ढाक भैरीची प्रस्तरभिंत

Submitted by सूनटून्या on 9 January, 2015 - 06:52

ढाक आणि गिरीविराज हाईकर्सचा याराना तसा पुराना !

२५ मे १९८३ ला संजय लोकरे, किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर यांनी रोपशिवायचं कळकराय सुळका सर केला होता.

From DhaK Bhairi 27Mar2013

From DhaK Bhairi 27Mar2013

२४ फेब्रुवारी ते ०२ मार्च १९८९ या कालावधीत कळकराय सुळक्याची मागील जवळपास ९०० फुटी प्रस्तरभिंत प्रथमच सर केली होती.

डिसेंबर १९९२ मध्ये ढाकची गुहा ज्या कड्यामध्ये आहे त्या कड्याच्या प्रस्तरभिंतीवर प्रथमच चढाई केली होती.

१९९२ ते २०१३, तब्बल २१ वर्षांच्या कालावधीनंतर यावेळेस पुन्हा एकदा ढाकची गुहा असलेल्या कड्यावरच चढाईचा बेत आखण्यात आला.

रात्री होळी पेटवून लोक उद्याच्या धुळवडीची तयारी करीत असताना आम्ही २७ मार्च २०१३ च्या पहिल्या प्रहरी पावणे दोनची लोकल पकडून कर्जत स्टेशन गाठल आणि तिथल्याच एसटी डेपोमध्ये पाठ टेकवली. इतरही काही वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे ट्रेकर्स डेपोमध्ये आपापला बिस्तरा घेऊन आडवे झाले होते. त्यांच्या बरोबर गप्पा मारता-मारताच पहाटे पावणेसहाच्या बसने तासाभरात सांडशी गावात पायउतार झालो. प्रवीणच्या ओळखीचे पाटेकर यांच्याकडे चहा घेऊन सात वाजता सकाळच्या कोवळ्या उन्हात (जे नंतर भाजून काढणार होत) सॅक पाठीवर मारून दूरवर दिसणाऱ्या ढाकच्या दिशेने निघालो. ढाक कड्याच्या खाली असलेलं पठार ज्या डोंगरावर पसरलेलं आहे त्या डोंगराची एक धार मांजरसुंभा डोंगराच्या दिशेने खाली उतरते. मांजरसुंभा डोंगराला उजव्या हाताला ठेवत त्या धारेच्या दिशेने निघालो. उन्हाळ्याच्या दिवसात सांडशी गाव ते ढाक या संपूर्ण ट्रेकमध्ये वाटेत पाणी कुठेच सापडत नाही म्हणून गावातच पाणी भरून घेतले होते. पाठीवर वजन असूनसुद्धा वाट सपाटीची असल्याने त्या धारेपर्यंत आरामात पोहोचलो. आता खरा कस लागणार होता, वाट खड्या चढणीची होती आणि सूर्य आमच्या शरीरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाच अर्ध्य मागत होता.

प्रचि १
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २
From DhaK Bhairi 27Mar2013

मार्चचा महिना असल्याने डोंगरधारेवरची सगळी हिरवळ नाहीशी होऊन रखरखीत आसमंत तेव्हढा उरला होता त्यामुळे पाठीवर ओझ घेऊन डोंगरधारेवरून चढताना सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. प्रत्येक शंभरेक पावलांवर ढुंगण टेकवून पायांना विश्रांती देत साधारण १२ वाजता ढाकच्या पठारावर पोहोचलो. ढाकचं पठार संपूर्णपणे जंगलाने बहरलेलं आहे.

प्रचि ३
From DhaK Bhairi 27Mar2013

ट्रेकर कितीही पट्टीचा असो, पण चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्याने जर ढाकभैरीचा ट्रेक सांडशी (कर्जत) मार्गे आखला, तर तो चुकलाच म्हणून समजा. आमच्याही बाबतीत अगदी असच घडलं. या पठारावर पोहोचताच क्षणी समोर जंगलात लुप्त होणाऱ्या अनेक ढोरवाटा फुटलेल्या दिसल्या. या रानात जंगली म्हशींचा अधिवास आहे. जवळील पाणी संपत आले होते म्हणून मागे घडलेला प्रसंग आठवला. गेल्या वेळेस असेच आलेलो असताना या पठारावर पोहोचायला रात्र झाली आणि जवळच पाणी संपल होत. एव्हढ्या रात्री गुहेत पोहोचणे अशक्य असल्याने या पठारावरच रात्र काढण्याचं ठरलं आणि पाण्याचा शोध घेत असताना एका डबक्यात साचून राहिलेल्या चिखलात जंगली म्हशी आरामात पहुडलेल्या दिसल्या. त्या बिचाऱ्यांना उठवून तेच पाणी पिण्याची वेळ आली होती. तर असो!

