स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Submitted by ferfatka on 26 February, 2015 - 03:33

savarkar.jpg
आज दिनांक २६ फेब्रुवारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ४९ वा आत्मार्पण दिन. ज्याचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या पुरुषसिंहाने आपले सारे आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. आणि मुख्य म्हणजे मरणही याच देशासाठी पत्करले.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते मात्र ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही. सतत त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. १९४८ ला महात्मा गांधीवध झाला आणि नेहरु शासनाने सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही. थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.
पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला.
अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन.
अशा या देशभक्तापासून पुढील पिढीने प्रेरणा घ्यायला हवी किंबहुना आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेरणा घ्यायला भाग पाडावे.

http://ferfatkawebsite.blogspot.in/

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेषराव मोरे यांच्यावर स्वातंत्रसंग्राम की जेहाद या ग्रंथाबद्दल संघाकडून अश्लाघ्य टीका झाली होती. जालावरच्या कमेण्ट्स तर वाचवत नव्हत्या. त्याच मोरेंनी सावरकरांवर भरपूर संशोधन करून ग्रंथ लिहीलेला आहे याचं विस्मरण अनेकांना झालं. प्रतिक कुलकर्णी यांनी आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.

वि दा सावरकर ह्यांना त्यांच्या सामाजिक कार्य नि अंधः श्रद्धा निर्मूलनाचे जे कार्य त्यांनी केले त्याबद्दल विनम्र अभिवादन

आँ ! आमचे वंदनही खरेच आणि आमचे विचारही खरेच.

दुसर्‍यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही.

स्व-तंत्र-वीर काउराव कागलकर

सावरकर इंग्रजांकडून ६० रुपये पेंशन घेत होते असे नवीनच वाचायला मिळाले. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकाऱ्यांना इंग्रजच पेंशन देत होते हे कसे काय? इथले जाणकार प्रकाश टाकतीलच. तसेच त्यांना अटक ही पिस्तूलाच्या तस्करीसाठी झाली होती. कोणत्याही स्वातंत्र्यलढ्यासाठी नाही.

20210801_120135.jpg

दुसऱ्या बाजीरावला इंग्रज 7 लाख तनखा देत होते.

60 रुचे काय कौतुक !

पेन्शन तनखे देऊन गप्प बसवणे , हे म्हणजे त्या काळचे ऑपरेशन लोचट होते

दिल्लीतल्या एका कॉलेजला सावरकरांचे नाव देणार आहे म्हणे. सावरकरांचं कर्तृत्व काय? माफीनामे पाठवणे, इंग्रजांकडून पेंशन घेणे, स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसणे इत्यादी इत्यादी. राजीव गांधींच्या नावाची ऍलर्जी असलेले सावरकरांचं नावाच कसं समर्थन करणार?

https://www.aajtak.in/india/delhi/story/will-veer-savarkar-be-the-name-of-the-new-college-of-delhi-thoughts-on-the-name-of-sushma-swaraj-also-ntc-1305679-2021-08-07

<< भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. >>

------- १९०९ मधे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरें (वय केवळ सतरा) कडून करवला. कोवळ्या वयाच्या मुलांचा हिंसा करण्यासाठी वापर केला.
१९४८ मधे महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी गोडसेचा वापर केला. पुढे कोर्टात सबळ पुराव्या अभावी सुटका झाली. हिंसेचे समर्थन केले पण कृती करण्यासाठी अनंत कान्हेरे किंवा गोडसे असा इतरांचा वापर केला... स्वत: कायम मागेच राहिले.

भाषाशुद्धी साठी प्रयत्न खावाखणण्यासारखे आहेत पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा हे पटत नाही, अतिशयोक्ती आहे.

<<इंग्रजांकडून पेंशन घेणे, >>

------ त्यांनी अनेक वेळा ब्रिटिशांची माफी मागितली आहे हे सामान्यांना सांगितलेच जात नाही, पण त्यांना ब्रिटीश सरकारची पेंशन मिळत होती याला काही आधार आहे का ?

