खिडकी आणि भिंत या मधील फट काढणे

Submitted by सुनिता on 10 March, 2015 - 02:14

एक माहिती हवी आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.
आमच्या घराची भिंत आणि स्लायडींग खिडकीची फ्रेम यामध्ये थोडी फट राहीली आहे. फट तशी मोठी आहे व पावसाचे पाणी थोड्याफार प्रमाणात आत येते. बिल्डरचे सर्व पैसे देवून झाल्यामुळे आता तो लक्ष देत नाहीये व बोलावून पण येत नाहीये. आता मला अशी माहीती हवी आहे की ती फट कोणते कारागिर काढुन देवू शकतील (जसे पेंटर, गवंडी, फॅब्रिकेशन वाले ) ते कळत नाहीये.

कृपया कोणी सांगू शकेल का की भिंत आणि स्लायडींग खिडकीची फ्रेम यामधील फट कशी भरुन काढावी?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या गवंड्याला बोलावून त्यालाच विचारा.

छोट्या फटीत एम-सील भरून होईल. मोठी असेल तर पीओपी अथवा व्हाईट सिमेंट भरावे लागेल. फ्रेमवाले काही करू शकणार नाहीत.

एकच फट भरायला हँडिमॅन मिळणे कठीण. हा जॉब पेंटर वा पीओपीवाले यांच्या अखत्यारीत येतो.

दर्शनी भागातली खिडकी नसेल, तर स्वस्तातला 'डी.आय.वाय.' (डू इट युअरसेल्फ) इलाज सांगतो.

आधी फटीत थोड्या चिंध्या, पॉलिथिन पिशव्यांचे तुकडे इ. भरा. प्रोफेशनल पीओपी वाले पॉलिथिन गोणीचे धागे काढून पीओपीमधे मिक्स करून वापरतात. ते वापरलेत तरी चालेल. (कुंभाराच्या मातीत फायबरसाठी लीद असते तसे.)

हार्डवेअर/रंगाच्या दुकानातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) पिशवी विकत आणा. (३०-४० रुपयांत किलोभर मिळायला हरकत नाही. नक्की किम्मत ठाऊक नाही.) हे पीओपी पट्कन घट्ट होते. थोडेथोडे पाण्यात कालवून बोटाने गॅपमधे भरा. एकाद्या सपाट बोथट सुरी/उलथन्याने ओले असतानाच त्याचा सरफेस सारखा करा, थोडे जास्त वाळले, की ओल्या फडक्याने सरफेस पॉलिश करा. १०-१५ मिनिटांत सिमेंटसारखे कडक होईल. त्यावर नंतर फ्रेमला/भिंतीला मॅचिंग रंग देता येईल. फ्रेम काळ्या असतात सहसा. काळ्या ऑईलपेंटची छोटी डबी आणून झकास काम होईल.

इकडे तिकडे लागलेले पीओपी ओले असतानाच पुसून टाका. कोरडे झाल्यावर भिंतीचा रंग त्याच्यासोबत निघेल.

गवंडी बोलवा.. सगळ्यात योग्य तेच काम करुन देतील..

घरच्या घरी पण ती फट बुजवता येईल.. व्हाईट सिमेंट वापरुन.

सीलन्टची छोटी नळकांडी मिळतात बाजारात. ती घ्या आणि स्प्रे करा. म्हणून गूगल करा म्हटलं. पुढं टोक असतं त्यामुळं आपोआप फटीत जाऊन बसतं.

ग्लासवुल किंवा पफचं इन्स्युलेशन करताना सीलीकॉन सीलन्टची नळकांडी वापरतात तशीच असतात ही पण.

तुमची खोली वातानुकूलित असेल तर जरादेखील फट असणे इष्ट नाही. तेव्हा बाळू यांच्या प्रतिसादातील उपाय सर्वात प्रभावी.

त्याचप्रमाणे दिल्लीस्थित प्रिसिजन पाईप्स अ‍ॅन्ड प्रोफाईल्स कंपनी लिमिटेड तर्फे पीवीसीपासून गॅस्केट बनविले जाते (जसे की फ्रिजच्या दरवाजाला असते) त्याचाही खिडकी व भिंतीमधली फट घालविण्याकरिता उपयोग होईल. फक्त या प्रकारात खिडकी काढून पुन्हा गॅस्केटसह बसवावी लागेल.

http://info.shine.com/company/precision-pipes-profiles-co-ltd/3740.html

http://ppapco.in/message-cmd.html

सर्वांना मनापासून धन्यवाद.

एकूण २५ खिडक्या आहेत व प्रत्येक खिडकवच्या फ्रेम व भिंतथोड्याफार कमी जास्त प्रमाणात फट आहेच.
पहाते रेट व बजेट पाहून काय परवडण्यासाऱखे व सोयिस्कर आहे ते..

बाळू भाऊ ते सिलंट काय नावाने मिळतं म्हणे ?

उपायांबद्द्ल पुनश्च धन्यवाद.

सुनिताताई

मला सुद्धा गुगलावं लागेल. खिडकीच्या गॅपची साईज काय आहे हे हे इतरांना कसं माहीत असणार ? त्यापेक्षा तुम्हीच शोधाशोध करुन पहा. तसच फट किती व कशी आहे यावर कुठली मेथड ते ठरणार आहे. म्हणून तुम्हाला आधी सर्च देऊन पहावं लागेल.

ओला चुना पाच किलो (५०रु)लगदा मिळतो त्यात नेरू पाच किलो(५०रू) मिसळा दहा किलो मिश्रण होईल याने फटी नीट बुजवा एखादा गडी बोलावल्यास तिनशे रू घेईल.