१०० विचार-मौक्तिके - अमेरीकेतील खरेदी

Submitted by वाट्टेल ते on 13 March, 2015 - 14:00

१. तुम्हाला खरेदीचा तिटकारा असेल तर तुम्ही अमेरिकेत जगायला (जवळजवळ) नालायक आहात.
२. 'Walmart मध्ये मी कधीही जात नाही' हे तुमचे आवडते वाक्य असते.
३. Walmart मध्ये कधीही न गेलेला माणूस अमेरिकेत अस्तित्वात नाही.
४. Buy one get one free म्हणजे एक वस्तूला साधारण दुप्पट किंमत देऊन दुसरी गोष्ट फुकट मिळवणे.
५. मोठ्या departmental store मधून फक्त एक गोष्ट घेऊन बाहेर पडणे हा कायद्याने गुन्हा आहे.
६. Garage Sale शोधत फिरणे हा गावातले रस्ते माहित करून घेण्याचा उत्तम मार्ग आहे.
७. Bed Bath and Beyond या दुकानामुळे कोणत्याही रकमेचे ८०% चटकन काढण्याचा सराव होतो.
८. सर्वोत्तम deal तेच ज्यात आपल्याला गरज नसलेली वस्तू आपल्या मैत्रीणीपेक्षा स्वस्तात मिळते.
९. Window shopping करत फिरणे हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे
१०. महिन्याभराच्या खरेदीच्या receipt जाळल्यास सुमारे महिनाभराचा स्वैपाक शिजेल इतके इंधन मिळते.
११. बायकोशी झालेले भांडण मिटवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तिला हट्ट करून mall मध्ये पाठवणे.
१२. गोष्टी वाया घालवू नयेत. हाती लागलेले प्रत्येक कूपन वापरलेच पाहिजे.
१३. १०० dollar च्या वस्तूची खरेदी चटकन होते. ३ - ४ dollar ची वस्तू खरेदी करण्यासाठी फार चिकित्सा करावी लागते.
१४. Thanks giving च्या खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा आणि दुकानाची दारे उघडल्यावर आत उडणारी झुंबड पाहिल्यावर अमेरिकेत भिकारी कमी असतात हे तुमचे विधान तुम्हाला बदलावे लागेल.
१५. चीनची लोकगणना पुन्हा एकदा केली पहिजे, काहीतरी मोठी चूक असणार. चीनच्या भूमीवर माणसे राहत नसून फक्त वस्तू तयार करणारी यंत्रे असावीत अशी दाट शंका तुम्हाला असते.
१६. Mall मधल्या दुकानात ( dollar shop वगळता) मूळ छापलेल्या किमतीला वस्तू खरेदी करणारा माणूस निर्बुद्ध असतो.
१७. Dollar shop मध्ये वस्तू विकत घेणारे आणि Las Vegas ला slot machine मध्ये एक एक penny टाकत जुगार खेळणारे, या दोघांचे 'सस्त्यात मजा' हे एकच तत्व असते.
१८. वस्तू वापरून, निर्ढावलेल्या चेहऱ्याने परत करण्याचे कसब हा अमेरीकेतील खरेदीशास्त्राचा पाया आहे.
१९. तुम्ही एकदा घातलेला कपडा repeat केल्याचे तुमच्या मैत्रिणीने पाहिल्यास तिचा तुमच्या सांपत्तिक स्थितीबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.
२०. कळकट ब्राह्मण चालेल पण स्वच्छ शूद्र चालणार नाही या धर्तीवर जुनी, लहानशी ( budget मध्ये जितकी येईल तितकी ) आणि अखंड काम काढणारी bmw खरेदी केलीत तरी चालेल पण नवीन, चकाचक, प्रशस्त kia वगैरेच्या आसपास सुद्धा फिरकू नये.
२१. Dillards, Macy's मध्ये काम करणारी एखादी मैत्रिण बांधून ठेवा व तिची मर्जी सांभाळा, अर्थात ती त्या दुकानात काम करत आहे तोवरच.
२२. thanks giving ला खरेदीच्या गदारोळात तुम्हाला चालत असले तरी India त गेल्यावर बाजारातल्या गर्दीने तुम्हाला 'कसेसेच' होते.
२३. कधीही करता येणारी online खरेदी अत्यंत सोयीची आहे पण रात्री १२ :३० वाजता condom ची तत्काळ गरज असेल तर online खरेदी करून ते वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील याची शाश्वती नसते.
