दक्षिण आफ्रिकेचे अश्रू

Submitted by बेफ़िकीर on 24 March, 2015 - 06:08

दक्षिण आफ्रिकेचे अश्रू पाहून रडू आले. खरे तर उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात क्रिकेट जिंकले असे म्हणावे लागेल. पाऊस पडला तरीही सामना खेळला गेला. भरभरून क्रिकेटचा आनंद लुटला गेला. पारडे प्रत्येक चेंडूला वरखाली होत राहिले. शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल काय लागेल ह्या उत्सुकतेने रोमांच आले. आफ्रिकेने दबावाखाली येऊन दोन महत्वाचे झेल सोडले आणि एक धावबादची संधीही! ह्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त जवळपास सगळेच क्रिकेटरसिक मन गुंतवून बसलेले होते.

न्यूझीलंडच्या प्रेक्षकांना इतका जल्लोष करताना पाहण्याची संधी आजवर आलेली नव्हती. ह्या सामन्याने ती संधीही मिळवून दिली. त्याशिवाय ए बी डी आणि त्याच्या सहकार्‍यांनी , काही अपवाद वगळता, दिलेली झुंज रोमांचकारी ठरली. सगळे प्रेक्षक, धावपट्टी, वातावरण सगळेच परकीय असतानाही अशी झुंज देणे म्हणजे क्रिकेटवरील खरे प्रेम व भक्ती म्हणावी लागेल.

म्हणूनच मॉर्केल, एबीडी आणि स्टेनचे थबकून उभे राहणे, डोळे भरून येणे, मॉर्केलच्या गालांवरून त्याचे अश्रू वाहणे, कोणीतरी कोणाचेतरी सांत्वन करणे हे सगळे पाहून आपलेही डोळे भरून आले नाहीत तर नवल म्हणावे लागेल.

दुसर्‍या उपांत्य सामन्यात आपला देश जिंकेल किंवा जिंकावाच हे तर आपल्याला वाटत असणारच, पण ते सगळे क्षणभर बाजूला ठेवून असे म्हणावेसे वाटते की क्रिकेटचा सेमीफायनल / फायनलचा सामना व्हावा तर आज झाला तसा व्हावा.

दक्षिण आफ्रिका, तुम्ही आजवर जिंकला नसाल, प्रत्येक महत्वाच्या सामन्यात घातकी खेळून थट्टेचा विषयही ठरला असाल, स्वदेशात जाताना कदाचित तुमची मान ताठ नसेल, पण वुई ऑल क्रिकेट लव्हर्स नो दॅट यू आर वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम्स अ‍ॅन्ड वुई लव्ह यू!

-'एक क्रिकेटरसिक'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, या विषयावर काही मराठी, उर्दू गझला लिहून टाका तीन चार.
भावना इतक्या उत्कट झाल्या की त्याचा अविष्कार करायला उर्दु गझलाच पाहिजेत. काही काही कठीण शब्द वापरून लिहा, म्हणजे आम्हाला काही कळले नाही तरी आम्ही व्वा, व्वा, बहोत खूब, माशाल्ला असे ओरडू!

जास्त प्रतिसाद मिळतील. सगळेच चांगले असतील असे नाही, कारण विषय जेव्हढा अगम्य तेव्हढी त्यावर टीका जास्त असा नियम आहे. दुसर्‍या माणसाची स्तुति कशी करायची? आपण महाराष्ट्रीय ना!
Light 1

न्यूझीलंड डिजर्व्ह करत होती आज जिंकणे. आजच्या दिवसाचा हिरो ब्रेण्डन मॅकल्लम होता.. आताच हाईलाईटसमध्ये मी त्याची स्टार्ट पाहिली.. दुसरा कोणी असता तर नवीन बॉलवर सावध सुरुवात असती आणि आफ्रिकेला वरचढ व्हायला संधी असती..

