यमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो

Submitted by गणेश पावले on 15 January, 2015 - 07:11

जोडून शब्दास शब्द भाव मनातले लिहावे म्हणतो
यमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो

खूप झाले हसे आता किवितेत तिला शोधावे म्हणतो
भास आभास खूप झाले जवळून तिला पहावी म्हणतो

डोळे भिडले होते कधीकाळी जवळ तिला घ्यावी म्हणतो
हृदयाचा ठोका चुकवून मिठीत तिला भरावी म्हणतो

लपंडाव मनाचा होता आता सत्यात खेळी खेळावी म्हणतो
राहता राहिले आयुष्य थोडे आता तरी पत्रिका जुळावी म्हणतो

खोडून सारे पाश आता माझीच तिला करावी म्हणतो
जोडून शब्दास शब्द एक गझल तिच्यावर लिहावी म्हणतो

कवी - गणेश पावले
१५/०१/२०१५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो
काहीही लिहिता राव. गझल अशी थोडेच होते. फारफारतर गझलसदृश्य रचना व्हावी.
आपली रचना गझलसदृश्य म्हणावी अशीही नाही. वाईट वाटून घेऊ नये, सुरुवातीला असे होतेच.
कृपया रचना कविता विभागात हलवावी. तसेही कविता विभागात काहीही चालते (गमतीत घ्याल).

धन्यवाद.

समीर

धन्यवाद

समीर दा…. वाईट अजिबात वाटणार नाही
मी कधीच गझल लिहिली नाही…
हा थोडाफार प्रयत्न होता………………

तरीही मात्रा जुळल्या नाहीत…।

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

पहिल्यांदा वृत्तात लिहिणे आवश्यक आहे. आपण अक्षरगणवृत्तात लिहावे असा सल्ला देइन.

उदा. भुजंगप्रयात वृत्त घ्याल तर गण असे असतातः

१२२ १२२ १२२ १२२
इथे -हस्व ला १ मात्रा तर गुरू ला २.
प्रत्येक ओळ ह्या वजनात हवी (आधारासाठी मनाचे श्लोक गुणगुणू शकता मात्र त्यात वृत्त निभावले गेले नाही अनेक ठिकाणी.
पहाटे पहाटे मला जाग आली हे भटांचे गीत ह्याच वृत्तात आहे.
एक सोपा मार्ग म्हणजे भटांचा एल्गार विकत घ्या. त्यात आवश्यक सगळे काही मिळेल).

त्यानंतर गझलेची बाराखडी वाचालः http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
अगोदर नाही.

समीर