द पॉवर ऑफ `आम' मतदार ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 February, 2015 - 12:09

..

राजकारणात तसा रस मला जेमतेमच.
म्हणजे ते असते ना, फूटबॉल फक्त वर्ल्डकपपुरताच बघायचा आणि त्यानंतर मधल्या चार वर्षात त्या खेळात काय घडतेय याच्याशी आपले काही घेणेदेणे नाही. बस्स तसेच!, निवडणूकीचे वारे वाहू लागले की आपले राजकारणाचे ज्ञान आजमावून बघायचे आणि आपल्या आसपास काय घडामोडी घडताहेत याची माहिती घ्यायची. अर्थात यंदा कोणाला मत द्यायचे हे ठरवण्यासाठी हे देखील पुरेसे ठरते. वय वर्षे अठरा झाल्यापासून प्रत्येक निवडणूकीत मी हेच करत आलोय. जसे फूटबॉल विश्वचषकाला आपल्यासाठी सारेच देश सारखे म्हणून मी जो सर्वोत्तम खेळेल तोच जिंकावा म्हणून सपोर्ट करतो, तसेच इथेही त्या त्या वेळी जो योग्य वाटला त्यालाच नेहमी मत देत आलो. त्यामुळे अमुकतमुक पक्षाचा असा शिक्का माझ्यावर कधीच बसला नाही, किंवा त्या त्या निवडणूकीपुरताच बसला.

आता दिड-दोन वर्षापूर्वीची गोष्ट ..

लोकसभेची निवडणूक जवळ आली होती, देशात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कॉंग्रेसविरोधी वारे चालू होते, भाजपाने हिच योग्य संधी म्हणत कंबर कसायला घेतली होती, हे दोनचार बातम्या काय बघायचो त्यावरून माहीत होते. पण एका मर्यादेपेक्षा जास्त रस घेत नसल्याने महाराष्ट्राबाहेर काय चालते याच्या जास्त खबरी नव्हत्या. आणि अश्यातच अचानक एक धक्कादायक खबर कानावर आदळली.

देशाच्या राजधानीत कॉंग्रेसला डावलून भाजपालाही थोडेसे लांबच ठेवत दिल्लीकरांनी ‘आम आदमी पार्टी’ नावाच्या नवोदित पक्षावर विश्वास दाखवला आहे. काय कुठला "आम आदमी पक्ष" आणि कोण ते ‘अरविंद केजरीवाल’ हे माहीत नसूनही खबर इंटरेस्टींग वाटली. आपल्याकडे प्रत्येकाचा साधारण एखादा पक्ष ठरलेला असतो. काहीही घडो त्यालाच किंवा त्यातूनच फुटून तयार झालेल्या त्याच्याच भाऊबंदाला मत द्यायचे हेच थोडाफार अपवाद वगळता आजवर आसपास बघत आलोय. आपला विचार आधीच पक्का आणि ठरवलेय त्याच्यावरच मारायचा शिक्का, पण दिल्लीकरांनी चक्क झाडू या वेगळ्याच चुनाव चिन्हावर शिक्का मारला. ते देखील थोड्याथोडक्यांनी नाही तर ४० टक्के जागा मिळाव्यात इतक्या जणांनी आपले मत ‘आप’च्या पदरात टाकले. खरेच फार कौतुक वाटले दिल्लीकरांचे. पुढे जाऊन आम आदमी पार्टी त्यांना निराश करेल का नाही हा मुद्दा तेव्हा माझ्यासाठी गौण होता. कारण देशातील दोन दिग्गज राष्ट्रीय पक्षांना आपली नापसंती मतपेटीतून दर्शवत त्यांना पर्याय उभा करणे, किंबहुना तुम्हालाही पर्याय आहे हे त्यांना दाखवून देणे, हे केवळ सुज्ञ मतदारच करू शकतात. तिकडच्या मतदारांनी आपली ताकद दाखवली होती, म्हणून त्यांचे कौतुक होते. पण त्याचबरोबर हे आपल्याकडे का नाही होऊ शकत याची खंतही वाटलीच.

