मध्यंतरी प्रवासात रस्त्याकडेला लागून एक शाळा होती आणि शाळेवर एक मोठी पाटी होती.
YOUR CHILD IS IN NO PUNISHMENT ZONE
ही पाटी लावलेली पाहून इतके चटकन् लक्षात आले की पालकांना शाळेबाबत विश्वासार्हता वाटावी ह्यासाठी हे विधान मुद्दाम एखाद्या जाहिरातीसारखे झळकवले गेलेले आहे.
साहजिकच मी शाळेत होतो त्या काळाची ह्या काळाशी 'विद्यार्थ्यांना शिक्षा करणे' ह्या निकषावर होऊ शकणारी तुलना मनात आली आणि हे जाणवले की आजच्या पालकांना इतर कोणी आपल्या पाल्याला शिक्षा केलेली खचितच आवडत नसणार. आवडत नसणार असे म्हणण्यापेक्षा तसे घडल्यास आजचे पालक चवताळून उठतही असतील कदाचित, असेही वाटले. पुन्हा साहजिकच आमच्या पालकांच्या ह्यासंदर्भातील भूमिकेची आठवण झाली व तेव्हाच्या काळात शिक्षा सहजपणे दिल्या जात असून आपल्या पाल्याला शिक्षा होणे ही बाब पालक 'शिक्षकांना अपेक्षित असलेल्या गांभीर्याने' घेत असत हे आठवले.
धाक दाखवून विद्यार्थ्यांना वळण लावण्याची जागा सकारात्मक विचारप्रेरणेमार्गे वर्तन बदलवण्याने घेतली आहे हे मी समजू शकलो. शिक्षेमार्फत विद्यार्थ्याला काही भलतीच इजा पोहोचू नये, तसेच त्याला लाजिरवाणे वाटून त्याचे काही काळापुरते मानसिक खच्चीकरण होऊ नये ह्या कारणांसाठी हा बदल घडवून आणण्यात आला असावा असेही जाणवले.
अधिक विचार केल्यावर असे वाटले की आपल्यावेळी (म्हणजे आपण विद्यार्थीदशेत असताना) शिक्षक हे जणू आईवडिलांप्रमाणेच संस्कार करण्यास अलिखितरीत्या अधिकृत समजले जायचे. बहुधा तसे आजचे शिक्षक असतीलच असे नाही, आहेत की नाही हे बघण्याची यंत्रणा अस्तित्त्वात नसल्याने शिक्षकांवर तो विश्वास टाकलाच जात नाही किंवा दुसर्या कोणी माझ्या पाल्याला इजा पोहोचवूच नये असे म्हणणार्या पालकांची भूमिका सर्वानुमते मान्य झालेली आहे.
विषयापासून थोडे दूर जाऊन एका वेगळ्याच मुद्यावर मुद्दाम विचार केला. आजचे विद्यार्थी आणि आपण विद्यार्थी होतो तेव्हाचे विद्यार्थी, ह्यांच्या एकंदर वर्तनात काय फरक जाणवतात? तर मनाने कौल असा दिला की आजचे विद्यार्थी हे वर्तनाने बरेचसे (विद्यार्थी म्हणून) शिस्तप्रिय व विद्यार्थीदशेबाबत, शिक्षणाबाबत गंभीर असतात तर आपल्यावेळी अनेक विद्यार्थी थोडेफार 'हटके' असायचे. आजकालचे विद्यार्थी अधिक दबावाखाली असतात व दप्तराच्या दसपट अपेक्षांचे ओझे वागवत असतात हेही जाणवले. अश्या विद्यार्थ्यांना शिक्षा करावीशी वाटणारही नाही.
मग मात्र जरा विचित्र प्रश्न पडला. आपण 'शिक्षेमार्फत वर्तन-सुधारणा' प्रकारचे होतो आणि आजकालचे विद्यार्थी 'शहाण्यास शब्दांचा मार' ह्या प्रकारात मोडतात का? तसे असल्यास ते चांगलेच आहे, पण तसे होण्याची कारणे चांगली आहेत का?