त्या ढोरवाटेमधली एक वाट पकडली आणि कळकराय सुळका आणि शेजारील डोंगर यांच्यामधील घळीच्या दिशेने अंदाजाने निघालो कारण एकदा जंगलात घुसल्यावर डोक्यावर फक्त झाडांची गर्दी असणार होती आणि त्याच्यापलीकडे काहीच दिसणार नव्हते. अगदी तसेच घडले, जंगलात शिरल्यावर एक तास झाला तरी वाट वर चढताना दिसतच नव्हती.

प्रचि ४ - वाट चुकलेलो माहित असून सुद्धा थोडासा खेळ सुद्धा हवाच.
From DhaK Bhairi 27Mar2013

आम्ही जिथे वळण घ्यायचे होते ते सोडून ढाकच्या विरुद्ध दिशेला मांजरसुम्भ्याच्या वाटेला जाउन पोहोचलो होतो. परत तासाभराच्या परतीच्या प्रवासाने होत नव्हत ते सगळी पाणी संपल होत. शेवटी एकदाची ती चढणीची वाट सापडली आणि आम्ही आता एका जंक्शनवर पोहोचलो. एक वाट पलीकडे कोंडेश्वरला जाते, तिथून पुढे राजमाचीला. ढाकच्या गुहेत पोहोचायला सव्वा दोन वाजले होते. आमचा पाच दिवसांचा बाड-बिस्तरा खालच्या अरुंद गुहेत टाकला, या गुहेत सपाटी नाहीच आणि कंबरेत वाकून नाही तर बसूनच वावरावं लागत.

प्रचि ५- थकलेले जीव
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि ६
From DhaK Bhairi 27Mar2013

लोडफेरीसाठी आलेले प्रवीण, सतीश, मोरेश्वर, वासुदेव, दर्शन आणि अनिकेत संध्याकाळी चार वाजता परत जाण्यासाठी ढाकच्या कड्याच्या पायऱ्या उतरून खाली जंगलात निघून गेले. पण आम्हाला कुठे उसंत होती, उद्याचं काम थोड हलक होईल या विचाराने आजच या कातळभिंतीवर चढाईसाठी सज्ज झालो. सुरुवातीस संपूर्ण भिंत घासूनपुसून गुळगुळीत केल्यासारखी दिसत होती, त्यामुळे बोल्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हताच. हितेशने सुरुवातीस बोल्ट ठोकून किशोरला पुढची सूत्र दिली. किशोरने ठोकलेल्या बोल्टमध्ये शिडी अडकवून त्यावर उभा राहून वरची उंची गाठली आणि वर असलेल्या कपारीत एक पेग (अणूकुचीदार सळई) ठोकला. सुरक्षिततेसाठी त्यातून रोप पास केल्यावर त्याला १९९२ मध्ये ठोकलेले बोल्टस दिसू लागले. बोल्ट्सच्या रिंग्स खराब होऊन तुटल्या होत्या पण बोल्ट्स मात्र अजूनही तग धरून होते. किशोरने anchor साठी ४ mm च्या स्लिंगचा (दोर) वापर करून त्या बोल्ट्सच्या साहाय्याने जवळपास ४० फुट उंची गाठली आणि रात्रीच्या मुक्कामाला परत खाली गुहेत आला.

प्रचि ७ चढाई मार्ग
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि ८
From DhaK Bhairi 27Mar2013

दुसरा दिवसाची सकाळ माकडांनी गाजवली. गुहेत मुक्कामाला नवीन पाहुणे आल्याची वार्ता त्यांना कळताच पाच-पन्नास माकडे खाण्या-पिण्याच्या जीन्नसांवर हात मारण्यासाठी संधीच्या शोधात होती. त्यांच्या बंदोबस्तासाठी एक माणूस कायमचा गुहेमध्येच ठेवण जरुरी झाल होत. त्यांचा बंदोबस्त केल्यावर किशोरनेच आज परत चढाईचा प्रारंभ केला.