२४. ५० dollar च्या खरेदीनंतर Kohls चे १० dollar चे गिफ्ट कार्ड मिळत असल्याने तेथे खरेदी नेहमी ५० च्या पटीत करणे बंधनकारक आहे.
२५. Credit Card वगळता खरेदीला गेल्यावर लागणाऱ्या आवश्यक गोष्टी - battery full असलेला smartphone - त्यातील calculator आणि जवळपासच्या दुकानात ती वस्तू कितीला आहे हे दाखवणाऱ्या Apps सकट, भक्कम पाय, खरेदी न आवडणाऱ्या व आपल्या खरेदीत काड्या घालणाऱ्या घरातील इतर सदस्यांची अनुपस्थिती, भरपूर वेळ.
२६. अमेरिकन लोकांचे गणित अत्यंत कच्चे आहे हे वाक्य फेकताना आपण आर्यभट्ट व रामानुजमचे वंशज असतो आणि गणितातील उच्च पदव्या घेण्यासाठी लोक भारतातून अमेरिकन विद्यापीठांत (सुद्धा) शिकायला येतात.
२७. खरेदी करताना coupon लक्षात ठेवून नीट वापरल्याने काही dollar अगदी हमखास वाचतात आणि नंतर मेंदू आणि पायांना शीण आल्याने वाचले त्याच्या काही पट restaurant मध्ये खर्च होतात.
२८. बाहेरगावी फिरायला गेल्यावर ३ प्रकारचे लोक बघायला मिळतात
१. कॅमेरामधून सर्व गोष्टी बघत हिंडणारे
२. दुसऱ्याचा कॅमेरा (आणि इतर काही गोष्टी) बघत आपल्याशी compare करत हिंडणारे
३. खरेदी करणारे.
२९. costco मध्ये रविवारी दुपारी खरेदीला जाणारे लोक आणि कुरणात चरत चरत फिरणाऱ्या गाई-म्हशी यांच्यात विलक्षण साम्य आहे.
३०. दुकानात display वर जितक्या कमी वस्तू तितकी प्रत्येक वस्तूची किंमत जास्त असते. पहा - coach किंवा Louis Vuitton चे दुकान.
३१. purse ची किंमत purse मधील सर्व वस्तूंच्या एकत्रित किंमतीच्या काही पट असू शकते.
३२. भारतातून तुमच्याकडे फिरायला येणाऱ्या मंडळींना ( विशेषत: जेष्ठ) आल्या आल्या Victoria's Secret सारख्या दुकानात किंवा J C Penney, Macys सारख्या दुकानांच्या काही विवक्षित sections मध्ये नेऊन घाबरवून सोडू नये.
३३. Mall मध्ये Abercrombie & Fitch किंवा तत्सम दुकानांत इतका अंधार असण्याचे कारण उघड्या डोळ्यांनी स्वच्छ प्रकाशात धडावर डोके असणारा माणूस तिथे कपडे खरेदी करणार नाही.
३४. दुकानात विकत घेतलेला dress दुकानातून घरी येइपर्यंत out of fashion होतो.
३५. TV वर channel surfing करताना channel बदलण्याचा rate, fashion बदलण्याच्या rate पेक्षा कमी असतो.
३६. Superbawl च्या संध्याकाळी Kohls ने न भूतो न भविष्यति असा सेल ठेवल्यास पुरुषांना हवे ते शांतपणे बघता येईल तसेच program ची viewership अर्ध्याने कमी होईल.
३७. स्त्रियांची खरेदी ( म्हणजे स्त्रिया करत असलेली खरेदी) हा जगातील सगळ्यात अनाकलनीय आणि अतर्क्य विषय आहे या विषयावर दुमत संभवत नाही.
३८. Advertisements मध्ये स्त्रिया models च्या अंगावरचे कपडे आपल्या अंगावर कसे दिसतील याची कल्पना करत असतात तर पुरुष त्या कपड्याखाली model कसे असेल याची कल्पना करत असतात यावरून स्त्रियांचा स्वभाव वरवरच्या, उथळ गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याचा असतो तर पुरुषांचा स्वभाव एखाद्या गोष्टीच्या खोलात जाण्याचा असतो असे आमच्या एका पुरुष मित्राचे चिंतनीय मत आहे.
३९. वस्तू विकत घेण्यातला आनंद ती वापरण्याच्या आनंदापेक्षा जास्त असतो.
४०. घरात निश्चित किती भांडी किंवा dinner sets लागतात याचा अचूक अंदाज बांधणाऱ्या माणसाच्या नावाने नोबेल पारितोषिकांप्रमाणे, 'घरगुती अर्थशास्त्र' या विषयावर खास पारितोषिक देण्याचा आमचा मानस आहे.
