Submitted by उडन खटोला on 14 March, 2015 - 05:15
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयटी असो, मेकॅनिकल असो,
आयटी असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रीकल असो, मेडिकल असो. डिप्लोमा असो , डिग्री असो, आयटीआय असो.. Skilled Labor ला कुठेही "भाव" असतोच/आहेच. पाट्या टाकणारे लोक प्रत्येक ब्रांच मधे असतातच. आपण skill मिळवायचे का पाट्या टाकायच्या हे आपले आपण ठरवायचे.
सिव्हिल , मेकॅनिकल ,
सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना सहमत नाही , कुठेही तुटवडा नाही , असल्यास कळवावे किमान ज्यांना नोकरी नाही त्यांना तरी मिळेल अशी अपेक्षा
>>>>>>>>>> +११११११११११११११११
हाहाहा. गंमत म्हणून, आपोआप
हाहाहा. गंमत म्हणून, आपोआप किंवा कुणीतरी officially वगैरे glamor देतंय असं एकूण मत दिसतंय धागा सुरू करणार्यांचं. आणि ते कमी झालंच पाहिजे असा निषेध पण दिसतोय लिहीण्यात. उडन खटोला तुम्ही केलंय का इंजिनियरींग? किंवा झालेल्या लोकांशी बोलला तरी आहात का किमान? जा बोला जरा इतर स्ट्रीममधल्या लोकांशी. इथं दर वर्षी आयटीत चांगल्या लोकांची कमी आहे म्हणून इतर स्ट्रीममधल्या आणि अगदी नॉन इंजिनियरींग च्या लोकां चीही भरती होते. कसला का असेना रिसोर्स बेस वाढवण्यासाठी कंपन्या मरत असतात. उगाच मज्जा म्हणून कोण असं करेल?
आणि आयटी इंडस्ट्री मधून पैसा मिळतोय म्हणून त्याला ग्लॅमर आहे. revenue generating industry आहे ही. आणि म्हणून त्यांच्या white collared labour ला पण पैसा आहे. आयुष्य काही फार सुखाचं आहे असं नाही. पण पुर्वीच्या middle class पण academic लोकांच्या पोरंच्या मगे लागून मार्क पडण्याचं चीज झालं म्हणावं इतकं lifestyle ही industry देते. त्यामुळे इतर अनेक industries चालतात.
असं एखादं क्शेत्र तुमच्या इच्छेवरून glamourous किवा non-glamorous झालं अस्तं तर भारत केंव्हाच महासत्ता झाला असता.
नक्की तुमचं objection कशाला आहे तेच कळलं नाही.
इंजिनियरींग च्या जागा
इंजिनियरींग च्या जागा रिकाम्या रहाण्याचं कारण इथल्या हावरट लोकांनी बाहेरच्या राज्यातून लोक महाराष्ट्रात शिकायला येतात म्हणून भरमसाट कॉलेजं काढून ठेवलीत हे आहे. तसं तर आयटी रिलेटेड स्ट्रीमस च्या जागा पण असतीलच रिकाम्या. नीट बिल्डिंग पण नसलेली, proper labs नसलेली कितीतरी इंजिनियरिंग कॉलेजेस कुठं कुठं आहेत. गेल्या काही वर्षांमधे किती तरी नविन कॉलेजेस निघाली आहेत.
नक्की तुमचं objection कशाला
नक्की तुमचं objection कशाला आहे तेच कळलं नाही.
....
अनुमोदन.
ते गेल्या वर्षीच रिटायर होऊन चार पैसे गाठीला बांधुन कोकणात खानावळ की गेस्ट हाउस वगैरे चालवतात म्हणे .. याण्याना या चिंता कशाला हा मलाही प्रश्न पडला होता. स्वतः चार पैसे मिळवुन रिटाय्र होउन जग्तात मजेत , तर इतरानाही चार पैसे मिळवुन जगु द्यावे की.
आयटी क्षेत्राला लाभलेले
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते ;> नाही पटले. आयटी मुळे भारताला बर्यापैकी परकिय चलन मिळते, आयटी तसेच त्याचा आजुबाजुच्या लोकाचे रहाणीमान वाढते. ( हिजेवाडीचे रिक्षावाले पण आयटीमुळे जास्त कमवतात हे कुणीतरी लिहले आहे).
