१०० विचार-मौक्तिके - अमेरिकेतील नाटकवाल्यांसाठी

Submitted by वाट्टेल ते on 12 March, 2015 - 16:29

१. नाटकाच्या पहिल्या (आणि अखेरच्या) प्रयोगाच्या सुमारे ३० दिवस आधी नाटकाची संहिता शोधण्यास लागावे.
२. नाटकाच्या ८ पेक्षा अधिक तालमी करू नयेत त्यामुळे कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयावर बंधने येतात.
३. नाटकात किमान एक अत्यंत बावळट आणि अजागळ स्त्री पात्र आवश्यक आहे.
४. नाटकात किमान एक अत्यंत खाष्ट आणि लबाड स्त्री पात्र आवश्यक आहे.
५. नाटकात स्त्री व पुरुष पात्रांची संख्या ४ : १ अशी असावी.
६. नाटक घराच्या दिवाणखान्यात आणि दिवाणखान्यातच घडते.
७. नाटकात किमान एकदा चहा (खोटा) किंवा खाणे (खरे) stage वर येणे बंधनकारक आहे.
८. नाटकातील वाफाळता चहा, पात्रांनी पाण्यासारखा एका घोटात प्यावा.
९ . नाटक हे सत्यनारायणाच्या भक्तिभावाने करण्याची गोष्ट आहे त्यामुळे नवरा बायकोच्या भूमिका खऱ्या आयुष्यातील नवरा-बायको यांनीच कराव्या.
१०. सर्व स्त्रीपात्रांनी भरजरी कपडे घालावे व भरपूर रंग फासावा जेणेकरून प्रेक्षकांना दृष्टीसुख लाभेल.
११. घरात वावरणाऱ्या पुरुष पात्राचा पोशाख 'गुढग्याखाली लोंबणारा झब्बा' असाच असावा.
१२. 'नाटकात कोणत्याही पात्राने प्रेक्षकांना क्षणभरही पाठ दाखवणे हा अक्ष्यम्य गुन्हा आहे ' या एकाच गोष्टीवर जगात दुमत संभवत नाही.
१३. पात्राने stage वरून, प्रेक्षकांतील आपल्या ओळखीच्या माणसाला हात करणे व क्वचित त्याच्याशी hi - hello करण्याने नाट्यरसाचा भंग होत नाही तर प्रेक्षकांशी जवळीक साधली जाते.
१४. नाटकात (चुकून) प्रेमप्रसंग असल्यास पात्रांनी एकमेकांपासून सुमारे ४ फूट लांब उभे रहावे.
१५. नाटकात फोनवरील संभाषण असणे बंधनकारक आहे.
१६. तालमी दरवेळी वेगळ्या जागी कराव्यात . प्रयोगाचा दिवस वगळता पात्रांनी आपले पाय एरवी stage ला लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.
१७. stage वर, नेपथ्यातील पोकळी भरून काढण्यासाठी fake plants ठेवावीत व घराला बागेचे स्वरूप द्यावे.
१८. stage वर २ हून अधिक पात्रे असल्यास त्यांनी आगगाडीचे डबे असतात तसे एका रेषेत उभे रहावे.
१९. ३० मिनिटाच्या नाटकानंतर १७ मिनिटांचा पात्रपरिचय, कौतुक- आभार प्रदर्शन समारंभ असावा.
२०. stage वरील पात्रांनी एकमेकांशी बोलताना एक डोळा ज्याच्याशी बोलतो त्याकडे व दुसरा डोळा प्रेक्षकांकडे ठेवावा.
२१. ५ लोकांनी ८ पात्रांचे संवाद कधी चालत, उभे राहत किंवा कधी बसून वाचणे यास तालीम असे म्हणतात.
२२. आधीचे पात्र बोलताना चुकले तर प्रसंगावधान दाखवून नाटक सावरू नये. ज्याची चूक त्याच्या पदरात तिथल्यातिथे टाकावी.
२३. stage हे नाटक करण्याची नव्हे तर लिहीण्याची जागा आहे असे समजून मनाचे संवाद म्हणावेत.
२४. ३० मिनिटांच्या नाटकाला 'एकांकिका' असे म्हणतात.
२५. stage वर जे घडत असते त्याला 'एक धमाल विनोदी एकांकिका' असे म्हणतात.
२६. stage वरची 'एक धमाल विनोदी एकांकिका' पडद्यामागे 'एक गहन शोकांतिका' असते.
२७ . नाटक बसवण्याचे ठरवल्यावर ते सादर करेपर्यन्त जे काही घडते ते प्रत्यक्ष नाटकापेक्षा जास्त नाटयपूर्ण असते.
२८. गावाकडे मृत व्यक्तीच्या नावाने तेराव्याचे गावभोजन घालतात त्याप्रमाणे नाटक उरकल्यावर एक potluck घालावे.
२९. तालमीत, कोणत्याही अस्सल नाटकवाल्याप्रमाणे आपणच केलेल्या जुन्या नाटकांच्या गोष्टी चघळत रहाव्या.
