..
या भागातील अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर ...
सर्वप्रथम नमूद करू इच्छितो की डॉक्टर या पेश्यात वा वैद्यकीय सेवेत असलेल्यांबद्दल मला शिक्षक किंवा सीमेवर लढणारे जवान यांच्याइतकाच किंवा त्यापेक्षाही कांकणभर जास्तच आदर आहे. लोक डॉक्टरांना पृथ्वीतलावरचे देव असे म्हणतात, मी लहानपणापासून त्यांना खरोखर देव मानत आलो आहे. अगदी सिझरींग होत माझा जन्म होण्यापासून आजवर झालेल्या कित्येक आजारांत या भगवंतांनीच मला तारले आहे. कोणत्याही आजारपणात दोनच जागा मला नेहमी सर्वात सुसह्य आणि सुरक्षित वाटल्या आहेत, त्यापैकी पहिली माझ्या आईची कुशी आणि दुसरी डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गादी अन उशी!. तिथे झोपल्यावर आणि ते समोर उभे असताना, त्यांच्या चेहर्यावरचे आश्वासक भाव पाहताना, आपसूकच आजाराविरुद्ध लढण्याची एक उमेद मिळते, जगण्याची शाश्वती मिळते. अंगात १०२ ताप असतो, क्लिनिकमधील एसी थंडगार हवा फेकत असतो, तरीही तिथे डोळे मिटून शांत झोपून जावेसे वाटते., आणि याला कारणीभूत असतो त्यांच्यावर असलेला आपला विश्वास! पण कधीकधी "गंधा है पर धंदा है" या उक्तीला अनुसरणार्या काही अपवृत्तीच्या डॉक्टरांचेही अनुभव येतात. या लेखमालेत (जर लेखमाला झालीच तर) चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील., कारण ते तसे दोन्ही प्रकारचे अनुभव कमी जास्त प्रमाणात आले आहेत. पण यातूनही वर ज्या चार ओळी खरडल्या आहेत त्यात व्यक्त केलेल्या विश्वासाला आजवर धक्का पोहोचलेला नाहीये, कारण वाईट कमी आणि चांगलेच अनुभव जास्त आले आहेत.
प्रस्तावना आटोपून आता सुरुवात एका गंमतीशीर अन तितक्याच चमत्कारीक अनुभवापासून करतो.
------------------------------------------------
तर ......
साधारण वर्ष-सव्वा वर्षांपूर्वीची गोष्ट!
अचानक एके दिवशी दाढी करताना काहीतरी कापले गेले आणि जाणवले डाव्या गालफडाच्या तळाशी पुळीसारखे काहीसे आलेय. दाढी करून झाल्यावर तुरटी फिरवताना फारसे काही झोंबले नाही, तरीही त्यानंतर आईचे फेव्हरेट औषध ‘कैलास जीवन’ लावून त्याला विसरून गेलो.
दोनेक आठवड्यानंतर पुन्हा दाढी करायला घेतली तेव्हा आढळून आले की मॅडम अजूनही तिथेच ठाण मांडून बसल्या होत्या. फरक इतकाच की कापले गेल्यानंतरही आकाराने कमी न होत्या वाढल्याच होत्या. जपूनच तिच्या आजूबाजूने दाढी उरकून घेतली आणि पुढे दिवसभराच्या घाईगडबडीत पुन्हा विसरून गेलो. नाही म्हणायला पुढचे दोन तीन दिवस गालावरून हात फिरवताना हाताला स्पर्श करून जात होती, पण तिचे काय करायचे हे ठाऊक नसल्याने मनात आलेला विचार तिथेच विरून जायचा. एक साधारण पंधरवड्याने पुढच्या दाढीची वेळ झाली. यावेळी तिच्यावर स्वताच्या हाताने ब्लेड फिरवायला मन धजावले नाही, म्हणून मग थेट सलूनचा रस्ता धरला.
