व्हाई शूड ‘गर्ल्स’ हॅव ऑल द फऽऽन !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2015 - 03:39

..

ऐका या शुक्रवारची कथा ..

आमच्या एमएनसी कंपनीच्या नियमानुसार फ्रायडे ड्रेसिंगचे निमित्त साधत, (यंदाच्या २६ जानेवारीला मॉलमध्ये लागलेल्या सेलचा लाभ उचलत घेतलेले भारीतले ब्राण्डेड) टी-शर्ट घालून ऑफिसला गेलेलो. ब्राईट अन उठावदार रंगाचे टी-शर्ट मला खुलून दिसत आहे हे सकाळी आरश्याने सांगितले होते. त्यामुळे फेस टू फेसवरच लाईक्स एण्ड कॉमेंटस मिळायची अपेक्षा सोबत होतीच.

मेन गेटवरचा सिक्युरटी गार्ड मोहनलाल!, गुड मॉर्निंग बोलताना त्याच्या नजरेत जे कौतुकाचे भाव ओसंडून वाहत होते, त्याने बोहणी चांगली झाली म्हणायला हरकत नव्हती. रिसेप्शनवरची सॅण्ड्रा जागेवर नव्हती, त्याची तेवढी हळहळ वाटली. पण काही वांधा नाही, लंचनंतर तिला दर्शन देऊया म्हणत मी आमच्या डिपार्टमेंटकडे वळलो. वाटेत दोन दुसर्‍या डिपार्टमेंटचे मित्र भेटले, त्यांनी लांबूनच इशार्‍याने ‘आज तर छावा दिसतोयस’ टाईप सुचवले. पुढच्या वळणावर सेक्शन मॅनेजरचे केबिन पडते. सुदैवाने ते दरवाज्यातच उभे असल्याने, दोन कौतुकाचे शब्द त्यांचेही झेलले.

इथपर्यंत सारी धमाल होती!., पण जसे आमच्या विंगमध्ये पाऊल टाकले तसे यकायक सर्वच मुली खिदळायला (हसायला) लागल्या. मी घाबरून तात्काळ उलटा वळलो, आणि पॅंट चाचपून चैन लावायला विसरलो तर नाही ना हे चेक केले. पण ती व्यवस्थित होती. बस्स माझी तर्कबुद्धी इथेच संपली. उगाच नेहमीसारखे काहीतरी पांचट कारणासाठी हसत असतील म्हणून मी देखील त्यांना उलटतोंडी हसत हसत जागेवर जाऊन बसलो. पण तरीही सर्वच जणी एकाचवेळी कश्या हसल्या हा प्रश्न होताच. ठरवून गेम तर करत नव्हत्या माझा??

दुपारपर्यंत त्यांचे अधूनमधून माझ्याकडे कटाक्ष टाकत हसणे चालूच होते. अर्थात हे कटाक्ष टाकत हसण्यामागच्या भावना ‘त्या तश्या’ नसल्याने माझे गाल काही "गुलाबी" होत नव्हते. पण ते चांगलेच झाले एकाअर्थी, कारण त्यांचे हसण्याचे कारण माझे "गुलाबी" रंगाचे टी-शर्ट हेच होते. मला हे तेव्हा समजले, जेव्हा न राहवून त्यातील एकजण म्हणाली,

"काय रे रुनम्या, तुला दुसरा रंग नाही का सापडला? हा कसला पोरींचा रंग घालून आलायस?"

"नायतर काय,... तरी नशीब दाढी थोडीफार वाढलीय, नाहीतर एकदम ‘तस्सा’ वाटला असतास... खी खी खी.." दुसरी खिदळली. यातला ‘तस्सा’ म्हणजे नेमका ‘कस्साऽऽ’ विचारत मला स्वताचीच शोभा करून घ्यायची नसल्याने मी सवयीप्रमाणे वाद न घालता यावेळी शांतच राहिलो. पण त्या बालिकांना थांबायचे नव्हतेच.

"हा हा हा,.. पिंकी पिंकी" म्हणत तिसरीने त्यांच्या कॉलेजमध्ये एकजण कसा बरेचदा पिंक रंगाचे कपडे घालायचा म्हणून त्याला "पिंकी" नावाने चिडवायचे याच्या सुरस कथा सांगू लागली.