३०. ३ खुर्च्यांवर एखादी चादर पसरली की नाटकातला सोफा होतो.
३१. सगळीच्या सगळी पात्रे एखाद्या तालमींसाठी उपस्थित आहेत अशी नामुष्कीची अवस्था येऊ देऊ नये.
३२. पार्श्वसंगीत किंवा काही खास नेपथ्य फक्त प्रयोगाच्या वेळेसच उपलब्ध करावे.
३३.पात्रांनी आपले संवाद, स्वगत म्हणत असल्यासारखे वा भाषण दिल्यासारखे mike च्या समोर येउन म्हणावेत.
३४. stage वर center table हे सर्वात मुख्य पात्र आहे. त्यावर माईक, चहाचे कप, मासिके इत्यादी ठेवता येते. सर्व घटना center table च्या भोवती घडतात.
३५ . center table मुळे पात्रांना फारसे फिरता येत नाही व माईकपासून पात्रे लांब जाण्याचा धोका टळतो.
३६. साधारण ३ वाक्ये उभ्या-उभ्या आणि ३ वाक्ये बसून बोलणे हा क्रम ठेवावा.
३७. नाटक कौटुंबिक असल्यास सासू - सून किंवा नवरा - बायको यांनी संवादांचे table - tennis खेळणे बंधनकारक आहे.
३८. नाटक फक्त कौटुंबिक असावे.
३९. नाटकाला दिग्दर्शक नसावा.
४०. जी मराठी मंडळाची कार्यकारिणी ( तुम्ही तिच्यात नसल्यास) नाटक करीत नाही ती टाकाऊ समजावी.
४१. नाटक जेवणानंतर सादर करावे.
४१ अ - रिकाम्या पोटी प्रेक्षकांना झोडपणे बरे नव्हे.
४१ ब - नाटक बघण्याची सक्ती करणे बरे नव्हे.
४२. १९८० - १९८५ नंतर लिहिलेले नाटक करण्यास अलिखित बंदी समजावी
४३. नाटकात stage वर संपूर्ण उजेड किंवा संपूर्ण काळोख अशा २ प्रकारचीच प्रकाशयोजना वापरावी.
४४. stage ला पडदा असण्याची व तो न अडकता उघडण्याची अल्पशी शक्यता गृहीत धरून आपापल्या जागा पडदा उघडण्यापूर्वी पकडण्यास हरकत नाही.
४५. नैसर्गिक अभिनय म्हणजे पात्राच्या नव्हे तर आपल्या स्वत:च्या नेहमीच्या शैलीत बोलणे.
४६. नाटकाची CD करून garage मध्ये अडीनडीला सहज सापडेल अशी अडगळीच्या खोक्यात पाठी ठेऊन द्यावी.
४७. नाटकाच्या script च्या साधारण पात्रसंख्या गुणिले ६, इतक्या प्रती संपूर्ण नाटक बसवण्याच्या काळात काढल्या जातात.
४८. ३० मिनिटाच्या नाटकात किमान २ वेळा कपडे ( stage वर नव्हे तर stage च्या पाठी) बदलण्याचे प्रसंग घालणे बंधनकारक आहे.
४९. जगातील कोणताही कौटुंबिक घोळ, गैरसमज आणि त्याची उकल ३० मिनीटांत होऊ शकते तस्मात ३० मिनिटांच्या आत नाटक संपणे बंधनकारक आहे.
५०. अर्धवट तालीम आणि सुमार संहिता घेऊन हौशी नाटके करण्यास काहीही हरकत नसावी. अनेक व्यावसायिक नाटकेही अशीच बेतलेली असतात.
५१ . अमेरिकेतील नाटकवाल्यांसाठी उरलेली ५० विचार- मौक्तिके वाचण्यासाठी तसेच अमेरिकेतील रहिवाश्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आमची खालील विषयांवरील विचार-मौक्तिके (मूल्य प्रत्येकी $9. 9 9 फक्त ) उपलब्ध आहेत. गरजूंनी त्यांचा लाभ अवश्य घ्यावा -
१. अमेरीकेतील खरेदी - सुगृहीणीसाठी
२. अमेरिकेत घर घेणे, बदलणे आणि घरातील दुरुस्ती - दाम्पत्यसुखासाठी
३. अमेरिकेतील स्वैपाक - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
४. अमेरिकेत मुलांचे व मुलींचे संवर्धन - सर्वांसाठी
५. अमेरिकेतील मराठी मंडळांचे कार्य - मराठी मंडळांसाठी
६. अमेरीकेतील हिंदू सण आणि रिवाज - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
७. अमेरिकेतील नाटके - नाटकवाल्यांसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्यात घरगुती लेव्हलवर आख्खे नाटक रेकॉर्ड करून ते मागे वाजवून नुसता अ अ अभिनय ओतायचा स्टेजवर अशी एक प्रथा नाही का?

