आपण इथे असण्याची कारणे

Submitted by बेफ़िकीर on 21 January, 2015 - 10:34

आज कोणी एक मायबोली सदस्य स्वतःचे सदस्यत्व घालवून बसला. प्रशासनाने हा निर्णय घेताना त्या सदस्याचा कालावधी, त्या कालावधीत त्याने मन लावून केलेले 'अवतारकार्य' व मायबोलीच्या उमद्या प्रवाहाला सोडून निव्वळ विशिष्ट सामाजीक / राजकीय भूमिकेचा प्रसार करण्याची मानसिकता बहुधा मापली.

त्या सदस्याने ही गोष्ट त्याच्या स्वतःच्या मनाला तितकी लावून घेतली नसेलही, कारण त्याला त्याचा अंत कदाचित माहीत असावा. किंबहुना, काही काळ स्वतःच्या भूमिकेचा दबदबा निर्माण करण्याच्या हेतूनेच त्याने सदस्यत्व घेतले असावे. कदाचित, तो येथल्याच कोणाचा आणखीन एक आय डी असेलही!

त्या सदस्याचे सदस्यत्व नष्ट झाल्यावर काही इतरांकडून झालेला उत्सव शिसारी आणणारा होता.

पण मायबोली म्हणजे फक्त राजकीय चर्चा किंवा राजकीय हेतूने आरंभलेल्या चर्चा नाहीत.

येथे अंगभूत कलेला वावही आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्यही आहे.

मी मायबोलीवर आलो त्यापूर्वी केव्हापासूनच आणि आजतागायतही येथे अनेक प्रकारचे धागे निर्माण होतात.

'मायबोली हे एक उथळ संकेतस्थळ आहे' असे काही इतर स्थळांच्या चालकांकडून ऐकलेले वाक्य मी तिथल्यातिथेच परतवून लावलेले होते. ह्याचे कारण माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मायबोली तुम्हाला व्यक्त व्हायला कधीही आडकाठी करत नाही. कारवाई झालीच तर ती निव्वळ विशिष्ट हेतूने कार्यरत असलेल्या सदस्यांवर, तेही, जर त्यांचे हेतू निव्वळ वादोत्पादक किंवा अशोभनीय असले तर.

प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेबाबत काही बोलण्याचा ना कोणाला नैतिक अधिकार आहे ना कोणाची ती योग्यता! पण आपण स्वत: 'तूर्त चालू असलेल्या राजकीय उखाळ्यापाखाळ्यांचे अस्तित्त्व' दिसत असूनही मायबोलीवर येणे किती एन्जॉय करतो व का करतो ते कृपया लिहावेत अशी विनंती!

अत्यंत परस्परविरोधी मतांचे लोक येथे येऊन नांदत राहतात, नांदू शकतात. मायबोली राजकीय धाग्यांपलीकडे खूप काही आहे. असे तुम्हाला वाटते का? की आता येथे फक्त तेच तेच चाललेलेल असते असे वाटते?

नम्रपणे मान्य करतो की हा प्रश्न विचारण्याची योग्यता माझी नाही कारण माझ्यापेक्षा दहा, दहा वर्षे आधीपासून येथे असणारे कित्येक सदस्य आहेत. पण तेही इथे अजूनही येतातच.

खूप काही बिनसल्यासारखे आपल्याला तरी वाटत नाही राव! अजूनही अनेक इतर गोष्टींचा आनंद घेता येतो.

कृपया, तुमची उत्स्फुर्त मते येथे द्यावीत अशी विनंती! ही विनंती करतानाही मला प्रशासनाने दिलेल्या स्वातंत्र्याचाच मी एक प्रकारे वापर करत आहे ह्याची नम्र जाणीव आहे. पण मत द्यायचे नाही असे कृपया करू नका. जे काय असेल ते मत द्या!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कथा वाचायची फार आवड आहे. आंतरजालावर शोधताना 'बेफिकीर' यांचा 'बोका' सापडला आणि त्याच्या करामती फार आवडल्या आणि झपाटलेल्यासारख बेफिंच्या सगळ्या कथा / कादंबर्या वाचुन काढल्या. माबोवर माझे येण्याचे खरे कारण म्हणजे 'बेफिकीरराव आणि त्याचं बोका हे पात्र. माबो वरच्या जवळपास सर्व कथा वाचुन का़ढल्या. बेफिकीरराव, विशाल कुलकर्णी , कवठीचाफा, नंदिनी, दिनेश., जिप्सि व नवेदीत लेखक "स्पार्टाकस" यांचे त्यांच्या दर्जेदार लिखाना बद्द्ल मनपुर्वक आभार!!!!!

