आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर

Submitted by उडन खटोला on 14 March, 2015 - 05:15

नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल

आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर <<<<
या शीर्षकाशी सहमत.
परंतू, या ग्लॅमरमुळे इंजिनियरिंगच्या बाकी बाजुन्ना विद्यार्थी मिळत नाहीत ही कारण मिमांसा अतिशय अपुरी वाटते.
बाकी बाजुन्ना विद्यार्थी न मिळण्यामागे प्रधान कारणे म्हणजे, या रिकाम्या जागा कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे जागोजाग नव्याने उगवलेल्या/उगवविलेल्या विविध शिक्षणसम्राटांच्या विनाअनुदानित संस्थांमधील आहेत.
मागणिपेक्षा पुरवठा जास्त, शिवाय, या संस्थांच्या अधिकृत/अनधिकृत फीया जास्त, व तितक्या फीया भरण्याची ऐपत असणारे शेवटी संख्येने कितीक असणार, याचा विचार न होता गल्लोगल्लीत पानपट्ट्या उघडल्याप्रमाणे उघडलेली कॉलेजेस, ज्यांची ऐपत या महामूर फीया भरण्याची आहे, तरी मग तेवढा पैका व्याजी लावून विद्यार्थी नुस्ता घरी बसला तरी त्याचे प्वॉट भरेल असा व्यवहारी विचार करणार्‍यांची वाढती संख्या, ही प्रमुख कारणे.
याव्यतिरिक्त, आयटीमधील बैठ्या, शरिरकष्ट नाहीत अशा (गैर)समजातून निर्माण झालेले आकर्षण, (शरिरास कष्ट न देण्याची/हातकपडे काळे न करण्याची तयारी), आयटीमधील भिन्नलिंगिय भरपूर उपस्थितीचे आकर्षण, आयटीच्या चकाचक बिल्डिंगा अन हायफाय इन्गिशमधिल अगम्य पाश्चात्य बातचित, शिक्षण झाल्यावर स्टार्टीन्गच्या पगाराचे डोळे दिपवणारे (फसवे) आकडे, अशा विविध बाबींनी ग्लॅमर की काय ते उत्पन्न होते यातही शंका नाहीच.

आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे >>>>>>>. खरच झाल पाहिजे........ जगाला वाट्त आयटीवाले खोर्याने पैसे छापतात..........अस खरच काही नसत........... तुम्ही रोज १५ तास काम केल्यावर पण तुम्हाला वीकान्ताला राबाव लागत.....परत नोकरीची सुरक्षितता शून्य..........आणि एवढे सगळे करून पगारवाढ वगैरे मिळेल कि नाहि माहीत नाही......तुम्हाला पुण्यात १ BHK घेताना भंयकर कष्ट पड्तात.......

अहो प्रत्येक क्षेत्रात भरपूर संधी आहेत.
मी telecom आणि IT दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये काम केले आहे.
पूर्वी टेलीकॉम आणि सध्या IT.
पैशांच्या बाबतीत फारसा फरक नसला तरी IT मधली लाइफस्टाइल आवडली.

एका एका काळाची गरज आणि क्रेझ असते त्याप्रमाणे त्या त्या व्यवसायाला ग्लॅमर मिळते.
एकाला मिळालेले ग्लॅमर दुसर्‍याला अनावश्यक का वाटावे?
आपला जो काही धंदा आहे त्यात ग्लॅमर मिळावावे.
Wink

आयटी चे भारतातील पदार्पण योग्य काळात झाले असे वाटते, एकीकेडे फकत मेडीकल किंवा इंजिनिअरिंग मिळविण्यासाठी होणारी धडपड किंवा किमान वेतनात राबवून घेणारी प्रायव्हेट सेक्टर्स यामुळे तरुण वर्ग खूप निराश होता. अर्थात आय टी मध्ये फार काही वेगळे नव्हते (शेवटी गंगाधर आणि शक्तीमान एकच होता) पण एक मोठा तरुण वर्ग आय टी कडे वळल्यामुळे खरे तर इतर क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे म्हणता येइल. कारण ज्यांना खरेच त्याच क्षेत्रात आपले करिअर करायचे होते त्यांना ते करता आले ( त्यांच्या क्षेत्रातील स्पर्धा कमी झाल्याने म्हणा हवे तर ) . आणि , ज्यांचे महाविद्यालयीन शिक्षण तांत्रिक स्वरुपाचे नव्हते त्यांनाही आय टी ने सामावून घेतले.

