फुल्सु

Submitted by टीना on 19 February, 2015 - 03:13

लागणारा वेळ - कधीच मोजला नाही.

लागणारे जिन्नस:
-> चिंच
-> वाळलेल्या लाल मिरच्या (किती तिखट आवडत त्याप्रमाणे ज्याचे त्याने ठरवावे)
-> १ मोठा कांदा बारीक चिरुन
-> ५ ते ७ लसणाच्या पाकळ्या
-> छोटा अर्धा चमचा जीरपूड
-> मीठ चवीसाठी
-> गुळ - किसुन घेतला तर बरा.. चवीसाठी
-> सांभार (कोथिंबीर)

fulsu 1.JPG

गुळ कुठाय नै विचाराच Angry .. तिथ ठेवायला विसरली

क्रमवार पाककृती:

-> मुठभर चिंच थोड्या कोमट पाण्यात भिजू घालायची. अर्ध्या एक तासात आग्गाऊचे सटरफटर काम आटपुन घ्यायचे. त्यातल्या बिया (असल्या तर) बाजुला करुन मिक्सी मधुन फिरवून घ्यायचं ( १ २ ३ - ३ २ १ असं .. माझा मिक्सी तसाच आहे म्हणून मी तसच फिरवते .. तुम्च्याकड जो प्रॉडक्ट असेन त्याप्रमाण तुम्ही हात साफ करु शकता ). चाळणीतन ते गाळून घ्यायचं ( हो! चाळणीतनचं गाळायचं .. गाळणीतून गाळू किंवा चाळू नये .. शेफ चे सर्व हक्क अबाधित आहे.. नसत्या शंका नको. ).

->आता त्यात बारीक चिरलेला कांदा + जीरपूड + खलबत्त्यात कांडलेल्या लसणाच्या पाकळ्या ( मिक्सी वाली यकसारखी पेश्ट नाय ) + मीठ + गुळ + वाळलेल्या लाल मिरच्यांचे फ्लेक्स ( डॉमिनोज वाले देतात त्यापेक्षा थोडूशे मोठे. परत का कस नै पुसायचं ) + बारीक चिरलेला सांभार सगळं टाकायच आणि कालवून घ्यायच.

फुल्सु तयार.. फ्रिजमधे ठेवली तर आठवडाभर पुरते फक्त खायच असेल तेव्हाच लसण आणि कांदे घालावे .

fulsu 2.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्सकूल >> मजा नै येत .. ती खुपच गोड असते ना चटणी सॉस जे कै आहे ते.. पर्यायच नसेल आणि गोड आवडत असेल तर कै हरकत नै..

डाबरचा होममेड चिंचेचा कोळ वापरून पुलुसू केले आज. मस्त झालंय.

काकूंनी सांगितल्यानुसार हा आंध्रातला प्रकार असून पुलिसा= चिंच, अन पुलुसू म्हणजे "भाताबरोबर खायचे चिंचेचे".
यात इतरही प्रकार उर्फ कांद्यासोबत दुधीभोपळ्याच्या बारीक फोडी वगैरे घालूनही करता येतो.
इथे लिहिलाय त्या कच्च्या पुलुसू सारखे इतर व्हेरियंट्स शिजवूनही करतात.

पुलुसु.. पहिल्यांदा ऐकतेय . फुल्सु करायला मला माझ्या आप्पाजींनी शिकवलं आणि ते यवतमाळलाच राहतात सो या पाकॄ चा उगम विदर्भातला आहे की आंध्रातला नै माहिती. विचारते त्यांना.. माहितीबद्दल धन्यवाद इब्लिस Happy

Pages