ता.क. - बेफिकीरराव आपण सनम, भुक्कड, अन्या ह्या कथा जमल्यास पुर्ण करा हि कळकळीची विनंती..

पहिल्यांदा इथे आलो ते माझ्या एका नातेवाईकाने बेफिकीर यांची एक कथा वाचायला दिली तेव्हा.
त्यानंतर त्यांच्या सगळ्या कथा, कादंबऱ्‍या वाचून काढल्या.
आणि मग ओढ लागल्यासारखा इथे येऊ लागलो.
बाकीच्यांच्या कथा पण वाचायला चांगल्या होत्या.
त्यानंतर फक्त प्रतिसाद देण्यासाठी सदस्य झालो.
अवांतर- बेफिकीर खरच अन्याचं काहितरी करा राव.

>>> shara | 31 January, 2015 - 17:27 नवीन

ethe aale ki ekatepanachya dipretion madhun baher padalyasarakh vatat..
<<<

मला सर्वात आवडलेला प्रतिसाद आत्तापर्यंतचा! Happy

सर्वांचे पुन्हा आभार

पहिल्यांदा इथे आलो ते माझ्या एका नातेवाईकाने बेफिकीर यांची एक कथा वाचायला दिली तेव्हा.
त्यानंतर त्यांच्या सगळ्या कथा, कादंबऱ्‍या वाचून काढल्या.
आणि मग ओढ लागल्यासारखा इथे येऊ लागलो.
बाकीच्यांच्या कथा पण वाचायला चांगल्या होत्या.
त्यानंतर फक्त प्रतिसाद देण्यासाठी सदस्य झालो.
अवांतर- बेफिकीर खरच अन्याचं काहितरी करा राव.

पहिल्यांदा इथे आलो ते माझ्या एका नातेवाईकाने बेफिकीर यांची एक कथा वाचायला दिली तेव्हा.
त्यानंतर त्यांच्या सगळ्या कथा, कादंबऱ्‍या वाचून काढल्या.
आणि मग ओढ लागल्यासारखा इथे येऊ लागलो.
बाकीच्यांच्या कथा पण वाचायला चांगल्या होत्या.
त्यानंतर फक्त प्रतिसाद देण्यासाठी सदस्य झालो.
अवांतर- बेफिकीर खरच अन्याचं काहितरी करा राव.

आपण इथे असण्याची कारणे >>>

- आपण या जगात ऑलरेडी आलेलो आहोत आणि आपल्याला लिहीता वाचता येते.
- वरच्या कारणाला धरून पुढचे कारण म्हणजे हे "स्थळ" आपल्याला ( न दाखवता किंवा दाखवून) पसंत पडले.
- कुणीतरी हे स्थळ जालावर बनवले आणि त्याचे मार्केटींग झाले किंवा न झाले तरी सदस्य मात्र वाढत गेले, ज्यामुळे ही आपल्याला ते आवडले असावे.

माझ्या मते ही मुलभूत कारणं असावीत. आता स्पेशलायझेन करायचं म्हटलं तर...:हाहा:

स्पार्टाकसप्रमाणेच. बाकी आपल्याला कोणी आवडले नाही अथवा कोणाला आपण आवडत नसल्यास तर कोणी लगेच गाव सोडतो का? फारतर रस्ता बदलून चालतो.

हा धागा म्हणजे आपलीच टीमकी आपण वाजवण्याचा प्रकार आहे. एकमेकांच्या पाठ खाजवण्याच्या असल्या उथळ प्रकारांपासुन दुर रहाणे माबो साठी चांगले असेल.

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद बेफिकीर. Happy माझी प्रतिक्रिया टोचा यांना उद्देशून होती.
आ.न.,
-गा.पै.

नमस्कार मंड्ळी.
मी अजुन नवीन आहे इथे. आधी गुपचुप लेख वाचले पन हळुहळु प्रतिसाद द्यवासा वाटला म्हणुन सभासद झालो. परदेशात तेवढाच एक विरंगुळा.

ॠन्मेश Happy & बेफिंचे लिखान आवडते त्यामुळे इथे वारंवार येणे होते.

Pages