तुम्ही रोज १५ तास काम केल्यावर पण तुम्हाला वीकान्ताला राबाव लागत.....परत नोकरीची सुरक्षितता शून्य..........आणि एवढे सगळे करून पगारवाढ वगैरे मिळेल कि नाहि माहीत नाही......तुम्हाला पुण्यात १ BHK घेताना भंयकर कष्ट पड्तात.......

आय टी व्यतिरिक्त क्षेत्रात यापेक्षा चांगली स्थिती नाही हे ही तितकेच खरे आहे . सिव्हील, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रीक इंजिनिअर होवून बाहेर पडून बघा , सुरवातीच्या काळात आपल्या हाताखालचे कामगार आपल्यापेक्षा खूप जास्त कमवतात हे लक्षात येईल.

एकंदरीत मूळ चर्चेतील आय टी चा ग्लॅमर अनावश्यक वाटत नाही , ग्लॅमर असेल तर ते आय टी चे यश म्हणावे लागेल. माझा आय टी क्षेत्राशी कधीही संबंध आला नाही , पण आय टी तरुण वर्गाला भूरळ पाडते हे नक्की , दाखविण्यापुरता चांगला स्टेट्स किंवा परदेशातील संधी या इतर क्षेत्रात सहजासहजी मिळत नाहीत.

सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना सहमत नाही , कुठेही तुटवडा नाही , असल्यास कळवावे किमान ज्यांना नोकरी नाही त्यांना तरी मिळेल अशी अपेक्षा Happy

मॅन्युफॅक्चरींग मधील इंजिनिअर्स जसे वयाने मोठे होतील तशी त्यांची गरज व किंमत वाढते पण आयटीमधे त्याच्या उलट...फ्रेशर्स जास्त काम करून जास्त कमवून देतात कंपनीला. त्या मानाने सिनिअर्सची गरज कमी असते. सिनिअर्सचे जॉबस धोक्यात असतात. सतात नवीन शिकत रहावे लागते नाहीतर तुम्ही दिवसागणिक कमी महत्वाचे होत जाता.

थोडे अवांतर - मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज राहिल्या कुठे आहेत आता पुण्यात? महाराष्ट्रातील लिव्हिंग महाग झाले आहे त्यामुळे सगळे उद्योग इथला प्लांट विकून बाहेर राज्यात प्रस्थापित होत आहेत. ओळखीतले हार्ड कोअर इंजिनिअर्स (४-५ जण )पुणे सोडून बंगळुरु, वापी, टाटा नगर अश्या ठिकाणी नोकरीनिमित्ताने गेले आहेत.

लिंबुटिंबू सहमत आहे.

मॅन्युफॅक्चरींगचा धंदा चीनने पळवला.

जपानने तंत्रज्ञानावर हुकूमत मिळवली. चीनने तंत्रज्ञान मिळवलं. हार्डवेअर मधे चीन अग्रेसर आहे. कोरीयन कंपन्यांनी स्व्तःचं तंत्रज्ञान विकसित केलं. भारअज्ञहीअजूनही तंत्रज्ञान नाही. १९८४ साली जपानी कंपन्या भारतात आल्या तेव्हां त्यांना भारतीय कंपन्यांशी करार करावे लागले. राजीव गांधींनी याच अटीवर प्रवेश दिला होता. त्यामुळं देशी उद्योगांना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची ओळख झाली. पण संशोधनाच्या नावाने बोंब आहे आजही. वाहन उद्योगातही १९८४ च्या करारामुळे श्रीमंत झालेया भारतीय कंपन्यांनी डिझाईन्स विकत घेण्यावार भर ठेवला आहे. स्कील भरपूर आहे, पण त्याला वाव देणारं उच्च दर्जाचं तंत्रज्ञान नाही.

