर इट. आणि हा हा म्हणता १६ किमी / अवर हून १०-१२ सेंकदात ४९ किमी पर अवरनी मी चालवत होतो. २-३ किमी झाल्यावर मी चौकात येऊन गोल्डन ब्रीज पाशी थांबलो. तिथे ही लोकंही येऊन पोचली.

द अग्ली

पुल पार केल्यावर मी सुधाकरला म्हणालो स्प्रिंट मार. तो तयार झाला, पण एक दोन पेडल मारे पर्यंत त्याचा पेडल आर्म तुटला आणि तो सायकलीवरून उधळून जोरात खाली पडला. त्याच्या हेल्मेटला क्रॅक गेले आणि पायावर खरचटले. आम्ही सर्व काळजी करू लागलो. त्याला पाणी दिले. सुदैवाने त्याला काही झाले नाही.

कल्याणीला राईड फिनिश करायची होती, राकेशला त्याची गरज नव्हती, तो देखील थांबायला तयार होता. पण मी राकेशला म्हणालो, कल्याणीसोबत तू जा, मी सुधाकर सोबत थांबेन. त्या क्षणी मला मित्राची सोबत फिनिश करण्यापेक्षा जास्त महत्वाची वाटली. नाहीतरी मी अनोळखी कल्याणी सोबत आख्खी रात्र राईड केली तर इथे नेहमीचा सायकलींगचा मित्र होता. ती दोघे पुढे गेली.

तो क्रॅशचा आवाज ऐकुण विरुद्ध दिशेने मॉर्निग राईडला जाणारे काही सायकलिस्ट आले. त्यातील एकाने स्प्रे दिला. तो मारला. त्या गडबडीत माझ्याकडेही स्प्रे आहे हे विसरले होते. त्यांनी काय, कुठून, कोण हे विचारले.. मी माझे नाव सांगीतले, तर तो म्हणाला, अरे आपको तो मै स्टरावा पे फॉलो करता हूं सर, मग त्याने त्या गडबडीत माझा फोटो काढला. सुधाकर आणि मी जाम हसलो. एकाला माझ्या क्लिट बद्दल विचारायचे होते. त्याने प्रश्न विचारला, पण मी त्याला म्हणालो, बाबारे सात वाजत आले आहेत आणि अजून २० किमी आहेत जाउ दे मला.

द फिनिश

पेडल कसेबसे फिक्स केले. आणि सुधाकर व मी निघालो. मी ७:४५ ला आणि सुधाकरने ८ वाजता फिनिश केले!

आम्ही चौघांनी ( कल्याणी, राकेश, सुधाकर आणि मी) रुपालीत मग व्यवस्थित पोटभरून खाल्ल आणि बाय म्हणून निघालो. डोन्ट नो, इफ आय विल एवर सी हर अगेन. नॉर दॅट इट मॅटर्स टू मी नाऊ.

कुडोज टू हर टू ! कारण ती तरली, ती देखील दोनदा क्विट करणार होती. आमच्यामुळे तरली असे म्हणायला असले तरी, सायकल तर तिलाच चालवावी लागली ! गुड थिंग इज सुधाकरला काही झाले नाही आणि राकेशने राईड फिनिश केली.

नेव्हर गिव्ह अप अ‍ॅटिट्युड असल्यामुळे ह्या ड्रॅग राईड मध्ये मी तरलो. इमॅजिन, शेवटचे ११० करायला आम्हाला ८ तास लागले, आणि देअर आय वॉज, पूर्ण राईड ९ तासात करू असे म्हणून निघालो होतो. अर्थात त्याला कारणीभूत माझ्या शरीराला असणारी सवय होती. आणि ३००, ४०० वगैरे राईड मी ५-५, ६-६ तास आधी पूर्ण केल्या आहेत.

रात्रीच्या ब्रेव्हे नेहमीच्या रायडर्सना पण खूप टफ जातात. तर ज्यांना अशी सायकल चालवायची सवय नसते त्यांना किती कठीण होत असेल ह्याचा अंदाज लावून बघा. अगदी दिवसाही काही झालं, धडपडलो, पंक्चर झाले तरी त्रास होता आणि इथे तर रात्र ! शिवाय मध्यरात्री नंतर ढाबे बंद होतात आणि पाणी देखील मिळत नाही, तर इतर मदत मिळणे खूपच कठीण होते. मध्यरात्री नंतर शरीर थकते. झोप येऊ लागते. मानसिक अवस्था बेकार होते. नुसतं रात्री जागरण केले तरी लोकांना त्रास होतो, इथे तर नुसते जागरण नाही, रस्त्यावर, विविध कंडीशन मध्ये सायकल चालवत, शारीरिक श्रम घेत केलेले जागरण. आणि २८ ला तर पावसामुळे त्यात अजून भर ! त्यामुळेच १३ जणांनी ही राईड क्विट केली. इट वॉज जस्ट टफ टू कंटिन्यु !