सुरुवातीला जुने बोल्टस दिसत होते, कालच्याप्रमाणेच anchor साठी ४ mm च्या स्लिंगचा (दोर) वापर करून त्या बोल्ट्सच्या साहाय्याने पुढची चढाई आरंभली आणि पहिल्या लेजवर पोहोचला. सेकंड मेन हितेश खाली बोल्ट्सवर लटकलेले सामान काढत-काढत (Wind Up) किशोरला जाऊन मिळाला. तिथून पुढे फ्री मूव्ह करत आणखी उंची गाठत किशोरने दुसरी लेज गाठली आणि रात्रीच्या मुक्कामासाठी परत खाली गुहेत आला.

प्रचि ९
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि ९अ
From DhaK Bhairi 27Mar2013

दुसऱ्या दिवशी प्रदीपने आशिषला सोबतीला घेऊन चढाईला सुरुवात केली. सावधपणे हालचाल करीत असताना अचानक तोल जाऊन प्रदीप सात-आठ फुट खाली कोसळला, पण सेकंड मेन आशिष सावध असल्याने त्याने प्रदीपचा जीवनरक्षक दोर खेचून धरला आणि संभाव्य दुर्घटनेपासून त्याला वाचवलं, पण खाली घसरताना कड्याला घासून प्रदीपची करंगळी फाटली. त्यामुळे त्याला परत लेजवर खाली येउन पुढची चढाई आशिषकडे सोपवावी लागली. पहिल्या लेजवर असलेल्या हितेशने सेकंड मेनची भूमिका घेतली तर हितेशची जागा वासुदेवने भरून काढली. प्रदीपला दुखापत झाल्याने आज लवकरच pack-up करून मंडळी परत खाली आली.

प्रचि १०
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि ११- कळकराय सुळक्यावरून छायाचित्रण
From DhaK Bhairi 27Mar2013

काल झालेल्या दुखापतीने जराही विचलित न होता प्रदीप आज परत एकदा चढाईसाठी तयार झाला व किरणने सेकंड मेनची भूमिका घेतली. गेल्या सव्वा दोन दिवसात जवळपास २५०-३०० फुट उंची गाठलेली असल्याने तळापासून परत काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जुमारिंग करीत पोहोचण्यास बराच वेळ वाया गेला. सुरुवातीला प्रदीपने फ्री मूव्ह करीत ससाण्याची केव्ह गाठली आणि इथेच आपला तोल सांभाळत अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर anchor साठी एक बोल्ट ठोकण्यात यश मिळवलं. पुढे फ्री मूव्हची संधी दिसत असल्याने त्याने किरणला वर बोलावलं आणि पुढची सूत्र किरणकडे सोपवली. किरणने संधी मिळताच फ्री मूव्ह केली खरी पण वरचा होल्ड काही हातात येत नव्हता म्हणून मग प्रदीपच्या खांद्यावर उभे राहून वरच्या होल्डला हात घातला आणि दुसरी मूव्ह केली पण इथे परत मागचीच पुनरावृत्ती झाली, इथे बोल्ट ठोकण्यासाठी दोन्ही हात सोडून उभासुद्धा राहू शकत नव्हता. आजूबाजूला नजर फिरवल्यावर दोन्ही बाजूला कपार दिसली, डाव्या बाजूच्या कपारीत पिटॉन (काही इंची धातूची पट्टी) ठोकून पाहिला पण तो झटक्याने परत बाहेर आला म्हणून उजव्या बाजूच्या कपारीत पिटॉन ठोकला जो एकदम घट्ट बसला, अशारितीने पिटॉनची अधांतरी सुरक्षितता लाभताच किरण सुसाट वर निघाला तो तीसेक फुट चढाई करून एका मोठ्या गुहेमध्ये पोहोचला. इथेच acnhor साठी बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली.