एका मेकॅनिकल इंजिनीयरला चार वर्षात तो ज्या मशिनिंग प्रोसेसेस वापरणार नाही त्यासहीत रेफ्रीजरेशन, स्टीम इंजिन्स, आयसी इंजिन्स, इ. इ. अगणित शाखांचा अभ्यास का लागतो याबद्दल आपल्याकडे स्पष्टता नाही या यातला एक एक विषय हा इंजि. ची एक एका स्वतंत्र शाखा आहे . पण कधीकाळी कुणाला तरी वाअलं की मेकेनिकल इंजिनिअरने हे सर्व शिकायलं म्हणून तसं धोरण थरलं जेआजतागातयत चालू आहे. जुनाट मशीन्सवर प्रॅक्टीकल्स केल्यानंतर आधुनिक कारखान्यात १ -२ वर्षे ट्रेनिंगमधे जातातच. उलट एस. के. एफ मधे बोअर, होनिंग, ग्राइंडींग या प्रत्येक विषयाचे तज्ञ असतात ज्यांना फषयातल अथपासून इतिपर्यंतचं ज्ञान असतं. पण त्या विषयात ते स्पेशालिस्त असतात असं ट्रेनिंग त्यांना देण्यात येतं. त्यांना थेअरी ऑफ मशीन्स, भासत नाही.

लिम्ब्याच्या भिन्नलिंगी आकर्षणाच्या मुद्द्याचं आकर्षण असलेले लोक मी पाहिले आहेत (मी लिम्ब्याला अनुमोदन देतोय असे समजू नका).

कुठल्या आयटीला ग्लॅमर आहे असे आज तुम्हाला वाटते आहे? भारतातल्या चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील (केवळ आय.आय.टीच नव्हे तर दर राज्यातली शासकीय जुनी उत्तम कॉलेजे) तसेच उत्तम एम.बी.ए.संस्थांमधील मुले आय.टी.क्षेत्रात मिळत नाहियेत आज. विशेषतः सेवा क्षेत्रातल्या आयटी कंपन्यात. या क्षेत्राचे ग्लॅमर उतरले आहे.

एन आय डी संस्था प्रॉडक्ट डिझाईनर्स घडवते, पण अभियांत्रिकी रचनाकार घडवणारी संस्था आपल्याकडे नाही.

मी या विष्यातली तज्ञ नाही. पण मधे एक रुग्णाचा नातेवाइक MCA झालेला भेटला.
मला वातले पुण्यात एखाद्या आय्टी कंपनीमधे नोकरी केल्रत असेल. तर म्हन्णाला गावी पंढरपुरला २० एकर शेती आहे तिथे जास्त परवदते.एक तर घरभादे वाचते. घरचेच धान्य,दुध,फळे असत्तात तो खर्चही वाचतो.
बाकी गोस्टीही,सेवाही महागआहेत पुण्यात

एकुणातच पुणे महागले आहे. त्या तुलनेत पगार मात्र फार वाधत नाइयेत. हे एक कारन असु शकते ग्लॅमर कमी होयाचे.

>>> पण संशोधनाच्या नावाने बोंब आहे आजही. वाहन उद्योगातही १९८४ च्या करारामुळे श्रीमंत झालेया भारतीय कंपन्यांनी डिझाईन्स विकत घेण्यावार भर ठेवला आहे. स्कील भरपूर आहे, पण त्याला वाव देणारं उच्च दर्जाचं तंत्रज्ञान नाही. <<<
बाळू, हे वर्मावरचे बोट आहे.
पूर्वीच्या नेहरू/इंदिरा यांच्या वेळच्या लायसेन्सराज नंतर (त्या काळात ते आवश्यकही होते), राजीवनी दारे किलकिली केली. पण इंडियन इंडस्ट्रिजचे धुरीण कायमच तेव्हाही व आत्ताही, तंत्रज्ञानाबाबत दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्यातच धन्देवाईक हुषारि समजत आलेले आहेत.
भारतात कोणत्याच क्षेत्रात संशोधन व विकास यास पोषक वातावरण नाही. खाजगी वा सरकारी आस्थापणे निव्वळ मागिलपानावरुन पुढे दिवस ढकलत रहातात. कसलीही दूरदृष्टी नाही. व्हिजन नाही.

