(ही जेवणानंतरची चावडी, त्याचे ठिकाण, पात्रे, गप्पा सर्व काल्पनिक आणि कैच्याकै आहे.याचा वस्तुस्थितीशी संबंध असल्याशी शंका आल्यास दोन तीन शिंका देऊन सर्व शंका झटकून टाकाव्या.)
"काय म्हणाला गं तुझा मांजर अप्रेझलला?"
"नेहमीचेच गं..|| खोक्याबाहेर विचार करा || || गोष्टी घडायची वाट पाहू नका || || घडवून आणा || || नविन कल्पना द्या || प्रॉडक्ट नुसते सुधारु नका || || अप्रतीम बनवा || || गतकाळाची होळी करा || || उद्याची उंच गुढी उभारा || || यावेळी इन्फोमॅटिक सारख्या मोठ्या माशाने पण १००० लोकांना नारळ दिला आहे || || आपल्या सारख्या लघु उद्योगाकडून भव्य दिव्य पगारवाढीची अपेक्षा करु नका || || काम वेळेत करुन उपयोग नाही || || वेळेच्या खूप आधी करा आणि ब्राऊनी पॉइंट मिळवा || || आपल्याकडे आता नव्या कामाला बँडविड्थ नाही || || जुन्या कामाला अजून घासून पुसून पॉलीश करा || || नव्या पोरांना सांभाळून घ्या || त्यांच्या कलाकलाने घ्या ||"
"ब्राऊनी पॉईंट?? बँडविड्थ? काही म्हण हां, तुझ्या मांजराचं इंग्लिश मस्त आहे. आपण बाळबोध बिचारे काय म्हणालो असतो? || वेळेच्या खूप आधी करा म्हणजे पुढच्या कामाच्या तयारीला वेळ मिळेल ||"
"ईनोव्हेशन कमी पडतंय म्हणाला."
"मागच्या वेळी मी आयड्या दिली होती की बेंचवरच्या लोकांकडून गवारी, अंबाडी, वाल, तुरीच्या शेंगा निवडून घेऊन ५ रु. महाग भावाने विकायला ठेवा आणि मिळालेला नफा मोडलेल्या फिरत्या खुर्च्या बदलायला वापरा. तर नाक उडवून एका बाजूने हसला आणि म्हणतो कसा, "हो. आय विल टेक धिस विथ हेडस, पण मागच्या वेळी मी कँटीनला, वॉशरुमला, पॅसेजला, गच्चीला, मोबाईलला स्वाईप एंट्री लावून तो वेळ दिवसाच्या वेळेतून वजा करा अशी आयड्या दिली होती त्याच्या वर अजून काम चालू आहे आणि या नव्या आयड्या साठी आत्ता बँडविड्थ नाही."
"अरे देवा!! सगळीकडे स्वाईपं लावाल हो, पण लोकांच्या मनाला स्वाईप कसे लावाल? या तुझ्या मांजराचं लवकर लग्न करुन लवकर पोरं व्हावी म्हणजे जरा ऑफिसात पडीकपणा कमी होईल. किती दिवसात सोम ते शुक्रवारचा सूर्योदय आणि सूर्यास्त कसा दिसतो पाहिला नाहीय "
"मी म्हणतो सहिष्णुता, शांतता ही भित्र्यांची "सी"गिरी आहे. एक बाँब टाकून सगळं उडवून टाकायला पाहिजे. तुमच्या सारखे चाकोरीतून बाहेर न पडणारे लोक आहेत म्हणूनच आपण मागे पडलोय. जीडीपी कमी झालाय. त्या बोलिव्हिया आणि पापा न्यू गिनीया मध्ये काय चाललंय बघा जरा!!"
"सोम्या, "पापा न्यू गिनीया" नाही पापुवा न्यू गिनी.. पा पु वा.. हा बघ विकीपिडीया अॅपवर उच्चार आहे."
