"पारवा" - एक अधुरी प्रेम कहाणी .

Submitted by विश्या on 14 January, 2015 - 06:14

(भाग - १ )
नमस्कार मित्रहो , पारवा हि कथा एका प्रेमी युगुलाच्या आयुष्यावर आधारित आहे . कथा थोडी फिल्मी आहे वाटते पण कथेतील सत्यता आणि पारदर्शकता फिल्मी नाही .
नरेश हा एक खाजगी कंपनी मध्ये अभियंता म्हणून काम करत होता , हि कथा आहे नरेश आणि त्याची अधुरी राहिलेल्या प्रेम कहाणीची .
"नरेश हा एका खेडे गावात शिक्षण झालेला पण अत्यंत हुशार व जिद्दी असा तरुण होता , नरेश चे गाव अतिशय निसर्ग संपन्न होते , डोंगर्याच्या कुशीत वसलेले , त्याला साथ वाहणाऱ्या संथ नदीची जी आपल्याबरोबर चांगले वाईट जे काही आपल्यात मिसळेल ते आपल्या बरोबर वाहून नेणारी , आंबा , फणस, काजू , नारळ अश्या अनेक फळांच्या बागा तर दुसरी कडे लहान लहान पाण्याचे वडे नाले , गाव नुसत कौलारू घरे आणि लहान लहान दगडी वाडे यांनी भरलेले , तर एका बाजूला रल्वे सेवा गावातील वेशीवरून जात असल्यामुळे लोकांना शहरात जा ये करण्यासाठी रेल्वे हि एकमेव सेवा जास्त उपयोगी पडत होती .
images.jpg
नरेश हा मध्यम वर्गीय कुटुंबातील पण पाटील घरातील एक मुलगा होता .एकंदरीत काय तर नरेश चे सगळे व्यवस्तीत चालू होते आता तो नववीच्या वर्गात होता आणि वार्षिक परीक्षेच्या तयारीत होता .
तर दुसरीकडे दिन्या कुंभाराचा घरात जनम्लेलि संगीता हि तिची मुलगी ती हि असेल जवळ पास १६ वर्षाची , संगीताला तिचा बाप लाडाने संगी म्हणायचा, त्यानेच आवाज दिला
“ संगे जर इकडे ये ग , चीक्लात पाणी वत माती कालवायची आहे , चिकुल तयार झाला कि गाडगी वळून ठवतो ”
बापाचा आवाज कानावर पडताच छुम छुम पंजानाचा आवाज कडत , कमरेवर एक मटके ठेऊन लटक मटक चालत , केसांची बटा बाजूला ढकलत , लाडिक पणे बापाला पाणी द्यायला आली , पाणी चीक्लात ओतत बोलली
“ बाबा तुमाला कितीदा सांगितले मला संगे म्हणत जाऊ नका म्हणून , तुमच्या मुळ माझ्या सगळ्या मैत्रिणी मला संगेच म्हणू लागल्यात , त्यावर दिन्या म्हणाला
“अग पोरी मी तुझा बाप आहे तुला लाडाने संगे म्हणतोय आता बघ तुझ्या आईचे नाव सविता पण मी तिला सवेच म्हणतोय कि , पण तरीबी तुला आवडत नसेल तर नाही म्हणत , आणि जरा आता पाणी ओत्शील चीक्लात” , तशी ती सावध होऊन पुन्हा पाणी ओतून तीतून निघून गेली .
दिन्या (उर्फ दिनकर ) गोरख कुंभार गावातला एकुलता एक कुंभार, घर याचे वडिलोपार्जित कुंभाराचा व्यवसाय करून घर चालवत असे , बापाचे १/२ एकर माळरान होते आणि घर पण तरीही आपल्या एकुलत्या एक लेकीची सर्व हौस पुरवायचा प्रयत्न करत होता , संगीताच्या आईला एकच काळजी असायची संगीताच्या लग्नाची , सारक एकच धरून असायची शिकून काय मोठी ब्यरिस्टर होणार हाय तवा , आईच वेगळेच गणित चालू होते , लवकरात लवकर एकादा चांगला जागा आला कि संगिताच लगीन लाऊन द्यायचं . आणि त्यासाठी तिने आपल्या भावाच्या पोरासाठी एकदा दिन्याला सांगितले पण होते पण दिन्याने ऐकणे टाळले होत .