चार जणी आणखी कान टवकारत गोळा झाल्या, तसे मी हातातले काम सोडून तडक तिथून निघून गेलो, अन्यथा मलाही त्या दिवसापासून नको ते पिंकी वगैरे नाव पडले असते.

सकाळपासून आरश्यासमोर उभे राहताना ज्याच्यामुळे मला स्वताचेच कौतुक वाटत होते ते पिंक टी-शर्ट, आता मला ताबडतोब अंगातून भिरकावून द्यावेसे वाटत होते. ज्या दुकानातून घेतले होते त्यांची रिटर्न शिटर्न पॉलीसी तकलादू असल्याने आता ते परतही करता येणार नव्हते. थोडक्यात पैसेही फुकट गेले होते. पण त्यापेक्षाही मला एका गोष्टीचे जास्त वाईट वाटत होते, ते म्हणजे जी वस्तू मला आवडली होती आणि जी मला शोभतही होती, ती मला आता समाजमान्य नसल्याने यापुढे वापरता येणार नव्हती. आणि राहून राहून एकच प्रश्न मनात उसळत होता .. व्हाई शूड गर्ल्स,. व्हाई शूड गर्ल्स,.. व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फऽऽन !!!

....
...
..

आता ऐका एक जुना पुराणा कॉलेजचा किस्सा !

सबमिशनचा काळ होता. मी घरी कमी आणि हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर जास्त पडीक असायचो. खाणे-पिणे त्यांच्याच मेसवर., कधी मैत्रीखात्यात तर कधी पैसे मोजत,. तर कधी चायनीजची गाडी झिंदाबाद!. सबमिशनसाठी रात्र जागवायची असेल तर भुर्जीपाव हवाच हवा. शाकाहारी पोट्ट्यांसाठी मॅगी आणि कटींग, सोबत टायगर बिस्किटांना तोड नाही. बस्स अशीच एक रात्र!,

अशीच एक रात्र आम्ही दोन मित्रांनी हॉस्टेलच्या अभ्यासिकेत जागवली ते थेट पहाट होईपर्यंत. सकाळी कुठलेही लेक्चर नव्हते, कॉलेजला सबमिशनसाठी दुपारीच जायचे होते. पण सकाळ उजाडता उजाडता ध्यानात आले की आपल्याकडच्या ड्रॉईंग शीटस संपल्या आहेत, आणि त्या हमखास मिळायचे सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे कॉलेजचेच वस्तू भांडार. घड्याळावर एक नजर टाकली तर साडेआठ वाजले होते. नऊ वाजता कॉलेज भरते, आणि स्टोअर त्याआधीच १५-२० मिनिटे उघडते. अजून आम्ही आंघोळ केली नव्हती की तोंड धुतले नव्हते. अर्थात रात्रभर झोपलोच नसल्याने ब्रश करायचा प्रश्नच नव्हता. एक कटींग चहा ढोसला की तोंड फ्रेश!.

असो, तर कॉलेजला जाण्यासाठी आंघोळ कंपलसरी केलीच पाहिजे, असला काही आमच्या कॉलेजला नियम नव्हता, त्यामुळे ती न उरकताच जाणे चालण्यासारखे होते. प्रश्न होता तो कपड्यांचा! थंडीचा तो सीजन नव्हता किंवा मच्छरांचा हैदोस नव्हता, त्यामुळे आदली रात्र अभ्यासिकेतच जेमतेम गुडघा झाकेल इतपत तोकड्या पॅंटवर काढली होती. आताही दोघांच्या अंगावर तीच हाल्फपॅंट (आपापली) आणि टी-शर्ट होते. रूमवर कपडे बदलायला परत जायचे म्हणजे सबमिशन काळातल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय, तसेच रूमवरची पोरे झोपली असतील तर त्यांच्या झोपमोडीच्या शिव्यांचा प्रसाद!..

बस्स!, केसांवरून एक हात फिरवला अन कपडे झटकत, ड्रॉईंग शीट ठेवायचे सिलेंडराकृती नळकांडे धनुष्यबाणाच्या भात्यासारखे खांद्याला लटकवले आणि कॉलेजच्या दिशेने प्रयाण केले.

बापूंच्या देशात धोती आणि पंच्यापेक्षा किंचित जास्तच कपडे परीधान करून महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करताना आम्हाला कसलाही संकोच वाटत नव्हता. उलट कमालीचे हलकेफुलके अन प्रत्येक पावलागणिक पायांवरून मोरपीस फिरवल्यासारखे वाटत होते. पण स्टोअरवाल्याने उगाचच आमची अर्धवट उघडी ढोपरे बघत एक कॉमेंट टाकली, ‘काय रे झोपेतूनच उठून आलात का? ते ही नाईट ड्रेसवर?" ..