"ठीक आहे रे! तू शि! तुझी विजार मोठी!" (आता आता कुठे हा सर्व सेन्सॉर शब्दांना कात्री लावायला शिकलाय! आता बिचारा सेन्सॉर नसलेल्या शब्दांना पण कात्र्या आणि अडकित्ते लावतोय.)
"अरे तो आपल्या मजल्यावर मुलगा आहे ना, बरेचदा रणविजय सारखी दाढी ठेवतो तो, त्याचा पगार किती असेल रे? स्वभावाला कसा आहे?"
"आं?? तुला बहीण नाही, तुझं लग्न झालंय. आता या चौकश्यांचं प्रयोजन काय म्हणे?"
"अरे आमच्या सासूबाईंच्या मावसनंणंदेच्या भाचीला त्याचं स्थळ सांगून आलंय. मला अंदाज घ्यायला सांगितलंय. पोरगा वागायला कसा आहे, सिगरेट ओढतो का, अप्रेझल नीट होतं का, ज्यात काम करतो ती टेक्नॉलॉजी जनरल आहे की स्पेशल, युएस आहे की युरोप, कारचं लोन फिटलंय का, डेस्कवर पसारा असतो का, कँटीन मध्ये जेवण वाढणार्यांशी आणि हाऊस कीपींग वाल्यांशी चांगला वागतो का, केस कलर क....."
"बापरे!! स्थळ आहे की एफ बी आय ला पाहिजे माहिती? आणि काय पाहिजेय? मुलगा चालताना डावा पाय पुढे टाकतो की उजवा, जेवताना आधी भात खातो का कोशिंबीर, किती शर्ट आहेत, कारचं अॅव्हरेज कीती आहे, आणि हेमोग्लोबिन किती आहे, रेटिना स्कॅन इमेज वगैरे नको का?" (इथे दोन अविवाहीत उमेदवारांनी मनात ऑफिस टपरीवर गरम नावाची लवंग धूम्रकांडी न पिण्याची आणि डेस्कवरचा पसारा आवरण्याची प्रतिज्ञा केली. आता हे सर्व करायला नवा अड्डा शोधायला हवा.)
"मुलीच्या बापाची घालमेल! तुम्हा बॅचलरांना कशी कळणार? माझ्या मुलं बघायच्या वेळी तो एक आला होता.डाटा वेअर हाऊसिंग मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे म्हणाला. आम्ही समोरच्या काकांच्या मुलाला चौकशी करायला सांगितलं. त्या मुलाच्या आणि त्याच्या कंपनीच्या सिगरेट प्यायच्या ग्यालर्या समोरासमोर होत्या म्हणून. तर कळलं की प्रोजेक्ट म्हणजे एका मेडीकल स्टोअर ला एक्सेल शीट मध्ये हिशोब आणि ग्राफ काढून द्यायचे आणि याच्या खाली एक पोस्टाने दिल्लीचे एम सी बी शिकलेला मुलगा त्याचे बॅकलॉग पास होईपर्यंत."
"एम सी बी? सर्किट ब्रेकर?"
"मॅनेजमेंट इन काँप्युटर ब्रेन स्टॉर्मिंग."
"वाह वाह!! आता जाऊन आमच्या मांजराला सांगतो की टेस्ट केस लिहायला पोरं मिळत नाहीत तर एम सी बी घेणार्या कॉलेजांना क्यांपस घ्या म्हणून. चला यावेळच्या अप्रेझल च्या दहा मार्कांची सोय झाली. माय हॉर्स टूक हेड बाथ इन होली गँजेस."
"तुम्ही असेच अल्पसंतुष्ट कूपमंडूक रहा रे!! ते शेजारी कुंपणापलिकडे बघा लोक स्टार परफॉर्मर ला आयपॅड मिळवतायत. आणि आपण.सारखे टी शर्ट आणि मग घेतोय. आता एक टी शर्ट बनवणारं युनिट टाकून द्यायला पाहिजे."
