परवाच " चीन " ह्या विषयावरच्या काही डॅाक्युमेंट्रीज पाहिल्या ...........
६००००००० ओफिशियल मेंबर्स असणारी कम्युनिस्ट पार्टी ..,
ओरिजिनल प्रॅाडक्ट बनवणा-या प्रत्येक MNC मॅन्युफॅक्चरिंग युनिट च्या शेजारीच असलेले त्या प्रॅाडक्ट च्या काउंटरफीट' चे मेकींग युनीट........,
४-४, ५-५ चौरस मैलात पसरलेल्या नी एका वेळेस ४० ते ५० हजार लोकांना रोजगार देणा-या कंपन्या असोत,
मुस्लीम बहुल जिंझियांग प्रांतात मुस्लीमांचं प्राबल्य कमी व्हावं म्हणुन सरकारनी सुरु केलेला लाखोंच्या संख्येन बिगर मुस्लीमांच्या त्या भागात स्थानांतरित होण्याचा कार्यक्रम नी त्याची भलामण करणारा नी " मी लहानपणी कुराण वाचलंय पण कम्युनिस्ट पार्टीत आल्यावर मी इस्लाम पाळणं बंद केलं.." असं म्हणणारा इस्माइल तालिवाडी नामक जिंझियांगचा मुसल्मान गव्हर्नर ............
रातोरात सेझ' साठी गावंच्या गावं गायब करणारी नी बिजींग सारख्या दिड करोड लोकसंख्येच्या शहरात मेट्रो/ हायवे बनवण्यासाठी दोन दिवसात अख्खी ४ किमी अंतरात पसरलेली झोपडपट्टी गायब करणारी सिस्टम असो..
वा हो-हँग-हो नी यांगत्सेच्या खो-यात दरसाल येणा-या पुरामुळे जीवित व वित्त हानी होत असल्याने निर्णय घ्यायला कमिटी बसवुन महीनाभरात ४-४ अजस्त्र धरणं बांधायचा निर्णय घेउन सुमारे २ कोट लोकांना पुढल्या सहा महीन्यात स्थलांतरीत करणं ...........
डोकं सुन्न झालंय..!
मोदी साहेब.. तुम्ही प्रयत्न करताय हे ठीक..
पण आपल्या इथल्या " स्वातंत्र्यामुळे" झालय काय की गल्ली गल्लीतच ओंगळपणा इतका वाढलाय की एक काय १०० मोदी जरी दिल्लीत आले तरी ते ही आम्हाला सुधारु शकतील का? असा प्रश्न पडतो .
अजुन ५ वर्षांनी २०१९ ला , " अमकं फुकट दिलं नाही, तमक्याचे भाव वाढवले, अच्छे दिन आलेच नाहीत.. " असल्या फुटकळ कारणानी आम्ही तुमची सत्ता घालवणार की काय ?
आम्हाला फुकट/ विनासायास नी कुठल्याही बांधीलकी विना पुरोगामीपण/ आरक्षण वगैरे ची झुल पांघरुन नी ' स्वैराचाराचा नंगा नाच' रुपी स्वतंत्र राहुनच सगळं मिळवायचंय.. जे की अशक्य आहे..
हल्ली, रोज संध्याकाळी दिवे लागणीला माझ्या एक वर्षाच्या पोराला कडेवर घेउन देवासमोर उभं राहुन "शुभं करोती" बरोबरच " नमस्ते सदा वत्सले मातृभुमे" सुद्धा म्हणतोय..
नी फक्त मनात असलेल्या ( नी १५ आगस्ट/ २६ जानेवारी सोडुन इतरत्र कधी ही न दिसणा-या) तिरंगी ध्वजाला
" ध्वज प्रणाम..
एक
दो
तीन .." म्हणुन सलाम ठोकतोय..
सद्ध्या तेवढंच हातात आहे माझ्या..!
*Edited
चीन हा शत्रू आहे हे मोदीना
चीन हा शत्रू आहे हे मोदीना ठाउक होते तर ते झोपाळ्यावर बसुन झुलत का होते ?
मला वाटले होते भेटायला बोलवुन म्हाराजअनी खानचा कोथळा काढला तसे कर्तात की काय !!
पण तसे काही झालेच नाही. उलट चायना गुज्रातेत कारखाने काढणार म्हणे !

मोदी त्यांना घाबरवत होते.
मोदी त्यांना घाबरवत होते. १९६२ ला चिनी सैन्याची आम्ही कशी हालत केली ते लक्षात आहे ना असं खुसुफुसुर करून सांगत होते. आता तर आमचंच सरकार आहे. आम्ही सैन्याला ट्रेनिंग देणार आहोत. निमूटपणे कारखाने लावता की नाही असा सज्जड दम भरल्याबरोबर चीनचे अध्यक्ष सटपटले. त्यांच्या खिशात एक टेप पण होती. चला आता आपण छाती मोजूयात म्हटल्यावर ते म्हणाले, नाही नको, आम्ही कारखाना लावू.