आम्ही देसी स्टुडंटस इंडिया नाईटसाठी जे स्किट करायचो तिथे हाच फंडा असायचा.

बाकी इथे समांतर रंगभूमीवर थोडेफार काहीतरी करून मग परदेशात गेल्यावर देसी कम्युनिटीच्या नाटकवाल्यांच्यात मिसळताना/ नाटक करताना सुपरडुपर हिरवागार पोपट होतो असा आन्भव आहे.

नाही. सहसा तसे होत नाही. लोकंच बोलतात, पण मग बरेचदा काही लोकांना आठवत नाही आणि प्रॉम्पटरची कुजबूज पण इतक्या जोरात असू शकते की ती पहिल्या एक दोन रांगेत ऐकू येते.

मागील पानावरून पुढे चालू….
n+ 5 : मुळात नाटकामधे बॅकस्टेज नावाची एक संकल्पना असते ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरून जावी. नाटकाशी संबंधीत प्रत्येक व्यकतीने स्टेजवरच असायला हवे असा आग्रह ( की अट्टाहास ) धरावा.
n+ 6 : पात्रांची निवड नाट्यवाचन वगैरे जुनाट आणि कालबाह्य पद्धतीने न करता, व्होटींग पद्धतीने करावी.
अ) यामधे कथानकाचा विचार न करता, प्रत्येक पानावर किती वाक्ये आहेत त्यानुसार प्रमुख, दुय्यम, तिय्यम भूमिका ठरवाव्यात, आणि "करीन तर प्रमुख भूमिका नाहीतर कोणतीच नाही" असा बाणेदारपणा अंगी बाळगावा
ब) ह्या व्होटींगमधे प्रमुख भूमिकेसाठी शक्यतो पहिले मत स्वतःला द्यावे, आणि अगदीच औदार्य दाखवत दुसरे मत स्वतःच्या 'बेटर हाफ' ला द्यावे. (आपला 'बेटर हाफ' त्या भूमीकेसाठी 'फारसा बेटर नसला' तरीही)

सगळ्यांनीच भारी अ‍ॅडीशन्स केल्या आहेत…. Lol

आपली पण ऑडिशन .... आपलं अ‍ॅडिशन :

* नाटक कोणतेही असो, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू असो वा नसो, त्याला समांतर असे (साग्र)संगित मानापमानाचे प्रयोग दणक्यात सुरू ठेवावेत. हे प्रयोग नाटकाच्या सुरवातीपासून सुरू करून ते थेट नाटक संपल्यानंतरही अनेक काळापर्यंत सुरू ठेवावेत. (हे प्रयोग जुन्या वाईनप्रमाणे पुढल्या वर्षीपर्यंत अधिकच मुरतात. ) संगित मानापमानामुळे मूळ नाटक हे अस्सल 'नाटक' म्हणून वठते.