म्हणजे असे, की विद्यार्थी परिपक्व आहेत म्हणून शिक्षा आवश्यक नाही ही बाब चांगली आहे, पण विद्यार्थी परिपक्व आहेत ह्यामागे त्यांच्यावर असलेल्या प्रचंड अपेक्षांचे ओझे कारणीभूत आहे का? विद्यार्थ्यांना जराही 'हटके' वागायची संधीसुद्धा मिळत नाही आहे का? 'छंद' हा प्रकारही एखाद्या शैक्षणीक अभ्यासक्रमाप्रमाणे त्यांच्यावर लादला जात आहे का?
थोडक्यात, त्यांचा आवाज दाबून टाकून, त्यांना मूक समजून, मग त्यांना परिपक्व समजण्यात येत आहे का? किंवा, त्यानंतर ते परिपक्व असल्यामुळे त्यांना शिक्षेची आवश्यकताच नाही असे पालकांतर्फे (व कदाचित त्यामुळे शिक्षकांतर्फे) आणि शाळेतर्फे समजण्यात येत आहे का?
मग अनेक प्रश्न पडू लागले. अपत्यसंख्या हा त्यामागील एक कारणीभूत घटक आहे का? पालकांची शक्य तितकी स्वप्ने एकदोनच अपत्यांना पेलायला लागणे हे एक कारण आहे का? भीषण स्पर्धेची जाणीव बालकांना नको त्या वयात होत आहे का? 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हे तत्त्व सर्व्हायव्हलची काळजीही न भेडसावणार्या वयात शिकावे लागत आहे का?
'शिक्षा पाहिजे' असे अजिबातच म्हणणे नाही. किंबहुना, आजचे विद्यार्थी पाहून तर पालकांनाच शिक्षा दिली जावी असे वाटते.
पण 'येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' असे सांगणार्या शाळा काय, ते वाचून आनंदणारे पालक काय किंवा 'शिक्षा नसणे' हा निकष प्रवेश घेण्यासाठीचा एक महत्वाचा निकष बनणे काय, हे सगळेच मला 'कोणीतरी कोणाचीतरी केलेली दिशाभूल' वाटत आहे. हे माझ्यातील 'त्या' काळच्या विद्यार्थ्याचे विधान नसून 'ह्या' काळातील एका व्यक्तीचे विधान आहे.
आमचे विद्यार्थी टॉपर्स होतात, आमच्या शाळेत विद्याध्ययनासोबतच सुजाण नागरीक बनवले जातात, अश्या जाहिराती न लागता 'आमच्या येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' अशी जाहिरात लागणे (मे बी, आय एस ओ साठी का असेनात, पण तरीही) हे जरा विनोदीच वाटते.
-'बेफिकीर'!
(हे सगळे लिहायचा नैतिक अधिकार नाही ह्याची नम्र जाणीव आहे)
(Well! So, one of the questions is, are they already punished so much, in terms of pressures, that the schools can safely say that they can't go beyond that.)
अवघडै. काही मुलांची
अवघडै.
काही मुलांची प्रवृत्तीच अशी असते की त्यांना धाक नसेल तर ते खोड्या काढत बसतात. अशांच्या बाबतीत काय करायचं हे कळत नाही. भारतात असताना मुलांचा स्वभाव लक्षात घ्यावा तर इतर मुलांच्या आईवडलांच्या तक्रारीचं काय करावं हे कळत नाही. त्यांना काय सांगायच हा प्रश्नच असतो. अशा वेळी पालक मुलांना धाक दाखवतात. पालकत्व आपणही शिकत असतो, पण संयम ठेवणं कठीणच.
हे जरूर पाहा आणि आपले मत
हे जरूर पाहा आणि आपले मत मांडा.
https://www.youtube.com/results?search_query=siddhant+episode+30
A girl Anju Varma, under depression commits suicide and the principal of the school, Mr Divakar Panth is blamed for being a very strict follower of rules and discipline. Siddhanth is asked to defend the case of Panth and he agrees to this. In due course, we find that what Anju really missed was the love and support of her parents, who were not in terms with each other and also lacked commitment with their daughter.