आणि त्या दिवशी म्हणजे संक्रातीच्या आधी भुगी असते त्यासाठी लागणारी मटकी (लोटकी) विकण्यासाठी दिन्याने एका अळीला सविता ला लोटकी घेऊन पाठवले होते तर दुसरीकडे संगीता पाटल्याचा अळीला गेली होती, पहिलाच वाडा हा नरेश चा होता. तिने दारातूनच हाक दिली ,
" कुणी हाय का घरात , मी आल्या , कुंभाराची संगी “ .
"लांब केस , गोरा रंग , भोरे डोळे , गुलाबी गाल, योग्य असा बांधा, उंची ५.५ फुट असावी , पण तीच रूप तिची अदा , तिला पहिले तर पाहताच राहावे अशी छबी होती तिची खरी . दिन्या कुंभार मातीला आकार देण्यात मग्न असताना , निसर्गाने एक अतिशय सदृढ अस शरीर सांगितला बहाल केल होत. त्याच्या मुलीला निसर्गाने एक अतिशय सुंदर असा आकार भरला होता . तिला पाहून नरेश पहिल्या नजरेतच घायाळ झाला , एक सुंदर मुलगी सकाळ सकाळी आपल्या दारात उभी होती, एकसारका तिला बघतच राहिला होता, तिच्या डोक्यावर बुट्टी होती त्यात लोटकी होती , भुगी पूजनासाठी लागतात म्हणून विकायला आली होती , तिने वाड्याच्या आत येउन आवाज दिला कोण आहे का घरात , आजी “काकू , मी आल्या , मी ..... संगी ,,,,,, कुंभाराची ,,,,, भुगी पुजायला लुटकी अन्ल्याती .
नुकतीच यौवनात पदार्पणात केलेली , अतिशय मनमोहक , अगदी स्वप्नसुंदरी , तिला पाहून नरेश जाग्यावरच खिळून गेला होता ,
तिने पुन्हा आवाज दिला , आजी ,,,,,,,,,,” जरा आला काय “,,,,,
तोच समोरून आवाज आला ६० ते ६५ वर्षाच्या ( सोनाबाई पाटील) आजीचा -
" आलो ग थांब "
आजीचा आवाज एकदम खणखणीत होता , तसेच म्हातारी पण खमकी होती डोक्यावरचे पांढरे झालेले केस सुचवत होते तिने किती पावसाळे खाल्ले असतील याचा, नौवारी साडी आणि चोळीत उठून दिसत होती म्हातारी ,
” आलो ग पोरी थांब , काय अनलेस , लोटकी व्हय “
, बर झाल आलीस नाही तर मीच कुणाला तर पाठवणार हुतो दिन्या कडे लुटकी अनाया. ये आत ये , “ ये नर्या जरा बुट्टी उतरू लाग की तिला नुसत बघत काय बसल्यास तिज्या तोंडा कड आं”,
आजीचा आवाज कानावर पडताच नरेश एकदम दचकून जागा झाला आणि
“व्हय व्हय म्हणत बुट्टी उतरवायला पुढे झाला “
बुट्टी उतरताना त्याचे लक्ष पूर्ण पणे संगीतावर होते , तिचे ते रूप , तिचे शरीर आणि आवाजातील गोडवा , बुट्टी पकडताना थोडासा स्पर्श झाला तिच्या हाताला तसा ४४० चा झटका बसावा तसा झाला होता नरेश . बुट्टी उतरून खाली ठेवल्यावर आजीने तिला बसाया सांगितले पाणी प्यायला दिले , किती गुणाची हायस ग पोरी तू ,
“ गोरा कुंभाराची नात ना”
, "व्हय " ,
“लय देखणी हायास बघ देवाने साक्षात इंद्राच्या दरबारातील अप्सराच धाडली आहे गोरा कुंभाराच्या घरी . तुझा आजा पण लय कष्टाळू होता आणि तुझा बाप पण लय कष्टाळू हाय , तुझ्या एवडा असताना तोच यायचा लुटकी द्यायला आणि हक्काने शेर भर जुन्धाळ मागायचा ५ लोट्क्या वर.