सबमिशन काळात त्या स्टोअरवाल्याची चलती असल्याने आणि आम्हाला पुढचे काही दिवस त्याची गरज असल्याने, आम्ही फारशी हुज्जत घातली नाही. एवढेच नव्हे तर बाजूने खीखी करत आलेल्या ‘नाजूक’ आवाजांकडेही दुर्लक्ष केले. पण परतताना कॉलेज कॅंटीनमधून निघणार्‍या अण्णासस्पेशल कॉफीच्या वासाने रेंगाळलो आणि तिथेच सपशेल घात झाला.

कॅंटीनच्या पायरीवर बसून हातात कॉफीचा ग्लास पकडत, सकाळी नऊ वाजताचे, भरणारे कॉलेज अनुभवत होतो,. येणाजाणार्‍या मुला‘मुलींची लगबग न्याहाळत होतो.. अन इतक्यात एका मामांनी हटकले!.. त्यांचा आवाजाचा टोन बघता आम्हाला वाटले की यांचा गैरसमज झाला असावा, बहुतेक ते आम्हाला कॅंटीनमध्ये काम करणारे पोर्‍या समजले असावेत. अर्थात, त्यांच्याशीही असे फटकून बोलणे अपेक्षित नव्हतेच, पण तरीही असते ना एकेकाचे..

"आम्ही स्टुडंट आहोत, याच कॉलेजचे...." आम्ही त्यांना ओळख पटवून देऊ लागलो.

"ते दिसतेच आहे...." आमच्या हातातल्या वस्तूंवर एक नजर टाकत ते म्हणाले.

च्याईला मग प्रॉब्लेम काय आहे,.. असा विचार आमच्या डोक्यात आला.

"कॉलेजमध्ये हे असले कपडे घालून येतात का? घरी आहात का?......" त्यांचा प्रॉब्लेम काय होता याचा लागलीच उलगडा झाला.

हुज्जत घालून वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा, सॉरी बोलून उरलेली कॉफी एकाच घोटात संपवून तिथून सटकणे त्या परीस्थितीत योग्य ठरले असते. पण तो टोन जिव्हारी लागला होता. उत्तरासाठी मी आजूबाजुला पाहिले आणि माझे डोळे चमकले. समोरून चारेक मुलींचा ग्रूप कॅंटीनच्या दिशेने चाल करून येत होता. त्यापैकी एका मुलीने आमच्याच मापाची हाल्फ पॅंट घातली होती. आता अ‍ॅटीट्यूड दाखवत बोलायची पाळी आमची होती. दोन चुटक्या वाजवत.. मी म्हणालो, हिंमत असेल तर तिला हे सु्नवा !!

त्या मामांना हे बापजन्मात शक्य नव्हते, ना आमच्या युक्तीवादाचे त्यांच्याकडे प्रत्युत्तर होते. बदल्यात आमच्याकडे त्यांनी आयकार्डची मागणी केली. पण आम्ही त्यांना ‘जाओ पहले उस लडकी का आयकार्ड लेके आओ’ सुनावत तिथून सटकलो.

या कचाट्यात न अडकता सुखरूप अन वेळेत परत जातानाही आम्हाला एक गोष्ट समजली होती, पुढच्या वेळी इच्छा असली तरीही आम्हाला या कॉलेजमध्ये हाल्फ पॅंट आणि शॉर्टसवर फिरता येणार नाही. भले त्यात आम्ही कितीही कम्फर्टेबल फील का करत असेना, कॉलेज प्रशासनाने वा पर्यायाने समाजाने बनवलेले हे कायदेकानून आम्हाला पाळावेच लागणार होते. आणि तेव्हाही, त्या मौजमस्तीच्या वयातही, राहून राहून एकच प्रश्न मनात रेंगाळत होता ..

व्हाई शूड गर्ल्स,. व्हाई शूड गर्ल्स,.. व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फऽऽन !!!

