दाता कोण घेता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 January, 2015 - 12:09

माझे मन तुला
टाकले देवूनी
तरीही विकार
येतात दाटुनी

कळल्या वाचुनी
येते हे घडुनी
हातातुनी पाणी
जाते ओघाळूनी

का न तू मन हे
घेतले अजुनी
का न मज देता
आले ते अजुनी

उदास अंतर
भरले व्यथेनी
दाता कोण घेता
न ये रे कळूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरी करायला पाहिजे असे वाटत असते पण काय करायचे हे कळत नसते.
इतरांना असे वाटत असते की आपले जीवन कसे ताला सुरात व अगदी योग्य पणे चालले आहे पण आतला आवाज सांगत असते की अजून काहीतरी कमी आहे. पण काय कमी आहे ते मात्र कळत नसते.