>>>> (मी लिम्ब्याला अनुमोदन देतोय असे समजू नका). <<<<
बरेचदा "पुरोगामी" लोकांचे तोंडी अशा अर्थाची/आशयाची वाक्ये मी ऐकली आहेत (म्हणजे लगेच मी टण्याला तो अस्सल पुरोगामी आहे असे समजतोय असे समजू नका Proud )

मी लिम्ब्याला अनुमोदन देतोय असे समजू नका >>> पण ते येथे दिलेलेच आहे की! :). आणि एकाही मुद्द्यावर सहमती असू शकत नाही का?

त्यात -
पूर्वीच्या नेहरू/इंदिरा यांच्या वेळच्या लायसेन्सराज नंतर (त्या काळात ते आवश्यकही होते) >>> येथे लिंबूने चक्क नेहरू/इंदिरा च्या काळातील एका गोष्टीचे समर्थन केलेले आहे Happy

येथे लिंबूने चक्क नेहरू/इंदिरा च्या काळातील एका गोष्टीचे समर्थन केलेले आहे

हे वाचून मला आश्चर्याचा धक्का बसून छातीत दुखु लागले आहे. बरे वाईट झाले तर आमुचा रामराम घ्यावा.

ग्लॅमर???????????????

अस काहि नसत हो.
जिकडे पैसा मिळतो, नोकरी मिळण्याची खात्री आहे, लोक तिकडे प्राधान्य देणारच की.

आणि हो प्रत्यक्ष आयटी मध्ये काम करणारे सांगतीलच घी असेल तरी कामाचा बडगा पण असतोय.
असो. हल्ली त्यातही स्पर्धा वाढली आहे.
ढिगाने कॉलेजेस आणि ढिगाने एन्जिनीर तयार होत आहेत प्रत्येक वर्षी.
दोन शिफ्ट मध्ये देखील सुरु आहेत कॉलेजेस.

>>>आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते<<<

ह्या वाक्यातील 'लाभलेले', 'अनावश्यक' आणि 'ग्लॅमर' ह्या तीन शब्दांशी असहमत असल्याने पूर्ण वाक्याशी व त्यामुळे लेखाशी असहमत आहे.

फारेन्डा/विकू, अहो चांगल्याला चांगले म्हणणे ही आपली हिंदू संस्कृतीच आहे हो.......
फक्त असलेल्या चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे प्रमाण वाढलेले दिसले की वाईटापुढे चांगले ते झाकोळून जातेच.
रावण त्याकाळचा शिक्षित वैदिक ब्राह्मण होता, कर्मठ, शिस्तप्रिय, कष्टाळू होता, कवी होता, बलाढ्य होता, शरिरसंपदा कमाविलेला होता, युद्ध निपुण होता, रसिक होता, सोन्याची लंका उभारणारा होता.... हे सर्व त्याचे गुणच होते, ते नाकारण्यात अर्थ नाही, पण परपुरुषाचे स्त्रीला पळवून आणणे व डांबून ठेवणे या गुन्ह्यांपुढे त्याचे हे गुण झाकोळले जाणारच. व लोकांचे आठवणीत सीऽतेचे हरण करणारा तो रावण अशीच निव्वळ आठवण रहाणार, जशी की आणिबाणीची राहिली आहे. यात दोष लोकांच्या अल्पस्मृतीचाही असू शकतो, नै का?

आणि, राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यातले चांगले गुण स्विकारूच नका/अनुकरण करूच नका/मान्यही करू नका अशी शिकवण सुदैवाने आईने मला दिली नाहीये. उलट, शत्रुचेही कौतुक करायला शिक असा सल्ला दिलाय.

>>>आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते<<<
>>>>> ह्या वाक्यातील 'लाभलेले', 'अनावश्यक' आणि 'ग्लॅमर' ह्या तीन शब्दांशी असहमत असल्याने पूर्ण वाक्याशी व त्यामुळे लेखाशी असहमत आहे. <<<<< Lol
बेफी, अहो कधी जमले तर हिंजवडीजवळ वाकडला उतरा, अन रीक्षा पकडून चिंचवड निगडीला येऊ लागा, पन्नास रुपड्यांच्या अंतरा इतक्या प्रवासासाठी रीक्षाचे भाडे २५० रुपयाच्या खाली सांगितले तर मी माझी आयडी बदलेन. याला म्हणतात आयटीचे ग्लॅमर ! Proud
अहो हिंजवडी आहे, आयटी आहे, इतके भाडे होणारच ... वर हे देखिल ऐकायचि तयारी ठेवा.......!
फार पूर्वी पुण्यात कोरेगावपार्कमधे रजनीश आश्रमामुळे अशीच परिस्थिती होती.