उलट बाकीच्या कामाचे ग्लॅमर वाढले पाहिजे असे लिहले असते तर योग्य ठरले असते.
इन्जिनियन्ग सिट बद्दल बोलत असला तर मागणीपेक्षा पुरवठा खुपच वाढला आहे. तसे करताना दर्जा मात्र घसरला आहे. देशात मागणी नसल्याने आणि परदेशात जाण्यासाठी दर्जा नसल्यामुळे बाकी इन्जिनियन्ग च्या लोकाना (खास करुन fresh engineers ला) वाईट दिवस आले आहेत. त्यामुळेच ४४००० जागा रिकाम्या राहिल्या आहेत. त्या रिकाम्या न राहाण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढवणे हा एकच उपाय आहे.
लिम्ब्याच्या भिन्नलिंगी
लिम्ब्याच्या भिन्नलिंगी आकर्षणाच्या मुद्द्याचं आकर्षण असलेले लोक मी पाहिले आहेत (मी लिम्ब्याला अनुमोदन देतोय असे समजू नका).
>>>
मी लिम्ब्याच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन देत नाहिये या पर्तिक्युलर मुद्द्याला देत आहे इतकेच म्हणायचे होते.
आय.टी. सेवा क्षेत्र दिवसें दिवस अधिकाधिक कमोडिटाइझ होत आहे. कमोडिटाइझ होणे आणि पगार घसरणे/ग्लॅमर घसरणे हे व्यस्त प्रमाणात असणार. इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे नवीन/लेटेस्ट टेक्नॉलोजीवर काम करणार्यांना, नवीन कल्पना बाजारात आणून विकणार्यांना (आंत्रप्रुनर) आजही आयटी तगडा पैसा देते.
एके काळी फोटोग्राफर असणे हे एकदम स्किलचे काम होते, आठवून बघा की फोटोग्राफर व्यवसायातला माणूस समाजात सधन वर्तुळात असे. आज काही मोजके फोटोग्राफर (जे आपलं स्किल अद्ययावत ठेवतात) सोडल्यास त्या धंद्यात पुर्वीसारखी पत नाही. त्यामागे थोडे गेलात तर गराज मेकॅनिक बर्यापैकी धंदा समजला जात असे.
आयटीचे तेच होईल (जे इतर तांत्रिकी शाखांचे झाले)/
आयटीचे ग्लॅमर या शब्दाने घोळ
आयटीचे ग्लॅमर या शब्दाने घोळ झाला. शिक्षण अधिकाधिक व्यवसायाभिमुख असाब्वं अशी पालकांची (आणि विद्यार्थ्याची ही ) अपेक्षा असते. आयटी़चा व्यवसाय युरोप, अमेरीका आदी देशांशी असल्याने त्या त्या देशांप्रमाणे वेतन (थोडे कमी असले तरी) किंवा त्या त्या देशातल्या चलनात पगार मिळू लागला. भारतीय रूपयात प्रचंड तफावत असल्याने जेव्हां भारतात राहून आयटीवाले डॉलर, पौंडाच्या हिशेबात पगार घेऊ लागले तेव्हां त्या त्या शहरात दोन अर्थव्यवस्स्था निर्माण झाल्या. दुबईत ट्रेड्समनना ज्या दराने वेतन मिळते त्या दराने सर्वच भारतात दर मागू लागले तर काय हाहा:कार उडेल ? पण जर सर्वांचंच जीवनमान उंचावलेलं असेल तर कुणाला त्याचं काही वाटणार नाही. इथे एका क्षेत्राला आंतरराष्ट्रीय वेतन आणि इतर सर्वच क्षेत्रात उदासीनता झाल्यामुळे महागाई वाढली, ज्याचं कारण आयटी क्षेत्र आहे असा समज निर्माण झाला, ज्यात तथ्यही आहे. बंगळुरू सारख्या ठिकाणी रिक्षेवाला एक किमीला पाच ते दहा रूपये घेत होता ते आता शंभर रूपये मागू लागला आहे. एमजी रोडला फळं सुद्धा वाटेल त्या दरात मिळतात. कारण घेणारे लोक आहेत. मॉल आल्यापासून तिथे खरेदी करणारे लोक आले, ते आल्याने अन्नधान्याच्या किंमती वाढल्या. या महागाईला तोंड द्यायचे तर परंपरागत व्यवसाय धंद्यात दरवाढ होणे आवश्यक आहे, पण ते शक्य होताना दिसत नाही. चांगल्या लाईफ स्टाईल साठी लोक आयटीकडे वळत आहेत.