प्रचि १२
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १३
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १४
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १५
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १६
From DhaK Bhairi 27Mar2013

माणसाची कमतरता या मोहिमेत सुद्धा होतीच, त्यातच संजय आणि हितेश सुट्टी संपली असल्यामुळे परत आपल्या घरट्याकडे निघुन गेले. ढाकच्या या कड्याला बारमाही सूर्यप्रकाश लाभला आहे, थंडीत तो खूपच हवाहवासा वाटतो पण आम्ही निवडलेल्या ऋतूत मुळीच नाही. मार्चच्या या कडक ऊन्हाळ्यात गेल्या तीन दिवसातच एव्हढे रापलो होतो कि घरचे तरी ओळखतील तरी कि नाही याचीच चिंता लागली होती. घरातून जरी रंगांची धुळवड न खेळताच निघालो असलो तरी इथे मात्र उन्हाने आपली छाप आमच्या सर्वांगावर सोडली होती.

सकाळी साखरझोपेत असताना माकडांनी हल्ला करून पोहे आणि फरसाणाची पाकीट लांबवली, आजचा शेवटचाच दिवस असल्याने आम्हीही त्यांच्यामागे धावण्याचा निरर्थक प्रयत्न सोडून दिला. माणसेच कमी असल्यामुळे आजही चढाईसाठी प्रदीप आणि किरणचाच नंबर लागला होता. उंची वाढल्यामुळे ३५०-४०० फुट झुमारिंग करून वेळ आणि ताकद व्यर्थ घालवण्यापेक्षा कळकराय सुळकाच्या बाजूला असलेल्या घळीतून वर येत डाव्याहाताची ढाक गावाकडे जाणारी पायवाट पकडली व विसेक मिनिटांच्या चालीनंतर पायवाट सोडून धबधब्याच्या वाटेने खडा कातळ चढून ढाकचा सर्वोत्तम माथा गाठला. माथ्यावरूनच रॅपलिंग करत खाली उतरून काल चढाई थांबवलेल्या गुहेत पोहोचलो.

प्रचि १७
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १८
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि १९
From DhaK Bhairi 27Mar2013

ससाण्याच्या केव्हपासून डावीकडील बराचमोठा रॉकपॅच गेल्या वीस वर्षात केव्हांतरी पडून गेल्यामुळे आमचा जुना मार्ग दृष्टीस पडत नव्हता. त्यामुळे जुना डावीकडे वळत गेलेला मार्ग न शोधता अगदी सरळ रेषेत आम्ही नवीन मार्गाने चढाई सुरु केली. प्रदीपने बिले घेताच किरणने चढाईला सुरुवात केली. गुहेच्या उजव्या बाजूने बाहेर येत वरचे एकेक होल्ड पकडत पुन्हा एकदा तीसेक फुटांची सुरेख फ्री मूव्ह करीत किरण वरच्या टप्प्यावर पोहोचला व प्रदीपला वर बोलावून घेत पुढची सूत्रे प्रदीपला दिली. प्रदीपने दुखऱ्या करंगळीकडे दुर्लक्ष करीत सावधपणे हालचाल करीत पन्नासेक फुटांची उंची गाठत Anchor साठी लागोपाठ तीन बोल्ट्स ठोकले आणि पुढचा कारभार किरणला सोपवला. माथा आवाक्यात आलेला असल्याने किरणने उजवीकडे सरकत एक छोटीसी आडवी लेज पकडली व पूर्ण शरीर वर खेचून हातांचा दाब देऊन लटकू लागला, परंत्य पायाना काही केल्या एकही होल्ड सापडेना. एकेक हात बदलून किरण तसाच त्या लेज वर धडपडत होता, तब्बल दहा मिनिटे धडपड केल्यावर त्या अरुंद लेजवर उभे राहण्यात किरण यशस्वी झाला,

प्रचि २०
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २१
From DhaK Bhairi 27Mar2013

पण इथेही दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती. पाचेक मिनिटे प्रयत्न केल्यावर शेवटी एकदाचा वर पोहोचला आणि उजव्या पंजात आधारासाठी धरलेला मोठा दगड उचकटून खाली दरीत कोसळला. क्षणभरासाठी छातीत धस्स झाल पण तेव्ह्ढ्यापुरतच. नशिबाने सेकंडमेन प्रदीप कड्याच्या थोडासा आतल्या बाजूला असल्याने दगड त्याच्या डोक्यावरून खाली दरीत जाऊन विसावला. हे विसरून किरणने माथ्यावर पाय ठेवलाच आणि ढाकच्या कड्याला आपल्या रंगात रंगवून टाकलं.