त्यांना ब्रिटीश सरकारची पेंशन मिळत होती याला काही आधार आहे का ?>> नेटवर बरेच संदर्भ सापडतात. साठ रुपये प्रति महिना या आकड्याचा देखील बऱ्याच जागी उल्लेख मिळतो.

इंग्रजांची ९ वेळा माफी मागून अन् मरेपर्यंत इंग्रजांची पेन्शन खाऊन देशभक्तीची शिकवणी घेणाऱ्यांना वीर का म्हणावे यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

सावरकर हे एक पोलरायझिंग व्यक्तिमत्व आहे. संघाची/हिंदुत्ववादी सावरकरांना (आता) देव बनवून पार भगतसिंगांनासुद्धा त्यांचे शिष्य म्हणण्यास लाजत नाहीत तर डाव्या बाजुला सावरकर म्हणजे एक पुळचट, भित्रट आणि दांभिक व्यक्ति होते असे पोर्ट्रे करतात.
उपलब्ध साहित्यातून ज्याला जसे समजेल तसे जाणून घेता यावे - ज्यांना या विषयासंदर्भात पुस्तक वाचून वेळ व्यर्थ करण्याची इच्छा आहे - म्हणून इथे अश्या पुस्तकांची यादी दिली तर बरे होईल.

धनंजय किरांनी लिहिलेले सावरकरांचे चरित्र बहुतेक पहिले समग्र चरित्र म्हणता येईल. पण त्या पुस्तकाला आता ६० वर्षे होवून गेली आणि ते सावरकर जिवंत असताना लिहिले आहे.
वैभव पुरंदरेंनी लिहिलेले पुस्तक मला तरी फार आवडले नाही, उथळ वाटले.
विक्रम संपथ या तरुण इतिहासकार/लेखकाचे सावरकरांचे दोन खंडातील चरित्र प्रकाशित झाले आहे. दुसरा खंड मागल्याच आठवड्यात प्रकाशित झाला. शेखर गुप्तासारख्या साक्षेपी संपादकाने या पुस्तकाचे कौतुक केले आहे. इथे शेखर गुप्ताने घेतलेली विक्रम संपथची मुलाखत आहे.

स ह देशपांड्यांची सावरकरांच्या हिंदुत्वावरची पुस्तके आहेत. शेषराव मोर्‍यांच्या लिखाणात सावरकरांच्या हिंदुत्वाचा उल्लेख येतो.

इतरांनीही 'अभ्यासू' पुस्तकांबद्दल इथे लिहिले तर जर कुणाला काही वाचायचे असेल त्यांना फायदा होईल. सावरकर विरोधी विचारधारेतून लिहिली गेलेली पुस्तके जर नमूद झाली तर अधिक फायदा होईल. मराठीत कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, य दि फडके वगैरे तसेच पुढल्या पिढीतील लेखकांनी लिहिले आहे का ते माहिती नाही. ते देखील समजेल.

>मराठीत कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, य दि फडके वगैरे तसेच पुढल्या पिढीतील लेखकांनी लिहिले आहे का ते माहिती नाही.

य दि फडके यांनी लिहिलेलं "शोध सावरकरांचा" हे पुस्तक फार पुर्वी वाचलेलं.
कुरुंदकरांच्या "शिवरात्र" या लेखसंग्रहात हिंदुत्ववाद आणि सावरकरांबद्दलही टीका आढळते.

मी आज हा लेख वाचला -

आज दिनांक २६ फेब्रुवारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ४९ वा आत्मार्पण दिन>> अगं बाबौ...!!

ज्याचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या पुरुषसिंहाने आपले सारे आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. आणि मुख्य म्हणजे मरणही याच देशासाठी पत्करले.>> बाकीच्या भारतीयांनी पाकिस्तान्साठी मरण पत्करले का? पुरुषसिंह..?? नरसोबा म्हणायचं होतं का..???

वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. >> पण केला का मग भारत स्वतंत्र..? नेमकं काय योगदान दिलं..??

वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. >> आयाय गं..!!

ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली >> Rofl

आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला >> Proud Proud

भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. >> म्हणजे शिकार सिंहाने केली अन वाटा मात्र कोल्ह्याला.