असो, पण जे घडत होते ते दिल्लीत घडतेय, सर्व देशाची नजर त्यावर लागलीय, आणि त्यातून देशभरातले मतदार बोध घेतील आणि आपल्या मताची ताकद ओळखतील, याचा मला आनंदच होत होता. पण आम आदमी पक्षाला बहुमत मिळवता आले नाही आणि मग पुढे जे काही घडले ते सर्वांना माहीत आहेच. उगाळत बसत नाही, कारण पक्षीय राजकारण हा या लेखाचा हेतू नाहीये. पुढे जे काही घडले त्याने मला बरेच निराश केले. आम आदमी पक्ष लोकसभेत संपला आणि त्याचबरोबर माझाही विश्वास धुळीला मिळाला, आशा लावली होती ती मावळली. फेसबूक व्हॉटसपसारख्या सोशलसाईटवर श्री अरविंद केजरीवाल हे एक थट्टेचा विषय बनून राहिले. साहजिकच दिल्लीच्या पुन्हा होणार्‍या निवडणूकांमध्ये आता भाजपाचा सरळसोट विजय होईल म्हणत मी पुन्हा राजकीय बातम्यांचा चॅनेल म्यूट करून ठेवला.

पण काही दिवसांपूर्वीच समजले की ‘आप’ पक्ष अजून संपला नाहीये. या निवडणूकीत भाजपा इतकेच त्यालाही जागा मिळतील असा निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त होतोय. आणि मी पुन्हा बातम्या बघू लागलो. भले इथे आपण वेड्यासारखे सोशलसाईटवरच फॉर्वर्डस पाठवून टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानत असलो तरी दिल्लीकरांना त्याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. त्यांनी आपल्या मताची ताकद ओळखली होती. जो आमचे काम करेल त्यालाच आम्ही सत्ता देऊ आणि काम न कराल तर तशीच लाथ पडेल. लोकशाही म्हटले की यापेक्षा वेगळे काय अभिप्रेत असावे कोणाला.

... आणि आज दिल्लीतल्या निवडणूका पार पडल्या.

एक्जिट पोलचा निकाल ‘आप’ला स्पष्ट बहुमत दाखवत आहे.
१० तारखेला थोड्याफार फरकाने हाच निकाल लागणे अपेक्षित आहे.
केंद्रात बीजेपीचे सरकार असूनही हे घडले हे विशेष. एकाअर्थी त्या सरकारलाही दिल्लीकरांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आणि त्याचबरोबर गेल्यावेळी जे घडले ते फ्लूकमध्ये घडले नसून ते आम्हीच घडवले हे देखील दाखवून दिले आहे. आणि त्याचमुळे मलाही आनंद गेल्यावेळपेक्षा जास्त झाला आहे.

"सत्तेत राहायचे असेल तर जनतेची कामे करा, ते बघूनच जनता ठरवणार तुम्हाला सत्तेत ठेवायचे की नाही" असा संदेश जो दिल्लीकरांनी या सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे त्याचे अनुकरण देशातील प्रत्येक मतदाराने केल्यास, देशात आणि देशातल्या प्रत्येक गावात "खर्‍याखुर्‍या आम आदमीची सत्ता" यायला वेळ लागणार नाही. मग ती आम आदमीची सत्ता भाजपाच्या रुपात असो वा कॉंग्रेसच्या!. वा आणखी कोणाच्या..

मी ऋन्मेष, एक आम नागरीक आणि एक आम मतदार म्हणून दिल्लीकरांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ऋन्मेऽऽष,
तुमच्या शेवटच्या प्रतिसादामध्ये तुम्ही जी शक्यता वर्तवताय तीच बाब मी माझ्या प्रतिसादात खात्रीने मांडली आहे.

आज पुन्हा एकदा आम आदमीचा डंका वाजणार...
एक मुख्यमंत्री आपल्या कामाच्या जीवावर पुन्हा मुख्यमंत्री होतोय एक आम आदमी म्हणून खरेच आनंद आहे Happy

विखारी प्रचाराच्या विरोधात लोकांनी विकासाला कौल दिला हे पाहून प्रजा तंत्र का हवे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

एक मुख्यमंत्री आपल्या कामाच्या जीवावर पुन्हा मुख्यमंत्री होतोय एक आम आदमी म्हणून खरेच आनंद आहे >>>>+ १

दिल्लीत केजरीवालांच्या सरकारात शाळांना अनुदान, शिक्षण फुकट, वीज कमी दरात वैगेरे ज्या पोस्ट येताहेत ते सगळं खरं आहे का?