एकमेकांवर निरतिशय प्रेम
एकमेकांवर निरतिशय प्रेम असणारे आणि पाल्यावर अपेक्षांचा अतिरिक्त बोजा टाकणारे पालक, ज्यांच्या पाल्याला शिक्षा करावी'च' लागत नाही, अश्यांबद्दल माझा मूळ प्रश्न होता. तुम्ही, 'हेही वाचा' असे म्हणून दिलेल्या लिंकचा जो सारांश मी वाचला तो थोड्या निराळ्या पालकांबाबत आहे. तोही ह्या धाग्यावर एक अभिप्राय म्हणून नक्कीच स्तुत्य आहे. मात्र, दोघेही 'त्या'बाबतीत व्यवस्थित ट्यून्ड असताना मुलांची अवस्था शैक्षणीक ध्येयांच्या संदर्भात केविलवाणी व प्रभावित होते का हा 'एक' मुद्दा आहे, 'एकमेव' नव्हे.
>>> In due course, we find
>>> In due course, we find that what Anju really missed was the love and support of her parents, who were not in terms with each other and also lacked commitment with their daughter.<<<
हा विषय ह्या धाग्यावर स्तुत्य आहे पण दुय्यम आहे.
कमिटमेंट स्ट्राँग असणार्या पालकांच्या मुलांवरील अशी प्रेशर्स, जी पाहिल्यावर शाळाच काय, कोणीच त्यांना शिक्षा करू इच्छिणार नाही, त्या पाल्यांचे काय?
अगदी बरोबर वीणातै ...
अगदी बरोबर वीणातै ... वीणेच्या खुंट्या पिरगाळल्यावर वीणा सुरात लागते आणि पोरांचे कान पिरगाळल्यावर पोराना शिस्त लागते
वरच्या जाहिरातीत 'शारीरिक'
वरच्या जाहिरातीत 'शारीरिक' शिक्षा असं अभिप्रेत असावं. इथे शारीरिक शिक्षा दिली जाणार नाही इतकाच अर्थ मी काढला. वेगळं बसवणे, मुख्याध्यापकांच्या खोलेत बसणे, सक्तीची सुट्टी मिळणे, मित्र/ मैत्रिणी बरोबर मजा करायला न मिळणे/ एखादी ट्रिट न मिळणे इ. करत असतीलच. शिक्षेचं स्वरूप बदललंय चागाल्यासाठीच.
>>>वरच्या जाहिरातीत 'शारीरिक'
>>>वरच्या जाहिरातीत 'शारीरिक' शिक्षा असं अभिप्रेत असावं. <<<
असे असेल, तसे असेल, अश्या गृहीतकांवर आधारीत प्रतिसाद विचारात घेण्याची दानत माझ्यात नाही.
>>>इथे शारीरिक शिक्षा दिली जाणार नाही इतकाच अर्थ मी काढला<<<
इतकाच अर्थ कसा काय काढला? ह्यापेक्षा वेगळा कोणताही अर्थ निघू शकतच नाही हे कसे ठरवले?
सगळं जगण काहीना काही
सगळं जगण काहीना काही गृहीतकांवर आधारितच जगतो. अनुभव येतील तशी गृहीतके बदलतात, काही तरीही नाही बदलावीशी वाटत.
वेगळा अर्थ नक्कीच निघू शकेल. मूळ लेखात शिक्षा म्हणजे काय हे स्पष्ट होतं न्हवत, तुम्ही शाळेत चौकशी केली नाहीये, मला शक्यही नाहीये. चर्चा करावीशी वाटली, ती करण्यापूर्वी मी काय गृहीत धरले हे लिहिणे आवशक समजतो ते लिहिले इतकंच.
>>>मूळ लेखात शिक्षा म्हणजे
>>>मूळ लेखात शिक्षा म्हणजे काय हे स्पष्ट होतं न्हवत, तुम्ही शाळेत चौकशी केली नाहीये, मला शक्यही नाहीये. चर्चा करावीशी वाटली, ती करण्यापूर्वी मी काय गृहीत धरले हे लिहिणे आवशक समजतो ते लिहिले इतकंच.<<<
पनिशमेंट ह्या शब्दाचा डिक्श्नरीतील अर्थ काय आहे ते बघावेत.
मला शाळेत चौकशी करण्याची गरज नाही.
तुम्हाला ती चौकशी करणे शक्य नाही आहे म्हंटल्यावर पुढचे बोलणेही खुंटते.