४१. प्रत्येक खरेदीत गिऱ्हाइकांचे काही डॉलर वाचले की Departmental Stores ना किती किती आनंद होतो ते त्यांच्या advertisements, receipts मधून आम्हाला कळते. गिऱ्हाइकांच्या वतीने सर्व Departmental Stores ना कळकळीची विनंती की सगळेच्या सगळे डॉलर वाचवण्याचा आनंद पण गिऱ्हांइकांना अधून मधून द्यावा.
४२. दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुम्ही एकच mobile चे model वापरल्यास तुम्हाला FBI च्या चौकशीस सामोरे जावे लागेल असा कायदा व्हावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत तेव्हा सावध रहा किंवा mobile चे चालू model तत्काळ बदला.
४३. घरातील सर्व 'smart' उपकरणांची एकूण संख्या घरातील माणसांच्या एकूण संख्येच्या किमान चौपट नसेल तर तुमचे कुटुम्ब दारिद्रयरेषेखाली गणले जाईल.
४४. अमेरिकेतल्या लोकांनी भारतात नेहमीच्या जागी खरेदीला जाऊच नये. गेल्यास ग्रहणात दान मिळालेले कपडे घालून जावे. आपले तोंड आपण मुके असल्यागत बंद ठेवावे व बरोबरच्याला घासाघीस करू द्यावी. पैसे देण्याची वेळ आली की तुम्हाला अमेरिकेतील स्वस्ताईचा अचानक साक्षात्कार होऊन गड्या अपुला गाव बरा म्हणत अमेरिकेच्या आठवणीने गदगदून येते.
४५. काहीही खर्च न करता भारतातील बाजारात जाऊन आल्याचा आनंद मिळावा या चांगल्या उद्देशाने indian grocery ची दुकाने जराशी कळकट, काळोखी व किमती नीट कळू नयेत अशीच ठेवण्यात येतात, इतकेच नव्हे तर येथे शेंडी मोडून ठेवलेली भेंडी, मोड आलेले बटाटे, पूजेसाठी कुजके नारळ व पाने काढून घेतलेल्या पुदिनाच्या काड्या ( खास लागवडीसाठी) सुद्धा मिळतात.
४६. online खरेदी करणाऱ्या मोठ्या लोकांसाठी A for Amazon, E for Ebay, F for fatwallet, G for Groupon अशी इत्यंभूत reference list आमचे, 'अमेरीकेतील खरेदी विचार- मौक्तिके' या पुस्तकात उपलब्ध आहे.
४७. आमच्याकडील एका report नुसार जगातील ( म्हणजे अमेरिकेतील) ९० % लोक ज्या वस्तूवर सगळीकडे deal शोधण्यात जितका जास्त वेळ घालवतात त्या प्रमाणात ते ती वस्तू विकत घेण्याची शक्यता धूसर होत जाते.
४८. There is nothing like free lunch and great deal!
४९. अंथरूण पाहून हातपाय पसरावे हे खरे, पण इथे भरपूर आणि अमेरिकन size ची अंथरूणे असतात, credit cards या नावाची.
५०. भरपूर खरेदी करा, सतत खरेदी करा, हवे ते खरेदी करा, नको ते तर जरूर खरेदी करा. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला तिचे tonic भरपूर देत राहा.
५१ . अमेरीकेतील खरेदी आणि कुपन्सचा सदुपयोग यासंबंधी उरलेली ५० विचार- मौक्तिके वाचण्यासाठी तसेच अमेरिकेतील रहिवाश्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आमची खालील विषयांवरील विचार-मौक्तिके (मूल्य प्रत्येकी $9. 9 9 फक्त ) उपलब्ध आहेत. गरजूंनी त्यांचा लाभ अवश्य घ्यावा -
१. अमेरीकेतील खरेदी - सुगृहीणीसाठी
२. अमेरिकेत घर घेणे, बदलणे आणि घरातील दुरुस्ती - दाम्पत्यसुखासाठी
३. अमेरिकेतील स्वैपाक - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
४. अमेरिकेत मुलांचे व मुलींचे संवर्धन - सर्वांसाठी
५. अमेरिकेतील मराठी मंडळांचे कार्य - मराठी मंडळांसाठी
६. अमेरीकेतील हिंदू सण आणि रिवाज - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
७. अमेरिकेतील नाटके - नाटकवाल्यांसाठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol _/\_