- ऋनम्या

Light 1 Light 1 Light 1

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चेतनजी,

आपला बहुतांश प्रतिसाद प्रश्न स्वरुपातच आहे आणि एकेक मुद्द्याला उत्तर द्यायची इच्छा झाल्यास (नव्हे ते धागाकर्ता म्हणून माझे कर्तव्यच आहे) मोठी पोस्ट होत जरा वेळ खाऊ प्रकरण होईल, जे करायची इझाजत मला माझे ऑफिस देत नसल्याने रात्री घरून उत्तर टाकेन.

तोकडे कपडे (इथे संदर्भ अर्धी चड्डी) व गुलाबी रंग परिधान करणे म्हणजेच मज्जा आहे असे कुणी सांगितले?
>>>
लेखात नमूद केले आहे,
१) गुलाबी रंग मला शोभून दिसत होता
२) तोकड्या कपड्यात कम्फर्टेबल वाटत होते.
..

इतर अनेक गोष्टी मुले करु शकतात व मुली करू शकत नाहीत असे असता "मुलींनाच सर्व मजा करायला का मिळावी?" अशा अर्थाचा शीर्षकस्थानी असलेला प्रश्न अनावश्यक वाटत आहे.
>>>
हाच प्रश्न जाऊन त्या प्रियांका चोप्रा आणि आलिया भटला विचारा..... सुरुवात त्यांनी केलीय आधी! Happy
..

मुली केस वाढवू / कापू शकतात, मुलांनी वाढवले तर समाज चांगल्या नजरेने पाहत नाही.
>>>
सहमत, आणि जखमेवर मीठ चोळलेत,
माझ्या चेहर्याचा आकारौकार पाहता मला लांब केस वाढवून समोरून हेअरबॅण्ड शोभून दिसावा, मात्र कॉलेज जमान्यात केसांनी योग्य साथ दिली नाही.. आणि आता केस मस्त झालेत तर ऑफिसमध्ये अशी काही स्टाईल करता येणे शक्य नाही. Sad
..

मुले दाढीमध्ये विविध फॅशन्स करू शकतात; मुलींना निसर्गानेच शक्य ठेवले नाही.
>>>
केसांचा विग वापरता तसे नकली दाढी वापरू शकतात, पण त्यांच्या नाजूक चेहर्याला ते शोभणार नाही. शोभले तर कोणी हसणार नाही.
..

मुली मुलांचे कपडे (पँट/शर्ट इत्यादी) परिधान करू शकतात. मुलांनी स्कर्ट / फ्रॉक / साडी परिधान केल्यास समाज चांगल्या नजरेने पाहत नाही.
>>>>
एखाद्याची नजरच वाईट असेल तर मुलींनीही काहीही परीधान करा ती नजर वाईटच पडणार.
..

अवजड कामे, जसे की रस्त्यात एखादा दगड / पडलेले झाड यांचा अडथळा आहे तर तो मुलांनी हटवावा, बस बंद पडली आहे तर ती मुलांनी ढकलावी याउलट घरातील आदरातिथ्याची कामे (चहा, स्वैपाकपाणी, इत्यादी) मुलींनी करावीत असे सामाजिक संकेत आहेत.
>>>>>
अंशतः असहमत,
पहिल्या उदाहरणात मुलींची शारीरीक ताकद कमी असते हे गृहीत धरून (जे खरेही आहेच) ते आलेले आहे. पण पुढच्या उदाहरणात मुलींची म्हणून दिलेली कामे मुलांनाही जमू शकतातच.
सांगायचा मुद्द्दा असा की हे नियम आपणच बनवलेले आहेत. Happy
..

हे सर्वच पारंपारिक संकेत आहेत.
>>>
अनावश्यक परंपराच तर बदलायच्या आहेत.
..

माझे कितीतरी असे पुरुष नातेवाईक (आजोबा, मामा, मावशीचे यजमान, आत्याबाईंचे यजमान इत्यादी) आहेत ज्यांनी आयुष्यभर केवळ पांढरा सदरा, पांढरा पायजमा / धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी याखेरीज इतर रंगाचा पोषाख कधीच वापरला नाही.
तुम्ही तर केवळ गुलाबी रंगाचा पोषाख वापरता येत नाही म्हणून लेख लिहीताय.
>>>>>
तुमच्याआमच्या नातेवाईकांमधील येणार्या पिढीसाठी म्हणूनच लिहिलाय.
..