इतर क्षेत्रात फक्त स्पेशालिस्टला हववंते मानधन मिळतं. माझे गुरू आहेत ज्यांना रेफ्रीजरेशन या विषयावर व्याख्यान देण्यासाठी तासाला १०,००० रु. मोजण्याची तयारी असते लोकांची. त्यांची सल्ला फी सुद्धा जबरदस्त आहे. या स्टेजला यायला त्यांना ४० वर्षे लागलीत. एकाच क्षेत्रात पहील्यापासून काम करून त्यातला अंतिम शब्द बनणे यासाठी वेगळीच कमिटमेण्ट लागते. अर्थात त्यांच्या काळात त्यांना मिळणा-या पगारात भागत होतं. लोकांच्या लाईफस्टाईल मधे मुळातच प्रचंड तफावत नसे. त्यामुळे गरजा माफक. शिक्षण स्वस्त इत्यादी अनेक फॅक्टर्सही होते. माझ्या आईवडलांना तेच सांगत असतो, की तुमच्या काळात आमच्या शिक्षणावर तुम्हाला जवळजवळ शून्य इतका खर्च झाला. आम्हाला पहिलीची फी आणि इतर खर्च धरून लाखभर रूद्या द्यावे लागतात. हे सगळं जुळवायचं तर जोडधंद्याशिवाय पर्याय नाही. दुसरा मार्ग म्हणजे बक्कळ पैसा मिळणारं क्षेत्र.
उडन खटोला, मला एक विचारावेसे
उडन खटोला,
मला एक विचारावेसे वाटत आहे. तुम्हाला असे वाटत नाही का की मानवजमातीच्या जीवनशैलीतील व राहणीमानातील बदल हे प्रवाहानुसार होत राहतात? अनेकदा माणूस ठरवून त्याबाबत काहीच करू शकत नसतो असे वाटत नाही का? आय टी व आय टी मुळे विकसित झालेली एक वेगळी जीवनशैली हा इन्जिनिअरिंग व इतर सर्वच इंडस्ट्रीज आणि व्यवसायांमधील ऑटोमेशनच्य निकडीचे एक बायप्रॉडक्ट आहे. फरक इतकाच आहे की ह्या इंडस्ट्रीत विकसित देशांंअधील जीवनशैलीशी फारच मोठ्या प्रमाणावर संबंध येत आहे ज्यामुळे यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी वगैरे शाखांना जे दिवस दाखवता आले नाहीत ते आज दिसत आहेत.
आय टी क्षेत्राला ग्लॅमर नाही आहे उडन खटोला! अविकसित समाज ज्या जीवनशैलीला ग्लॅमरस म्हणून अचंब्याने पाहतो त्या जीवनशैलीशी भारतातील आय टी क्षेत्रातील कर्मचार्यांचा आये दिन जवळून संबंध येतो म्हणून असे वाटते की तेही ग्लॅमरसपणे जगत आहेत. प्रत्यक्षात आय टी त असलेले अनेक लोक खासगी आयुष्यात नॉनग्लॅमरस जीवनशैलीतच जगत असतात.
मी जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअर
मी जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअर झालो तेव्हा जगभरातील ऑटो मॅन्यूफॅक्चरर्स भारतात येऊन स्वतःहून असेंब्ली लाईन टाकत होते किंवा कोलॅबोरेशन्स करत होते. सहज गृहीत धरू. जर तेव्हा त्या ऑटो मॅन्युफॅक्चरर्सनी भारतातील तुलनेने स्वस्त लेबर, जागा, पाणी, इन्जिनियर्सचा ताफा, व्यवसायवृद्धीची भारतदेशाची अजरामर आकांक्षा ह्या घटकांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नसता आणि फक्त आणि फक्त येथील अभियंत्यांना स्वतःच्या देशात मोठ्या प्रमाणावर नेले असते (हे सगळे होणे शक्य नव्हते हे मान्य आहे) तर तेव्हाच आजचे दिवस भारतीय समाजाला दिसले असते.