Lol हे देखिल धमाल!

'अमेरिकेतील (भारतात घेऊन जाण्यासाठी केलेल्या वस्तूंची) खरेदी' असा एक स्वतंत्र बाफ येऊ द्या. Proud

सहीये हे!! Lol

मॉल मध्ये आपल्याशी विनाकारण जवळीक साधू पहाणारे आणि जणू तुम्ही लंकेची पार्वती करून ठेवलेल्या बायकोचा सुखी संसार वाचवण्यासाठी तुम्हाला मार्केटिंगच्या वराने ऊपकृत करू पाहणारे देसी पाहताच फिटिंग रूममध्ये जास्तीतजास्त वेळ स्वतःला लपवावे.

SS is more like a moderator of mauktike Light 1

सायो आपल्या सत्राशे साठ शब्दप्रयोगासारखं यांचं शंभर असेल किंवा आपण अ‍ॅड करायला हवीत अशी त्यांची योजना असेल.

खतरनाक.. .
कोस्को मध्ये रविवारचा नाश्ता (कुरणात चारणाऱ्या गाई म्हशी मेथड ने) केल्यावर ट्रंकेत सामान भरताना तो नाश्ता किती शे dollar ला पडला हा जोक इमानेइतबारे दर विकांताला मारावा.
काहीही स्वस्त दिसलं की स्टोकप करावे.
गराज सेल (क्रेग लिस्ट, किजीजी) हा रस्ते माहित करण्याचा मार्ग हे तत्त्व फारच महत्त्वाचे आणि tested आहे.
अमेरिकेत शर्टच्या बटणा पासून उंदराच्या शेपटी पर्यंत सर्व गोष्टींचा इन्शुरन्स मिळतो.

शिर्षकात १०० मौक्तिकं म्हटलंय पण आहेत ५१ च. ह्या आणि आधीच्या लेखातही >> पहिल्यापासून गणित कच्चेच ( माझे)

५० चा नमुना दाखवलाय, उरलेली ५० वाचण्यासाठी ५१ वे कलम वाचा

उत्तम, हे मात्र भारत सोडुन सगळीकडे लागु होती. फक्त दुकानाची नावे बदलावी लागतिल.
>>

नाही नाही नाही. अमेरिकेतली मॉल व खरेदी संस्कृती, डिल्स, सेल याची तुलना करणे अशक्यच!!

३८. Advertisements मध्ये स्त्रिया models च्या अंगावरचे कपडे आपल्या अंगावर कसे दिसतील याची कल्पना करत असतात तर पुरुष त्या कपड्याखाली model कसे असेल याची कल्पना करत असतात यावरून स्त्रियांचा स्वभाव वरवरच्या, उथळ गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याचा असतो तर पुरुषांचा स्वभाव एखाद्या गोष्टीच्या खोलात जाण्याचा असतो असे आमच्या एका पुरुष मित्राचे चिंतनीय मत आहे.>>>>>