त्याने या बाप्याचे केसाळ पाय पाहाणे आम्हाला त्रासदायक वाटते असे सांगितले. तसेच "आकर्षक ते झाकावे" हा पुर्वीचा भारतीय समाजमान्य संकेत आता बदलला असून जागतिक संकेतानुसार "आकर्षक ते आत्मविश्वासाने उघड करावे" असा प्रचलित असल्याचे सांगितले.
>>>>>
केसाळ चेहरा चालतो तर केसाळ पायात काय प्रॉब्लेम आहे. आणि पायावरचे केस काढले तर मिळेल का परवानगी?
..

तेव्हा ऋन्मेऽऽष आता जमाना बदलला आहे हे आमच्या सारख्या वयस्कांनी मान्य केले ते तुमच्यासारख्या नवतरूणांना मान्य होऊ नये याचे आश्चर्य वाटते.
>>>
एकीकडे आपण पारंपारीक आणि सामाजिक संकेत पाळावेत असे म्हणत आहात तर दुसरीकडे जमाना बदल गया है मां जी .. नक्की काय समजावे? आणि बदललेला जमाना मग फक्त मुलींसाठीच आहे असे समजावे का?
..

तेव्हा महिला व पुरुषांना ज्या काही नैसर्गिक / सामाजिक / पारंपारिक मर्यादा आहेत त्याविषयी तक्रार करण्यात अर्थ नाहीये. फार तर काळ बदलण्याची वाट पाहावी. बदलत्या काळानुसार यात काही प्रमाणात बदल होतीलही.
>>>>>>
मी मेल्यावर किंवा म्हातारा झाल्यावर काळ बदलला तर फायदा काय?

Lekh mastay!
Pratikriya pan bhannat ahet...

anakhi kahi baracha mandaycha (vichar/anubhav :)) hota...pan Marathi toggle karta yet nahiye :(.

eSakal sarkha "M/E" he button dabun pahila pan tarihi english madhecha type hotay.

@ Chetan Subhash Gugale-
Paramparik ha shabda chukicha lihala ahe to 'Paramprik' asa hava-dusrya p nantar kana nako

(he paravach Purushottam chya tv varil karyakramat 'Upendra Limaye' kadun aikle)

kalave,
Nira (navin mabokar)

मानला तुला ऋन्मेऽऽष.. ऑफिसात गुलाबी शर्ट घालणे आणि अर्धी चड्डी घालुन कॉलेजात जाणे ह्यावरही तू मायबोलीवर लेख पाडतो आहेस! (आणि त्याचा संबंध मुलींनी एन्जॉय करण्याशी लावतो आहेस) लई भारी Happy Happy
रच्याकने - तु माबो ला गर्लफ्रेंड मानतोस कि काय? येता जाता मन मोकळं करत असतोस तिच्याकडे Happy

नवा धागा काढायची वेळ झाली . ( उठा उठा दिवाळी आली च्या चालीवर म्ह्णावे. )
>>>>>
युआर विश माय कमांड, उद्या उठल्यावर काढतो Happy

हा हा स्वस्ति धन्स, ज्या लेखात काही आचरटपणाचा किस्सा असतो ते बाय डिफॉल्ट माझ्याकडून भारीच लिहिले जाते Proud

Nira,
font cha problem asunahi pratisad dilat tya baddal dhanywad.
tyaachi paratfed mhanun mazahi tyach bhashet reply Happy
(बादवे, हे रोमन ईंग्लिश लिहिणे जास्त कठीण असते, स्पीड स्लो होतो)

रच्याकने - तु माबो ला गर्लफ्रेंड मानतोस कि काय?
>>>>>>
चौकट राजा,
याचे उत्तर शिल्लक ठेवतो. कदाचित येत्या काही दिवसात यावर सेपरेट लेख बनू शकतो असे मला माझा सिक्शथ सेन्स सांगत आहे Happy

लेख वाचुन मजा आली. पण आजकाल पींक बरयाच मुलांनी घातलेल पाहिलय आणी ऑफिस मधे नका घालू पण इतर ठिकाणी घालुच शकता की..

अगदी स्ट्रॉबेरी आईसक्रिम किंवा बार्बी गुलाबी नाही पण त्यातल्या डार्क आणि एकदम फिक्या शेडचे शर्ट मुले/पुरुष वापरतात असे दिसते.
बार्बी गुलाबी बायकापोरीत पण खूप कमी जणीना चपखल शोभून दिसतो.