सलूनवालाच तो!. ऐकले ऐकले आणि विसरला. काळजी घ्यायला सांगितले असूनही घाईगडबडीत झप्पकन चालला त्याचा वस्तरा आणि निस्तरा यला मात्र मला लागले. रक्ताची अशी काही धार लागली की थांबता थांबेना. एवढ्याश्या पुळीतून दोनचार चमचे रक्त इतक्या सहजपणे वाहून गेले जणू काही शरीरातल्या ब्लडबॅंकचा बॅलन्स फुगलाय जे थोडीफार उधळपट्टी चालून जावी. दाढी करणार्या न्हाव्याची माझे रक्त थांबवताना अशी काही तारांबळ उडाली होती की जसे त्या रक्ताची किंमत त्याच्या पगारातून कापली जाणार होती. असो, पण टिव्हीवर दाखवल्या जाणार्या जाहीरातीतील एखादी क्रीम लावावी आणि सात दिवसांत पुळी गायब, असे हे प्रकरण दिसतेय तेवढे सोपे नाही, हे मी समजून चुकलो. माझी अवस्था पाहता सलूनच्या मालकाने माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली. सोबत त्या नोकराला दोनचार शिव्या हासडत ती दिलगिरी मनापासून आहे हे देखील दाखवून दिले. त्यानंतर माझ्याकडे वळून म्हणाला, "भाईसाहब ये मस्सा है.!"
मी चेहरा कस्सा नुस्सा करत त्याला विचारले, मतलब?.. नक्की ये क्या मसला है?
त्यावर त्याने जो काही उपाय सांगितला त्यानुसार हा ‘गंभीर मसला’ आहे एवढे नक्की समजले.
त्याने ती चेहर्यावरची पुळी चक्क जाळायला सांगितली. "ब्लेड से उडाओगे तो फिर वापस आयेगी" असेही पुढे जोडले.
मी बरे म्हणत झोंबरा गाल घेऊन तिथून निघालो.
फिर वापस आयेगी असे तो म्हणालेला खरे, पण ती कापली गेल्याने त्यातून झालेल्या रक्तोत्सर्जनाने संसर्ग होत आणखी चार पुळ्या चेहर्यावर उगवल्या. सर्वच पुळ्या गाल आणि हनुवटीवरील दर्शनी भागात सेंटर ऑफ अॅट्रेक्शन बनत पसरल्या होत्या. त्या पैकी दोन पुळ्या येत्या काही दिवसांतच इतक्या वेगाने वाढू लागल्या की माझ्या दाढीच्या केसांची वाढही इतकी वेगवान नव्हती. परिणामी दाढीचे केस त्यांना लपवायला कमी पडू लागले. तरीही त्यांना न दुखावता दाढी करणेही शक्य नसल्याने ती देखील आपल्या जागी वाढत होती.
एमएनसी कंपनीत कामाला असल्याने काही कायदे कानून पाळणे गरजेचे होते. एका मर्यादेपुढे दाढी वाढवणे शक्य नव्हते. ती मर्यादा आली आणि मग पुन्हा सलूनची परीक्षा नको म्हणत मी घरीच दाढी केली. गालावरचे जंगल साफ होताच समजले की हि विषवल्ली किती मोठ्या प्रमाणात माझ्या चेहर्यावर पसरली होती. हा थेट माझ्या सौंदर्यावरच घाला होता. पण तरीही तेच तोंड वर करून ऑफिसला जाणे भाग होते.
त्या दिवशी दिवसभर माझ्या ध्यानावरून टवाळक्या सहन कराव्या लागल्या, पण तरीही ऑफिसला जाण्याचा एक फायदा तर झाला. आमच्या वॉचमननेही सलूनवाल्याच्या म्हणण्याला पुष्टी देत मला त्या पुळ्या जाळून टाकायचा सल्ला दिला. सोबत त्या त्याच्या स्वत:च्या हस्ते अगरबत्तीने जाळायची मोफत तयारीही दर्शवली. अर्थात, "तकलीफ होगी" हे पुढे नमूद करायला विसरला नाही.
या प्रकाराला तयार होणे म्हणजे माझ्यासाठी अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग कॅटेगरीतले होते. त्यापेक्षा मी पांढरपेश्या माणसासारखे डॉक्टरचा रस्ता धरणे योग्य समजले. या मधल्या काळात माझ्या त्या पुळ्यांच्या वाढीवर नजर ठेवून असलेली माझी ग’फ्रेंड माझ्यासाठी एक चांगला नावाजलेला डॉक्टर पक्षी "स्किन स्पेशालिस्ट" सुचवून तयार होतीच.