खतरनाक Happy

२३. कधीही करता येणारी online खरेदी अत्यंत सोयीची आहे पण रात्री १२ :३० वाजता condom ची तत्काळ गरज असेल तर online खरेदी करून ते वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील याची शाश्वती नसते.>>>अ‍ॅमॅझॉनच्या १ अवर ड्रोन डिलिव्हरीबद्दल ऐकलं नाही का? फक्त एक तास कळ काढा. फक्त नंतर तो ड्रोन तुमच्या खिडकीबाहेर तरंगत नाहीये एवढी खात्री करा.
५१. सबवेमध्ये सँडविचमध्ये कोणकोणत्या भाज्या घालू, असे विक्रेत्याने विचारल्यावर एकच कुठलीतरी भाजी वगळून 'एव्हरीथिंग बट (ओनियन/पेपर्/स्पिनच वगैरे)' असे सांगावे. कारण कमीत कमी पैशात जास्तीत जास्त माल भरलेला सँडविच मिळवणे हा आपला अधिकार आहे, पण नुसतंच 'एव्हरीथिंग' म्हटलं तर हावरट समजतात.
५२. बाय वन गेट वन फ्री, ही पाटी वाचल्याक्षणी जे काय असेल ते उचलून ट्रॉलीत टाकावे. थँक्सगिव्हिंगला पिसाटल्यासारखी खरेदी करून मिनिव्हॅन छपरापर्यंत भरून जाईल एवढी खरेदी करावी. यातलं आपल्याला खरोखरच लागतं याचा विचार घरी गेल्यावर करावा. नंतर दोन दिवसांनी सावकाश निघावे आणि त्यातल्या ९०% वस्तू रिटर्न करून यावे.
५३. $२५ ची वस्तू शहराच्या दुसर्‍या टोकाला $२३ मध्ये मिळत असेल तर तिथे जायला ५-६ डॉलरचा गॅस जाळणे योग्य आहे.
५४. हायफाय ब्रँडेड दुकानातून काहीबाही खरेदी करून रिटर्न करून टाकावे. त्यांचा भलामोठा लोगो असलेली पिशवी मात्र ठेवावी. नंतर चड्डी-बनियन-मोजे घ्यायला मॉलमध्ये गेलो तरी सर्व सामान त्या पिशवीत ठेवून मिरवावे.
५४. आपण एरवी महिन्याकाठी दोन-तीन केळी खात असलो तरी कॉस्टकोमध्ये होलसेल भावात चार डझन मिळाल्यास आणावी आणि सकाळ-संध्याकाळ पोटात चेपून चेपून संपवावी. यालाच पैसे वाचवणे असे म्हणतात.
५५. ऐशी डॉलरच्या जेवणावर दोन डॉलर टिप देणे अत्यंत वाजवी आहे.
५६. व्हेगासला वगैरे गेल्यास एका दिवसासाठी स्पोर्ट्स कार रेंट करावी आणि तिच्यात बसलेले फोटो काढावेत. ते नच जमले तर रस्त्यात उभ्या असलेल्या एखाद्या फरारीला टेकून 'आत्ताच गाडीतनं बाहेर पडलो' स्टाईलमध्ये फोटो घ्यावा. नंतर तो फेसबुकवर डिस्प्ले पिक्चर म्हणून लावून भारतातल्या मित्रांना जळवावे.

सायबर मंडे संपल्यावर निदान महिनाभर तरी गाडी घरात आणताना आणि गराजमधून बाहेर काढताना विशेष काळजी घ्यावी. नवर्^याने किंवा घरात जास्त ऑनलाइन खरेदी करणार जो कोणी मेंबर असेल त्याने मागवलेल्या वस्तू फेडेक्सवाला डिलिवर करताना अंगणातल्या अपुर्^या जागेमुळे ड्रायवेवर ठेऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या तंद्रीत त्यावर गाडी घालाल. अर्थात त्याचंही फार टेंशन घेऊ नका. खरेदीतला कुठलातरी क्लॉज काढून ते वेळेवर रिटर्न करायची सोय असेलच.

पस्तीस वर्षांपूर्वीपासून अमेरिकेत रहातो आहोत. अजूनहि सौ. चा समज असा आहे की अमेरिकेत कायदा आहे की सेल असल्याखेरीज काही विकत घेऊ नये नि सेल असेल तर ते विकत घेतलेच पाहिजे. कूपन असल्यास, एकवेळ सेल नसला तरी गोष्ट विकत घेणे माफ आहे, मात्र डिक्लेअर करायला पाहिजे की कूपन होते म्हणून ती गोष्ट घेतली, नाहीतर न घेता चालले असते.

>>>सर्वोत्तम deal तेच ज्यात आपल्याला गरज नसलेली वस्तू आपल्या मैत्रीणीपेक्षा स्वस्तात मिळते.>>> हे आवडलेच. Happy

चिमीचांगा >> अतिदूर वायव्य आणि पश्चिम अमेरिकेतून drone चे लोण फ्लोरिडाला राहणाऱ्या आम्हा गरीबांपर्यंत पोहोचायला अजून १० वर्षे तरी लागतील.

सॉल्लिड!!! Biggrin

महिन्याभराच्या खरेदीच्या receipt जाळल्यास सुमारे महिनाभराचा स्वैपाक शिजेल इतके इंधन मिळते.

>>>>> Lol

Lol
ऑनलाईन खरेदी करतांना फुकटात शिपिंग मिळण्यासाठी $१० च्या वस्तु बरोबर $९० च्या वस्तु अ‍ॅड करण अगदीच लिगल आहे.

नंतर परत करु म्हणुन ठेवलेल्या वस्तु ६ महिण्यांनी क्लॉजेट साफ करतांना परत दिसल्यात तर त्या घरातील ऑब्जेक्शन घेउ शकतिल अश्या मेंबरांपासुन लपवुन परत कोंबुन ठेवाव्यात आणि गुड विलच्या पुढच्या ट्रिप मधे टाकुण यावे.

Pages