"किती रे किती पैशाचा हव्यास कराल? लोकांना खायला मिळत नाही. दिवसाच्या कमाईवर तेल चहापूड मसाले आणून चुली पेटतात. या विषम जगात आपण अॅलन सोली आणि ली कूपर वापरणं पण अन फेअर आहे."
"मार्क्सवादी मॅडम!! फक्त एकच सांगा, यार्डलेचा डिओ आणि बाटाचे बूट कधी फेकून देणार आहात? घर सोडून झोपडीत रहायला कधी जाणार आहात?"
"यांच्यासारख्या समृद्ध नवरे वाल्या अप्रेझलला पगारवाढ न मागणार्या बायकांमुळे आपली प्रमोशनं लटकतायत.यांच्यामुळे इंजिनीयरिंगच्या सीटा अडतायत. यांच्यामुळे घरं महाग होतायत. यांच्यामुळे सणवार नष्ट होतायत." (इथे बायका ऐवजी काक्वांमुळे शब्द वापरणार होता पण याने आधीच ठिणगी टाकलीय, आणि दारुगोळा टाकला तर लघु उद्योग बेचिराख होण्याचा धोका.)
"बरं, बायकांना इंजिनीयरिंगला पाठवू नका, शिकवू नका, गाड्या स्वतः चालवा, बँकांची कामं स्वतः करा, घरी कुरियर आलं तर स्वतः घ्या. बायकांना मुलांच्या शाळेचे फॉर्म आणायची कामं सांगू नका. जुन्या काळाकडे जायचं ना, पूर्ण जा. बायका आता फक्त घरातून निघालेल्या भुयारातून जाऊन विहीरीवरुन पाणी आणतील आणि स्वयंपाक करतील .बाकी सर्व कामं तुमची."
"यालाच देजा वू म्हणतात की काय? काल पण याच विषयावर हेच मुद्दे चालू होते. जाऊद्या रे. अरे तो बघ तो डायरेक्टर सायकलीकडे चाललाय. मजा आहे ना? याची स्कोडा सुपर्ब आपण घ्यायची का? रोज ये म्हणावं सायकलीने"
"त्याची सायकल पाच लाखांची आहे. रोज सुपर्ब मधून बालेवाडी पर्यंत येतो. आणि तिथे पार्क करुन पुढे सायकलीने."
"मला पण यायचंय रे. कॉलेजात बाबा म्हणत होते सायकल वरुन जा तर हट्ट करुन सनी घेतली. आता वाटतंय तेव्हापासून सायकल चालवत ठेवायला हवी होती म्हणजे आज तीने जिने चढल्यावर दम लागतो तो लागला नसता."
"तू काहीच करत नाहीस का?"
"नाही रे, पण रामदेव बाबा अॅप डाऊन लोड केलंय. रात्री झोप लागेपर्यंत चाळीस मिनीटं आसनांबद्दल वाचतो पडून."
"हो ना. मी पण गाडी लांब पार्क करुन लिफ्टपर्यंत चालत जाते. "
"ते फिटनेस म्हणून नाही, नाईलाज म्हणून!! तू ज्या वेळेला येतेस त्या वेळेला सर्व जवळच्या जागा भरलेल्या असतात."
"याच परखड पणा मुळे तुम्ही मराठी पोरं मागे पडता पोरी पटवण्यात. आता इथे तो अमराठी पोरगा म्हणाला असता, "ऑफ कोर्स, मुझे पता है आप कुछ तो करती ही होंगी! आय कॅन सी द ग्लो!"" कॉलेजातल्या सर्व सुंदर्या अशाच घालवल्यात ना, आता बसा लेको जीवनसाथी आणि शादी आणि मॅट्रीमोनी बघत."
"चला रे आता. आमचे मांजर जेवून आले पण. आता जागेवर जाऊन मन लावून काम करु आणि अंधार झाला की कलटी टाकू."