विकसित जगाशी व संगणकीकरणाशी आपला संबंध घनिष्ट होण्यामागे आपली आपल्या लोकांना आय टी क्षेत्रातील शिक्षण देण्याची क्षमता, आपल्या लोकांची शिक्षण घेण्याची क्षमता व अफाट लोकसंख्या हे घटक कारणीभूत आहेत. हे घटक इतर कोणत्याही शाखेस लागू होत नाहीत. त्यामुळे आय टी मुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर विकसित देशांमधील जीवनशैलीचा परिचय झाला आहे. हे ग्लॅमर नसून हे 'आपण स्वतःला त्यांच्याशी जुळवून घेणे' अधिक आहे असे मला वाटते. काही प्रमाणात, वुई आर बीइंग यूझ्ड अॅन्ड वुई वॉन्ट द सेम, असे काहीतरी!
अनेकदा, आय टी मधील कर्मचारी मला खूप जास्त स्ट्रेस्ड, कन्फ्यूझ्ड, एक्स्प्लॉइटेड आणि डिस्सॅटिस्फाईड वाटतात.
ही मते वैयक्तीक!
जर तेव्हा त्या ऑटो
जर तेव्हा त्या ऑटो मॅन्युफॅक्चरर्सनी .......... दिसले असते.
या अपेक्षा अर्थातच अवाजवी आहेत हे तुम्हालाहि मान्य असेल. जिथे तुम्ही आय टी., ऑटो उत्पादन समजता तिथे परकीय लोक "धंदा" बघतात. त्यात नफा मुख्य. त्यातहि ह्यूमन रिसोर्स विकास महत्वाचाच. पण तो इतर देश आपोआप करताहेत, त्यासाठी परकीय कंपन्यांना काहीच करायला नको.
जेंव्हा माझे काम इतर देशात चांगले होऊ शकणार नाही असे कंपनीला वाटले तेंव्हापासून त्यांनी मला भरपूर शिक्षण दिले. अजूनहि इथे अनेक लोक अशी कामे करतात की जी आउट्सोर्स करता येत नाहीत. तिथे त्यांना भारतीयांच्या कित्येक पट पगार देऊन पुनः त्यांना शिक्षणहि देतात.
इथे आय.टी. ला ग्लॅमर नाही - किम कार्डॅशियनला आहे.
आय टी. चे ग्लॅमर पैशांमुळे आहे. आय टी. वाल्यांपेक्षा जास्त श्रीमंत लोक भारतात अनेक आहेत. ते पण खूप मज्जा करतात. ग्लॅमर अर्थातच मल्लिका शेरावत इ. ना कितीतरी जास्त आहे ना?
>> पन्नास रुपड्यांच्या अंतरा
>> पन्नास रुपड्यांच्या अंतरा इतक्या प्रवासासाठी रीक्षाचे भाडे २५० रुपयाच्या खाली सांगितले तर मी माझी आयडी बदलेन
मी मॉडेल कॉलनी मधे रहायचो तेव्हा शिवाजीनगर पासून कुठलाही रिक्षावाला तिथे यायला तयार व्हायचा नाही. आता बोल लिंबू!
>>>पण तो इतर देश आपोआप
>>>पण तो इतर देश आपोआप करताहेत, त्यासाठी परकीय कंपन्यांना काहीच करायला नको.<<<
झक्की,
हे वाक्य नाही समजले. कृपया अधिक विस्तृतपणे सांगावेत
फक्त आणि फक्त येथील
फक्त आणि फक्त येथील अभियंत्यांना स्वतःच्या देशात मोठ्या प्रमाणावर नेले असते
या वाक्यासंबंधी. जशी गरज तसे ते नेतील ना! ते काही आयटी वाल्यांना फार मोठ्या प्रमाणात वैयक्तिक रीत्या बोलवत नाहीत.