पोस्ट प्रोसेसिंग

कल्याणी ऐवजी तिथे एखादा मुलगा असला असता तर मी इतकी हळू चालवली असती का? उत्तर नाही असे आहे. का? तर ती मुलगी आहे, तिच्या सोबत जायला आवडले असते म्हणून नाही, तर ती मुलगी आहे, एकटी होती आणि संपूर्ण रात्र चालवायची होती आणि मुख्य आपला भारतीय समाज व स्त्रीयांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण हेच मुख्य कारण होते. त्यात ती एकटी आणि रात्र. जस्ट इमॅजिन. तिला आधीच काही लोकांनी प्रश्न विचारून सतावल्याचे तिने सांगीतले होते.

काय शिकलो?

१. रात्री जेवायला सव्वा तास थांबायचे नाही.
२. जर स्पीड मॅच करू शकत असाल तर ग्रूप कधीच सोडायचा नाही.
३. दिवसा मुलगी असो की मुलगा, स्लो रायडरला फार जवळ करायचे नाही.
४. रात्रीच्या BRM उन्हाळ्यात चांगल्या असल्यातरी रात्री १ नंतर पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे गरज नसताना उगाच परत मी नाईट BRM ला जाईल असे वाटत नाही. (असं आत्ता म्हणतोय, पण तेंव्हाच तेंव्हा)
५. समजा गेलोच आणि परत एखाद्या मुलीला कंपनी देण्याची वेळ आली (रात्री) तर नाही म्हणायचे नाही, स्लो असली तरी कंपनी द्यायची कारण गरज फक्त तिलाच नाही, तर चांगले पुरूष अजूनी भारतात आहेत हा विश्वास येणे महत्वाचे आहे. (अर्थात तो मक्ता माझाच आहे का हा वादाचा विषय, पण जेवढे मला शक्य तेवढे मी करीन)
६ रात्री गेलोच जर ऑन बाईक, ऑन द गो बार्स, केळं वगैरे घ्यायचे. आणि खूप कमी वेळेचे ब्रेक घ्यायचे म्हणजे ४ पर्यंत परत पोचता येते.
७. आणि रात्री स्लो मुलाने कंपनी मागीतली, तर चल sprint करू असे म्हणून मागे सोडून द्यायचे.

सायकल हळू चालविणे हा काही गुन्हा नाही, तुम्ही तुमच्याच स्पीडने चालवायला हवी. पण ज्याच्या सोबत तुम्ही जाता आणि तो जर तुमच्यापेक्षा बराच फास्ट रायडर असेल त्याची राईड खराब होते. म्हणून हे वरचे लिहिले.

ऑल इन ऑल ही राईड एक माणूस म्हणून मलाही खूप शिकवून गेली.

माझी सायकल. द रिलायेबल ब्युटी !

My Cycle.jpgMy cycle_1.jpg

विषय: 
प्रकार: 

__/\__

अमेझिंग , आश्चर्यकारक फीलिंग येत राहिलं वाचताना..
इतके डीटेल्स अजिबात माहीत नव्हते.. खूप्पच जी के वाढलंय.. तुम्हा सर्वांच्या इच्छाशक्ती चं मनापासून कौतुक वाटलं.. एक माणूस म्हणून जे जे शिकलास ते इकडे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.. खूप छान वाटलं वाचून ..
कल्याणी इज अ लकी गर्ल ,तिला ही बरंच काही शिकायला मिळालं असेल..
कुडोस टू यू ऑल..

तुझ्या सायकली चा एक झकाससा फोटो टाक पाहू इकडे!!!

जस्ट लव सायकलिंग... कितीतरी देशांत, बीचेस वर सायकल जिथे कुठे अवेलेबल असतात तिथे तिथे

चालवून घेण्याची हौस भागवून घेते.. Happy

अफलातून..... अतिशय कमी वेळेत शर्यत पूर्ण करण्याची क्षमता असूनही, काळवेळ बघून त्या मुलीला सोबत दिलीस हे फारच चांगले केलेस.