(No subject)
ओ, तेवडं ते हिंजवडी करा बुवा,
ओ, तेवडं ते हिंजवडी करा बुवा, हिंजेवाडी चुकीचा उच्चार आहे.
मस्त ! ( वास्तव नाही म्हणताय
मस्त ! ( वास्तव नाही म्हणताय नं ! )
हाइट्ट आहे! हिंजवडी
हाइट्ट आहे! हिंजवडी चावडीच्या गप्पा भरपूर ऐकल्या आहेत. चावडी चावडी पे है आयपॅड की बातें पोरगा वागायला कसा आहे, सिगरेट ओढतो का, अप्रेझल नीट होतं का, ज्यात काम करतो ती टेक्नॉलॉजी जनरल आहे की स्पेशल, युएस आहे की युरोप, कारचं लोन फिटलंय का, डेस्कवर पसारा असतो का, कँटीन मध्ये जेवण वाढणार्यांशी आणि हाऊस कीपींग वाल्यांशी चांगला वागतो का, केस कलर>>>
बेंचवरच्या लोकांकडून गवारी,
बेंचवरच्या लोकांकडून गवारी, अंबाडी, वाल, तुरीच्या शेंगा निवडून घेऊन ५ रु. महाग भावाने विकायला ठेवा आणि मिळालेला नफा मोडलेल्या फिरत्या खुर्च्या बदलायला वापरा. >> भारी
(No subject)
पर्फेक्ट!
पर्फेक्ट!
मस्त आवडलं
मस्त आवडलं
मस्त लिहीले आहे अनु.
मस्त लिहीले आहे अनु.
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
मस्तं!
मस्तं!
>आता बसा लेको जीवनसाथी आणि
>आता बसा लेको जीवनसाथी आणि शादी आणि मॅट्रीमोनी बघत."
जबरदस्त बरेच दिवसांनी मस्त वाचायला मिळालं..
>गरम नावाची लवंग धूम्रकांडी
फारच जोरदार निरीक्षण आहे.
>शेजारच्या कंपनीत
दुरून कंपनी चांगली, हेच खरं.
पण मॅनेजरसारख्या प्राण्याला मांजर हा अतिशय सौम्य शब्द दिल्याबद्दल तीव्र निषेध!
(No subject)
चायला, पण जाता येता मराठी
चायला, पण जाता येता मराठी मुलांना नावे ठेवण्याच्या प्रवृत्तीचाही जाहीरच निषेध. कोणीतरी लिहा रे मराठी मुलींबद्दल...
लयच भारी.. स्थळाची माहिती,
लयच भारी..
स्थळाची माहिती, समृद्ध नवरे वाल्या अप्रेझलला पगारवाढ न मागणार्या बायकांमुळे लटकणारी प्रमोशनं.. सगळंच
लई भारी/
लई भारी/
(No subject)
(No subject)
आवडलं
आवडलं
लै भारी..
लै भारी..
सुपर्ब..
सुपर्ब..
झकास जमलंय !
झकास जमलंय !
पंचेस भारी आहेत.
पंचेस भारी आहेत.
लेख भारी जमलाय. 'त्यातला'
लेख भारी जमलाय. 'त्यातला' नसलो तरी पंचेसला हसू आलं बरोब्बर!
*
अवांतर.
>>गरम नावाची लवंग धूम्रकांडी<<
गरम नावाच्या धूम्रकांडीत फक्त लवंग नसते. तंबाखू देखिल असते. प्लस, टार व निकोटीनचे प्रमाण इतर सिगारेटींपेक्षा प्र च ण्ड प्रमाणात अधिक असते.
महान.
महान.
जबरी!
जबरी!
(No subject)
जोरदार! उस गाँव की नसले तरी
जोरदार! उस गाँव की नसले तरी भापो
मस्त. आवडेश.
मस्त. आवडेश.
मस्तचं.!.
मस्तचं.!.
Pages