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट डे ला जसा भरघोस प्रतिसाद सहज मिळतो तितक्या प्रमाणात हाल्फ पँटी फडफडल्या नाहीत. बरेच जणांनी संकोच बाळगण्यातच धन्यता मानली होती.>>>>>

आमच्या हाफिसात आम्ही children's day दिवशी half pant day(मुळात ती लहान मुलांसारखे बनायचे अशी concept होती, त्या वेळी मी school uniform टाईप पांढरा शर्ट आणि खाकी half pant घालून गेलो होतो) साजरा केला. मज्जा आली.:स्मित: आणि हाइट म्हणजे, आमच्या Hr ने आमच्या बॉसला याबाबत पुर्वकल्पनाच दिली न्हवती. मुंबईत असताना half pant घालणे व्हायचे, पण आता पुण्यात आल्यापासून जर टरकूनच असतो(त्यात हाफिस सदाशिवात, म्हणजे मिळवलीच) तर त्या दिवशी भीतभीतच ऑफिस मध्ये पाउल टाकले, बॉसच्या समोरून जाऊन जागेवर बसलो आणि आश्चर्य म्हणजे बॉस ने ओळखलेच नाही. आणि दुपारनंतर त्याने मी आलोय का नाही याची Hr कडे चौकशी केली.:खोखो:

ईंटरेस्टींग आहे प्रशू.. हाफिसात हाफ पँट .. Happy
वरती मस्त चटॅकमटॅक रंगीबेरंगी सँन्डो बनियान घालून जायची..
पण आमच्याकडे काही डिपार्टमेंट उदासीन असल्याने हे असले धाडसी (!) उपक्रम राबवले जाणे कठीण दिसतेय Sad

imagine करतोय, Uhoh children's day + चटॅकमटॅक रंगीबेरंगी सँन्डो बनियान + half pant = nice combination.
नक्कीच try करेन, फक्त बनियन फाटून body बाहेर आली नाही म्हणजे मिळवले. Lol

रच्याकने, आमच्या कालिजात एक मास्तर बी हाफ पँट घालुन येत हुते उन्हाळ्यात, आणि हिवाळ्यात तसला शेरलोक होम्स सारखा कोट आणि त्यावर टोपी..आणि गेला बाजार आमचा बॉस बी हाफ पँटीवर पाहिलाय हाफिसच्या कँटिनात, पण ते ५:३० नंतर Wink

मला एक प्रश्न नेहमी पडतो, Uhoh
पुर्वीच्या काळी, स्त्रिया गोषात असायच्या, आता स्त्रिया सर्रास हाफ पँट घालताना दिसतात पण पुरुष हाफ पँट घालताना का संकोचतात ?(ऋन्मेऽऽष च्या वरील प्रतिसादाचा संदर्भ)

(मी बापुडा जमेल तसे, जमेल त्या वेळी हाफ पँट घालतो)

प्रशू,
काही सार्वजनिक जागी पाळायच्या संकेतानुसार उचित समजले जात नाही इतकेच.
ऑफिसमध्येही शुक्रवारच्या ड्रेसकोडला मी जेव्हा सिक्स पॉकेट कापडी बेल्ट कार्गो स्टाईल वगैरे घालून जातो तेव्हा चार नजरा कौतुकाने (!) बघतात, कारण इतर कोणी आमच्या ऑफिसात असली थेरं (!) करत नाही. अर्थात सेक्शन मॅनेजर वा एचआर मॅनेजरने मला `इथे असे चालत नाही' असा कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निर्देश दिला नसल्याने इतरांची फिकिर नॉट..

रश्मी,
मला पर्सनली थ्री फोर्थ प्रकार आवडत नाही. ना पुर्ण इज्जत झाका ना कम्फर्ट लेवल वाढवा, उगाच मधल्यामध्ये समझोता वाटतो.. आणि फॅशन म्हणूनही अंडीवाला असल्यासारखे वाटते.

ऋन्मेऽऽष मायानगरीत राहतोस ना रे तु, मग तुला त्या सिक्स पॉकेट कापडी बेल्ट कार्गो चे कसले रे कौतुक. जुणी झाली ती फ्याशन आता.