सुधाकरच्या उदाहरणावरून चांगले हेल्मेट आवश्यक हे ही कळतय.

परत एकदा सर्वांग सुंदर लेखन. वाक्यावाक्यातून सायकलिंगबाबत अतिशय उपयुक्त नवनविन माहिती कळते आहे.

>>> तिने ग्लुकोज आणले होते, ते तिला घेऊ नको असे सांगीतले.<<< असे का सांगितले?
"एनर्जी केळं" म्हणजे आपली नेहेमीची केळी घेतली होतीस का बरोबर? की काही वेगळे च्यूसी बार वगैरे होते?

कल्याणीचेही अभिनंदन. वरवर पहाता ती अर्थातच फारच नाजुक चणीची भासत होती, व अंतर पूर्ण करेल की नाही शंका आली होती. पण तुझ्या साथीने पूर्ण केलेन. ग्रेट.

एक प्रश्न, विलासला भरपेट जेवलात का? भरपेट जेवल्यावर सायकल चालवायला काही त्रास नाही झाला? होऊ द्यायचा नसेल तर काय करावे?

नाईट रायडिंगच्या अडचणींची साधारण कल्पना होती, तुझ्या लेखामुळे तपशील कळतोय. रात्रीची थंड हवा इतकाच काय तो प्लस पॉईण्ट. बाकी सगळा आनंदच.
(माझ्याबरोबर नसरापूरच्या बाजारातून घेतलेली एक छोटीशी तिन एलईडीची बॅटरी होती बॅगेत, ती लावली तर आख्खी रुम प्रकाशते. खास पंक्चर वगैरे काढण्याकरता ठेवली होती. तशाच वजनाला हलक्या पण इफेक्टिव बॅटरी अजुन मिळाल्या तर घेऊन ठेवणार आहे. त्या सलग पाच तास चालतात. माझ्या हँडलवर लावलेल्या वीजेवर रिचार्ज होणार्‍या दोन बॅटर्‍याही सलग पाच तास चालतात. टेस्ट केल्यात. अर्थात सेल वर चालणारा दिवा व सुट्टे सेल्स सोबत हवेच हवे.
बाकी काही असूदे, पण मी सामानाच्या तयारीबाबत मात्र अतिशय चोखंदळ व मुक्त हस्ताचा आहे. मी काय काय बरोबर घेतले होते ते लिहायला हवे होते Proud )

तिने ग्लुकोज आणले होते, ते तिला घेऊ नको असे सांगीतले.<<< असे का सांगितले?
"एनर्जी केळं" म्हणजे आपली नेहेमीची केळी घेतली होतीस का बरोबर? की काही वेगळे च्यूसी बार वगैरे होते?

>>

फक्त ग्लुकोज मध्ये शुगर जास्त असते. पण एन्डुरंस मध्ये शुगर, कार्ब, सॉल्ट, मिनरल्स अणि प्रोटिन हे सर्व आवश्यक असते. त्यासाठी एनर्झाल पावडर खूप चांगली आहे.

केळं म्हणजे आपली नेहमीची केळी. मी इतरही वेळी ७५ + जाणार असेल तर एखादं केळ सोबत ठेवतो.

एक प्रश्न, विलासला भरपेट जेवलात का? भरपेट जेवल्यावर सायकल चालवायला काही त्रास नाही झाला? होऊ द्यायचा नसेल तर काय करावे? >>

हो भरपेट. जनरली लोकं भरपेट जेवत नाहीत कारण त्यामुळे स्पीड कमी होऊ शकतो. पण आय लव्ह फुड, त्यामुळे मी नेहमीच भरपेट जेवतो, अर्धा तास थोडा कमी स्पिड मिळतो पण एनर्जी भरपूर साठविल्या जाते.

आणि ते साधे लाईट काही कामाचे नसतात लिंब्या. ७००, १२०० ल्युमिन्स वाले रात्री लागतात. सेपरेटवर बॅटरीवर चालणारे.

बीआरएम वर एक पुस्तक लिही तू आता >> अरे नाही रे. इतकेही काही ग्रेट नाही. मे बी ५० BRM झाल्यावर लिहिन. Happy

तुझ्या सायकली चा एक झकाससा फोटो टाक पाहू इकडे!!! >>. मुख्य लेखातच टाकतो. Happy

बी, हर्पेन, मित्, हिम्या, वर्षू, प्रविण, चनस, झकासराव, सुप्रिया, इन्ना, नरेश, लिंब्या धन्यवाद.