तुम्ही नेमके वेगळेच काहीतरी का गृहीत धरलेत हे समजले नाही. जे मी गृहीत धरले (भारतात, त्याच जिल्ह्यात, त्याच संस्कृतीत राहून) ते गृहीत धरण्यात तुम्हाला मुळात अडचणच का यावी? जिथे तुम्ही नाहीच आहात तिथल्या लोकांना जे दिसते ते चुकीचे असू शकते असे म्हणण्यामागे नेमकी काय भूमिका आहे तुमची?
तुम्ही जिथे आहात तिथले
तुम्ही जिथे आहात तिथले तुमच्यापेक्षा इथल्यांना जास्त कळते असे कोणी म्हणाले तर तुम्ही कसे रिअॅक्ट व्हाल? तुमच्यासोबत आये दिन गप्पा मारणारे कसे प्रोअॅक्टिव्हली त्यावर रिअॅक्ट होतील? तुम्ही इथे नाहीच आहात तर इथल्या पाट्यांचा अर्थ मी चुकीचा घेतला हे तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हणत आहात?
आपण भारताबाहेर असलो की
आपण भारताबाहेर असलो की भारतातील कोणत्याही विषयावर काहीही हवे तसे बोलू शकतो असे वाटते का?
'शिक्षा' करणं आणि चुका
'शिक्षा' करणं आणि चुका सुधारण्यासाठी पावलं उचलणं (करेक्टिव्ह अॅक्शन) यात मुळात फिलॉसॉफीतच फरक आहे. अल्पवयीत गुन्हेगारांनाही 'तुरुंगात' पाठवत नाहीत - बाल'सुधार'गृहात पाठवतात, बरोबर ना?
जर ही पॉलिसी/फिलॉसॉफी ते पाळत असतील तर आनंदाचीच बाब आहे.
>>>बरोबर ना?<<< हे कुणाला
>>>बरोबर ना?<<<
हे कुणाला विचारत आहात?
ते तर मी स्वतःच म्हंटलं आहे लेखात! ती आनंदाची बाब आहे अश्या अर्थाचीही विधाने लेखात सापडतील.
उगाचच काहीतरी रेझिस्टिंग टोन का अॅडॉप्ट केला जात आहे?
एकमेकांसाठी धावून जाणे थांबेल
एकमेकांसाठी धावून जाणे थांबेल का?
तूर्त शुभरात्री! प्रतिसाद
तूर्त शुभरात्री!
प्रतिसाद आलेले असले तर लॉग ईन होईन तेव्हा बघेन!
धन्यवाद!
तुम्ही त्या फलक पहिल्या
तुम्ही त्या फलक पहिल्या देशांत, गावात, संस्कृतीत राहताय (समान संस्कृतीत राहताय हे धैर्याच बोलणं आहे संस्कृती फारफार लवकर बदलते) म्हणूनच तुमचं बरोबरच आहे हा अट्टाहास का?
यात भारताबाहेर राहण्याचा काय संबंध आला? अवांतर होतंय जास्त भरकटवत नाही.
असो, शिक्षा म्हणजे पानिश्मेंट नाही शिक्षा ही सुधारण्यासाठी देतात.
>> धाक दाखवून विद्यार्थ्यांना
>> धाक दाखवून विद्यार्थ्यांना वळण लावण्याची जागा सकारात्मक विचारप्रेरणेमार्गे वर्तन बदलवण्याने घेतली आहे हे मी समजू शकलो.
>> पण 'येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' असे सांगणार्या शाळा काय, ते वाचून आनंदणारे पालक काय किंवा 'शिक्षा नसणे' हा निकष प्रवेश घेण्यासाठीचा एक महत्वाचा निकष बनणे काय, हे सगळेच मला 'कोणीतरी कोणाचीतरी केलेली दिशाभूल' वाटत आहे.
तुमच्याच लेखात तुम्हीच परस्परविरोधी विधानं करता. हीदेखील एक कलाच म्हणायची. आता कोणीही काहीही लिहिलं तरी ते लेखातल्या कुठल्यातरी वाक्याच्या विरोधात जाणारच आणि दुसर्या एखाद्या वाक्यात 'मी म्हणालो की ते' असं म्हणता येऊ शकण्याचीही वाट सापडणार.
