'बुकारु'- छोट्यांचा साहित्यमेळावा (Bookaroo Children's Literature Festival)

Submitted by लसावि on 3 February, 2015 - 01:19

३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०१५ या दोन दिवशी 'बुकारु' (Bookaroo Children's Literature Festival) या छोट्यांसाठीच्या साहित्यमेळाव्याला माझ्या मुलाला घेउन जाण्याचा योग आला.

अत्यंत सुरेख संयोजन, मुलांचा भरघोस प्रतिसाद आणि उत्तम वक्ते यामुळे फार मजा आली. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी प्रत्येकी ७-८ वेगवेगळे कार्यक्रम होते. त्यापैकी कोणतेही तीन निवडावे लागतात. ४ ते ६, ६ ते ८, ८ ते १०, १० ते १२ आणि १२ ते १४ असे वयोगट होते. त्यामुळे आपल्या वयाला साजेसे कार्यक्रम मिळाल्याने मुलेही पूर्णपणे रंगली होती. संपूर्ण कार्यक्रम विनाशुल्क होता. त्याचबरोबर पुस्त्क प्रदर्शन व विक्रीही चालू होती.

आम्ही निवडलेल्या कार्यक्रमात कथाकथन, लेखकांबरोबर गप्पा आणि प्रश्नोत्तरे, हस्तकला असे वैविध्य होते. मुख्य म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी फक्त मुलांनाच प्रवेश होता! संपूर्ण उपक्रम इंग्रजी माध्यमातूनच होता हे मात्र नमूद करावेच लागेल.

एका इस्रायली लेखकाची त्याच्याच पुस्तकावर सही व संदेश वगैरे घेऊन आल्याने चिरंजिव फारच खुशीत होते! मुलांना वाचनाची आवड असेल तर ती अजून वाढण्यासाठी आणि नसेल तर ती निर्माण होण्यासाठी असे उपक्रम फार प्रभावी ठरावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पासेस सकाळच्या ऑफीसमधे जाऊन घ्यावे लागणार होते हे जरा त्रासाचं होतं, मागच्या आणि ह्या वर्षीही त्यामुळे जमलं नाही Sad

आगाऊ, खरे आहे ही माहिती त्रोटक वाटली पण खाली लिंक दिली आहे त्यावर सविस्तर माहिती मिळते आहे. धन्यवाद. मला वाटत हल्लीच युग अस आहे की करायला वारेमाप आहे पण वेळेची जाम टंचाई आहे.

गेल्या वर्षीचा मस्त अनुभव होता म्हणून ह्यावर्षी पण गेलो होतो. पण ह्यावर्षी निराशा झाली Sad लेक आणि तिच्या मैत्रीणी (१४ वर्षे) कोणालाच आवडले नाही.

३ प्रोग्रॅम्सचे पासेस घेतले होते. पण एकालाच जायला जमले.

१० ते १२ चे प्रोग्रॅम्स छान होते असे ऐकले.

...

लले, डीटेलवार लिहायला मी प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागीच नव्हतो ना! आम्ही नुसतेच कडेकडेने!
आता पोरालाच लिहायला सांगतो Happy