एवढ्याश्या पुळीसाठी आपल्याला लवकरच "त्वचा रोग तज्ञ" असला काही भारी प्रकार गाठावा लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण हे घडत होते. डॉक्टरांनी माझ्या चेहर्याची टेहाळणी करत छोटीशी सर्जरी करत हे उडवावे लागेल असे निदान केले. ‘सर्जरी’ हा शब्द ऐकून मन पुन्हा एकदा चरकले. अगदी लहानपणी झालेले अपेंडिक्सचे ऑपरेशन वगैरे डोळ्यासमोर आले. आता यासाठी कधी यावे लागेल अशी चौकशी करता, अगदी आत्ताच, बस्स पाच मिनिटात होईल असे म्हणत डॉक्टरांनी त्यासाठी ‘दोन हजार रुपये’ ईतका खर्चाचा आकडा सांगितला. चार पुटकुळ्यांसाठी एवढ्या कवड्या खर्च करणे नाही म्हटले तरी जिवावर आले होते. पण तरी याने माझ्या बाह्यसौंदर्याचे जे अध:पतन झाले होते ते पाहता मी लागलीच तयार झालो.
मला बेडवर आडवे केले गेले. एक छोटेसे ईंजेक्शन त्यापैकी मोठ्या वाढलेल्या पुळ्यांमध्ये खुपसण्यात आले. बहुधा ते लोकल अॅनेस्थेशिया असावे. (मला डॉक्टरांकडे फारशी चौकशी करायची सवय नाही, पण हा अंदाज सोपा असावा) त्यानंतर पुढच्या पाचेक मिनिटांतच हातात एक एलेक्ट्रीक रॉड सारखे उपकरण घेत एकेक करत त्यांनी सर्व पुळ्या जाळून काढल्या. जिथे अॅनेस्थिशिआ दिला नव्हता त्या छोट्या पुळ्यांना थोडा त्रास झाला, मात्र एकंदरीत प्रकरण बरेपैकी सुसह्य होते, आणि लवकर आटोपले.
दोन हजार गेले पण दुसर्या दिवशी ताठ मानेने ऑफिसला जायची सोय झाली. ग’फ्रेंडच्या नजरेला नजर मिळवायची हिंमत आली.
पण हा निव्वळ दिलासा होता, पुढची दाढी करेपर्यंतचा!..
...
सातच दिवसांत दाढीच्या नव्या केसांच्या जोडीने नवीन पुळ्या नवीन जागी जम बसवू लागल्या होत्या. दाढी करताना चुकून सर्रकन एखादी कापली गेली तर रक्ताची न थांबणारी धार लागायची. आणि त्यांना चुकवून दाढी केली तरी येत्या काही दिवसांत त्यांची टपोरी बोरं झालेली असायची. मग साधारण महिन्या दिड महिन्याने पुन्हा त्याच स्किन स्पेशालिस्टचा रस्ता धरणे आलेच. पुळ्या छोट्या असल्या तर ते हजार रुपये घ्यायचे आणि मोठ्या झाल्या तर दिड हजार!. सुरुवातीला दोनतीन वेळा त्यांनी स्वत:च कारागिरी केली, मात्र नंतर माझी केस त्यांच्या हाताखालील ज्युनिअर्सना सोपवण्यात येऊ लागली. (त्या शिकाऊ मदतनीसांचे पण एकेक गंमतीशीर किस्से आहेत, पण ते पुढच्या एखाद्या सदरात.)
