..
राजकारणात तसा रस मला जेमतेमच.
म्हणजे ते असते ना, फूटबॉल फक्त वर्ल्डकपपुरताच बघायचा आणि त्यानंतर मधल्या चार वर्षात त्या खेळात काय घडतेय याच्याशी आपले काही घेणेदेणे नाही. बस्स तसेच!, निवडणूकीचे वारे वाहू लागले की आपले राजकारणाचे ज्ञान आजमावून बघायचे आणि आपल्या आसपास काय घडामोडी घडताहेत याची माहिती घ्यायची. अर्थात यंदा कोणाला मत द्यायचे हे ठरवण्यासाठी हे देखील पुरेसे ठरते. वय वर्षे अठरा झाल्यापासून प्रत्येक निवडणूकीत मी हेच करत आलोय. जसे फूटबॉल विश्वचषकाला आपल्यासाठी सारेच देश सारखे म्हणून मी जो सर्वोत्तम खेळेल तोच जिंकावा म्हणून सपोर्ट करतो, तसेच इथेही त्या त्या वेळी जो योग्य वाटला त्यालाच नेहमी मत देत आलो. त्यामुळे अमुकतमुक पक्षाचा असा शिक्का माझ्यावर कधीच बसला नाही, किंवा त्या त्या निवडणूकीपुरताच बसला.
आता दिड-दोन वर्षापूर्वीची गोष्ट ..
लोकसभेची निवडणूक जवळ आली होती, देशात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कॉंग्रेसविरोधी वारे चालू होते, भाजपाने हिच योग्य संधी म्हणत कंबर कसायला घेतली होती, हे दोनचार बातम्या काय बघायचो त्यावरून माहीत होते. पण एका मर्यादेपेक्षा जास्त रस घेत नसल्याने महाराष्ट्राबाहेर काय चालते याच्या जास्त खबरी नव्हत्या. आणि अश्यातच अचानक एक धक्कादायक खबर कानावर आदळली.
देशाच्या राजधानीत कॉंग्रेसला डावलून भाजपालाही थोडेसे लांबच ठेवत दिल्लीकरांनी ‘आम आदमी पार्टी’ नावाच्या नवोदित पक्षावर विश्वास दाखवला आहे. काय कुठला "आम आदमी पक्ष" आणि कोण ते ‘अरविंद केजरीवाल’ हे माहीत नसूनही खबर इंटरेस्टींग वाटली. आपल्याकडे प्रत्येकाचा साधारण एखादा पक्ष ठरलेला असतो. काहीही घडो त्यालाच किंवा त्यातूनच फुटून तयार झालेल्या त्याच्याच भाऊबंदाला मत द्यायचे हेच थोडाफार अपवाद वगळता आजवर आसपास बघत आलोय. आपला विचार आधीच पक्का आणि ठरवलेय त्याच्यावरच मारायचा शिक्का, पण दिल्लीकरांनी चक्क झाडू या वेगळ्याच चुनाव चिन्हावर शिक्का मारला. ते देखील थोड्याथोडक्यांनी नाही तर ४० टक्के जागा मिळाव्यात इतक्या जणांनी आपले मत ‘आप’च्या पदरात टाकले. खरेच फार कौतुक वाटले दिल्लीकरांचे. पुढे जाऊन आम आदमी पार्टी त्यांना निराश करेल का नाही हा मुद्दा तेव्हा माझ्यासाठी गौण होता. कारण देशातील दोन दिग्गज राष्ट्रीय पक्षांना आपली नापसंती मतपेटीतून दर्शवत त्यांना पर्याय उभा करणे, किंबहुना तुम्हालाही पर्याय आहे हे त्यांना दाखवून देणे, हे केवळ सुज्ञ मतदारच करू शकतात. तिकडच्या मतदारांनी आपली ताकद दाखवली होती, म्हणून त्यांचे कौतुक होते. पण त्याचबरोबर हे आपल्याकडे का नाही होऊ शकत याची खंतही वाटलीच.