हो.
आंध्र प्रदेशात अक्षरशः बँक account मधेय पैसे टाकत आहेत. माझ्या दोन्ही मोलकरणी गावी जाऊन आल्या पैसे घेऊन यायला. एकीला sms वाचता येत नाहीत म्हणून ती मला रोज फोन बघायला देत होती पंधरा हजार आले का बघ! दुसरी मोलकरीण दिन वेळेस जाऊन आली एकदा बँक account मध्ये पैसे आले आणि एकदा cash घ्यायला. (दोन वेगळे पैसे)
ह्यानंतर पण आंध्रप्रदेश मध्ये हेच सरकार येणार. Direct पैसे मिळत आहेत काहीहि काम न करता. ह्याचा परिणाम 7 ते 8 वर्षनी दिसणार.

पूर्वी तामिळनाडू मधेय करुणानिधी सरकार होते तेव्हा tv, laptop, fan असं कायकाय फ्री मिळत होत, तेव्हाची मोलकरीण तामिळ असली तरी कर्नाटक रहिवासी होती आणि येडीयुरप्पा काही देत नव्हते आणि तिच्या नातेवाईकांना तामिळनाडू मध्ये सगळं काय-काय फ्री मिळत होते. खूप शिव्या घालायची कर्नाटक सरकारला.सध्या देत असतील तरी माझ्याकडे तामिळ मोलकरीण नसल्याने माहीत नाही.

दिल्ली हि देशाची राजधानी असल्यामुळे तेथे मिळणाऱ्या करांचे प्रमाण (केंद्राचे आणि राज्यांचे) भरपूर आहे.शिवाय त्या राज्याचे क्षेत्रफळ फारच कमी आहे.

महारष्ट्रात गडचिरोली गावात रस्ता बांधण्यासाठी वीज पुरवण्यासाठी येणाऱा दरडोई खर्च हा दिल्लीतील एखाद्या वस्तीला रस्ता बांधण्यासाठी येणारा खर्चाच्या दसपट किंवा वीस पट आहे आणि त्यातून मिळणारा महसूल हा एक पंचमांश आहे.

मग गडचिरोलीच्या खेड्यातील माणसांना एस टी चा किंवा विजेचा दर दहा पट लावणार का?

दिल्ली राज्याने बहुसंख्य पायाभूत सुविधा केंद्रशासित असल्यापासून आंदण म्हणून फुकटात मिळवल्या आहेत.

त्यामुळे कोणतेही कर्जाचे हप्ते नसताना भरपूर कर मिळवून आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणून मतांसाठी जनतेला फुकटेपणाची सवय लावण्याची हि वृत्ती शेवटी देशाच्या मुळावर येईल.

दिल्ली काही केजरीवाल यांनी उभी केलेली नाही. दिलीत विजेचा एक खाम्ब टाकायला दहा हजार रुपये खर्च येतो तर गडचिरोलीला २५ हजार येतो. आणि गडचिरोलीलाला एका वस्तीला वीज पुरवायची असेल तर १०० खांबांची गरज पडत असेल तर दिल्लीत पाच खांबात ते काम होतं.

गडचिरोलीला त्या वस्तीतून मिळणाऱ्या विजेच्या बिलातून पुढची १०० वर्षे तरी हा भांडवली खर्च निघणार नाही. मग गडचिरोलीला वीजच पुरवायची नाही का? हि वीज पुरवण्यासाठी महारष्ट्रातील जनतेच्या करातून हा पैसा पुरवावा लागेल

यामुळे दिल्ली "राज्याला" बरीच गोष्टी फुकट देणे परवडते.पण महावितरणला १४९०० कोटींचा तोटा असताना हे महाराष्ट्राला परवडेल का?

आता महाराष्ट्रात मतांसाठी पण १०० युनिट पर्यंत फुकट वीज द्यायचा बेत चालू आहे

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharashtr...

आणि काल पश्चिम बंगाल मध्ये पण ७५ युनिट पर्यंत फुकट वीज पुरवणार म्हणून घोषणा

West Bengal budget: Government announces free electricity up

Read more at:
https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/west-bengal-budget-govern...

एकदा लोकांना फुकट मिळायची सवय लागली कि तो हक्क होऊन जातो आणि हि फुकट द्यायची सवय शेवटी जनतेच्या मुळावर येते.

धीरूभाई अंबानी याना भ्रष्टाचार बद्दल विचारले असता त्यांनी अशी मखलाशी केली होती कि माझे काम केल्याबद्दल मी त्या कर्मचाऱ्याला खुशीने चार पैसे दिले तर त्याच्या मुलाबाळांचे कल्याण होते.