>>>तुमच्याच लेखात तुम्हीच
>>>तुमच्याच लेखात तुम्हीच परस्परविरोधी विधानं करता. हीदेखील एक कलाच म्हणायची. आता कोणीही काहीही लिहिलं तरी ते लेखातल्या कुठल्यातरी वाक्याच्या विरोधात जाणारच आणि दुसर्या एखाद्या वाक्यात 'मी म्हणालो की ते' असं म्हणता येऊ शकण्याचीही वाट सापडणार<<<
लेखाचा प्रवाह लक्षात घेतला तर ही विधाने मुळीच परस्पर विरोधी नाहीत हे लक्षात येईल. तुम्ही वर कोट केलेल्या पहिल्या वाक्यात 'काय बदल झाला आहे हे मी समजू शकलो' असे लिहिले आहे.
तुम्ही कोट केलेल्या दुसर्या वाक्यात 'शिक्षा नसणे हा प्रवेश घेण्यासाठीचा एक निकष बनणे ही कोणीतरी कोणाचीतरी केलेली दिशाभूल आहे' असे लिहिले आहे. ह्या दोन विधानांचा बादरायण संबंध तुम्ही जोडलेला आहेत.
अमितव - तुमच्याशी बोलायचे ते बोलून झाले. उगीच काहीच्याकाही मुद्दे हुडकून लेख चिवडत बसण्याची गंमत घेत बसावेत.
असा झोन खरंच असतो का? कुणा
असा झोन खरंच असतो का?
कुणा पालकाला असा अनुभव आहे का कि असा बोर्ड लावलेली शाळा आहे नि खरेच या वाक्याचे पालन सदर शाळेकडून झाले आहे, आणि ते पालक-शिक्षक-पाल्य या सर्वाना फायद्याचेच झाले आहे?
लेख सद्य परिस्थितीची पूर्ण
लेख सद्य परिस्थितीची पूर्ण माहिती न करून घेता मनात आलेले विचार तरंग मांडावेत असा आहे. व कंजेक्चर स्वरूपाचा आहे. एकच लाइन डाटा स्वरूपाची आहे कि शाळेला नो पनिश मेंट झोन असे चालकांनी डिक्लेअर केले आहे. त्यामुळे त्याच संदर्भाने प्रतिसाद आहे.
अपत्यसंख्या हा त्यामागील एक कारणीभूत घटक आहे का? >> कमी अपत्ये झाली तरी त्यांना वाढवायची कला व त्या मागील जागरूकता नक्की वाढली आहे. सुजाण पालकत्व मेजॉरिटी पालक आपापल्या परीने प्रॅक्टिस करत असतात. माहीती अधिक मिळते त्यामुळे पालकत्वाच्या प्रकारांचे मुलांवर काय परिणाम होतात हे ही शिक्षकांना, स्कूल अॅड्मिनिस्ट्रेटर्स ना व पालकांना माहीत असते. त्यासंदर्भाने अनेकानेक सेमि नार, शिबीरे, ट्रेनिन्ग उपलब्ध आहे व संबंधितांना ते दिले जाते.
पालकांची शक्य तितकी स्वप्ने एकदोनच अपत्यांना पेलायला लागणे हे एक कारण आहे का? >> त्याचा काही संबंध नाही. हे एक रोमँटिक दुखरे असे नुसते गृहीतक आहे. मुलांबरोबर राहायचे तर स्वप्नात राहून चालतच नाही. रोजचा गृहपाठ, ते शाळेत जाणे आणणे, आहार, आजारपणे ह्यात दर क्षणी वास्तवाशीच सामना असतो. आपली एक क्ष स्वप्ने असली तरीही मुलाचा वकूब, कल हे दर टेस्ट / परीक्षेत समोर येते व मुलेही बोलून दाखवतात. ती मुकी, दाबलेली आहेत हा ही एक गोड गैरसमज आहे. उलट मागील पिढी पेक्षा आजची मुले जास्त व्होकल आहेत. स्पष्ट काय ते बोलून दाखवितातच. क रीअर काउन्सेलिन्ग सिनीअर क्लासेस मध्ये उपलब्ध असते.