इन्फोसिसला वगैरे कंत्राट देतात, मग ती कंपनी ठरवते कुणि अमेरिकेत जायचे नि त्याप्रमाणे इकडल्या लोकांकडून इन्फोसिस पैसे घेतात. पुनः इकडल्या कंपनीत काही गडबड झाली(काही विचारू नका - जेव्हढी मोठी कंपनी तेव्हढ्या मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट लगेच कॅन्सल असे होते), व्हिसा योग्य तर्हेचा नसला तर ताबडतोब भारतात परत हाकलून देण्याच्या घटना घडल्या आहेत.
तर आता इंजिनियरिंग चे कॉन्ट्रॅक्ट घेणार्या कंपन्यांतर्फे काही भारतीय इथे येऊन राहिलेले मला माहित आहेत. फक्त एकच अडचण - इथे नवीन काहीहि होत नाहीये इंजिनियरिंग मधे, आहे ते दुरुस्त करायला आहेत तीच माणसे लागतात, नि तेहि बिचारे जास्त पैसे न मागता नोकरी टिकली या आनंदात सुखाने काम करतात.
पुनः माझे म्हणणे - ग्लॅमर पैशामुळे आहे. कदाचित हात फारसे काळे न करता, कपडे न मळवता, नेहमी एअर कंडिशन ऑफिसमधे बसून काम याचे ग्लॅमर वाटत असेल तर माहित नाही. इथे मात्र कित्येक लोक ऑफिस संपले की घरची दुरुस्ति, घर वाढवणे, लॉन कापणे, बर्फ काढणे, गाडी त तेल बदलणे, बारीक सारीक रिपेअर इ. कपडे, हात काळी करणारी, कामे उत्साहाने करतात. तशीच कामे करणार्यांना इथे जास्त भाव आहे, जास्त पैसे आहे. आय टी वाल्याला पैसे देणारा स्वतःच्या सवडीने बोलावून घेतो, प्लंबर वगैरे त्यांना जमेल तेंव्हा येतात, पैसे तुम्ही देता, पण केंव्हा यायचे ही त्यांची मर्जी!
ऊडन खटोला एक प्रयोग करू बघा
ऊडन खटोला एक प्रयोग करू बघा 'आयटीला ग्लॅमर का?' चे ऊत्तर तुम्हाला आप्सूकच मिळून जाईल.
दोन-तीन वर्षाच्या एखाद्या लहानग्या/गीला (ज्याला ग्लॅमर मधला ग सुद्धा माहित नाही) एक खेळण्यातली रिमोट कंट्रोल्ड कार, एक घरं वगैरे बांधण्याचे ब्लॉक्स आणि एक आयपॅड देऊन बघा तो कुठल्या गोष्टींशी किती वेळ खेळतो.
मग त्याला/तिला विचारा तुला आयपॅड बद्दल एवढे ग्लॅमर का वाटते?
माणसाचे दैनंदिन आयुष्य सुखकारक बनवणारे, लहान सहान गोष्टीतून आनंद मिळवून देणारे शोध आयटी मिनिटागणिक लावते. ऊदा स्मार्ट फोन व त्याचे अॅप्स, ई कॉमर्स, ईंटरनेट ई. आयटी चे सगळे प्रॉडक्ट्स एका दिवसासाठी वायरावयाचे थांबवा आणि बघा तुमचे दैनंदिन जीवन काय होते ते.
टीवी, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन देणार्या ईलेक्ट्रॉनिक्स ला पूर्वी हे ग्लॅमर होते त्याही पुढे जाऊन आता माणसाच्या गरजा वाढल्याने आणि त्या गरजा आयटी भागवत असल्याने आयटी ला ग्लॅमर न येते नवलच.
जी गोष्टं आज आपल्याला अप्राप्य आहे पण आपल्याला तिचा हव्यास आहे त्या गोष्टीला ग्लॅमर प्राप्त होते ऊदा. तेंडुलकर सारखा फेम, कतरिनाची फिगर (ऋन्मेशला नसेल म्हणा कतरिनाचे ग्लॅमर), अंबानीचा पैसा.
वाहन ऊद्योगालाही आहे की बर्यापैकी ग्लॅमर. मंगळावर सुंदर एलियन्स च्या वसाहती सापडल्या तर न जानो ऊद्या अवकाश संशोधनालाही ग्लॅमर येईल. लिंबू टिंबू ने मांडलेला आणि टण्याने अनुमोदन दिलेला मुद्दाही फार महत्वाचा आहे.