असो, पण जे घडत होते ते दिल्लीत घडतेय, सर्व देशाची नजर त्यावर लागलीय, आणि त्यातून देशभरातले मतदार बोध घेतील आणि आपल्या मताची ताकद ओळखतील, याचा मला आनंदच होत होता. पण आम आदमी पक्षाला बहुमत मिळवता आले नाही आणि मग पुढे जे काही घडले ते सर्वांना माहीत आहेच. उगाळत बसत नाही, कारण पक्षीय राजकारण हा या लेखाचा हेतू नाहीये. पुढे जे काही घडले त्याने मला बरेच निराश केले. आम आदमी पक्ष लोकसभेत संपला आणि त्याचबरोबर माझाही विश्वास धुळीला मिळाला, आशा लावली होती ती मावळली. फेसबूक व्हॉटसपसारख्या सोशलसाईटवर श्री अरविंद केजरीवाल हे एक थट्टेचा विषय बनून राहिले. साहजिकच दिल्लीच्या पुन्हा होणार्या निवडणूकांमध्ये आता भाजपाचा सरळसोट विजय होईल म्हणत मी पुन्हा राजकीय बातम्यांचा चॅनेल म्यूट करून ठेवला.
पण काही दिवसांपूर्वीच समजले की ‘आप’ पक्ष अजून संपला नाहीये. या निवडणूकीत भाजपा इतकेच त्यालाही जागा मिळतील असा निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त होतोय. आणि मी पुन्हा बातम्या बघू लागलो. भले इथे आपण वेड्यासारखे सोशलसाईटवरच फॉर्वर्डस पाठवून टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानत असलो तरी दिल्लीकरांना त्याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. त्यांनी आपल्या मताची ताकद ओळखली होती. जो आमचे काम करेल त्यालाच आम्ही सत्ता देऊ आणि काम न कराल तर तशीच लाथ पडेल. लोकशाही म्हटले की यापेक्षा वेगळे काय अभिप्रेत असावे कोणाला.
... आणि आज दिल्लीतल्या निवडणूका पार पडल्या.
एक्जिट पोलचा निकाल ‘आप’ला स्पष्ट बहुमत दाखवत आहे.
१० तारखेला थोड्याफार फरकाने हाच निकाल लागणे अपेक्षित आहे.
केंद्रात बीजेपीचे सरकार असूनही हे घडले हे विशेष. एकाअर्थी त्या सरकारलाही दिल्लीकरांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आणि त्याचबरोबर गेल्यावेळी जे घडले ते फ्लूकमध्ये घडले नसून ते आम्हीच घडवले हे देखील दाखवून दिले आहे. आणि त्याचमुळे मलाही आनंद गेल्यावेळपेक्षा जास्त झाला आहे.
"सत्तेत राहायचे असेल तर जनतेची कामे करा, ते बघूनच जनता ठरवणार तुम्हाला सत्तेत ठेवायचे की नाही" असा संदेश जो दिल्लीकरांनी या सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे त्याचे अनुकरण देशातील प्रत्येक मतदाराने केल्यास, देशात आणि देशातल्या प्रत्येक गावात "खर्याखुर्या आम आदमीची सत्ता" यायला वेळ लागणार नाही. मग ती आम आदमीची सत्ता भाजपाच्या रुपात असो वा कॉंग्रेसच्या!. वा आणखी कोणाच्या..
मी ऋन्मेष, एक आम नागरीक आणि एक आम मतदार म्हणून दिल्लीकरांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.!
बर्नाल नको तर अयुर्वेदीक
बर्नाल नको तर अयुर्वेदीक कैलास जीवन ठासुन घ्या
एवढी जळजळ का होते आहे?
जरा आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा.
तुम्हाला दिल्लीतली सबसिडी
तुम्हाला दिल्लीतली सबसिडी घ्यायची तर तुम्ही दिल्लीत का जात नाही , डॉ खरे?
अंतरंगात बघायचे आम्हाला नका
अंतरंगात बघायचे आम्हाला नका शिकवू
अंतरातम्यांचा आवाज म्हणूनच सोनियाजीनी पी एम पद नाकारले होते
ते बहुधा पातंजली ची क्रीम
ते बहुधा पातंजली ची क्रीम यायची वाट बघत असतील
तुम्हाला दिल्लीतली सबसिडी
तुम्हाला दिल्लीतली सबसिडी घ्यायची तर तुम्ही दिल्लीत का जात नाही , डॉ खरे?
मी इतका टिनपाट नाही कि मला सबसिडी साठी दिल्लीत जायची गरज पडावी.