याचा परिणाम म्हणजे ज्या माणसाला असे पैसे देणे परवडत नाही त्याचे काम होत नाही

आणि सर्वात वाईट म्हणजे त्या कर्मचाऱ्याला पैसे मिळवण्याची सवय होते.

मेरा भारत महान __/\__

मुद्दा खोडून काढता येतो आहे का?

नाही ना, मग उगाच फाटे कशाला फोडताय?

कोणतीही गोष्ट फुकट दिली तर त्याची किंमत राहत नाही हि वस्तुस्थिती आहे आणि नंतर तो हक्क होऊन जातो.

महावितरणचा १४९०० कोटींचा तोटा कुठून आणि कसा भरून काढणार आहेत? हा बोजा शेवटी सामान्य नागरिकांवरच पडणार आहे.

मग ते फडणवीस सरकार असो नाही तर काँग्रेसचं

आणि सध्या आपलं अपयश झाकून ठेवण्यासाठी बरेच काँग्रेसी "तात्पुरते" आपटार्ड झालेले आहेत.

म्हणजे कसं भाजपला हरवल्याबद्दल वाकुल्या दाखवता येतात आणि काँग्रेसी म्हणून टीका हि सहन करावी लागत नाही.

भंपक मनोवृत्ती.

फ्री गोष्टींचा इतका फरक पडतो का मतांमध्ये?
(काँग्रेसने फ्री पैसे द्यायची स्कीम लोकसभेला आणली होती त्यावर बहुमत भेटलं असतं तर...बापरे विचार करवत नाही.)

केजरीवाल हा सुशिक्षित, आय आय टी पदवीधर, उजळ इमेज असलेला , दिल्लीत पाच वर्षे टिकून राहिलेला नेता लोकांना भावला हेही महत्वाचं कारण आहे.
मनोज तिवारी मुळात भोजपुरी फिल्म इंडस्ट्री, बिग बॉस ही background, मग समाजवादी पक्षातर्फे योगी आदित्यनाथविरोधात निवडणूक लढवून पराभूत, मग भाजपमध्ये प्रवेश करून खासदार- थोडक्यात कोअर भाजप कार्यकर्ता नाही.

फ्री गोष्टींचा इतका फरक पडतो का मतांमध्ये? --- हो. मोलकरीण माझ्याकडे काम करत होती आणि तिला सकाळी सात वाजता फोन आला गावाहून की आत्ताच सरकारी बाई सांगून गेली आहे; आज आलात तरच cash पैसे मिळतील. तिला गावाला पोचायला चार तास लागतात.माझं काम भराभर संपवुन बाकीच्यांना दांडी मारून लगेच बसमध्ये बसून गावाला गेली. आता मला सांगितले आहे की मला दरमहा दोन extra सुट्ट्या गावाला सरकारी पैसे घ्यायला जायला लागतील, खाडे पैसे कापायचे तर कापा.

फ्री गोष्टींचा इतका फरक पडतो का

फुकट ते पौष्टिक आणि स्वस्त ते मस्त
हि आपली मनोवृत्ती आहे.

आमचे चुलत सासरे मराठवाड्यात शेती करतात. त्यांनी जिल्हा सहकारी बँकेतुन शेतात विहीर पाडण्यासाठी काही कर्ज घेतलं होतं आणि ते नित्य नियमाने हप्ते भरत होते. (आमचे चुलत सासरे पापभिरू गटातील असल्यामुळे कर्जाचा हप्ता चुकवल्यास त्यांना झोप लागत नाही).

त्यावर त्यांचे शेजारी त्यांना वेड्यात काढत असत. शेजाऱ्यांनी आपली कर्जे थकवून ठेवली होती आणि पुढच्या कर्जमाफीच्या वेळेस ती माफही झाली. वर त्या शेतकऱ्यांनी आमच्या सासर्यांना मुर्खातहि काढले कि तुम्ही फुकट कर्ज फेडताय. सरकार कर्ज माफ करतंच.

हे सर्व सधन( खाऊन पिऊन सुखी) शेतकरी आहेत)

असं आहे

Actually people here don't know the excat sistution in Delhi. Why people who voted all 7 LS seats to BJP are not voting to Assembly elections. One reason is BJP don't have good face in Delhi who can be projected as CM candidate against AK. Second the poor governance of munciple corporations in Delhi which are with BJP. Third the work done by AAP with their limited powers. AAP MLA's are easily accessible to public and they solve most of the issues in the constituency. So I don't think people of Delhi voted to AAP just because of free water and electricity. Also there is catch in these free things and most of middle class don't get that free but still they voted for AAP. BJP is getting that 12-15 seats due to Shaheen bagh. Anyway I know that there is no point writing here. But..