बाकी हे ग्लॅमर की आयटीवाल्यांच्या जास्त कमाईमधे आपला वाटा हिसकावुन घ्यायची अहमहमिका हे ज्याचे त्याने ठरवावे, पण हिंजवडी झाली अन पिंचीमधिल जमिनी/घरांचे दर अनैसर्गिकरित्या चौपट/सहापट झाले हे वास्तव. परत यालाही ग्लॅमर म्हणायचे, की आयटी मुळे आलेल्या/येत असलेल्या "समृद्धिमधे" आपलाही वाटा "उचलण्याची" घाई म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

लिंबूभाऊ,

Happy

काय आहे की संकेतस्थळांवर आपण प्रतिसाद दिला की त्यावर प्रतिवाद करणारा आणखी एक प्रतिसाद येतो आणि मग तो आपल्याला पुढचा प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतो. (बाप रे हे वाक्य लिहू शकायला मला आठ वर्षे लागावीत? :फिदी:)

त्यामुळे मी तूर्त तुमच्या प्रतिसादावर माझा प्रतिसाद देत नाही आहे. कृपया गैरसमज नसावा. Happy

रिक्शावाल्याला हिंजवडी सांगितले की वेगळा, व हिंजेवाडी (उच्चारः हिंज्येवाडी) सांगितले की वेगळा रेट पडत असणार नक्की Happy

फारेन्डा, शंका बरोबर आहे तुझी, पण तसे होत नाही, निदान माझा तरी अनुभव नाही.
मुंबईत, पंचवीसतिस वर्षांपूर्वी सरदारजी टॅक्सिवाले भन्नाट फसवायचे.... हल्ली युपी/बिहारी असतात, पण म्हणुन दादरपाशी घेतलेल्या टॅक्सिचा मराठी भाषक ड्रायव्हर फसवत नाही असे नाही, तसा अनुभव नाही. तो देखिल गिर्‍हाइक मराठी असले तरी फसवतोच, मराठी बोलत बोलत फसवतो. तसाच अनुभव आहे.
सबब, काय भाषेत बोलता, काय कपडे घालता, कोणकितीजण असता या कशाशीही देणघेण नसून, तुम्ही फक्त एक "गिर्‍हाईक" अस्ता, व तुम्हाला बकरा कापल्याप्रमाणे त्यांनी कापायचे असते, अन तुम्ही कापून घ्यायचे असते इतकेच!.
अन वर पुन्हा हे देखिल समजुन घ्यायचे असते की फसवणारे हे सगळे, जनसामान्य नागरिक वगैरे असून शिवाय तळागाळांतील, वंचित वगैरे असल्याने तुम्हाला फसविण्याचा/तुमचा खिसा कापण्याचा/लुबाडण्याचा पुरेपुर नैतिक अधिकार त्यांचेपाशी आहे.

लिंब्या तो दोष पुण्याचा की आयटीचा ?

आमच्या मुम्बैत सगळे मिटरप्रमाणे चालते... शेअर रिक्षाचे दर बोर्डावर लिहिलेले असतात.

लिंब्या , नरसोबावाडीत / त्र्यंबकेश्वरात नारायण नागबळीला जो दर आहे तो आयटीवाल्य्ला तरी परवडतो का ?

इतर पब्लिकला दु:ख झाले की नशिबातल्या कर्मविपाकानुसार फळ मिळते असे म्हणुन मधाळ वाणीत प्रवचन देणार्‍या लिंब्याची जीभ , आयटीवाल्यांनाही अमाप पैसा हा त्यांच्या कर्मविपाकामुळे मिळाला असणार , हे मान्य करताना मात्र झडुन जाते हा कर्मयोग पाहुन मजसारख्या बुप्रावादी -नक्षली- ब्रिगेडी- हिंदुविरोधी व्यक्तीचा आत्मा मात्र पार हेलावुन गेला आहे.

Pages