अकथित वस्तवाचा आरसा...

Submitted by Kally on 2 February, 2015 - 06:55

तो: मी तुझाशी लग्न नाही करू शकत
ती: काssss,,??
तो: जॉब मुळे मी पुढील 2,3 वर्षासाठी यूके ला जात आहे कदाचित पुढे तिथेच सेट्ट्ले होईन, so या relationship चा इथेच शेवट करावा लागेल आपल्याला..
ती: तू अस का म्हणतो आहेस अरे काहीतरी मार्ग नक्की सापडेल.. आपण भेटून बोलूया.. मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय.. plz आपण भेटूया आज..
तो: ठिक आहे,,, संध्याकाळी घरी ये… शेखर गावी गेला आहे सो आज कुणी नाही असणार
ती: ठिक आहे मी येते..
संध्याकाळी ती त्याच्या घरी पोहोचते,, तो packing करत असतो..
ती: हे काय तू आजच जाणार आहेस का.. काय चालले आहे तुझे??
तो: अग नाही अजून आठवडा आहे पण उद्या गावी जात आहे घरच्याना ही भेटून येतो ना.. तू बस
ती: Ok.. तू…. परत कधी येणार आहेस
तो: नक्की नाही ग.. काम खूप आहे 2,3 वर्ष तरी भारतापासून दूरच राहीन …
ती: Mag मी.. मी काय सांगू घरी..
तो:काय सांगू म्हणजे..
ती: अरे आपले प्रेम आहे एकमेकांवर.. तू घरी येउन बाबाना भेट म्हणजे ते तू परत येई परेंत माझ्यासाठी स्थळ बघणे थांबवतील
तो: Ohk.. माझ ऐक तू तुझा बाबांचा म्हणण्यानुसार लग्न कर.. आपल्या नात्याला पुढे काही मार्ग नाही.. आणि plz आता तू हाच विषय घेउन रडू नकोस.. मी जवळ जवळ कायमचा दूर जात आहे तुझ्यापासून आणि तू मला असे bye बोलणार आहेस का … चल डोळे पूस..
ती विचार करत असते "किती निष्ठूरपणे हा बोलत आहे की सार विसर, केलेल प्रेम, आपले नाते एकत्र जगलेले क्षण,, इतके सहज सोप्पे असते का विसरणे.. ह्याने खरच कधी माझ्यावर प्रेम केल होत का.."ती डोळे पुसते.. आणि उठून उभी रहाते निघण्यासाथी.. मनात ठाम निश्चय केल्या सारखी. तो तिचा जवळ जातो तिचा हात हातात घेतो.. तिला मिठीत घेउन तिला kiss करण्याचा प्रयत्न करतो.. ती त्याला दूर लोटते..
ती: हे काय karto आहेस तू..
तो: Prem.. जाण्या आधी एकदा तुझ्या जवळ, अगदी जवळ यावेसे वाटते आहे मला.. माझावर प्रेम करतेस ना मग plz मला अडवू नकोस .. आजची रात्र मला तुझ्या धुंदीत रहायचे आहे..
ती: काय मूर्खासारखे बरळतो आहेस,, शुद्धीवर तरी आहेस का … माझ तुझ्यावर जे प्रेम होत,,, हो होतच म्हणाव लागेल कारण आता तू जे vagato आहेस त्यावरून मला तुझा प्रेमावर सौनशय येत आहे.. जर तू मला सोडून कायमचा दूर जात आहेस तर तुला माझा शरीराशी, भावनांशी खेळण्याचा काही एक अधिकार नाही आहे हे तुला कळले पाहिजे … तुझ्यावर माझे किती ही प्रेम होते असले तरी मला स्पर्श करण्याचा हक्क फक्त त्यालाच असेल जो माझा प्रेमाची कदर असेल, ज्याचा नावाचे मंगळसुत्र माझा गळ्यात असेल, कारण हा माझ्या चरित्र्याचा, माझा पावित्र्याचा प्रश्न आहे…

{एवढ फक्त एवढा विरोध नाही का करू शकत तुम्ही मुली प्रेमाचा ओघात अशा वाहावत जाता आणि नंतर नशिबाला दोष देत बसता … हे चुकीचे आहे.. प्रेम आंधळे असते अस म्हणतात कदाचित तसे असेल ही पण त्या प्रेमाला जेव्हा वासनेचा गंध येऊ लागतो तेव्हा सावध होणेच योग्य असते.. आपण जितक्या सहज एखाद्यावर विश्वास करतो तितक्याच समंजसपणे त्याचा वागण्यातला बदल समजून सुद्न्यपणे वागळे पाहिजे..}

Group content visibility: 
Public - accessible to all site users