असो, पण आजचाच का विचार करा, आफ्रिका साखळी सामन्यात भारतपाक कडून हरलीय.. हो हो चक्क पाकिस्तानकडून हरलीय.. याउलट न्यूझीलंड मात्र एकूण एक सामने जिंकलेय.. आणि हो त्यात ऑस्ट्रेलियाला देखील हरवलेय.. त्यांची कामगिरी या विश्वचषकात सरस होती..

ओवर ऑल सुद्धा मला न्यूझीलंड जास्त डिजर्व्हिंग वाटत होती.. आणि आफ्रिका काही वर्ल्डक्लास प्लेअर घेऊन खेळणारी असंतुलित टीम वाटत होती.. माझे विश्वचषक सुरु व्हायच्या आधीचे क्रिकेट धाग्यावरचे प्रेडीक्शन बघाल तर त्यात देखील मी न्यूझीलंड विश्वविजेता म्हणून अंदाज वर्तवला होता..

असो पण एकंदरीत आफ्रिकेचा हा संघ हरला याचे मला वाईट वाटले नाही.. जसे 1 बॉल 21 रनचे टारगेट मिळाल्यावर वाटले होते.. जसे क्लूसनरच्या दोन अफलातून फोर नंतर सामना टाय होत बाहेर पडले तेव्हा वाटले होते.. तसे वाईट आज वाटले नाही..

बाकी तसे कोणाला रडताना बघून वाईट वाटणे साहजिकच आहे, ते कांबळीला रडताना बघूनही मला वाटले होते..

@शाहीर- चोकर्स म्हणजे महत्वाच्या स्पर्धेत महत्वाच्या सामन्यात अटितटिच्या लढतीत फक्त मानसिक दबावामुळे (सामना जिंकायची संधी असताना) हरणे...आणि म्हणून दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू चोकर्स आहेत. कालच्या सामन्यात शेवटी शेवटी २ झेल सोडून आणि दोन धावचीत सोडून त्यांनी हेच तर दाखून दिलंय.
पण काही मूर्ख लोक गोष्टींचा अर्थ न समजून घेता जगाला मूर्ख म्हणून मोकळे होतात.

ते झेल किती अवघड होते ?
आपलया खेळाडूंनी घेतले अहेत का तसे झेल/? आफ्रिकन चोकर्स पेक्षा कमनशीबी जास्त वाटतात
पावसामुळे त्यांचा बर्‍याच वेळेस घोळ होतो

न्युझिलंडच्या कौतुकापेक्षा जिकडेतिकडे द.आफ्रिकेविषयी सहानुभूती अधिक प्रमाणात दिसते. त्यापेक्षा न्युझिलंडचे कौतुक जास्त करा. एवढी मोठी धावसंख्या असूनही ते डगमगले नाहीत.

न्युझीलन्डचे कौतुक आहेच, पण अफ्रिका कायम कमनशिबी ठरतेय. नाहीतर ९२ साली सुद्धा ते पाकीन्पेक्षा जास्त फेवरमध्ये होते. याला म्हणतात हाता-तोन्डाशी आलेला घास हिरावुन जाणे.

घ्या

न्यूझीलंड डिजर्व्ह करत होती आज जिंकणे. न्यूझीलंड मात्र एकूण एक सामने जिंकलेय.. आणि हो त्यात ऑस्ट्रेलियाला देखील हरवलेय.. त्यांची कामगिरी या विश्वचषकात सरस होती >> +१

ते झेल किती अवघड होते ? आपलया खेळाडूंनी घेतले अहेत का तसे झेल/? >> साऊथ आफ्रिकेची सर्वात मोठी स्ट्रेंग्थ त्यांची फिल्डिंग आहे....तिथेच त्यांनी मार खाल्ला!!!

कालची मॅच न्यूझीलंड ज्याप्रमाणे खेळले आहे त्याप्रमाणे तर तेच जिंकायला हवे होते!!

