बहरलेलं झाड

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

bogunwel.jpg

बंगलोरमधे आजकाल बर्‍याच ठिकाणी अशी बहरलेली झाडं दिसताहेत. अश्याच एका झाडाचा हा फोटो.

विषय: 

अहा! हिरव्या झाडावर गुलाबी पखरण असलेलं झाड अल्लद ठेवल्यासारखं दिसतयं.

निसर्गाने केलेले इतके सुंदर कलर कॉम्बीनेशन अतिशय अप्रतिम रित्या capture केले आहे...
फार सुंदर!! Happy
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy

वॉव.. छान.. ते ऊन सुद्धा किती खट्याळ... बाकीची झाडं सोडून या बहरलेल्या झाडाला बिलगलेल दिसतय.

दोन्ही रंग चांगले आले आहेत पण रात्री काढलाय का? मागे अंधारासारखे काय दिसते? तसेच वरती तो उजेड दिव्याचा पडल्यासारखा वाटतो तो काय आहे?

दिवसा उन्हाची दिशा बघून काढलास तर जास्त उठावदार येइल असे वाटते.

खूपच सुंदर. इथे पीच, चेरीची झाडं अशीच बहरतात.

चिन्नु, वैदेही, बी, भाग्या धन्यवाद.
भाग्या, चेरीच्या झाडांचे फोटो काढ की Happy
अमोल, रात्री नाही काढलाय. भर दिवसा, दुपारीच काढलाय! Happy झाड भर उन्हातच होतं ते. खूप उन्हामुळे जास्त expose झाल्यासारखं वाटत, मग तो गुलाबी रंग कळत नाही नीटसा, आणि त्यावर पडलेलं उनही. म्हणून ते तसं केलय, काम करताना त्यावर. तुला हवा तर मूळ फोटो पाठवीन पहायला.

आयटे, मस्तच..!!
नवीन कॅमेरा अगदी झक्कास वापरतेयस..
असेच 'शॉलेट' फोटो काढ आणि इथे टाक आमच्याकरता Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

छान

ऊन सावलीने रंगांची मजा वाढवली आहे............मस्तच!

किरु, छाया, माधुरी तिघांचेही खूप आभार.

अतिशय सुंदर Happy

झाड मस्तच. तो वरच्या कोपर्‍यामधला काळा रंग काढलास तर?

अजय, माधव धन्यवाद.
माधव, मी वर लिहिलेय ना Happy पण करुन पाहीन.

मस्तै बर्का !
खास करुन खालच्या बाजुच्या डाव्या कोपर्‍यातील फांद्यांच्या टोकावरील उन्ह क्लासच. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?