स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Submitted by ferfatka on 26 February, 2015 - 03:33

savarkar.jpg
आज दिनांक २६ फेब्रुवारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ४९ वा आत्मार्पण दिन. ज्याचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या पुरुषसिंहाने आपले सारे आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. आणि मुख्य म्हणजे मरणही याच देशासाठी पत्करले.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते मात्र ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही. सतत त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. १९४८ ला महात्मा गांधीवध झाला आणि नेहरु शासनाने सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही. थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.
पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला.
अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन.
अशा या देशभक्तापासून पुढील पिढीने प्रेरणा घ्यायला हवी किंबहुना आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेरणा घ्यायला भाग पाडावे.

http://ferfatkawebsite.blogspot.in/

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेरफटका, तुमची पोस्ट डब्बल झालिये. एडिटाल कां??

स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन.
सावरकरांची सर्व पुस्तके इथे पीडीएफ मध्ये, मोफत उपलब्ध आहेत.

@ferfatk
धाग्याच्या नावात योग्य बदल करावा.

स्वांत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर

सावरकर गेले त्यावेळी पेप्रात आलेली बातमी आज मटाने छापली आहे.

त्यात दिले आहे की ते पडले , मांडीचे हाड मोडले व त्यातच पुढे ते गेले.

http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=2&section=top-stories

काऊ, बातमीत १९६३ साली मांडीचे हाड मोडल्याचे दिले आहे.
त्याचा मोडका संदर्भ लावुन १९६६ मधे हाड मोडल्याने गेल्याचा तुमचा नि:ष्कर्ष निंदनीय आहे व सावरकर प्रायोपवेशन करून गेल्याच्या सत्याचा अपलाप करणारा आहे. मायबोलिवरील सुजाण सभासदांपुढे असल्या बाजारगप्पा करण्यापेक्षा अडाणी लोकांपुढे या गप्पा मारा, खच्चून टाळ्याही पडतील.

लिंबुभौ , हाड मोडल्यानंतर ते अंथरुणात खिळुन राहिले . अधुनमधुन प्रकृती बिघडे वगैरे दिलेले आहे. ते नीट वाचावे.

बाकी , सावरकरांचा मृत्यु प्राय्पवेशाने झाला वगैरे वाचुन तर मला भारीच दु:ख होते... अन्यायाचा विरोध करायला मौन , उपोषण ही सगळी तर मवाळ गांधीवादी लोकांची कामे ,

फाळणी , दंगली या काळात जहाल लोकानी हातात दंड घेऊन हिंदुंचे नेत्रूत्व करायला हवे होते का ? असे मला आपले उगाचच वाटते !

अस्तु.

स्वातंत्रेलढा , समाजोन्नती , काव्य , इतिहास , वक्ट्रुत्व , भाषाशुध्ही , अशा अनेक पैलुंना स्पर्श केलेल्या लोकनायक नेत्याला वंदन.

आत्मबल
जवळपास ५ वर्ष इंग्लंडमध्ये राहून भारतामधल्या क्रांतियुध्दाचे नेतॄत्व करणारे सावरकर पकडले गेले.
राजा विरुध्द बंड पुकारण्याचा आरोप ठेवुन त्यांना न्यायालयापुढे उपस्थित करण्यासाठी हिंदुस्थानात आणत असताना त्यांनी घेतलेली ती समुद्रातील जगप्रसिद्ध उडी ! मार्सेलिस बंदराजवळ, फ्रान्सच्या दक्षिण किनार्‍याजवळ सावरकरांनी सुटकेचा अत्यंत धाडसी प्रयत्न केला. पोहत फ्रान्सचा किनाराही गाठला परंतु ..... पुन्हा ऐकदा ते पकडले गेले ....

फ्रान्सच्या मार्सेलिसला त्यांना पुन्हा बोटीवर चढवण्यात आले. आपला यापुढे अमानुष छ्ळ होणार हे जाणुन त्यावेळी इंग्र्जांच्या छळाला पुरुन ऊरावे अशा अचल मनोधैर्याचा कवचमंत्र सावरकरांच्या प्रतिभेतुन खालील कविता साकारली.

अनादी मी ! अनंत मी ! अवध्य मी भला
मारील रिपु जगती असा कवण जन्मला // ध्रु. //

अट्टहास करित जनी धर्मधारणी /
मृत्युशीच गाठ घालु मी घुसे रणी /
अग्नी जाळी मजसी न खडग छेदितो /
भिऊन मलाअ भ्याड मृत्यु पळत सुटतो /
खुळा रिपु / तया स्वये /
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये // १ //

लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला /
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला /
कल्लोळी ज्वाळांच्या फेकशी जरी /
हटुन भवति रचिल शीत प्रभावली /
आण तुझ्या तोफा अन क्रुर सैन्य ते /
यंत्र, तंत्र, शस्त्र, अस्त्र आग ओकते /
हला हला / त्रिनेत्र तो /
मी तुम्हासी तैसाची गिळुन जिरवितो // २ //

अनादी मी ! अनंत मी ! अवध्य मी भला
मारील रिपु जगती असा कवण जन्मला //

लोकहो,

काउ यांनी वर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन केलंय. तो खोटेपणा आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मनात सावरकरांविषयी प्रगाढ द्वेष आहे.

savarkar_hatred.jpg

त्यांचे विधान इथे आहे : http://www.maayboli.com/node/2018#comment-3462095
हा वाहता धागा असल्याने काही वेळाने नष्ट होईल.

आ.न.,
-गा.पै.

वीर सावरकरांना विनम अभिवादन,

सावरकर ज्यांना समजून घेण्याची इच्छा असेल त्यांनी "सावरकरांचा बुद्धीवाद आणि हिंदुत्ववाद" हे पुस्तक जरूर वाचावे. लेखक - शेषराव मोरे.

>>>>>>>>>> काउ यांनी वर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन केलंय. तो खोटेपणा आहे <<<<<<<<<<<<<<

वाईट वाटले .
सावकरांचा द्वेष करणाऱ्या सर्व महाभागांना चर्चेचे खुले निमंत्रण देत आहोत. ऐपत असल्यास स्वीकारावे. अभ्यासपूर्ण विरोध करीत असाल तरच चर्चा करूया. अन्यथा कृपया वाचून न वाचल्यासारखे करावे.

धन्यवाद!

शेषराव मोरे यांच्यावर स्वातंत्रसंग्राम की जेहाद या ग्रंथाबद्दल संघाकडून अश्लाघ्य टीका झाली होती. जालावरच्या कमेण्ट्स तर वाचवत नव्हत्या. त्याच मोरेंनी सावरकरांवर भरपूर संशोधन करून ग्रंथ लिहीलेला आहे याचं विस्मरण अनेकांना झालं. प्रतिक कुलकर्णी यांनी आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.

वि दा सावरकर ह्यांना त्यांच्या सामाजिक कार्य नि अंधः श्रद्धा निर्मूलनाचे जे कार्य त्यांनी केले त्याबद्दल विनम्र अभिवादन

आँ ! आमचे वंदनही खरेच आणि आमचे विचारही खरेच.

दुसर्‍यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही.

स्व-तंत्र-वीर काउराव कागलकर