BJP is getting that 12-15 seats due to Shaheen bagh.

याला काही दुवा पुरावा?

आपलं मत ते अभ्यासू आणि

बाकीच्यांच्या गफ्फा

शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमधे आप ने केलेल काम खरच वाखाणण्यासारख आहे

आपला पक्ष निवडून येतोय म्हणुन आप खुष,
भाजपा येत नाहीय म्हणुन काँग्रेस खुष , काँग्रेसचे खातेही उघडत नाहीये म्हणुन भाजपा खुष आणि ईव्हीएमच्या तक्रारी नाहीत म्हणुन निवडणूक आयोग खुष.

सगळ्यांना खुष करणारी दिल्लीची जनता किती हुशार असेल विचार करा.

फुकटेगिरी हा काही ह्या निवडणुकीतील मुख्य मुद्दा वाटत नाही. थोडाफार फरक पडलाही असेल, पण तिथल्या मतदारांचे ऐकल्यास खरी मेख कळेल. माझ्या काही दिल्लीकर मित्रांच्या मते केजरीवाल ने खरोखर चांगले काम केले आहे. त्या सर्वांनाच पुन्हा आप निवडून येणार ही खात्रीच होती. आता माझे मित्र जरी स्टॅटिस्टिकली मिनींगफूल सॅम्पल नसले, तरी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हा महत्त्वाचा ठरतो.

कमी दरात वीज, शिक्षणप्रसार होण्यासाठी अनुदान ह्यात फुकटेगिरी काय आहे?
राजसी नी लिहिलंय की अकाउंट्ला पैसे येताहेत ते फुकट म्हणु शकतो.

अकाउंट्ला पैसे येताहेत ते फुकट म्हणु शकतो... ऑनलाइअन सब्सिडी असते. कायदेशीर आहे. तुम्हाला ती चुक वाटत असेल तर लोकशाही मार्गाने त्याला तुम्ही विरोध करु शकता . न्यायालयात पेटीशन, मोर्चा इत्यादी. कमकुवत गटातल्या लोकांना मदत करणे हा हेतु असतो. मते मिळत असतात कारण त्या लोकांसाठी ती गरज असते. सगळेच फुकटे नसतात.

केजरीवाल यांचं अभिनंदन, हॅट्रिक साधली त्यांनी. त्याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक, विकासाला मतं मिळाली.

काँग्रेस मात्र बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना करतंय. भाजपने खूप ताकद लावली, त्यामानाने फार काही साधताना दिसत नाहीयेत. सीटस वाढतायेत, मतं वाढतायेत पण जेवढ्या प्रमाणात हवी तेवढी नाही.

वर खरे डॉक्टरांनी लिहीलं तसंच आमच्याकडे, माझे मोठे दिर कर्ज ठेवत नाहीत, त्यांना नाही जमलं तर इथून नवरा भरतो पैसे, ते कळवतात यंदा तू भर. खरं तर काढायचं टाळतात पण काढावं लागलं आणि फेडायला जमलं नाही तर काळजीत पडतात. कोकणात बरेच शेतकरी कर्ज नाही ठेवत, व्यवस्थित फेडताना दिसतात. त्यांच्यासाठी सरकार काहीतरी योजना आणणार आहे, कधी आणतंय बघुया.

अर्थात इथे मला असं मुळीच म्हणायचं नाहीये की सर्वच शेतकरी इतर ठिकाणचे सधन असून मुद्दामून कर्ज ठेवतात, बरेच गरीब असतात, खरंच जमत नसेल, पीकपाणी येत नसेल. सधन ठेवत असतील तर ती मात्र चांगली गोष्ट नाही, त्यांनी फायदा घेऊ नये. असो फार अवांतर झालं.

सलग पाचव्या राज्यात भाजप हारले ,
जिथे चांगले काम आहे तिथे भाजप चे ध्रुवि करण चालत नही.
बिजू पट नाईक , नन्तर केजरिवाल हे उदाहरण आहे ,

शहामृगांना ते दिसणार नाही

कोल्हा तो कोल्हाच,

दिल्ली गंगाजलीत पैसा शिल्लक पडत असेल आणि तो जर तिथल्या नागरिकांना मिळत असेल तर गडचिरोलीच्या लोकांच्या पोटात का दुखावे ?