पहिली काही वाचनं Skype वर करावीत त्यानंतर कधीतरी ८ तालमी प्रत्यक्ष भेटून कराव्यात.

पुढे काही वर्षांनी स्वत:च्या नाटकाचा उल्लेख अगदी सहज करतोय अस दाखवत 'आमच्या त्या ह्या ह्या प्रयोगाला काय टाळ्या पडल्या होत्या... अमुक तमुक हॉल मध्ये झाला होता प्रयोग'

n+2 : जितकी पात्रे, तितक्या साठी स्टेजसमोर व्हिडियो कॅमेरे+कॅमरामनच्या भूमिकेत पात्रांचे Other half असावेत. त्यामुळे तितके तरी प्रेक्षक असतील याची खात्री होते, >>>>
+१११११११११
हे अनेक वेळा अनुभवलेलं आहे Happy

खतरा अ‍ॅडिशन आहेत सगळ्यांच्याच Happy

धन्यवाद. Additions ची (ज्याचा नाटकाशी अन्योन्य का कसला म्हणतात तसा संबंध आहे) संख्या बघता एकूण १०० चा टप्पा लवकरच पार होईल असे वाटते.

Lol

धमाल लिहिलंय!

>>गावाकडे मृत व्यक्तीच्या नावाने तेराव्याचे गावभोजन घालतात त्याप्रमाणे नाटक उरकल्यावर एक potluck घालावे. Biggrin

मस्तच,

पण बी नी सांगितल्याप्रमाणे अमेरिकीतील अनिवासी मंडळानी सिंगापुर वाल्याकडे शिकायला हरकत नाही.

सिंगापुर मराठी मडळाचे अनुभव..

१> internet वर बुकिंग चालु झाल्यावर ते काही मिनिटात संपते. त्यामुळे लवकर तिकिट बुक करावे.
२> तिकिटाच्य पैसे भरलेली bank transfer चा screen shot जवळ ठेवावा . काही कारणानी जर प्रवेश मिळाला नाही तर bank transfer चा screen shot वर प्रवेश मिळतो.
३> नाटकाच्या दिवशी तिकिटे मिळणे अशक्य आहे. त्यामुळे ऐन वेळी नाटक बघायला जायचा विचार सुध्धा मनात आणु नये. ( black marketing ला बर्यापैकी स्कोप आहे).
४> मध्यन्तरात पळत जाउन वडे आणि चहा विकत घ्यावा. उशिरा गेल्यास काही मिळत नाही.
५> मागच्या वर्षाच्या नाटकाची DVD पाहिजे असल्यस लवकर जाउन विकत घ्यावी. संपल्यास मडळ जबाबदार नही.
६> नाटकाचा दुसरा प्रयोग होईलच असे नाही, त्यामुळे पहिल्या प्रयोगाचे बुकिंग ओपन झाल्यावर लगेच तिकिटे बुक करणे.

पण नाटक मात्र खुप चांगले असते अगदी शिवाजी नाट्यमंदिर किंवा बाल्गंधर्व सारखा दर्जा असतो

काही 'आणभाविक किस्से'

'ईतना कौन देखता है यार, सब चलता है, अपनेही लोग है| वैसेभी हम सब बच्चोंके लिये ही तो करते है| हमे जो करना था, वह तो ईंडिया मे बहुत किया है|' - ही अटकपूर्व जामीनाची भुमिका घेऊन नाटक करावं.

नाटकाला सेट हवा म्हणून एका (अर्थात देसी) मॉटेल वाल्याकडून ३-४ प्लायवूड च्या अत्यंत जड फळ्या (क्वालिटीत तडजोड नाही) पांढर्या रंगात रंगवून घेतल्या आहेत. त्यातल्या २ फळ्यांना मधे चौरसाकृती खिडक्या कापल्या आहेत.

आता नाटक कुठलही असो, सेट एकच असतो (बाल-रामायण, गांधी-नेहरू, पशू-पक्षी कुणीही स्टेज वर असलं, तरी मागे ह्या ३ फळ्या).