तुम्हीच जेंव्हा तेंव्हा कॅन्टीन सुविधेवर पचपच करत असता.पण लष्करात सन्मान्य रित्या नोकरी देण्यासाठी मी तुम्हाला जेंव्हा धड नोकरी नाही म्हणून रडत होतात तेंव्हा "खुल्ली आफर" दिली होती. तेवढी तुमच्यात हिम्मत नाही.
मूळ मुद्दा कुणालाही काहीही फुकट देण्याबद्दल आहे. मग ते भाजपच्या सरकारने देऊ केला तरी माझा त्याला विरोधच राहील.
ऑर्कुट मित्राच्या फेसबूक वॉल
ऑर्कुट मित्राच्या फेसबूक वॉल वरून ...
________
७० पैकी ६३ जागा, अपेक्षित असाच निकाल!
कारण आप हा देशातला कदाचित एकमेव पक्ष असेल ज्याने आपल्या जाहीरनाम्यातील सगळी आश्वासनं तर पाळलीच, पण त्याशिवायसुद्धा अनेक कामे केली.
वीज-पाणी-बस प्रवास-वायफाय-उपचार-औषधं-तीर्थयात्रा अशा सुविधा जनतेला मोफत देऊनही (जनतेचा पैसा जनतेला परत) केजरीवालने दिल्लीचे वार्षिक बजेट पाच वर्षात दुप्पट केले.
दिल्लीचे बजेट सलग पाच वर्षं सरप्लसमध्ये आहे.
खासगी शाळांना पाच वर्षांमध्ये फी वाढवू दिली नाही. उलट विनाकारण वाढवलेली फी परत करायला लावली.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या क्रांतीची तर देशविदेशातील मोठमोठ्या लोकांनी, संस्थांनी भरभरून स्तुती केली आहे.
सरकारी सुविधांची घरपोच सेवा, वृद्धांचे-अपंगांचे पेन्शन वाढवले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासाठी स्वतः सरकारच गॅरंटर राहिली, गटारात उतरून कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून गटारं साफ करण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स आणल्या आणि त्यांची मालकी सफाई कर्मचार्यांनाच दिली, शहिदांच्या परिवाराला १ कोटींचा सन्मान निधी दिला, महिला सुरक्षेसाठी बसेसमध्ये होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात आली, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, बाईक अॅम्बुलन्स आणल्या, अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी 'फरिश्ते दिल्ली के' सारखी योजना लागू केली.
आणि अशीच इतर कित्येक लोकोपयोगी कामं केली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आम आदमी पार्टीने सगळी निवडणूक फक्त आणि फक्त याच मुद्द्यांवर लढवली.
आणि देशातील लोकांसाठी मनोभावे काम करणारे आम्हीच खरे देशभक्त आहोत, हे आपल्या कामातून दाखवून दिले.
दुसरीकडे निकाल असाच लागणार हे भाजपालाही माहीत होते, पण तरीही मोदीजींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.
मोदीजींनी देशभरातून आपल्या शेकडो आमदार-खासदार-मंत्री-मुख्यमंत्री यांना दिल्लीत ठाण मांडून बसायला लावले होते.
तथाकथित आधुनिक चाणक्य म्हणजेच देशाचे गृहमंत्रीसुद्धा घरोघरी जाऊन प्रचारपत्रकं वाटत होते, यातच सगळे आले.
भाजपाने नेहमीप्रमाणेच गलिच्छ प्रचाराची आणि राजकारणाची परंपरा यावेळीही कायम ठेवली होती, पण यावेळी त्यांचा उद्देश निवडणूक जिंकणे हा नव्हताच मुळी!
यावेळी भाजपाला फक्त मागच्या सीट्स किमान दुप्पट तरी करायच्या होत्या आणि देशभरात हिंदू-मुस्लीम हे नॅरेटीव्ह मजबुतीने सेट करायचे होते.
कारण येत्या वर्षभरात बिहार, बंगाल, आसाम आणि केरळसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत.
त्या निवडणुकांमध्ये तर काय प्रचंड घाण पसरवतील हे लोक, याचा विचारच न केलेला बरा.
काहीही असो, आज दिल्लीवाल्यांनी खर्या तुकडे-तुकडे गँगला मस्त धडा शिकवला, याचा खूप आनंद होतोय.