जनता ही देशाची स्टेक होल्डर आहे , त्यांनाही मिळालेच पाहिजे.

आमदारांना फुकट मिळते , आर्मीच्या केंटिनात वस्तू स्वस्त मिळतात , मग तेही बिघडतात का ?

माझ्या काही दिल्लीकर मित्रांच्या मते केजरीवाल ने खरोखर चांगले काम केले आहे. त्या सर्वांनाच पुन्हा आप निवडून येणार ही खात्रीच होती. आता माझे मित्र जरी स्टॅटिस्टिकली मिनींगफूल सॅम्पल नसले, तरी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हा महत्त्वाचा ठरतो.>>>>

सुरवातीला केजरीवालने दिवसरात्र मोदीविरुद्ध आगपाखड करण्यात वेळ घालवला. नंतर मात्र जागा होऊन गेली तीन वर्षे तोंड बंद ठेऊन त्याने कामावर लक्ष दिले. त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत दिसून आला.

केजरीवालचे अभिनंदन.

>>>>>>>BJP is getting that 12-15 seats due to Shaheen bagh. Anyway I know that there is no point writing here. But.. <<<<<<<<
Biggrin

मग भाजपाच्या मदतीसाठी कोणी केल म्हणे शाहीन बाग ?

खरे गृहस्थांना घरि बसून शेति पासून राजकारण ते अर्थव्यवस्था सर्व कळते !

त्यांना दंडवत !

@शाहिर

का हो

आमच्या सासऱ्यांनी त्यांच्या गावची सांगितलेली खरी गोष्ट इथे सांगितली तर मला शेतीत सगळं समजतं असा माझ्या वर आरोप करण्याअगोदर मी शेतीबद्दल कोणते तारे तोडले आहेत ते तरी सांगा.

बर्नॉल द्या त्यांना

का तुम्हालाच जळजळ होते आहे? म्हणून बर्नोलची आठवण होते आहे

मी टाकलेल्या प्रतिसादामुळे बऱ्याच लोकांची गोची झाली आहे खरी.

जे काँग्रेसी आहेत त्यांची ७० पैकी ६७ जागावर अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे जळजळ होते आहे.( सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही)
आणि
भाजप वर आग पाखडण्यासाठी तात्पुरते आपटार्ड झाले तर उद्या श्री केजरीवाल कोणते नाटक करतील जे त्यांच्यावर शेकेल ते सांगता येत नाही.

हे म्हणजे "अवघड जागी दुखणं आणि जावई डॉक्टर" अशी स्थिती झाली आहे.

असू द्या हो होते जळजळ

लावा बरनॉल

@ BLACKCAT

आर्मीच्या केंटिनात वस्तू स्वस्त मिळतात.

तुमची जळजळ काही थांबत नाही.

तो जमाना कधीच गेला. मी निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून कॅन्टीनच्या कार्ड काढलेले नाही.

कारण ऑनलाईन वस्तू जास्त स्वस्त आणि घरपोच मिळतात.टीव्ही म्युझिक सिस्टीम पासून सर्व.

१२ वर्षांपूर्वी आणि मागच्या वर्षी परत नवी कार सुद्धा बाहेरूनच घेतली

बाकी दारू मात्र स्वस्त ( एक तृतीयांश ते ४० % दरात) आणि खात्रीलायक मिळते. परंतु मी ती पित नसल्यामुळे मला त्याचा काय फायदा?

आणि एवढी जळजळ होते आहे तर माझे खुले आव्हान गेली पाच वर्षे तुम्हाला देतो आहे.

लष्कराचे वैद्यकीय खात्यात भरती व्हा आणि भारताच्या नंदनवन असलेल्या काश्मीरची फुकटात सहल करून या पाच वर्षे, बारामुल्ला, उडी, पट्टन, गुरेझ, सियाचेन सुद्धा (अगदी फुकट)

आणि वर गावोगावच्या मशिदीत नमाझ पढुन दुवा पण मागता येईल.

आणि भरती झालात कि लगेच अन परत पाच वर्षांनी निवृत्त झाल्यावर कॅन्टीन ची सुविधा पण आयुष्यभर मिळेल

हा का ना का

मग केंव्हा करताय अर्ज?

मोदीच्या विरोधात लिहिलेल्या सर्वांना खांग्रेसी ठरव्याची भक्ताडांची सवय काही जात नाही. आसो. बर्नाल नको तर अयुर्वेदीक कैलास जीवन ठासुन घ्या

Pages