इन्ना तू ड्युएथलॉन मध्ये भाग घे आता.

केदार.. तु शिकागो मधे होतास ना? भारतात कधी गेलास? आणी सायकलिंग मधे एवढा कधी गुंतलास? मायबोलिवर मधे काही काळ आलो नव्हतो त्यामुळे तु भारतात परत गेलास व ही तुझी सगळी सायकलींग मधली प्रगती.. वगैरे सगळे मिसलो ...

जबरी लिहील आहेस रे.. शब्दाशब्दात तुझे सायकलप्रेम व कसब जाणवते. वाचताना तुझ्याबरोबरच आहे असे सारखे वाटत होते. हॅट्स ऑफ केदार! खरच... तु काय , रार काय(सायकलिंग व रनिंग साठी) ,टण्या काय(मॅरॅथॉन साठी).. आपापले करिअर सांभाळुन हे असे सगळे तुम्ही एवढे सिरिअसली करता यासाठी खरच सलाम!

मी भारतात असताना मिड ७० पासुन मिड ८० पर्यंत मुंबई-पुणे सायकल शर्यत कुतुहल म्हणुन बर्‍यापैकी फॉलो करायचो. तेव्हा त्या शर्यतीत कोण जिंकतो याचबरोबर (खंडाळ्याच्या) घाटाचा राजा कोण बनेल(म्हणजे घाट चढायला कोण सगळ्यात कमी वेळ घेतो त्याला तो किताब मिळायचा) याचीही खुप उत्सुकता असायची. कमलाकर झेंडे, दशरथ पवार, होमी भाथेना, अशोक कॅप्टन वगैरे नावे अजुनही लक्षात आहेत.. घाटांचे राजे किंवा शर्यत विजेते म्हणुन.

आता तुझ्या सगळ्या शर्यती वाचुन काढतो.

इन्ना तू ड्युएथलॉन मध्ये भाग घे आता.>> Uhoh अरे दोन आठवड्यापुर्वी २०-२५ वर्षांनंतर साय्कल चालवली १५ कीमी. अ‍ॅव्हरेज स्पीड २० . लै भारी वगैरे वाटून आता नेमानी चालवीन वगैरे विचार केला , पण अजूनही तुमच्या ह्या रुट्स वर मला मी गाडी चालवतानाच डोळ्यासमोर येतेय Wink Lol
बारीक चाकाची गियर वाली सायकल चालवता आली हेच काय ते समाधान.

भारीच लेख केदार.. तुमचे सगळे अनुभव एकदम खिळवून ठेवतात, आणि वाचकाला तोच थरार अनुभवतात.. खूप माहिती मिळतेय तुमच्यामुळे.. खूप खूप आभार..
आपल्या सायकलच्या फोटोत पॅडल(फुट रेस्ट) छोटं दिसलं. बर्याच भारी रोड बाईकच्या बाबतीत पण हे पाहिलंय.. त्यासाठी काही विशिष्ट शूज असतात का?

केप्या Happy नंदिनी, अरविंद, मुकूंद धन्यवाद

केदार.. तु शिकागो मधे होतास ना? भारतात कधी गेलास? आणी सायकलिंग मधे एवढा कधी गुंतलास? मायबोलिवर मधे काही काळ आलो नव्हतो त्यामुळे तु भारतात परत गेलास >>

हो शिकागो, स्वीट शिकागो, माय होम ! मी २०११ आक्टो मध्ये परतलो, म्हणजे नावापुरताच. पण ३ आठवडे भारत, २-३ आठवडे अमेरिका असे एप्रिल २०१४ पर्यंत केले. कारण कमिटमेंटस होत्या. आताही येण जाणं नेहमीच असतं.

आय मिस अमेरिकन रोडस. सायकलींग करायला मजा यायची ! मी सायकलिंग अमेरिकेत असतानाही करायचो, पण तेथे हजारो वर्ष मंडे टू थर्सडे असा प्रवास करावा लागत असल्यामुळे विकेंड वॉरियर होतो. इथे मला सायकल आणि शूटिगला द्यायला वेळ मिळतो. ( काईंडा फनी, भारतात येऊन वेळ मिळणे. Happy )