आता तुम्ही अमेरिकेत असता तर तुम्ही धागा काढला असता 'केमिस्ट्रीला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर'
आता तुम्ही अमेरिकेत असता तर
आता तुम्ही अमेरिकेत असता तर तुम्ही धागा काढला असता 'केमिस्ट्रीला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर'

>>>
>>> झक्की | 16 March, 2015 -
>>> झक्की | 16 March, 2015 - 21:44 नवीन <<<
झक्की,
असंबद्ध प्रतिसाद देण्याची इतकी घातक हातोटी पाहण्यात नाही. अभिनंदन!
धागे 'भारतात असलेले भारतीय विरुद्ध अमेरिकेत गेलेले भारतीय' इतक्याच स्वरुपाचे नसतात.
जगात काही इतरही गोष्टी घडत असतात.
प्लंबर भारतातही वेळ (त्याच्यामते) असेल तेव्हाच येतो. आणि अमेरिकेतही प्लंबर (आवश्यक असलाच तर) त्याच्या स्वतःच्या वेळेनुसारच येत असावा असे तुमचा प्रतिसाद पाहून वाटत आहे.
झक्की, तुम्ही तिकडे का आहात हे सांगाल का कृपया?
आयटी मिनिटागणिक शोध लावते
आयटी मिनिटागणिक शोध लावते म्हणण्यापेक्षा तंत्रज्ञान अपडेट करते म्हणणं जास्त योग्य. प्रोग्रामिंग तुलनेने सोपं आहे. जगात अनेक गोष्टींवर संशोधन चालू आहे , ज्याने माणूस सुखी होतो. नॅनो, मेम्स, कार्बन फायब,, बलून टर्बाईन्स, हायपरप्लेन्स... . पण या गोष्टींसाठी मुळातूनच अनेक गोष्टी नव्याने बनवाव्या लागतात. अनेक वर्षांचा पाठपुरावा लागतो. हे थोडंसं तपस्वी माणसासारखं आहे, ज्याकडे आकर्षित होण्यासाठी तो विशिष्ट जीन असावा लागतो. सगळेच आयटीकडे पळायला लागले तर हे बेसिक्स बंद होतील ना..
हल्लीचा सर्वात क्रांतीकारी शोध म्हनजे माणसाच्या मलमूत्रापासून पिण्यायोग्य पाणी बनणे. याशिवाय वैद्यकीय क्स्।एत्रात अभियांत्रिकीचे चमत्कार झालेले आहेतच. डेंटीस्टची खुर्ची रोज पाहून काही वाटत नाही, पण ते एक भन्नाट संशोधन आहे. ग्लॅमर हाच शब्द वापरायचा झाल्यास ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या अपडेट्सना ग्लॅमर आहे. हायड्रॉलिक ब्रेक्स केव्हाच जुने झाले, ब्ल्यूजुनेन टेक्नॉलीलॉजी जुनी झाली. पण हे काही मूलभूत संशोधन नाही. आता पाण्यापासून पळणा-या गाड्या ही क्रांती असेल. तर असोच. बरंचसं अवांतर होत चाललंय.
लहान सहान गोष्टीतून आनंद
लहान सहान गोष्टीतून आनंद मिळवून देणारे शोध आयटी मिनिटागणिक लावते. ऊदा स्मार्ट फोन व त्याचे अॅप्स, ई कॉमर्स, ईंटरनेट ई. आयटी चे सगळे प्रॉडक्ट्स एका दिवसासाठी वायरावयाचे थांबवा आणि बघा तुमचे दैनंदिन जीवन काय होते ते. >>> मांजर मेली का नाही हे सुद्धा न कळणारे काका ... आयटी म्हणजे नक्कि काय हे एकदा समजवून तरी घ्या
मिनिटागणिक आनंद देणारे शोध आयटी लावते ??? 
हे सगळे अॅप्स वापरायचे
हे सगळे अॅप्स वापरायचे थांबवले तर माणसाचे जिणे जास्त सुखी होईल ...