त्याचवेळी इथे माझी ग’फ्रेंड हैरान परेशान झाली होती. एकदा तीच माझ्या जोडीने डॉक्टरांकडे आली आणि त्यांना हे असे आणखी किती दिवस चालणार म्हणून विचारले. तर डॉक्टर म्हणाले की दाढीच्या ब्लेडने कापले जाऊन पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होत आहे. यावर एकच उपाय!, दर १२ दिवसांनी दाढी करायची आणि १४ व्या दिवशी ज्या थोड्याबहुत पुळ्या उगवल्या असतील त्या मुळापासून साफ करायच्या. हे असे वारंवार करत राहायचे जोपर्यंत त्या कायमच्या नष्ट नाही होत. मात्र मधल्या कुठल्याही दिवशी दाढी करायची नाही, अन्यथा संसर्गाला आळा बसणार नाही. मी अर्थातच याला तयार झालो.
सुरुवातीला सुसह्य आणि थोडक्यात आटोपली जातेय असे वाटणारी हि सर्जरी आता वारंवार घडू लागल्याने त्रासदायक वाटू लागली होती. तसेच शिकाऊ डॉक्टरांचा हात तुलनेत कच्चा होता. डॉक्टरसाहेबांची सफाई त्यात नव्हती. दर दोन आठवड्याने तो त्रास सहन करायला जाणे आता कंटाळवाणे वाटू लागले होते. पैश्यापरीस पैसा जात होताच, पण त्याहीपेक्षा पुळ्यांमध्ये फरक काहीच दिसत नसल्याने दिलासा असा कुठल्याही आघाडीवर नव्हता. अखेर मी वैतागून आता बस्स!, निदान डॉक्टर तरी बदलून बघूया म्हणत थांबलो. पण पंचक्रोशीत तेच सर्वोत्तम स्किन स्पेशालिस्ट गणले जात असल्याने पुढचा पर्याय न सुचल्याने ब्लॉक झालो होतो. डॉक्टरांकडे जायचे बंद केल्याने पुळ्या आता झपाट्याने वाढू लागल्या होत्या आणि सोबत दाढी सुद्धा फोफावत होती. ऑफिसमध्ये ‘जंगली महाराज’ हि पदवी पडली होती. कॉलनीत ज्या घरासमोरून जायचो तेथील आया धावत येऊन घाबरत आपल्या मुलांना आत घेऊन जायच्या.. आय यम जस्ट जोकींग!, पण हि माझ्या आयुष्यातली सर्वात दिर्घकाळ उगवलेली दाढी होती.. आणि अश्यातच मग एके दिवशी,. त्याच दाढीच्या केसांमध्ये पाणी राहिल्याने सर्दी पकडली म्हणून विभागातल्या जनरल फिजिशिअनकडे जाण्याचा योग आला...
आमचे नेहमीचे फॅमिली डॉक्टर गैरहजर असल्याने आडवाटेवरच्या दुसर्या एका डॉक्टरांकडे जाणे झाले. छातीवर स्टेथोस्कोप टेकवून माझ्या सर्दीच्या नाकाची तपासणी करताना दाढीआड लपलेले माझ्या चेहर्यावरचे वैभव त्यांना जवळून दिसले... आणि,
"यावर काय करतोस?" तपासत असताना सहजच त्यांनी चौकशी केली.
"सध्या काही नाही. आधी एक डॉक्टर करून झाले. ते जाळून काढायचे. पण पुन्हा पुन्हा उगवतातच. शेवटी नाद सोडला."
"एक गोळी सांगतो, महिन्याभरात गळून जाईल"
त्याही परिस्थितीत मला हसायला आले. चक्क हसलोही. पण दाढीच्या आड त्यांना दिसले नसावे. वा कदाचित दिसलेही असावे. काय फरक पडतो. गेले वर्ष सव्वा वर्ष जो आजार मला छळत होता त्याचा बंदोबस्त एक छोटेसे क्लिनिक थाटून बसलेला डॉक्टर करणार होता. ते देखील एक प्रकारची गोळी देऊन. हि गोळी काही मला पचली नव्हती. पण त्यांनी लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मी तिथून निघालो. अर्थात त्याचा त्यांनी एकही अतिरीक्त पैसा घेतला नव्हता. माझे सर्दीच्या तपासणीचे आणि गोळ्या ईंजेक्शनचे झाले होते तेवढेच दिडशे रुपये काय ते घेतले होते.
