मला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)
१) गाजराची फुलं
From mayboli
२) गाजर आणि मुळ्याची फुलं तयार करुन ती टुथ पिक च्या सहायाने मोसंब्यावर लावून फ्लॉवर पॉट तयार केला आहे.
From mayboli
३) ही काकडी आणि टोमॅटोची कमळं तयार केली आहेत.
From mayboli
४) टोमॅटोच्या कमळांनी सजलेले हे औक्षणाचे तबक
From mayboli
५) ही आहेत कांद्यापासून तयार केलेली फुल
From mayboli
हे मी केलेले सॅलड डोकोरेशन
१)
From mayboli
२)
From mayboli
ही ती सुरी. ही सुरी छोटीच आहे. साधारण पाच इंच लांब असेल. हीच हँडल लांब आहे आणि प्रत्य़क्ष सुरीचा भाग त्यापे़क्षा लहान आहे. धार नॉर्मल आहे आणि पुढे हीला पॉईंट आहे. खूप धारेची सुरी लागत नाही कार्विंग साठी तर लागतो हातावर कंट्रोल. कार्वींग करताना आपण भाजी कापताना सुरी धरतो तशी नसते धरायची तर लिहीण्यासाठी आपण पेन जसं धरतो तशी धरायची सुरी. अनामिकेने ( मधल्या बोटाच्या जवळचे बोट ) ज्यावर कार्व करणार आहोत त्यावर हलकेच दाब द्यायचा आणि कट करायच फर्मली असं टेकन्किक आहे त्याचं. प्रॅकटीस नी जमतं. मला ही खूप छान जमतयं असं नाही अजून खूप सुधारणा हवी आहे याची जाणीव आहे. कार्विंगचे व्हिडीओ बघताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते त्यांचं स्कील बघुन.
हं चला तर तयार व्हा टोमॅटो काकडीवर वार करायला (स्मित) इथे फोटो टाका मात्र आपल्या कलाकुसरीचे.
वॉव ... खुप सुंदर .. यातले
वॉव ... खुप सुंदर ..
यातले काही फोटो मी सेव्ह करुन ठेवले तर चालेल का आयडिया साठी ? मी कॉपी करेल तुमची .. if you don't mind
टीना , धन्यवाद. अग कॅापी
टीना , धन्यवाद. अग कॅापी केलेस तर काहीच प्रॅाब्लेम नाहीये. नक्की चालेल.
.
धन्यवाद
धन्यवाद
खुप सुंदर! !!! आम्हालाही
खुप सुंदर! !!!
आम्हालाही शिकवा.
फारच सुरेख!
फारच सुरेख!
ओहो मस्त मस्त . फारच छान
ओहो मस्त मस्त . फारच छान
अर्रे मैने कैसे मिस्स किया
अर्रे मैने कैसे मिस्स किया ये.. सुर्रेख आहे..
ममो तुझ्या कार्विंग नाईव्ज च्या सेट चा फोटो टाक ना इथे.. आणी कोणत्या ब्रँड चे, कुठून घेतलेस ते तेही कळव...
प्लीज
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
वर्षु, अग माझ्याकडे कार्विंग नाईफ चा सेट वैगेरे काही नाहीये. भांड्यांच्या दुकानात कार्वींग ची म्हणून एक पंधरा रुपयेवाली सुरी मिळते तीच आहे.
हेडर मध्ये एक आणखी फोटो अॅड करत आहे. ती आहेत आपल्या नॉर्मल कांद्यापासून बनवलेली फुल.
एकदम छान आहे हो कलाकुसर.
एकदम छान आहे हो कलाकुसर.
कांद्या ची फुलं..
कांद्या ची फुलं.. सुर्रेख!!!
इतर व्याप सांभाळून कधी वेळ मिळतो तुला बाई, हे सर्व करायला __/\__ कौतुक वाटतंय फार!!!
सुंदर!! मस्त! औक्षणाचं तबक
सुंदर!! मस्त! औक्षणाचं तबक सुरेख झालंय
ती पंधरा रुपये वाली सुरी घेऊन येते मी पण आणि हे बघते जमतंय का
सुंदर!! त्या सुरीचा पण फोटो
सुंदर!! त्या सुरीचा पण फोटो टाका ना प्लिज.
वॉव, खूपच छान आहेत सगळीच
वॉव, खूपच छान आहेत सगळीच कार्विंग.. आणि मलाही बघायची आहे ती सुरी. प्लीज फोटो टाका ना..
वॉव्व..... मस्त. इथे
वॉव्व..... मस्त. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
कांद्याची फुल मस्तच.. आत लाल
कांद्याची फुल मस्तच.. आत लाल गाजर आहे का ममो ?
सुरीचा पण फोटो टाका ना प्लिज. >> +१
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
धन्यवाद सगळ्यांना परत एकदा.
धन्यवाद सगळ्यांना परत एकदा.
घरी गेले की सुरीचा फोटो टाकते इथे.
अप्रतिम आहे...क्रोशाचे रुमाल
अप्रतिम आहे...क्रोशाचे रुमाल पण सुंदर आहेत .
हेडर मध्ये सुरीचा फोटो टाकत
हेडर मध्ये सुरीचा फोटो टाकत आहे. कार्विंग वरुन एक किस्सा आठवला तो सांगते.
एकदा बाजारात भाजी फळं वगैरे घ्यायला गेले होते. एक पपई वाला बसला होता. त्याकडे माझी नजर वळली . त्याने ही पाहिलं मी पपईकडे बघतेय ते. त्याला वाटलं की पोटेंशियल कस्ट्मर आली आहे तेव्हा त्याने पपईची भलामण करायला सुरवात केली ... ताई, घ्या ना गोड आहे, बिन बियांची आहे वैगेरे.
त्याला कुठे माहित होत की मला पपईत इंटरेस्ट नाहीये तर मला इंटरेस्ट आहे तो त्यांने पपईच्या केलेल्या कमळात. ( स्मित)
भाजीवाल्या ही कधी कधी मस्त कार्विंग करुन ठेवतात जसे चिकु, लाल पेरुची फुले. पपईचे कमळं . बीट कांद्यापासून फुले ई. वर कांद्याची केलेली फुले मी भाजीवाली कडून प्रेरणा घेऊनच केली आहेत ( स्मित)
ओहो..हि का सुरी ती !
ओहो..हि का सुरी ती ! ..
प्रचिबद्दल धन्यवाद ममो..
आणावी लागेल आता विकत
फोटो आणि कार्विंगच्या
फोटो आणि कार्विंगच्या टिप्ससाठी धन्यवाद मनीमोहोर.. अजून माहिती लिहीता आली तर नक्की लिहा.
Pages