आयटी शोध लावते आणि
आयटी शोध लावते आणि प्रोग्रॅमिंग तुलनेनं सोपं आहे? बरं!
बरं तर बरं प्रोग्रामिंग अवघड
बरं तर बरं
प्रोग्रामिंग अवघड आहे आणि मेम्स, सुपरकंडक्टिव्हिटी इ. तुलनेनं सोप्प आहे. घ्या झाली फिट्टंफाट !!
खूष ??
आयला आयटी शोध लावत नाहि
आयला आयटी शोध लावत नाहि म्हणताय, मग गुगल, अॅपल, मायक्रॉसॉफ्ट काय आभाळातुन पडलेत काय?
बाकि आयटीला ग्लॅमर मिळणं साहजिक आहे. एकुण जीडीपीच्या १०% उत्पन्न केवळ आयटी इंडस्ट्री देते; जवळ्जवळ $१०० बिलियन वार्षिक उत्पन्न. याच्या तुलनेत फिल्म इंडस्ट्रीचं, जी ग्लॅमर साठीच ओळखली जाते, वार्षिक उत्पन्न फक्त $५ बिलियन च्या आसपास आहे.
तर थोडं ग्लॅमर आयटीला हि मिरवुया ध्या साहेब...
राज, त्यांच्या शोधाची
राज,
त्यांच्या शोधाची (Research & Development) व्याख्या फिजिक्स, केमिस्ट्री लॅबच्या दारापाशीच संपते बहूतेक, त्यामुळे बाकी तंत्रज्ञानातली R & D डिपार्टेमेंट्सना बहूतेक त्यांच्यालेखी किंमत नसावी.
भलेही त्यांची कंपनी सॅप वापरत असेल, ते स्वतः मायक्रोसॉफ्ट ऑफिस दिवसातून १००० वेळा, वेदर चॅनलचा बिग डेटा सकाळी ऊठल्यावर, हजारो साईट्सवरचे सॅस चे अॅनालिटिक्स, स्मार्ट फोन वरच्या सतराशे साठ अॅप्स, लॅपटॉप वरचा अँटीवायरस, विंडोजचे अपडेट्स मिनिटागणिक वापरत असतील, टॅक्स साठीचं सॉफ्टवेअर ही घेतलं असेल आता विकत, तरी 'एका संशोधकाला तरी आयटी संबंधित शोधासाठी नोबेल वगैरे मिळालंय का?' असं खडसावून विचारतील तुम्हाला ते.
काका जरा दमान घ्या... हे वाचा
काका जरा दमान घ्या... हे वाचा http://en.wikipedia.org/wiki/Information_technology
जरा ह्यावर पण नजर टाका http://www.davidbudden.com/degrees-demystified-1/
हायला आयटी एनेबल आजकाल सगळेच असतात हो मॅकॅनिकल पसुन सिव्हिल पर्यंत ...
बाकि गुगल एक्वेळ आयटी कंपनी अस खपून जाईल पण माय्क्रोसॉफ्ट आणि अॅपल?
कशाकशाला आय टी म्हणतात? नुसते
कशाकशाला आय टी म्हणतात? नुसते प्रोग्रामर का इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी शी संबंधित सर्व धंदे, ज्यात गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल सगळे आले असे मला वाटते.
झक्की, तुम्ही तिकडे का आहात
झक्की, तुम्ही तिकडे का आहात हे सांगाल का कृपया?
वि.पू. बघा.
बहुधा बरेच लोक माझ्या लिखाणाला शहाणपणाने इग्नोर करतात, त्यांना काय इन्टरेस्ट मी जिवंत आहे का मेलो. मग रहातो कुठे नि का ते कशाला पाहिजे?
काका म्हणत आहात ते ठीक आहे
काका म्हणत आहात ते ठीक आहे फक्त पुढे 'मला वाचवा' म्हणाल तर आधीच सांगून ठेवतो 'जमायचं न्हाई, येळंच न्हाईना आपल्याकडे तेवढा'
आता तुम्ही बाल की खालंच काढायचे ठरवलेत तर तुमच्या लॉजिकने औषधनिर्माण शास्त्रं केमिकल ईंजियरिंग म्हणून खपेल की.