तुम्ही एवढे सिरिअसली करता यासाठी खरच सलाम! >> थँक्यु, सर. Happy

अशोक कॅप्टन वगैरे नावे अजुनही लक्षात आहेत.. घाटांचे राजे किंवा शर्यत विजेते म्हणुन. >>. अशोक कॅप्टन ग्रेट माणूस आहे. त्यांना भेटलोय मी. मुख्य म्हणजे त्या दिवशी माझी सायकल मी स्पेशलाईज्ड दुकानात नेली होती, तर कॅप्टन अशोक तिच्या प्रेमात पडले, आणि म्हणाले, यु नो, यु आर रायडींग ब्युटी. टेक गुड केअर ऑफ हर. Happy त्यांनी आणि मी जर एकत्र सायकल चालवली तर मी त्यांच्यासोबत एक मिनिटही टिकणार नाही. ते रॅमला पण गेले होते. आय विश मी अमेरिकेत असताना तिथे रॅम करण्याएवढी तयारी केली असती तर मजा आली असती. असो.

तुमचे सगळे अनुभव एकदम खिळवून ठेवतात >> Happy थँक्स.

आपल्या सायकलच्या फोटोत पॅडल(फुट रेस्ट) छोटं दिसलं. बर्याच भारी रोड बाईकच्या बाबतीत पण हे पाहिलंय.. त्यासाठी काही विशिष्ट शूज असतात का? >>

हो त्याला क्लिटस म्हणातात. त्याचे शू पण नेहमीसारखे नसतात, ते घालून जास्त वेळ चालता येत नाही, खूप स्टीफ असतात. त्याच्या तळाला छिद्र असतात त्यात क्लिटचा दुसरा भाग अडकवायचा. आणि हा शू त्या पेडल मध्ये अडकवायचा. म्हणजे तुम्ही टोटली बाईक वर अडकता. पावर ट्रान्सफरसाठी हे आवश्यक आहे.

>>> आपल्या सायकलच्या फोटोत पॅडल(फुट रेस्ट) छोटं दिसलं. <<<
अरे हां, हा देखिल एक प्रश्न.
पेडल मारताना फ्लॅट फुट ने मारावे (पायाच्या तळव्याच्या मध्यभागास पेडलवर ठेवून) की पुढिल चवड्याने मारावे? त्याप्रमाणेच सीटची उंची ठरवावी लागेल ना? ती किती असू द्यावी? पाय गुढग्यात पूर्ण ताठ होईल इतकी, की थोडे बाक चालेल?
तुझ्या सायकलचे पेडल बघता तू चवड्यानेच मारत असावास असे वाटते.
(मी चवडा, फ्लॅट फुट (तळपायाचा मध्यभाग) अन टाच अशा सर्व प्रकारे थोडी थोडी चालवून बघितली आहे... जस्ट चेंज म्हणून... Proud )

मला फ्लॅट पायाने चालविता येत नाही. लहानपणी बुटका असताना २४" सायकल चालवली तेव्हापासून पेडलला पाय पोहोचण्यासाठी चवड्याचाच वापर करायची सवय लागली आहे.

माझे प्रश्न वेड्यासारखे नाहीयेत ना? Sad

माझे प्रश्न वेड्यासारखे नाहीयेत ना? >>> अजिबात नाही. सायकलिंग बद्दल काहीही आणि कोणताही प्रश्न विचारा,मल माहिती असल्यास मी नक्कीच सांगेन.

सायकलिंग शू चे क्लिट हे चवड्यावरच लावलेले असतात. (म्हणजे जिथे बोट संपतात आणि फ्लॅट जागा सुरू होते त्या मधली जागा. ) तीच योग्य जागा.

त्याप्रमाणेच सीटची उंची ठरवावी लागेल ना? ती किती असू द्यावी? पाय गुढग्यात पूर्ण ताठ होईल इतकी, की थोडे बाक चालेल? >>

हा लेख वाच, उपयोगी आहे.

किंवा हा व्हिडीओ.

आणि हा व्हिडीओ.

I'm in awe every time I read about your BRMs !!!

ह्या लेखातून घडलेले माणुसकीचे दर्शन थरारक वर्णनाइतकेच आवडले.

लेख आवडला.
स्वतःच्या वेळेच्या रेकॉर्डची पर्वा न करता एका अनोळखी मुलीला इतका सपोर्ट केलास! सही आहे.
थ्री चीअर्स!

जबरी एकदम. खुप जबरदस्त राईड चा अनुभव आहे. रात्री गाडी चालवायला नको वाटते तिथे तुम्ही इतकी सायकल चालवलली म्हणजे मानलं _/\_

Pages