प्रचि २२
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २३
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २४
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २५
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २६- अभी तो में जवान हुं!
From DhaK Bhairi 27Mar2013

प्रचि २७
From DhaK Bhairi 27Mar2013

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच तंतरते. Proud

भले भले प्रस्तरारोहक हे करताना गळपटतात.
दोर काढून घेतले की अनेकजण कंफर्टेबल फ्री करत नाहीत. Happy मानसिकतेची सर्वोच्च कसोटी.

फार जबरदस्त मोहिम...
अफाट कातळभिन्तीवरची थरारक!!!
सतिश - आमच्यापर्यन्त हे सगळं पोहोचवल्याबद्दल खूप आभार!!!

सेना
प्रची क्रमांक ९अ पहा.
पीए शूज त्याने कुठे ठेवले आहेत ते दिसतील. आमच्याकडे प्रत्येकाकडे पीए शूज आहेत. त्या फोटोत जो आहे तो किशोर मोरे त्याच्याकडे इम्पोर्टेड पीए शूज आहेत, किमत फक्त ११०००/-. तसे ५००/- रुपयांपासून सुद्धा उपलब्ध आहेत. किशोर पोद्दार कॉलेजमध्ये कृत्रिम भिंतीवर दररोज सराव करतो. जर त्याची हि गत तर आमचं बोलायलाच नको.

अ‍ॅलेक्स होनॉल्ड- हा तर बापच आहे.

सध्या सुरक्षा-सुरक्षा हा खेळ चालू असल्याने, आपल्याकडे अ‍ॅलेक्स होनॉल्ड होने सध्या तरी संभव नाही. ज्याची अजिबात पात्रता नाही ते सुद्धा भेटल्यावर आम्हाला येउन सांगतात आम्ही वजीर केला, नानाचा अंगठा केला. यासाठी तुम्हाला अजिबात सरावाची गरज नाही. वरूनच सुरक्षा दोर सोडलेला असतो, त्यातच फुट-फुटांवर बोल्ट्स ठोकलेले असल्याने पडण्याची भीतीच नाही. एव्हढ सुरक्षित वातावरण असल्यावर दोराशिवाय प्रस्तरारोहण करण्यास कोणी धजावेल का? मी नावच घेतो- पुण्यातील safe climbing initiative SCI हि संस्था.

करू दे ना जरा मेहनत, अरे घाम गाळू दे लोकांना. कळू दे प्रस्तरारोहण काय आहे ते.

Artificial Climbing Wall - इथे सराव करणे आणि थेट सह्याद्रीमध्ये चढाई करणे यात भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण कृत्रिम भिंतीवर कायम दोर लावूनच सराव केला जातो आणो तोही top बिले. त्यामुळे बेडर आणि धाडसीपणा कमीच होतो. त्यामुळे जेंव्हा सह्याद्रीत चढाई करताना जर anchor ५-६ फुटांपेक्षा पण लांब असेल तर भले भले सुद्धा मूव्ह करताना डळमळतात. कारण उंची.

किरण काका, संजय लोकरे वगेरे मंडळींची सुरुवातच दोराशिवाय झाली होती. जवळपास सव्वीस सुळके दोराशिवायच सर केले होते.

आऊटडोअर्स
हो. डावीकडून किरण अडफडकर, सारंग अडफडकर, आणि संजय लोकरे.

बापरे! फोटो बघुनच गरगरायला झालं.
असा कातळ चढणं म्हणजे ग्रेट.

तो अ‍ॅलेक्स होनॉल्डचा व्हिडीयोही पाहिला. पुर्ण पहाण्यासाठी सुद्धा कशीबशी हिंमत गोळा करावी लागली.!! Uhoh

सेना
प्रची क्रमांक ९अ पहा.
पीए शूज त्याने कुठे ठेवले आहेत ते दिसतील.
>>> पायात नाही आहेत. माझा मूद्द तोच आहे. तूल लक्ष्यात आले ना. शूज असले तरी त्याची उपयूक्तता आपल्या वातावरणात कमीच आहे. Happy

