Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 January, 2015 - 12:09
माझे मन तुला
टाकले देवूनी
तरीही विकार
येतात दाटुनी
कळल्या वाचुनी
येते हे घडुनी
हातातुनी पाणी
जाते ओघाळूनी
का न तू मन हे
घेतले अजुनी
का न मज देता
आले ते अजुनी
उदास अंतर
भरले व्यथेनी
दाता कोण घेता
न ये रे कळूनी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विक्रांत प्रभाकर, सुंदर भाव
विक्रांत प्रभाकर,
सुंदर भाव
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद विनायक ,सुचक
धन्यवाद विनायक ,सुचक
सुरेख.. खरच आवडली कळल्या
सुरेख.. खरच आवडली
कळल्या वाचुनी
येते हे घडुनी
हातातुनी पाणी
जाते ओघाळूनी
काहीतरी करायला पाहिजे असे
काहीतरी करायला पाहिजे असे वाटत असते पण काय करायचे हे कळत नसते.
इतरांना असे वाटत असते की आपले जीवन कसे ताला सुरात व अगदी योग्य पणे चालले आहे पण आतला आवाज सांगत असते की अजून काहीतरी कमी आहे. पण काय कमी आहे ते मात्र कळत नसते.