सगळे ग्रूप म्यूट करून पाहिले
नोटिफीकेशन बार क्लियर केले
मेसेजेसना उत्तरं दिली
सगळं अनिवार्य म्हणून स्वीकारलं
पण
ही रुखरुख का जात नाही ?
पसारा करून पाहिला
पसारा आवरून पाहिला
स्वतःच्याच अवतीभोवती रेंगाळून पाहिलं
विचार करता करता सगळे दात कोरून झाले..
पण
ही रुखरुख का जात नाही ?
धुवायला दिलेल्या कपड्याच्या खिशात
जशी विसरावी महत्त्वाची चिठ्ठी
तसं काहीतरी विसरलंय
काळ खूप खेळून जातो म्हणतात-
उद्या त्या चिठ्ठीतली अक्षरं बदलतील
मलाच ओळखू येणार नाहीत
आवेग ओसरला की गोष्टींचे अर्थ बदलतात
असं काहीतरी होऊन
बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.
आणि हे जाणवून अजून अस्वस्थ वाटायला लागेल
मग त्या अस्वस्थतेवरची एखादी नवी कविता
पुन्हा एखाद्या कपड्याच्या खिशात ठेवली गेली तर ?
काळ खूप खेळून जातो म्हणतात..
ही रुखरुख का जात नाही ?
--सुशांत..
जबरी कविता सुशान्त...
जबरी कविता सुशान्त...
मस्त ! स्वातीने जावेद यांची
मस्त !
स्वातीने जावेद यांची ओळ उद्धृत केली आहे हेही फार आवडलं.
हमारे शौक़ की ये इन्तहा थी
कदम रक्खा कि मंज़िल रास्ता थी
.................................................
कभी जो ख़्वाब था वो पा लिया है
मगर जो खो गयी वो चीज़ क्या थी
धन्स कैलासजी, भारतीताई. कभी
धन्स कैलासजी, भारतीताई.
कभी जो ख़्वाब था वो पा लिया है
मगर जो खो गयी वो चीज़ क्या थी << क्या ब्बात !
वाह!!! खरे आहे खरे आहे.
वाह!!! खरे आहे खरे आहे.
Pages