आता एकच इच्छा आणि प्रार्थना आहे, की आम आदमी पार्टीने लवकरात लवकर एखाद्या 'पूर्ण राज्यात' सत्ता स्थापन करावी, जिथे पोलीस, जमीन, अधिकार्यांच्या पोस्टिंग, अॅंटीकरप्शन ब्युरो इत्यादी डिपार्टमेंट केंद्र सरकारच्या अखत्यारीत नसतील.
विचार करा, काय कायापालट होईल त्या राज्याचा!
ज्या दिवशी अशा एखाद्या राज्यात 'आप'ची सत्ता येईल, तो दिवस भारतीय राजकारणातला खर्या अर्थाने ऎतिहासिक दिवस असेल.
असो.
आम आदमी पार्टीचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
- सौरभ सावंत
..
..
@ फुकट फुकट फुकट...
मला १ प्रश्न पडलाय
सोयीसुविधा राशनपाणी वगैरे फुकट वाटून खरेच सत्ता मिळवता येते का?
यावेळी तरी आपने सत्ता राखली..
गेल्यावेळी पहिल्यांदा जेव्हा सत्तेत आले तेव्हा काय फुकट वाटून आले होते? निवडून आल्यावर फुकट वाटू असे आश्वासन देऊन आले होते का?
भारतातल्या कुठल्या खेडेगावात अशी भोळीभाबडी जनता असेल जी आश्वासनांवर विश्वास ठेऊन मतदान करते??
एवढे सोपे असते तर फेकाफेकीची स्पर्धाच सुरू झाली असती आणि त्यात कोण जिंकले असते हे सांगायची गरज नाही
असो,
दिल्लीतील जनतेचा अपमान थांबवा !
दिल्लीची जनता हुशार आहे. कुठं
दिल्लीची जनता हुशार आहे. कुठं कोणत्या शहाण्याला पाठवायचं त्यांना व्यवस्थित समजतं. उगाच नाही 5 वर्ष केजरीवालांचा कारभार बघूनही लोकसभेत सातही जागा भाजपला दिल्यात अन नंतर राज्यात केजरीवालांना.
उगा काथ्याकूट करण्यात अर्थ नाही.
भारतातल्या कुठल्या खेडेगावात
भारतातल्या कुठल्या खेडेगावात अशी भोळीभाबडी जनता असेल जी आश्वासनांवर विश्वास ठेऊन मतदान करते??
एवढे सोपे असते तर फेकाफेकीची स्पर्धाच सुरू झाली असती आणि त्यात कोण जिंकले असते हे सांगायची गरज नाही Happy
असो,
दिल्लीतील जनतेचा अपमान थांबवा !
>>> +१
सत्तेत राहायचे असेल तर जनतेची
सत्तेत राहायचे असेल तर जनतेची कामे करा, ते बघूनच जनता ठरवणार तुम्हाला सत्तेत ठेवायचे की नाही"
>>
नोप, कोणाला कुठं पाठवायचं हे दिल्लीवाल्यांना चांगलं समजतंय.
दिल्लीचे बजेट असेल तर देऊ दे
दिल्लीचे बजेट असेल तर देऊ दे की फुकट !
हाये ऐपत , म्हणून वाटतोय फुकट !
आणि जे पैसे वाचत आहेत ते सर्वसामान्य जनतेचे आहेत, गरिबांचे आहेत, लोकांची का जळते ?
केजरीवाल चा विजय दिलेली आश्वासन पाळल्याने झालाय हे मान्य करण्याचे मोठेपण नाहीए कारण मोदी नी आश्वासन पाळली नाहीत.
आणि दिल्ली भाजप ने देखील बऱ्याच फुकट गोष्टींचा आश्वासन दिले होते, पण काळा पैसा, 15 लाख वगैरे नंतर लोकांचा त्याबर विश्वास बसला नाही
फुकट म्हणे
फुकट म्हणे
जनता देशाची स्टेक होल्डर आहे , फुकट काय त्यात ?
पर्वा निर्मलाबाईंनी कार्पोरेट टेक्स कमी केला, तेंव्हा नै का फुकट वाटले ?
1797 अनधिकृत कॉलनी केंद्राने
1797 अनधिकृत कॉलनी केंद्राने अधिकृत केल्यात , हे बेकायदेशीर आहे , पण भाजपने केले की भक्त सोयीस्कर विसरतात
Pages