व्हि स्लायसरविषयी

Submitted by मंजूडी on 14 January, 2015 - 23:44

- इथे व्हि स्लायसर कोणी वापरला आहे का?
- भारतात उत्तम मिळेल असा कुठला विशिष्ट ब्रँड आहे का?
- मराठी जेवणात करतो त्या भाज्या त्यात व्यवस्थित कापता येतात का? उदा. बटाट्याच्या काचर्‍या, कोबीच्या भाजीसाठी - लागणारा बारीक चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो - कोशिंबीरीसाठी बारीक किंवा भाजीत घालण्यासाठी थोडे मोठे तुकडे, चायनीज पदार्थांसाठी लागणारे श्रेड्स इत्यादी
- भोपळी मिरची त्यामधल्या बिया काढून कापता येते का? लांब लांब किंवा त्रिकोणी तुकडे?
- पालेभाज्या???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी, खाली दिलेल्या लिंक्स पाहा. भारतात हे मिळतात म्हणून ह्या लिंक्स दिल्या आहेत.

http://www.amazon.in/Swissmar-V-2053-Borner-Julienne-Slicer/dp/B00E397I5...

http://www.amazon.in/Swissmar-Borner-V-1001-V-Slicer-Mandoline/dp/B00006...

मी हा नुकताच घेतला आणि मस्त चिरणे, कापणे जमतेय. जवळ जवळ सगळ्याच भाज्या चिरणे, गूळ किसणे होतेय.

http://www.amazon.com/gp/product/B000VZRZE8/ref=oh_aui_detailpage_o02_s0...
अमी

मंजूडी, अमी ने दाखवलाय तसलाच माझ्या आईकडे होता आणि आहे. मी तो वापरला आहे.. टोमॅटो, कांदा ह्यांचे स्लाईस तसच बटाट्याच्या भज्यासाठीचे काप, छान होतात. कोबी छान श्रेड होतो. भाजीसाठीचे डाइसेस होतात. भाज्या ताज्या असतील तर काम चांगले व पटपट होते. पालेभाजी साठी फार वापरल्याचे आठवत नाही.. पण सॅलड्स व भाज्यांसाठी कापायच्या वस्तू चांगल्या चिरता येतात.
विशेष सूचना म्हणजे त्याच्या होल्डर शिवाय भाज्या हातात धरून काम केले तर हातही छान कापला जातो. [बहुतेक वेळा हे होल्डर च्या कपॅसिटी च्या बाहेरच्या भाज्या (होल्डर च्या आत अडकलेला भाजीचा भाग वेस्ट होउ न देण्यासाठी !) चिरताना होते]..

शिवाय भाज्या हातात धरून काम केले तर हातही छान कापला जातो.>> सहमतच! काकडी चिरताना माझ्या उजव्या हाताच्या बोटाचा १-२ एमएम चा स्लाइस निघाला होता, नशिब व्हेन जस्ट खाली होती पण, हात २ तास वर (आकाशातल्या मायबापाला विन्तती स्ताइल) धरुन ठेवायला सान्गितला होता, तेव्हढ्या वेळात ही भरपुर रक्त गेले होतेच तेव्हा ह्यावर काम करताना फोकस पुर्ण त्याकडेच हवा.
बाकी झटपट पटपट होतेच काम!

पीसलिली, सोनचाफा, प्राजक्ता धन्यवाद!!
हो! हातही मस्तपैकी कापला जातो हे ऐकलं आहे. माझ्या एका मित्राला बोटाला टाके घालावे लागले होते.
मी आता वरच्या लिंक बघते आणि ठरवते काय ते.