(No subject)
http://dainiksanatanprabhat.b
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2015/03/blog-post_8011.html
ही वेबसाईट यवनांकडून हायजॅक तर नाही झाली ना ?
टण टणा ट्ण्ण्ण टंण टण
टण टणा ट्ण्ण्ण टंण टण
तोरसेकर _ टणाटण = संपूर्ण
तोरसेकर _ टणाटण = संपूर्ण ज्ञान.
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2015/03/blog-post_4999.html
यातला संपादक हा अतिशय हुषार माणूस आहे. लोकांना बातमी कळेलच असं नाही म्हणून कंसात तो बोधपर वाक्यं लिहीत असतो. जयतु जयतु !
चीन शत्रु आहे ? मग त्या घोष
चीन शत्रु आहे ? मग त्या घोष वाक्याच काय ?
मग तुम्ही मान्य करताय की पं नेहरु चुकच होते ? हिंदी चीनी भाई भाई म्हणे !!
दिसलं नाही का ? वेबसाइट
दिसलं नाही का ? वेबसाइट कुनाची आहे हे नीट डोळे उघडून पहावे. भिंग घेऊन पहाणे.
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2015/03/blog-post_8011.html
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
जम्मूत पुन्हा आतंकवादी आक्रमण
या घटनेवरून काँग्रेसप्रमाणे मोदी शासनाच्या राजवटीतही आतंकवाद फोफावत असल्याचे स्पष्ट होते !
मोदी शासनाने आतंकवादाविषयी बोटचेपे धोरण न अवलंबता आतंकवादाचा कठोरपणे बीमोड करावा !
सैनिकांकडून २ आतंकवादी ठार
जम्मू, २१ मार्च - आतंकवाद्यांनी सांबा जिल्ह्यातील मेशवाडा येथे असलेल्या सैन्याच्या छावणीवर आक्रमण केल्याची घटना २१ मार्च या दिवशी घडली. २० मार्चला सकाळी कठुआ येथील पोलीस ठाण्यावर भारतीय सैनिकी वेशात घुसून आक्रमण केल्याची घटना घडून २४ घंटे उलटत नाही तोच आतंकवाद्यांनी सलग दुसरे आक्रमण केले. या आक्रमणात त्यांनी थेट सैन्याच्या छावणीलाच लक्ष्य केले. (आदल्या दिवशी झालेल्या आक्रमणातील आतंकवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार मारले होते, हे ठाऊक असूनही आतंकवाद्यांनी आक्रमण केले. ते भारतीय सैनिक आणि गुप्तचर यंत्रणा यांना हुलकावणी देऊन आक्रमण करतात. यातून त्यांची हुशारी लक्षात येते. - संपादक) आतंकवाद्यांच्या या आक्रमणास सुरक्षादलाच्या सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही आतंकवादी मारले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-पठाणकोट महामार्गाच्या बाजूला असलेल्या ८१ आर्म्ड रेजिमेंटच्या छावणीत घुसून आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट होता; मात्र तो फसल्याने त्यांनी बाहेरूनच बेछूट गोळीबार चालू केला. आतंकवाद्यांनी सुरक्षासैनिकांच्या छावणीच्या दिशेने ग्रेनेडही फेकले. यामध्ये उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेला आणि श्री वैष्णोदेवीच्या यात्रेहून परतणारा भाविक घायाळ झाला. त्याला सांबा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी तात्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालून आतंकवाद्यांची नाकेबंदी केली. त्यानंतर आतंकवादी आणि सुरक्षादलाचे सैनिक यांच्यात झालेल्या धुमश्चाक्रीत दोन्ही आतंकवादी मारले गेले.
--------------------------------------------------------------------------------
आता जरा भाषणं ऐकूयात
-पाकिस्तान की ईट से ईट बजा देंगे
-५६ इंच की छाती
-क्या हम उनके चार के बदले चालीस नही मार सकते थे ?
-मुझे बहोत दुख होता है जब....
आता काय बाप बेटी की सरकार से
आता काय बाप बेटी की सरकार से दोस्ती की है.. अब हर हफ्ते एक आतंकवादी छोड देंगे.
१९९६ ला कंदाहार झालं तेव्हां सोडले, त्या आधी जनता दलाच्या सरकारला समर्थन देताना मेहबूबाच्या बदल्यात अतिरेकी सोडले, पण पाठिंबा चालूच ठेवला. परंपरा जुनीच आहे.
Pages