फुकटच्या सल्याला काही किंमत नसते, मग भले तो त्या विषयातील एखाद्या तज्ञाकडून का आलेला असेना!.. एकीकडे माझा चेहरा सुदानचे जंगल होत होते आणि दुसरीकडे ती चिठ्ठी माझ्या घरी एका ड्रॉव्हरमध्ये दोन आठवडे पडून होती. कारण ते औषध होमीओपथीचे होते आणि जिथे मिळायचे ते मेडीकलचे दुकान आमच्या घरापासून पंधरा-वीस मिनिटांवर होते. पुरेसा विश्वास नसल्याने मी ते आणायचा कंटाळा करत होतो. पण या काळात दुसरा डॉक्टर वा उपाय न सुचल्याने अखेर ग’फ्रेंडच्या हट्टाखातर मी ते औषध आणून वापरायला तयार झालो. ते आणायला जाताना घरात कुठेतरी टाकलेली चिठ्ठीही शोधावी लागली होती. पण नशीबात ते औषध घेणे असल्याने मिळालीच. आधीच मी त्या होमिओपथीच्या बारीक साबूदाण्यासारख्या पांढर्या गोळ्या घेण्यास फारसा उत्सुक नव्हतो., त्यात त्यांची किंमत बघून तर आधीच नसलेला विश्वास आणखी डुचमळला. एक बाटली फक्त वीस रुपयाला होती. गेले वर्ष-दिड वर्षात हजारो रुपयांचा चुराडा झाल्यावर कोणत्या वीस रुपयांच्या गोळ्या परिणामकारक ठरणार होत्या, यावर विश्वास ठेवणे हे माझ्यासाठी कोणत्या अंधश्रद्धेपेक्षा कमी नव्हते.
अर्थात, वरील वर्णनावरून वाचनात तरबेज असलेल्यांना अंदाजा आला असेलच की आता पुढे कहाणीत नक्की काय ट्विस्ट असेल ते!..
येस्स!..
त्या डॉक्टरांनी महिन्याभरात त्या पुळ्या गळून जातील असे भाकित केले होते. आज जवळपास महिना झाला मी त्या गोळ्या घेतोय. एका वेळेला त्या ५-६ बारीकश्या गोळ्या, असे दिवसाला ३ डोस!. सुरुवातीला पुरेसा विश्वास नसल्याने अधूनमधून एखाद दुसरा डोस विसरत असल्याने इफेक्टीवली २४-२५ दिवस झाले म्हणून शकतो. आतापर्यंत दोन बाटल्या औषध, म्हणजे चाळीस रुपये फक्त!, खर्चून झाल्यावर आज त्या पुळ्या आकाराने घटत निम्म्यावर आल्या आहेत. कदाचित आणखी महिन्याभरात त्यांचे नामोनिशाण मिटले असेल. दोन बाटल्या आणखी रिकाम्या झाल्या असतील. हा रोग पुन्हा परतून येऊ नये म्हणून एखादी बाटली आणखी घेत मी पुर्ण शंभराची नोट त्यावर खर्च करायचा विचार करत आहे. मनात नक्की काय भावना आहेत ते आता इथे शब्दात व्यक्त करू शकत नाही, ना हा या लेखाचा हेतू आहे. पण हल्ली रोज आरश्यात त्यांना कलेकलेने कमी होताना बघतो तेव्हा एकाच वेळी आनंद आणि पश्चाताप, या दोन्ही भावना मनात दाटून येतात एवढे नक्की!
अरे हो,
त्या गोळ्यांचे नाव राहिलेच,..
सांगितले तर जाहिरात करतोय असे नाही ना वाटणार !!
- ऋन्मेऽऽष
माझेही अनुमोदन, पण त्यांच्या
माझेही अनुमोदन,
पण त्यांच्या लिखाणाचा दर्जा शैली आवाका पाहता `भाषांतर, टाइपिंग साठी त्यांना मदतीची गरज लागू नये, प्रश्न असलाच तर वेळेचा, वा लिहिण्यासारखे एवढे काही त्यांच्याजवळ असताना नेमके काय लिहावा याचा.