“साळला जातीस का नाही ग पोरी , तुझ्या सारक्या सुंदर मुलीला उन्ह तान्हात हे वज्ज घेऊन मातीची लुटकी विकायला लागत्यात , देव बी प्रत्येकाला कशात कशात ना कमी जास्त देत असतो बघ पोरी , ह्यो माझा नातू तुझ्या एवढाच हाय पण काय काम करत नाही नुसत हिंडण आणि दोन पुस्तक वाचन एवडाच धंदा हेचा.
संगीने आजीला विचारले
“किती लुटकी देऊ आजी ?” पाच कि सात म्हजी काय काय जन सात पण पुजात्यात म्हणून इचारलं. "सात दे बाई, मग “ ये नर्या जा कनकी मधन शेर भर जुन्धल अन ,
आजीचा आवाज ऐकून नर्या सावध झाला आणि जुन्धल अनाया आत गेला , पाचच मिनटात परत आला जुन्धल घेऊन , पण येताना एकाच विचार करत होता आपण जर या मुलीशी लगीन केल तर आपण हिला असली कामे कधीच करू द्यायची नाही , राणी सारकी फक्त आपल्या जवळ ठेवायची , नर्या स्वप्नात गुंतत गेला होता तिच्या .आणि जुन्धल तिच्या बुट्टीत देऊन परत बुट्टी उचलून दिली तिला . आजीने पुन्हा एकदा जाताना तिची स्तुती केलेली ,
“लय गुणाची पोर ग बाई तू , गोरा कुंभाराच्या घरात लक्ष्मी ने जनम घेतलाय तुझ्या रुपान “ . आजीने संगीची केलेली स्तुती नर्या ला पण लय आवडली आणि कायम आजीच्या विरोधी गटात असणारा नर्या आता तिच्या गटात सामील झाला होता .
दुसर्याच दिवशी नर्याने संगीताच्या घराचा पत्ता , तिची शाळा , इयत्ता , तुकडी , तिच्या घरा जवळच्या आपल्या मित्रांना गाठून पण आलेला , आणि त्याने आपल्या बहिणीला पण तिच्याशी गट्टी करायला सांगितली होती . “साउ” , नर्या ची बहिण अतिशय गोड व समजूतदार अशी बहिण लाभली होती नर्या ला तो तिच्याशी सगळ्या गोष्टी शेर करत असायचा, साउ ने नरेश च्या सांगण्यावरून तिला बरेच दा आपल्या घरी बोलावले होते पण ती कामामुळे येत नसे .
नरेश ला काय तिच्या विना राहवेना , त्या वयातील आकर्षण म्हणावे कि प्रेम हे माहित नाही पण त्याला , जिकडे जाईल तिकडे तीच दिसायची , कशात लक्षच लागेना त्याचे , नजरे समोर तिचाच चेहरा ठाण मांडून बसलेला असायचा , कोण जरी दिसले तरी तिच्या मध्ये तिला संगिताच दिसत होती पूर्ण पणे तिच्या प्रेमात वेडा झाला होता, पागल झाला होता तिच्या प्रेमात ,
एके दिवशी तर त्याने मित्राच्या घरी जाण्याच्या बहाण्याने संगीताच्या घरी आला आणि उगाचच मटकीची चौकशी करण्याच्या बहाण्याने संगीशी बोलू लागला , उगचः काहीही प्रश्न विचारून त्याने हळूच तिला मुद्दामच शाळेबद्दल विचारले , व साउ हि आपली बहिण असल्याचे सांगितले , तिच्या मुळे का होईना संगीता ने त्याला घरात बोलावले चहा दिला , घरच्यांनी लगेचच ओळखल होत त्याला , जाताना सर्वांच्या पाया पडून भावी सासू सासर्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला होता त्याने आणि काहीसा सफल हि झाला होता , त्याचे संस्कार पाहून संगीच्या घरचे हि खुश झाले होते त्याच्यावर . हळू हळू संगीताशी भेटी घाटी वाढल्या , तिच्याशी मैत्री केली चांगली घट्ट मैत्री झाली होती दोघाची .आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी नरेश तिला आपल्या मनातील गोष्ट सांगणार होता आणि प्रेमाचा पहिला आवाज तिला देणार होता .
साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शोधला होता त्याने आपल्या प्राण प्रियसीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी , तो दिवस होता दसर्याचा , सोने घ्या आणि सोन्यासार्के राहा " या वाक्याचा . नरेश सकाळ सकाळी लवकर उठून अंघोळ देव पूजा करून एक मोठे आपट्याचे पण आणून ठेवतो संध्याकाळचा संदेश या पानावरच लिहून तो सांगितला देणार असतो .
सायंकाळी ५ च्या दरम्यान सर्व लोक माळावरील मोकळ्या रानात जमले होतो सोने लुटीचा कार्यक्रमासाठी , गावातील पाटलाने हवेत बंदुकीचा बार उढवला तसा सर्व गावकर्यांनी खरोखरचे सोने लुटली जाईल त्या पद्धतीने सोने लुटले होते . सोने घेऊन नर्या ने प्रथम देवळातील पालखीला वाहले , आपल्या आजच्या कामात यशस्वी होण्याचा आशीर्वाद मागितला आणि थेट घरी आला , घरी त्याने कधी नाही ते पाहिलान्द्या आपल्या आजीला पहिल्यांदा सोने वाटले होते , आजी ने गोड मनाने आणि कौतुकाने त्याला आशीर्वाद दिला होता , घरातील सर्वाना सोने वाटून नरेश पुढच्या ध्येयाकडे (मिशन संगीता ) कडे कूच करत होता , तीन गल्या पार करून तो गोरा कुंभाराच्या घरी आला त्याने आदराने दिन्या आणि सविता ला सोने वाटले होते व संगीताची चौकशी करू लागला तर घरच्यांनी सांगितले
“ती हि आताच सोने वाटायला बाहेर गेली आहे , मैत्रिणी बरोबर , तुला भेटलं वाटेत कुठे तर”.
संगीता घरी न भेटल्यामुळे खूप नाराज मनाने तो तीतून बाहेर पडला , एक एक गल्ली करत जवळ पास सगळे गाव पालथे घातले, हताश झाला होता बिचारा , त्याने सकाळी आणलेलं अपट्यच पण पुन्हा एकदा पहिले आणि परत किशात ठेऊन दिले , शेवटी जाता जाता त्याने कदम गुरुजीच्या घरून जायचे ठरवले , आणि आत जातो तर काय संगीता आणि तिच्या २ मैत्रिणी तिथे दिसल्या ,,,, त्याचा सगळा थकवाच निघून गेला , त्याने गडबडीने मास्तरांना सोने वाटले , घरातील सर्वाना सोने वाटले आणि बाहेर आला तर संगीता थोडीशी पुढे निघून गेली होती तर तिच्या मैत्रिणी घरी चालल्या होत्या ,
त्याने सांगितला आवाज दिला , थांबवले , जोर जोरात श्वास घेत तो तिच्या जवळ आला , धाप लागत होती त्याला , मन थोडेसे घाबरले होते, हात थरथरत होते , जीभ जड झाली होती , पण धीर न सोडता त्याने संगीता ला आपल्या किश्यातील सोने काढले व तिच्या हातात दिले आणि म्हणाला
" सोने घे आणि आयुष्यभर साथ दे "
एकदामात त्याने वाक्य टाकले , संगीता ते वाक्य समजे पर्यंत पुढे बोलला मला जे काय सांगायचे आहे ते या पानात लिहिले आहे ते वाच .
download_0.jpg
त्या पानावर नरेश ने एक लव काढले होते त्यात एका बाजूला संगीता आणि दुसर्या बाजूला नरेश असा लिहील होत . आणि सोबतच एक चिट्टी जोडली होती , त्यातील मजकूर --- संगीता मला तू खूप आवडतेस , तुला जवा पासून बघितलं त्या दिवशी पासून मी तुझ्या प्रेमात पडलोय , जिकडे बगेल तिकड तूच दिसत असतीस , माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे , जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल , तुलाबी मी आवडत असेन तर उद्या संद्याकाळी शाळा सुटली कि तुमच्या शाळेच्या मागे असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ मी तुझी वाट बघत थांबेन , तिथ येउन भेट .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्या, खरच वाचताना त्रास होतोय. तशीच रेटून वाचली.
परिच्छेद, संवाद... व्याकरण... कृपया बघाच. फक्तं पुढल्या भागातच नाही. हा भाग सुद्धा सुधाराच. कशाला गालबोट तरी ठेवायचं?
पुढले भाग येऊदेत... शुभेच्छा