ऐतिहासिक (गांधी-नेहरू वगैरे एकदम परफेक्ट. जाता-जाता संस्कार, झालच तर कुणाच्या भावना वगैरे दुखवत नाहीत आणी एखादा बारीक अंगकाठीचा आणी टक्कल असलेला माणूस - जो बरीच वर्षं तिथेच स्थायिक झालेला असल्यामुळे, त्याला सगळ्या कम्युनिटी अ‍ॅक्टिव्हीटीज मधे मानाचं स्थान असतं - असा, सहज उपलब्ध असतो.), बालनाट्य (पक्षी, झाडं, पण परत ह्यातून सुद्धा भरपूर संस्कार, विनोदी (ह्यातले संवाद हे उत्स्फुर्तपणे डेव्हलप करत न्यायचे असतात आणी स्वतःला जे विनोदी वाटेल, आणी समोरच्याची 'हेटाई' करत जे बोलता येईल, तेच स्टेज वरून बोलायचं असतं. अशी अनेक नाटकं पाहिल्यावर, केल्यावर (काही ईलाज नाही, एकदा नाटक्या नाव पडलं की दरवर्षी करावच लागतं) जीवाला गार वाटतं.

आम्ही (मी आणि माझा नवरा) इथल्या व्यावसायिक थिएटरमध्ये स्वतंत्रपणे (मंडळामार्फत नाही) नाटकं यशस्वीपणे करतो. सुरुवातीला सगळे अनुभव असेच होते. त्यातून शिकून दिग्दर्शक, निर्माता म्हणून आम्ही आमचे नियम पहिल्याच भेटीत समोर ठेवायला सुरुवात केली. आता आम्ही ’हीटलर’ आहोत सर्वांच्या दृष्टीने (मागून बोलताना) पण सगळं व्यवस्थित पार पडतं. त्यातले काही:
सराव दिलेल्या वेळेतच सुरु होईल. उशीरा आलात तर आधीचं जे गेलं असेल ते गेलं.
तुमच्या सूचना सरावाच्या मध्ये २० मिनिटं (त्यापेक्षा १ मिनिटंही जास्त नाही) असतात तेव्हा सांगाव्यात. तालमीत सांगू नयेत.
आपल्या मनाने स्वत:च्या आणि इतरांच्या संवाद, हालचालीमध्ये बदल केले तर पुन्हा ते बदलले जातील Happy
आपण इथे खाण्यासाठी जमत नाही त्यामुळे फक्त चहाची सोय होईल :-).

हा आमच्या युद्धपातळीवर काम करत केलेल्या कामगिरीचा दुवा - https://marathiekankika.wordpress.com/

'ईतना कौन देखता है यार, सब चलता है, <<
फेरफटका, या वाक्याचा कॉपीराइट आमच्या बॉलिवूडकडे आहे हां! Wink

नाही. मला म्हणायचं आहे जिथे व्यावसायिक नाटकं होतात तो रंगमंच (कारण मंडळं करतात ते नेहमी हायस्कूलचं स्टेज नाहीतर देवळाचं स्टेज असतं.)

ओह ओके.

वरचे सगळे धमाल आहेच पण मला खरंच असा प्रश्न पडतो की अमेरिकेत आणि युरोपात इतके शिस्तबद्ध तरीही ब्रिलियंट थिएटर वेगवेगळ्या पातळ्यांवर घडत असते पण तिथे जाऊन आपले मराठी, नुसते मराठीच का बाकीचे देसी लोकही नाटक करताना इतके बेशिस्त आणि ढिसाळच का वागतात देशात असल्यासारखे?

कारण ते ’हौशी’ असतात. त्यामुळे हौसेखातर काहीही खपतं असं त्यांना वाटत असतं. आम्ही जेव्हा सांगतो की आपण तिकिटाचे पैसे घेतो तर पेक्षकांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं काहीतरी पाहायला मिळायला हवं तेव्हा ’हं प्रोफेशनल’ असं म्हणतात पण ते खिजवल्यासारखं असतं Happy आम्ही काहीतरी गुन्हा करायला सांगत असल्यासारखं. मला सर्वात चीड येते ती इंग्लिश घालू या जास्तीत जास्त असा कलाकार आग्रह करतात तेव्हा.

Pages