Thuja is a wonderful drug
Thuja is a wonderful drug which acts on variety of conditions - infections, inflammation, cancerous growths of skin, gastrointestinal tract, respiratory tract, genitourinary tract. Its called
Its called tree of life
Its called tree of life because all the plants can be used homeopathically for tge treatment of abovesaid conditions.. only thing is it should be used judiciously.
It has antifungal properties too.
I wonder how people have miscoception that infections like warts vanish with placebo effect??
दिनेश, उदय, लीम्बुतींबू आणि
दिनेश, उदय, लीम्बुतींबू आणि रुन्मेश, आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
वेळेअभावी माबो वर जास्त प्रतिसाद देत येत नाही याची खंत वाटते. तरी देखील आवडत्या विषयांवर अवश्य लिहित असतो.
गीता-९ : होमिओपथिमध्ये खरोखरच कांही उत्तम औषधे आहेत यात वादच नाही. पण येथे संशोधनाची आवश्यकता आहे. कोणतेही औषध कोणत्या आजारामध्ये उपयुक्त आहे आणि ते कसे काम करते हे शोधले तर ते औषध पथींच्या मर्यादा ओलांडून 'मानव आरोग्य सुधार पथी' मध्ये दाखल होयील. असे झाल्यास होमिओपथिवर टीका करणारे आपोआप शांत होतील. असे अनेक आजार आहेत कि जेथे आधुनिक वैद्यकशास्त्राजवळ शास्त्रीय उत्तर आणि उपाय नाहीत. उदा. सर्दी, अलर्जी, मुळव्याध इत्यादी. हळूहळू मूळ संशोधन चालू आहे. उत्तरे सापडत आहेत आणि सापडणार आहेत. आपणासारख्या होमिओपथिक डॉक्टरांनी आपले अनुभव शेयर करणे त्या दृष्टीने महत्वाचे आहे. थुजाचे उदाहरण घेतले तर असे प्रयोग इतर अनेक डॉक्टर करीत असतात आणि अशी उपयुक्त माहिती संकलित करणे महत्वाचे आहे. मायबोलीकर डॉ साती यांनी मला विपु करून एक दुवा पाठविला होता तो हा मुद्दा विशद करतो. त्याचा स्क्रीनशॉट (पर्यायी मराठी शब्द ??) जोडत आहे. धन्यवाद डॉ साती !
डॉ. शिन्दे.
डॉ. शिन्दे.:स्मित:
शिंदेसाहेब धन्यवाद, वरच्या
शिंदेसाहेब धन्यवाद, वरच्या पोस्टबद्दल. तुमच्या कमेंट्स माबोवरील डॉक्टरांना मार्गदर्शक ठरतील अशी आशा बाळगुया...
Dr. SureshShinde तुमचा
Dr. SureshShinde तुमचा प्रतिसाद वाचून खरच खुप छान वाटले. बर झाल धागा वाचायला घेतला आणि प्रतिसादही
. डॉक तुमच्या नविन लेखाची वाट पाहतेय .
ऋन्मेष लेख छाने . बापरे अस झालं पण वाचून ..
टीनास, नमस्कार, खूप दिवसांनतर
टीनास,
नमस्कार,
खूप दिवसांनतर मायबोलीवर आलो होतो. आपला प्रतिसाद वाचून आनंद वाटला. धन्यवाद !
वेळात वेळ काढून लिहीन म्हणतो, पाहू या कधी जमेल ते !
ऋन्मेऽऽष.. लेख छान आहे! महिती
ऋन्मेऽऽष.. लेख छान आहे!
महिती पुर्ण प्रतिक्रिये साठी डॉ. सुरेश शिंदे यांचे विशेष आभार-/\-
हे औषध डॉ. च्या प्रिसक्रिप्शन शिवाय मिळते का?
हे औषध डॉ. च्या प्रिसक्रिप्शन
हे औषध डॉ. च्या प्रिसक्रिप्शन शिवाय मिळते का?
>>>>
हो, माझे प्रिस्क्रिप्शन हरवेले
याचा लेटेस्ट अपडेट काय आहे
याचा लेटेस्ट अपडेट काय आहे रूनमेश... मला पण एक छोटासा wart आला आहे गालावर.. thuja औषध आणायचे म्हणतोय.. तुमचं ठीक झालाय का आणि किती दिवस लागले...