भीषण स्पर्धेची जाणीव बालकांना नको त्या वयात होत आहे का? >>व्हायला हवीच ना.
'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हे तत्त्व सर्व्हायव्हलची काळजीही न भेडसावणार्या वयात शिकावे लागत आहे का? >>आजच्या मुलांपुढे जास्त विदारक प्रश्न आहेत. शाळेत शूटिन्ग झाले तर काय करायचे आतंकवादी हल्ला झाला तर. तुमच्या गोड मुलीवर कोणी मित्राने चाकू हल्ला, अॅसिड हल्ला केला तर? काय करायचे असे त्यांचे विषय असतात. त्यांचे वास्तव मागील पिढीच्या तुलनेत जास्त असुरक्षित आहे. स्कूल बसला सुद्धा हायजॅक केले जाउ शकते, अपघात होउ शकतो. हे ही मुले डिस्कस करतात. जपानात जसे भुकंपात काय करायचे ट्रेनिन्ग दिले जाते शाळकरी मुलांना तसे अश्या वेळी काय करायचे ह्याचे ही ट्रेनिन्ग द्यायची गरज आहे. घरात आणि घराबाहेर एकूणच मुलांची असुरक्षितता वाढलेली आहे.
भाग दोनः शिक्षा पाहिजे' असे
भाग दोनः
शिक्षा पाहिजे' असे अजिबातच म्हणणे नाही. किंबहुना, आजचे विद्यार्थी पाहून तर पालकांनाच शिक्षा दिली जावी असे वाटते.>> हे स्वीपिन्ग जनरलायझेशन आहे. त्यामुळे सुजाण पालकत्व प्रॅक्टिस करणार्या पालकांचा अनादर होतो आहे. तुमचे ह्या बाबतीतले निरीक्षण क्षेत्र वाढवायची गरज आहे.
पण 'येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' असे सांगणार्या शाळा काय, ते वाचून आनंदणारे पालक काय किंवा 'शिक्षा नसणे' हा निकष प्रवेश घेण्यासाठीचा एक महत्वाचा निकष बनणे काय, हे सगळेच मला 'कोणीतरी कोणाचीतरी केलेली दिशाभूल' वाटत आहे. >> ती तशी नाही. शिक्षकांनी केलेल्या अब्युजमुळे कायमची इजा झाली किंवा जीवच गमावून बसलेली अभागी मुले आहेत. अश्या बातम्या रोज बातमी पत्रात येत असतात म्हणून इथे लिंक देत नाहे त्यामुळे शिक्षकांना मुलाच्या वागण्यास कसे हँडल करायचे, काय प्रकारे त्यांच्या कडून अभ्यास व इतर अॅक्टिव्हिटी करून घ्यायच्या ह्याचे ट्रेनिग देउन शाळेने ठेवले असेल. ह्यात जास्तीचा खर्च आहे पण ते वर्थ आहे. पट्टी हातावर न मारता समजावून सांगून किंवा इतर प्रकारची नॉन फिजिकल शिक्षा देउन, जी मुलांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे, मुलांना शिकवले गेले तर ते अधिक चांगले आहे. व जेव्हा मी ( एक पालक ह्या भूमिकेतून) माझ्या कलेजेका टुकडाला आठ तास तिथे ठेवणार तर तिथे त्याच्यावर शिक्षेच्या माध्यमातून फिजिकल किंवा इमोशनल अब्युज होणार नाही अशी मला हमी मिळत असेल तर मी ती शाळा नक्की प्रिफर करीन. ह्यात दिशाभूलचा प्रश्नच येत नाही उलट जास्त डोळे उघडे ठेवणे आहे.
बस रूट, शाळेतील पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, वर्गातील लाईट, बाके , दप्तराचे वजन पुस्तकांची छपाई इत्यादी बाबींची पण पालकांकडून कसून तपासणी केली जाते तर ना शिक्षा हमी हे तर महत्त्वाचे कलम आहे नाही का.