काही प्रमाणात सहमत शाहीर. पाऊस आणि डकवर्थ - लेविस सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांची वाट लावतात

मित्रहो,

दक्षिण आफ्रिकेने ऐनवेळी घोडचुका केल्या हे जगजाहीर आहेच. पण नेहमीप्रमाणे नशीबही उलटले ह्याचे वाईट वाटल्यामुळे हा धागा लिहिला. इतर टूर्नामेंटमध्ये ते बरेचसे लौकीकाला साजेसे खेळले, कुठे शिवीगाळ केली नाही, शक्य ते स्पर्धेला द्यायचा त्यांनी प्रयत्न केला.

तेव्हा कृपया विनंती आहे की एकमेकांवरच चिडू नयेत. Happy

खर म्हणजे काल आफ्रिकेने शाळकरी टीम सारख्या चुका करून हातातली मॅच घालवली. very poor exibition of fielding and that's why they deserved to loose. मॅच शेवटी इंटरेस्टींग झाली असली तरी आफ्रिकेला माझी सहनुभूती मुळीच नाही. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्याने त्यांना जास्त दु:ख झाले असेल.

भारतात मोदींचा उदय होणे आणि दक्षिण आफ्रिका उपांत्या फेरीत पोहोचणे तसेच न्युझीलंडने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणे या गोष्टींचा आपसात संबंध असावा काय ?

कमनशीबी ??

ते चोकर्स नाही लूजर्स आहेत !>> रियली?? प्र्चैन्ड फॉर्मात असताना पॉवरप्लेच्या ७ ओव्हर न खेळता येणे याला कमनिशिबीच म्हणतात...

इट्स पार्ट ऑफ गेम, आणि ते पहिल्या इनिंगला झाले होते, त्यानंतरही बरीच मॅच बाकी होती, पण त्यांना नुसता तेवढाच बहाणा मिळाला. कधी हरतोय आणि आम्ही रडतोय अशी वाटच बघितल्यासारखे काल शेवटी खेळत होते..

लिहायला यावर बरेच आहे, एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.. पण तुर्तास ऑफिस सुटले Happy

Rashmi Rofl

अप्पा - किवीज डिझर्विंग आहेतच. पण ती आफ्रिकेच्या खेळाडूंची रिअ‍ॅक्शन कायम लक्षात राहील. बेफिंनी स्पेसिफिकली त्याबद्दल येथे चर्चा केल्याने त्यावर फोकस होत आहे, एवढेच.

त्या एबीडीला जग आज नंबर वन फलंदाज म्हणून ओळखते. नव्हे तो आहेच. माझा आजच्या तारखेचा सर्वात फेव्हरेट ज्याची बॅटींग बघायला ज्यादा पैसे मोजायला तयार होऊ म्हणतात अश्यातला फलंदाज..

पण.. आला कधी तो फलंदाजीला.. पाचव्या क्रमांकावर.. आधीचे त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म सेट करणार आणि मग हा मारणार.. असा गेमप्लॅन..

याउलट न्यूझीलंडचा बेस्ट फटकेबाज मॅकुल्लम.. भले एबीडी पेक्षा तुलनेत कमीच.. त्याने काय केले? तो ओपनिंगला उतरला आणि फटकेबाजी करून इतरांना प्लॅटफॉर्म सेट करून दिला..

हा या दोन्ही संघाच्या एटीट्यूड आणि कालच्या सामन्यातील डिसायडींग फॅक्टर..

याउपर कोणी काल सामना पाहिला असेल त्यांना समजले असेल की न्यूझीलंडने गोलांदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कसा आक्रमकपणा दाखवला होता.. निव्वळ बोल्टच नाही तर इतर गोलंदाजांनाही तेच करायला भाग पाडत होते..

