Khachapuri from Georgia

Submitted by दिनेश. on 2 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ / ६ खाचापुरी होतील
माहितीचा स्रोत: 
नेट व प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. सुंदर दिसते आहे खाच्यापुरी.. मूळ प्रकार आकाराने बराच मोठा खाल्ला आहे मी.. मात्र या फोटोमधली खाच्यापुरी अस्सल जॉर्जिअन बाईने करून खायला घातलेल्या खाचापुरी सारखीच दिसत आहे ये तो मानना ही पडेगा..

मी ही साइट वापरतो जॉर्जियन पदार्थ बनवायला: http://georgiaabout.com/2012/07/13/about-food-khachapuri-georgian-cheese...

तुम्ही नेटवर कुठली साइट वापरली?

बाप रे दिनेश. काय सुबक करता हो तुम्ही पदार्थ.

चविष्ट आहेत की नाही ते खाल्ल्याशिवाय सांगू शकत नाही, म्हणून सुगरण्/णा हा शब्द वापरत नाहिये Proud

(इतकी स्पष्ट हिंट दिली, आता तरी खाऊ घाला तुमच्या हातचं :फिदी:)

आरती, अवश्य बघ. एक खाल्ली कि जेवण झाल्यासारखे वाटते.

टण्या... खुप छान वाटलं ! एक अशी साईट नाही. यू ट्यूबवर बघत असतो. एखादा पदार्थ आवडला तर करून बघतो, एवढंच.

दक्षे, एका दिवसात किती पदार्थ करून देऊ शकेन मी. ( याचा अर्थ असा नाही कि मी खिलवणारच नाही, ते प्रॉमिस आहेच कायम ) पण तू नक्की करून बघ. मी इथे लिहितो ते पदार्थ, सहज जमण्यासारखे आणि नक्कीच चवदार असतात.

मूळ प्रकारात खाचा वगैरे नसतात, मी आपल्या उगाच पाडल्यात. >>>> मला वाटलं खाचा पाडल्यात म्हणून खाचापुरी.. Proud

मस्त दिसतय ! करून पाहू...

जॉर्जियन पदार्थ मला खूप भारतीय पदार्थांच्या जवळचे वाटले. विशेषतः त्यांचे मसाले. आपल्यासारखेच वेगवेगळे (पण आपल्याएव्हडे विविध नाहीत) मसाले म्हणजे लाल मिरची पूड, काळी मिरी असे एकत्र वाटून ते वापरतात. तसेच कोथिंबीर/धने याचा मजबूत वापर आणि तो स्वाद आपल्या जेवणाला जवळचा. एक ठळक फरक (जो भारतीय व इतर बर्‍याच खाद्यसंस्कृत्यातून दिसून येतो) म्हणजे फोडणी. तडका/फोडण्या आपल्या पाककृतींचा प्रमुख बेस जो जॉर्जियन मध्ये नाही.

ही आमची रिक्षा: http://vishesh.maayboli.com/diwali-2014/1578

बापरे दिनेशदा! केवढा सुंदर मेनू. मी सुद्धा करुन पहाणार आहे.

मला ब्रोकोलीचे फ्रितर करायचे होते त्यात काय काय घालावे असा विचार करत आहे. तुम्ही मला बेसिक रेसेपी देऊ शकाल का? धन्यवाद.

खाचापुरी हां शब्द मला भारतीय वाटला. खाच्या मारलेल्या पु-या.

चव कशी असेल देव जाने. चीज भरलेला प्रकार मला कितपत आवडेल माहीत नाही

दिनेशदा, पहिला फोटो बघुन मी ती पुरी घ्यायला नकळत हात पुढे केला.....
खुप रीच डिश दिसते आहे....
बघुनच पोट भरले .....

सह्ही.

किती मस्त वाटलं या सगळ्या प्रतिक्रिया बघून.. खरं तर माझ्यासाठी हे उद्योग म्हणजे रविवारच्या रिकामपणचे उद्योग असतात. इथे पोस्ट करून त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या कि माझ्या डोक्यात पुढच्या रविवारचे प्लान शिजायला लागतात.

हा प्रकार ( अर्थातच ज्यांना चीज आवडते ) त्यांना नक्की आवडेल. बेक करायचे सेटींग मला नाही सांगता येणार पण तव्यावरही मस्त होतो.

टण्याने दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातून खाच्यापुरी हा पदार्थ पहिल्यांदा कळला होता. त्याने त्याच्या लेखाची लिंकही दिली आहे प्रतिसादांत.

फोटो मस्त दिसतो आहे.

परत परत येऊन फोटो पाहतेय. अगदी उचलावीशी वाटतेय हीखाच्यापुरी. अर्थात खाल्ल्याशिवाय बोलता येणार नाही खाविशी वाटतेय का ते.. Happy

मी सोबत ऑलीव्ह ऑईलमधे परतलेले टोमॅटोज घेतलेत. वर मस्टर्ड सॉस व कोथिंबीरीचे लोणचे आहे.

हे कसे केले तेही सांगा ना. टोमटो नुसतेच कापुन परतवले काय? आणि कोथिंबीरीचे लोणचे? लोणच्याच्या खारात कोथिंबीर टाकली??

दिनेश्दा , एक खोचक प्रश्न विचारू का?

तुम्ही नविन नविन पदार्थ वाचून ,ट्राय करता , ते पहिल्याच फटक्यात जमतात का हो ?
की काही ट्रायल आणि एरर असतात ??

खरं तर माझ्यासाठी हे उद्योग म्हणजे रविवारच्या रिकामपणचे उद्योग असतात. इथे पोस्ट करून त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या कि माझ्या डोक्यात पुढच्या रविवारचे प्लान शिजायला लागतात. >>>> म्हणून सहज सुचलं ,

म्हणजे तुम्ही नक्की कुठला प्लान करताय .. रविवारी कुठला पदार्थ ट्राय करायचा ते की कुठला पदार्थ आमच्यासाठी बनवायचा Happy

साधना, हो नुसतेच परतले व त्यावर गार्लिक सॉल्ट टाकले छान चव आली ( केचप संपला होता, खाली जाऊन स्परमार्केट्मधून आणायचा आळस केला. आळशी माणूस आळशी राहण्यासाठी खुप काम करतो ! )

स्वस्ति, सहसा नाही बिघडत. काय काय बनवायचे त्याचे प्लान्स डोक्यात असतात. शनिवारी शॉपिंग करतो. योजलेले सगळे मिळतेच असे नाही, मग जे मिळेल त्यातून काहीतरी बनवायचे !

माझ्या बहुतेक भाज्या, आमट्या, चटण्या रविवारीच ( निदान बेसिक तयारी तरी ) केलेल्या असतात. मग रोज चपाती, भात, ब्रेड वगैरे केले कि झाले.

Pages