बिनधास्त आणा, वाटल्यास
बिनधास्त आणा, वाटल्यास एखाद्या होमिओपथीक डॉक्टरशी कन्सल्ट करून आणा. माझे तर आश्चर्यकारकरीत्या बरे झाले. पण ऑफिसातील एका मैत्रीणीच्या बहिणीलाही सुचवले ते तिचेही बरे झाले.
थुजा गुगाळलं तर थुजा
थुजा गुगाळलं तर थुजा क्रीमच्या ३ इमेजेस आल्या. ६६०, १४०० आणि ११६६ रुपये.
गोळ्या इतक्या स्वस्त मिळतात?
गोळ्या इतक्या स्वस्त मिळतात?>
गोळ्या इतक्या स्वस्त मिळतात?>>>>
हो सस्मित.ऑनलाईन गोळ्या महाग आहेत.कारण माहित नाही. मधे एक औषध ऑन्लाईनवर पाहिले तर २५००/- होते.तेच बाहेर,हो.फार्मसीमधून, मला १००/-च्या आतबाहेर मिळाले.
मला 20 रुपयाला गोळ्यांची
मला 20 रुपयाला गोळ्यांची बाटली पडली. मला डॉक्टरने महिनाभरात चार बाटल्या संपवायला सांगितल्या. मी 80 रुपये खर्च केले. पण पंधरावीस दिवसात दोनच संपवल्या आणि काम झाले. उरलेल्या तश्याच पडून राहिल्या मग एके दिवशी फेकून दिल्या. ऑनलाईन विकल्यावर चांगले पैसे मिळाले असते ही आयडीया तेव्हा असती तर ...
ऋ OLX पे बेच डाल
ऋ OLX पे बेच डाल
आधी रेझर्स वीक ती व्हायरस
आधी रेझर्स वीक ती व्हायरस वाली... नंतर गोळ्या 10 पट किमतीत विकल्या जातील तुजय्या ☺️
आधी रेझर्स वीक ती व्हायरस
आधी रेझर्स वीक ती व्हायरस वाली...
>>>>
हा हा... ही आयडीया सही आहे. तसेही कित्येक व्यवसायात हाच फण्डा वापरला जातो. आधी गरज निर्माण करा. आणि मग आपले प्रॉडक्ट खपवा..
अपडेट.. मी डेंटल फ्लोस च्या
अपडेट.. मी डेंटल फ्लोस च्या धाग्याने बांधला स्किन टॅग आणि 2 दिवसात गळून पडला, साईड बाय साईड थुजा खात होतो काही दिवस.. 1 महिना अलमोस्ट आता, नामोनिशाण नाहीय.
वेल डन च्रप्स !
वेल डन च्रप्स !
नामोनिशाण नसणे हे सर्वात जास्त महत्वाचे.
नाही तर लग्न जमणे अवघड होते.
मला वाटते स्कीन स्पेशालिस्टची क्लिनिके विवाहेच्छुक लोकांमुळेच जास्त चालतात. .. म्हणजे मी तरी हाच वयोगट तिथे जास्त पाहिला
नामोनिशाण नसणे हे सर्वात
नामोनिशाण नसणे हे सर्वात जास्त महत्वाचे.
नाही तर लग्न जमणे अवघड होते.
>>> महत्वाचे म्हणजे दाढी करता येते आता मस्त.. झिरो मशीन वापरून वैतागलो होतो.
महत्वाचे म्हणजे दाढी करता
महत्वाचे म्हणजे दाढी करता येते आता मस्त..
>>>>
हो अॅक्चुअली ! मला तर दाढी वाढवायची सवय. त्यामागे हा मस्सा सुद्धा टमटमीत फुगून यायचा. दिसायचा नाही, पण आतल्या आत छळायचा. दाखवताही येत नाही आणि सांगताही येत नाही असे व्हायचे. दाढी केल्यावर तो असा काही उघडा पडायचा की त्या क्षणाला आपण जगातले सर्वात कुरुप ईन्सान आहोत असे वाटायचे.
Pages