Artificial Climbing Wall - इथे सराव करणे आणि थेट सह्याद्रीमध्ये चढाई करणे यात भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण कृत्रिम भिंतीवर कायम दोर लावूनच सराव केला जातो आणो तोही top बिले. त्यामुळे बेडर आणि धाडसीपणा कमीच होतो. त्यामुळे जेंव्हा सह्याद्रीत चढाई करताना जर anchor ५-६ फुटांपेक्षा पण लांब असेल तर भले भले सुद्धा मूव्ह करताना डळमळतात. कारण उंची.
>>> ACW चा उद्देशच वेगळा असतो त्यामूळे फरक येणारच. इथे 'Feel Factor' महत्वाचा. लहानमूलांना गोडी लागावी, कळावे हा वॉलचा उद्देश. एकदा प्रकरण कळले की ते खर्‍या मोहीमेस भीडू शकतात. Happy

बर आता एक प्रश्न,

लीड प्रस्तरारोहक दर किती फुटांवर बोल्ट / पिटॉन ठोकतो? याबबत तूमचे काही ठोकताळे आहेत का? की ८ फूट, १२ फूट वगैरे...

मी आत्ता बघितला तो अ‍ॅलेक्स होनॉल्डचा व्हिडिओ. तो बाप असेलच नक्की, पण प्रचंड ड्येंजर प्रकरण वाटतंय ते फ्री क्लायम्बिंग. ९ मिनिटांनंतर बिले दिलेला बघून हायसं वाटलं मलाच. Proud

सेना

कृत्रिम भिंत असाव्यात याच मताचा मी सुद्धा आहे कारण कामाच्या व्यापात सरावासाठी डोंगरात जाताच येईल अस होत नाही.

आम्हाला शिकवताना anchor जवळ असला पाहिजे असच शिकवण्यात आलेलं आहे. जवळ असेल तर हिम्मत वाढते आणि fall झाला तरी तो कमीतकमी उंचीचा असतो. पण प्रत्येक वेळेला ते शक्य नसत. कारण काही वेळेस anchor करण्यासाठी उभे राहण्यास जागाही नसते. anchoring करण्यासाठी काहीही ठोकताळे नाहीत. जसजसे तुम्ही उंचीला सरावता तसतसे तुम्ही अधिक बेडर होत जाता. anchoring चा वापर व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कधी कधी १०० फुट चढाईसुद्धा without anchor होऊन जाते. (आताच दिवाळीत भोजगीरी-माळशेज मोहिमेदरम्यान एका रॉकपॅचवर २०० फुटांची चढाई without anchoring झाली.).

एखाद्याने anchoring शिवाय केलेली ५० फुट मूव्ह मलासुद्धा जमेलच असे नाही. मग अशा वेळेस मी काय करावे? ज्याने हा route open केला असेल त्याच्या कौशल्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न न करता त्यात एखादा बोल्ट ठोकणार. जे माझ्या स्वतःच्या मते अयोग्य आहे. त्यापेक्षा त्याच्या शेजारी अंतर ठेऊन आपण आपला वेगळा route open करावा आणि सर्वांनाच त्याचा उपयोग घेऊ द्यावा. म्हणजे शेजारील अवघड route पाहता पाहता निदान एखादा तरी ते आव्हान स्विकारेल आणि ज्या बहाद्दराने प्रथम हा route ओपेन केला असेल त्याचा पराक्रम कायम इतरांसाठी आव्हान म्हणून चिरंतन राहील.

आपल्याकडे काही लोक अशीही आहेत जे रॅपलिंग करत वरून खाली जात संपूर्ण चढाई मार्गाचा अभ्यास करतात आणि ड्रील मशीनच्या सहाय्याने आधीच बोल्टिंग करून ठेवतात व कुठे कुठे पिटॉन ठोकायचा, कुठे freinds हे euipment उपयोगी पडेल हे आधीच पाहून ठेवतात. अशाने आपल्याकडे अ‍ॅलेक्स होनॉल्ड होणार आहे का!

एखाद्याने anchoring शिवाय केलेली ५० फुट मूव्ह मलासुद्धा जमेलच असे नाही.
>>> हेच विचारणार होतो पूढे. Happy

आपल्याकडे काही लोक अशीही आहेत जे रॅपलिंग करत वरून खाली जात संपूर्ण चढाई मार्गाचा अभ्यास करतात
>>> हे चूकीचे वाटतयं. म्हणजे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय असे वाटतय. Happy

Pages