रश्मी, उचलायला हरकत नाही पण लोकांनी, माना मागे वळ-वळवून कोणी alien आल्यासारखे बघणे सोडायला हवे

प्रशू, एक्झॅक्टली.. म्हणूनच तर ते उदाहरण दिले. आमच्या ऑफिसचे वातावरण दाखवायला. आमच्या ३०० प्लस स्टाफमध्ये मी वगळता निदान ऑफिसमध्ये तरी कोणी फ्रायडेलाही सिक्स पॉकेट नाही घालून येत. बाहेर ते घालत असावेतही ती गोष्ट वेगळी, पण फ्रायडे ड्रेसिंग म्हटले तरी त्यातही कायदेकानून पाळले जातातच.

आणि आमच्याकडे प्रॉपर मुंबईचा असा फारसा कोणी नाही, किंवा फारच कमी. त्यामुळे आमचे (कोल्हापूरचे) एक सर माझा पोशाख बघून इतरांना सारखे म्हणत असतात, आपला रिशी मुंबईचा आहे, ते असेच कपडे घालतात, त्यांना शोभतात, म्हणून तुम्ही नका घालू वगैरे वगैरे.. मला यावर हसावे की रडावे समजत नाही.

उफ्फ्फ्, या उपर मी काय बोलु.. Uhoh मी गेले ४ वर्ष मुंबईत होतो, त्यावेळी माझे ऑफिस लोखंडवाल्यात होते. फ्रायडेला बॉस सकट झाडून साऱ्या पोरी स्लीवलेस आणि हाफ पँट घालून यायच्या. आम्हा पोरांमध्ये या बाबतीत चर्चाही व्हायची, मग एका फ्रायडेला ठरवून सगळे हाफ पँट घालून गेलो, पहिले तासभर जर विचित्र वाटल पण नंतर तो पायंडाच पडला. Proud (I was in production house)

तुझी MNC का काय ते म्हणतोस, ते मुंबईच्या कोणत्या कोपऱ्यात आहे? कारण एरिया चा ही फ्याशन, स्टाइल वर फरक पडतो.

प्रशू हो, एरीयाचा फरक पडतोच.. लोखंडवाला म्हटले की तुझे अनुभवात नवल नाही.. नव्या मुंबैत वा मध्य उपनगरात असे फारसे नाही दिसत.. मी मागे बोरीवलीला कामाला होतो तेव्हा बर्डवॉचिंगसाठी बांद्रा-अंधेरी पट्ट्यात फिरायचो.. अकरावीला आमचे कॉलेजला टांग मारून रुईयाच्या कट्ट्यावर त्याचसाठी जायचो.. असो, गेले ते दिवस .. चला आता श्री केजरीवाल यांचा शपथविधी बघूया !

ऋऽऽन्मेष,

अवांतर प्रश्न : तुम्ही व्हाय च्या जागी व्हाई का लिहिलंय? हिंदीत असं लिहितात. कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय. Happy

आ.न.,
-गा.पै.

>तुम्ही व्हाय च्या जागी व्हाई का लिहिलंय? हिंदीत असं लिहितात. कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे अहो गामा. Proud कितीही हुशार असला, तरी चोर सापडतोच की! हा चोर आधीही सापडलाय, पण तो नेहेमीच वेड पांघरून पेडगावला जातो. असो.

चांगली सोन्यासारखी ग'फ्रेंड आहे, तर किमान तिच्यासोबत फिरायला जावं वगैरे सोडून ऋऽन्मेष बावा लेख पाडतात. चला चला नवा लेख पाडायची वेळ झाली.

मायबोलीची साडेसाती सुरु आहे हेच खरे.

गापै, व्हाय ऑर व्हाई, विशेष काही नाई, बस्स व्हाय पेक्षा व्हाई जास्त कॅची वाटते, आणि ते शिर्षकात असणे मला हिताचे वाटले. Happy

आमच्या हाफिसात आम्ही children's day दिवशी half pant day >> आमच्याही ऑफिसात यावर्शी होता .
एकच उत्साही प्राणी आहे ,तो प्रत्येक समारंभाचा ड्रेस्स कोड पाळतो .
तो पण हाफ पँट , पांढरा शर्ट , टाय , छोटीशी बॅक्पॅक - अशा तयारीत होता .
ऑफिस्मध्ये कोणाला फार आश्चर्य वाटल नाही , कौतुकच झालं .

आमच्या विंगमध्ये बाकीही कॉरपरेट ऑफिसेस आहेत , त्यामुळे
माझा प्रामणिक प्रश्न होता , निचे सिक्युरिटी और लिफ्ट्मॅन का क्या रिअ‍ॅक्शन था?

Pages