बाकि गुगल एक्वेळ आयटी कंपनी अस खपून जाईल पण माय्क्रोसॉफ्ट आणि अॅपल?>>>>
) बहूतेक कानडीत लिहिला असेन.
Founded in 1975, Microsoft (Nasdaq “MSFT”) is the worldwide leader in software, services, devices and solutions that help people and businesses realize their full potential.
हे घ्या मायक्रोसॉफ्टच्या साईटवरून साभार. मी माझा पहिला प्रतिसाद (आपलं काका पुतण्याचं नातं ज्यातून निर्माण झालं तो
आयटी ईंजिनियर्स ना मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल बहूतेक अनुक्रमे कॅलिफोर्नियातील घरांना खिडक्या बांधायच्या आणि नापा व्हॅलीत सफरचंदांची झाडं लावण्यासाठी हायर करत असतील.
>>बाकि गुगल एक्वेळ आयटी कंपनी
>>बाकि गुगल एक्वेळ आयटी कंपनी अस खपून जाईल पण माय्क्रोसॉफ्ट आणि अॅपल?<<
अरारारा, तुमचा बेसीक मध्येच लोचा आहे. आयटी हे लय मोठं प्रस्थ आहे; त्यात हार्डवेर, साॅफ्टवेर, नेटवर्क्स, पेरिफेरल्स, सर्विसेस समदं येतं बघा...
काका खरच वाचलत का काय लिहिलय
काका खरच वाचलत का काय लिहिलय ते? वाचाल तर वाचाल
आयटी रोज नवे नवे शोध लावते हा आपला शोध ह्यावरून आपल्याला आयटी काय आहे हे खरच समजले नसावे असे वाटते. कोणत्याही इंटर्नेट सेवेचा आयटी हा अविभाज्य भाग आहे. म्हणुन सगळे शोध आय्टी अंतर्गत येत नाहीत... कंप्युटर सोफ्ट्वेअर (वर्ड, ऑपरेटींग सिस्टिम्स, डिझाइन ऑटोमेशन टुल्स किंवा इतर स्टेंडालोन वा इतर तत्सम ) ह्यामधे आयटीचा काहीही संबंध नसतो... कारण हि कोणत्याही डॅटा वा इन्फोर्मेशन च्या संदर्भात संकलन, साठवण वगैरे कामे करत नाहीत. त्याच प्रमाणे हार्डवेअर डिझाइन हेसुद्धा आयटी अंतर्गत येत नाही.
माय्क्रोसोफ्ट किंवा अॅपल ह्यांची सुरुवात वा त्यांची मुख्य उत्पादने त्यांना आयटी कंपनी म्हणावी अशी नव्हती व नाहीतही... अॅपलची आय्ट्युन्स/क्लाउड हे आयटी बेस्ड प्रोडक्ट म्हणता येइल. माय्क्रोसोफ्ट सर्व्हर/ एंटर्प्राइज सोल्युशन/क्लाउड हि आयटीशी निगडीत म्हणता येतिल... असो
आयटी / सोफ्ट्वेअर एंजिनिअरींग / कंप्युटर सायन्स / कंप्युटर एंजिनिअरिंग हे वेगवेगळे (थोडेफार ओव्हर्लॅपिंग) डिसिप्लिन्स आहेत...
देशात ह्या सर्वांनाच आयटीच्या बादलीत कोंबल जात कारण देशात आयटी सर्व्हिसेस देणार्या कंपन्या दांडग्या आहेत एकही सॉफ्ट्वेअर प्रोडक्ट कंपनी नाही.... त्यामुळे ह्याच काय पण अगदी एलेक्ट्रिकल्/मेकॅनिकल/ सिव्हिल/ टेलिकम्युनिकेश्न्स वगैरे असलेले इंजिनिअर्सही शेवटी आयटीतच येऊन पडतात.
राज , विकिची लिन्क वाचुन तर बघा
त्यातला हा रेलेव्हंट पॅरा:
"In a business context, the Information Technology Association of America has defined information technology as "the study, design, development, application, implementation, support or management of computer-based information systems".[39] The responsibilities of those working in the field include network administration, software development and installation, and the planning and management of an organization's technology life cycle, by which hardware and software are maintained, upgraded and replaced."
Pages