याउलट आफ्रिका.. जगातला सर्वोत्क्रुष्ट कसोटी गोलँदाज स्टेन यांच्या संघात.. पण वनडे मध्ये काय करावे ना हे याला समजले ना त्याला कसे वापरावे हे त्याच्या संघाला.. गेला बाजार इम्रान ताहीर या ट्रंपकार्डलाच योग्य प्रकारे वापरला असता तरी फरक पडला असता.. पण त्याच्याकडे हे चौथा गोलंदाज म्हणूनच बघत असावेत बहुधा..
तेच हे स्वता फलंदाजीला असताना समोरून चेंडू फिरकी घ्यायला लागला की आधीच यांची फे फे उडते.. तिथेच यांना पराभवाचे कारण मिळते..

अनुकूल परीस्थितीत दैदिप्यमान कामगिरी बजावत कागदावर बलाढ्य झालेला हा संघ आहे.. काल हरण्याआधी लढले असते तर माझ्यासारखेही रडले असते.. असो, पण यंदाही ते इथे विश्वचषक कमवायला नाही तर सहानुभुती मिळवायला आले होते, ती त्यांना देऊन तुर्तास अर्धविराम घेतो..

पण जाता जाता आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला इथेच एक सांगतो, पुढच्या चार वर्षांसाठी हा संघ माझ्या ताब्यात द्या. बघू कसा जिंकत नाही वर्ल्डकप!

मस्त!

उद्यापुरता भारताचा संघ ताब्यात मिळवा राव Light 1

बाकी खालील अटींची पूर्तता झाली तर कप आपलाचः

१. उद्या टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेणे
२. टॉस न जिंकल्यास आणि पहिली गोलंदाजी आल्यास जडेजाला गोलंदाज म्हणून लवकर इंट्रोड्यूस करणे
३. टॉस न जिंकल्यास आणि पहिली गोलंदाजी आल्यास धोनीने जडेजानंतर फलंदाजीस येणे
४. टॉस जिंकून पहिली फलंदाजी आल्यास रैनाला रहाणेच्या आधी पाठवणे
५. स्लेजिंगकडे तेंडुलकरच्या स्टाईलमध्ये दुर्लक्ष करणे
६. रोहित, धवन व कोहली मिळूण किमान १५० रन्स होणे!

Happy

न्यूझीलंड आपल्यासमोर गळाठणार ह्यात काहीही शंका नाही.

टॉसचे महत्व अनन्यसाधारण!

टॉस हरलो तर रैना आणि धोनी टिकणे अत्यावश्यक!

Happy

पण यंदाही ते इथे विश्वचषक कमवायला नाही तर सहानुभुती मिळवायला आले होते > > पण यंदाही ते इथे विश्वचषक कमवायला नाही तर सहानुभुती मिळवायला आले होते > >तू हे आधी तुझ्या "आजच्या तारखेचा सर्वात फेव्हरेट ज्याची बॅटींग बघायला ज्यादा पैसे मोजायला तयार होऊ म्हणतात अश्यातला " फलंदाजाला कळवले असतेस तर त्याचा त्रास वाचला असता रे, तो त्याच्या पत्रकार परिषदेमधे काहीतरी भलते सलतेच बोलला खरे

"It doesn't make me feel better at all, not at all, no, We play this game to win games of cricket, to take glory home and make a difference to the nation, and we didn't do that. We didn't achieve that."

>>>and make a difference to the nation<<<

वा एबीडी, किमान तुला ते माहीत आहे जे अजून ऋन्मेषला माहीत नाही. Wink Happy

ऋन्मेष - Light 1

>>>तू हे आधी तुझ्या "आजच्या तारखेचा सर्वात फेव्हरेट ज्याची बॅटींग बघायला ज्यादा पैसे मोजायला तयार होऊ म्हणतात अश्यातला " फलंदाजाला कळवले असतेस तर त्याचा त्रास वाचला असता रे, तो त्याच्या पत्रकार परिषदेमधे काहीतरी भलते सलतेच बोलला खरे<<<

खरे आहे

Pages