मात्र जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते >> मुम्बैत काय करत होते म्हणे...?

मात्र ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही.>>आपल्याच भारतमातेच्या मुलांचे सरकार होते.. बोलावणं येण्याची वाट बघत बसायचं होतं का देशभक्तांनी..???

सतत त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला.>> घालून-पाडून बोलले की मुस्कटदाबी केली..??

१९४८ ला महात्मा गांधीवध झाला >> गांधीवध अनाजी पणतुंच्या सडक्या विचारधारेचा शब्द..!!

आणि नेहरु शासनाने सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. >> सरकारी न्यायव्यवस्थेने घटनेनुसार जी शिक्षा असेल त्यामुळे केले अटक.

पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. >> कारणास्तव तुरुंगात टाकायला त्यावेळी गृहमंत्री शहा नव्हते हो..!!

पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही.>> कशाला काढेल.. बोबडी वळली असेल.

थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही. >> हपापाचा माल गपापा..!

पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला.>> अशा विचारसरणीने आत्मघात करायचाच होता तर हे १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच करायचा होता. तब्बल २० वर्षं अपमान, मुस्कटदाबी की काय म्हणतात ते करून घेण्यात वाया घालवली. भारतरत्न हवे होते म्हणुन की काय..??

अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन. >> प्रणाम

अशा या देशभक्तापासून पुढील पिढीने प्रेरणा घ्यायला हवी किंबहुना आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेरणा घ्यायला भाग पाडावे. >> नक्कीच.. स्वतःच्या आणि इतरांच्या मुलांना खरे आणि खोटे स्वातंत्र्यवीर कोण ते अगदी सोदाहरण सांगु..!!!

तिकडं पलीकडं येक शीतपेयांवर लेख हाय. त्यात सुरवातीला उगा नमन करून लेख पुढे चालू झालाय. नेहमी असंच खोड्या करून करून माफिविरचा क्रांतिवीर केला गेलाय. आता कह्याची चर्चा टनोबा? धा वर्सानी म्हणाल नठुवर बोलू काही. Wink

टवणे सर,
अशोक पांडेय नावाचे एक नवे काश्मिरी लेखक आहेत. त्यांनी "उसने गांधी को क्यू मारा" या पुस्तकात लिहिले आहे. त्याचे मराठी, इंग्लिश वगैरे भाषांतरेही आहेत.

A quick quiz :
१९३७ साली नेहेरू लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा "चाणक्य" या टोपण नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. नेहेरुंवर टीका होती. नेहेरुंना फार डोक्यावर बसवून घेऊ नका, अन्यथा ते हुकुमशहा बनायला वेळ लागणार नाही असा इशाराही होता. कोण होते चाणक्य?

"चित्रगुप्त" या टोपण नावाने सावरकरांचे चरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यांचा वीर हा उल्लेखही त्यातच बहुदा प्रथम होता. कोण होते चित्रगुप्त ?

ह्या असल्या शेलक्या पदव्या देण्याबद्दल पवारांचं नाव घेतलं नाही अजुन... बहुतेक त्यांचा जन्म झाला नसावा.. नाहीतर पितळ केव्हाच उघडं पडलं असतं. भले भले वरणभात खाल्लेले पैलवान आडवे केलेत त्यांनी Wink

https://www.loksatta.com/pune/the-fear-of-savarkar-name-should-increase-should-be-afraid-when-savarkar-lovers-come-sharad-ponkshe-svk-88-msr-87-3037421/
पोंक्षे म्हणतो की सावरकरप्रेमी आला की दहशत वाटली पाहिजे. दहशत वाटण्यासाठी हे नक्की काय करणार आता? माफीनामे लिहिणार का?
Sorry म्हणणाऱ्यांची कसली आली आहे दहशत. बाकी, ने मजसी ने मात्तुभूमीला म्हणत स्वतःच्या लेकीला परदेशी पाठवणाऱ्या पोंक्ष्याच्या कोडगेपणाला सलाम.

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sharad-ponkshe-daughter-siddhi-fly-for-pilot-study-actor-share-post/articleshow/92800835.cms