आमचे विद्यार्थी टॉपर्स होतात, आमच्या शाळेत विद्याध्ययनासोबतच सुजाण नागरीक बनवले जातात, अश्या जाहिराती न लागता 'आमच्या येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' अशी जाहिरात लागणे (मे बी, आय एस ओ साठी का असेनात, पण तरीही) हे जरा विनोदीच वाटते.>> पहिल्या दोन बाबीं चे रँकिन्ग असते. जसे डीएव्ही ऐरोली नवी मुंबईतील बेस्ट पाच शाळांपैकी आहे. सीबी एस सी अभ्यास क्र्मात तरी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्टेप्स घेतल्या जातात. गिव्ह सम क्रेडिट टू द एज्युकेटर्स अँड टीचर्स.
प्रत्येक मूल एक जिवंत गझल आणि कविता आहे. त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, फुलविण्यासाठी जमेल ते प्रयत्न केले पाहिजेत.
याउ पर तुम्हास काय विनोदी वाटावे हा तुमचा प्रश्न आहे.
व्याख्यान वाचायला वेळ लागेल.
व्याख्यान वाचायला वेळ लागेल. वाचून झाले की सावकाश शंका विचारू. सोमवारपर्यंत!
धन्यवाद!
बेफिकीर, नेमकी व्यथा आहे ही,
बेफिकीर, नेमकी व्यथा आहे ही, अन मला विचाराल तर माझ्या शब्दात थोडक्यात सांगू पहातो की ज्या दिवशी शिक्षण म्हणजे "संस्कार" नसून सोपस्कार झाला, ज्याक्षणी विधीवत कायद्याने, शिक्षण देणे-घेणे हा कॉन्ट्रॅक्च्युअल बिझनेस झाला, व्यवहार झाला, ज्याक्षणी शिक्षक हा सरकारी/अनुदानित/विनाअनुदानित संस्थांमधील "नोकर" ठरला, व ज्याक्षणी शिक्षण घेणारी व्यक्ती नुसती "व्यावहारिक ग्राहकच" नव्हे तर "हक्कदार" ठरली, ज्यादिवशी शिक्षणक्षेत्रातले "गुरूशिष्याचे" नाते संपुष्टात आणले गेले, त्या त्याक्षणीच तुम्ही मान्डलेत ते सर्व व इतरही अनेक प्रश्न निर्माण होऊन सुजलेल्या पुवळलेल्या पण न फुटलेल्या फोडातील पू प्रमाणे आतल्या आत फसफसत राहिलेत.
बेफिकीर, नेमकी व्यथा आहे ही,
बेफिकीर, नेमकी व्यथा आहे ही, अन मला विचाराल तर माझ्या शब्दात थोडक्यात सांगू पहातो की ज्या दिवशी शिक्षण म्हणजे "संस्कार" नसून सोपस्कार झाला, ज्याक्षणी विधीवत कायद्याने, शिक्षण देणे-घेणे हा कॉन्ट्रॅक्च्युअल बिझनेस झाला, व्यवहार झाला, ज्याक्षणी शिक्षक हा सरकारी/अनुदानित/विनाअनुदानित संस्थांमधील "नोकर" ठरला, व ज्याक्षणी शिक्षण घेणारी व्यक्ती नुसती "व्यावहारिक ग्राहकच" नव्हे तर "हक्कदार" ठरली, ज्यादिवशी शिक्षणक्षेत्रातले "गुरूशिष्याचे" नाते संपुष्टात आणले गेले, त्या त्याक्षणीच तुम्ही मान्डलेत ते सर्व व इतरही अनेक प्रश्न निर्माण होऊन सुजलेल्या पुवळलेल्या पण न फुटलेल्या फोडातील पू प्रमाणे आतल्या आत फसफसत राहिलेत.>>> अगदी अगदी limbutimbu काका. मोजक्या शब्दांतील प्रतिसाद.
अमांच ते व्याख्यान आणि आपलं
अमांच ते व्याख्यान आणि आपलं ते लेखन!
काय हे बेफि?
अमांच ते व्याख्यान आणि आपलं
अमांच ते व्याख्यान आणि आपलं ते लेखन<<<
छे छे! असे मुळीच नाही. त्यांनी प्रतिसादाचेही भाग पाडले म्हणून व्याख्यान म्हणालो.
त्यांचा प्रतिसाद अजून नीट वाचलाच नाही आहे.
ओके ओके. मगाशी दिवा द्यायचा
ओके ओके.
