Onion Bread from Ethiopia

Submitted by दिनेश. on 30 March, 2015 - 07:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एक लोफ होईल
माहितीचा स्रोत: 
नेट आणि यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा...खूप टेस्टी दिसतोय ब्रेड! वाह स्लर्प स्लर्प Happy
मला घरी ब्रेड करावासा वाटतो पण उगाचच खूप कठीण प्रकरण वाटतं. आता तर खूपच इच्छा होत आहे.

ब्रेड मस्त दिसतोय.

एका विशिष्ट बाफमुळे मी आधी पाकृचं नाव 'ऑनलाईन ब्रेड फ्रॉम इथिओपिया' असं वाचलं.

मस्तं दिसतोय.
ब्रेड काही मला कधी जमला नाही.
मावेच्या कन्वेक्शन मोडवर नीट फुलत नाही ब्रेड.
आणि यीस्टचं पण काहितरी चुकतं.

आता ह्या प्रमाणात करून बघते.

एका विशिष्ट बाफमुळे मी आधी पाकृचं नाव 'ऑनलाईन ब्रेड फ्रॉम इथिओपिया' असं वाचलं.>>> घ्या आता
खाली पिली बदनाम हो गये रे बाबा Lol Proud

दिनेशदा, मस्त पाकृ , पुढच्या गटगला असे पदार्थ पाठवले तर धावेल Wink

धन्यवाद..
मी आज डब्यात आणला होता. अजूनच मस्त लगतोय !
साती, जर ब्रेडचे मिश्रण जमले तर थेट तव्यावरही हा प्रकार करता येईल. मस्त फुगेल.
टीना.. याचा आणखी एक आता सुचलेला शॉर्टकट म्हणजे तयार बनमधे असा कांदा भरून पुन्हा भाजणे.

जाई. , वर्षूला पाठवला होता काल. ती म्हणाली, तूच खा एकटा !

भन्नाट! असा पाकळ्या-पाकळ्यांचा कसा केला?

ब्रेड आहे की ब्रेड पॅटीस, केक आहे की एग पकोडा, की हळद फासलेली चिकन तंदूरी... भरल्यापोटी देखील तो पदार्थ सुका दिसत असूनही तोंडाला पाणी आणतोय.. अफलातून!

धन्यवाद...

पावाचे पिठ दुसर्‍यांदा फुगल्यावर त्यात आणखी एखादा घटक मिसळणे कठीण असते. ( कारण मैद्यातील ग्लुटेन आणि यीस्ट चे घट्ट जाळे तयार झालेले असते ) त्यामूळे असे मिश्रण मिसळायला जोर लावावा लागतो.

असे मिसळल्यावर आपोआप असे आकार तयार होतात. पण यात खरेच फारसे अवघड काही नाही.

मस्त दिसतोय. खमंग लागत असणार. घराजवळ एक पावाची भट्टी / बेकरी आहे, तिथून रात्री अपरात्री पाव भाजल्याचा खरपूस, खमंग व गोडसर वास येत असतो. हा पाव भाजताना कसा वास येत असेल याची कल्पना करतेय.

(मीही ऑनलाईन.... असेच वाचले! Lol )

दिनेश यू ट्युब वर इथियोपिअन ओनिअन ब्रेद अशा रेसिपीज आहेत पण त्यातला प्रॉडक्ट शेवटी पिझ्यासारखा दिस्तोय

रॉबिन, तो साध्या पॅनमधे केलाय, मी ब्रेड मेकरमधे केलाय. आकाराचाच काय तो फरक. घटक आणि कृती हिच.

पहिला फोटो बघुन पेने पास्ता अस्ल्यासार्खा वाटला, स्लाइसेस भारी! हौसेने घेतलेल्या गोश्टी वापरता आहात चान्गले आहे
माझ नेहमी आरभशुर होत.