मगाशी दिवा द्यायचा राह्यला!
मी ही आता लेख आणि अमांची प्रतिक्रिया वाचते!
अश्विनीमामी, तुम्ही ह्या
अश्विनीमामी,
तुम्ही ह्या क्षेत्रात काम करत आहात का? तसे असल्यास अधिक चर्चा करायला नक्की आवडेल. तुमचा पहिला प्रतिसाद पूर्ण व दुसरा अर्धा वाचला. त्यात काही निरिक्षणे ह्या क्षेत्रातील तज्ञाने नोंदवावीत तशी नोंदवलेली दिसत आहेत व काही व्यक्तीगत ताशेरे हे त्याहीपेक्षा अधिक तज्ञाने ओढावेत तसे ओढलेले दिसत आहेत. ह्यावरून मला असे वाटत आहे की आपण बहुध ह्याच क्षेत्रात असाव्यात. तसे नसल्यास तुमच्या प्रतिसादातील ताशेर्यांकडे दुर्लक्ष करत आहे, निरिक्षणे शांतपणे बाजूला सारत आहे आणि मुद्दे मात्र व्यवस्थित विचारात घेत आहे.
तुमच्या मुद्यांबाबतः
१. तुमच्या पहिल्या प्रतिसादातील पहिले दोन मुद्दे (अपत्यसंख्या आणि पालकांची स्वप्ने) वाचल्यानंतर जाणवले की की त्याबद्दल काय म्हणत आहे हे तुम्हाला दुर्दैवाने समजलेले नाही आहे. हल्लीची मुले आधीच्या मुलांपेक्षा अधिक व्होकल आहेत वगैरे निरिक्षणे ही अतिशय जनरल स्वरुपाची आहेत. 'मुलांना शाळेत दिली किंवा न दिली जाणारी शिक्षा' ह्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही लिहिलेले नाहीत. मग तसेच जनरल बोलायचे तर कोणाचेही म्हणणे पटण्यासारखी अवस्था येईल. अशीही आकडेवारी मिळेल की पूर्वीची मुले अधिक व्होकल होती, पूर्वी खूप मुले असली तरी त्यांना पालक अधिक चांगले वाढवू शकायचे वगैरे! तो विषय 'शाळेतील शिक्षा' ह्या केंद्रस्थानी असलेल्या विषयाला अनुसरून बघायला हवा आहे.
२. तुमच्या पहिल्या प्रतिसादातील तिसरा मुद्दा (सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट) वाचून तर तुम्ही लेख म्हणजे 'पूर्वीच्या आणि आजच्या मुलांसमोरील आव्हानांची तुलना' वगैरे विषयावर असल्यागत घेतलेला दिसत आहे. अहो शिक्षा, शिक्षा! शिक्षेबद्दल चालले आहे. शिक्षा नसणे हे उत्तम असले तरी मुळातच प्रचंड दबावामुळे शिक्षा झाल्यासारखीच असणे, एखाद्या नव्या विचाराचे वारे नुसतेच अचानक सगळीकडे वाहू लागून तो एक ट्रेंड बनणे ह्या विषयावर लेख आहे हा!
आता तुमचे जर असे मत असेल की दहा पाच शाळांवरील पाट्या वाचल्याशिवाय माझ्या मनातसुद्धा काही विचार येऊ नयेत तर अगाधच आहे सगळे!
मी एका ठिकाणी पाटी वाचली, चार दोन ठिकाणहून असे काही ऐकले की बुवा हल्ली शिक्षा दिली जात नाही, हे विचार मांडायला पुरेसे नाही का? की येथील वाचकांच्या रुपातील न्यायाधीशांसमोर आपल्या निरिक्षणाचे दस्तऐवज, पुरावे, साक्षीदार मुबलक प्रमाणात सादर केल्याशिवाय कीबोर्डवर बोटच टेकवायचे नाही?
एक गंमतच वाटते हल्ली! पूर्ण
एक गंमतच वाटते हल्ली!
पूर्ण धाग्यातील एक कुठलेतरी विधान संदर्भहीनरीत्या प्रतिसादात कोट करून त्याखाली एक वेगळाच विरोधी सूर लावून मते नोंदवायची.
असे कशाला?
(No subject)
Pages