लेखणीतला दम

Submitted by गणेश पावले on 7 January, 2015 - 00:43

घरी निवांत बसल्यावर कधी कधी वही पेन हातात घ्यावासा वाटतो.
पण भीती वाटते कि सत्य जगाला रुचेल का?
आणि रुचले तरी ते पटेल का?
आणि पटले तर आचरणात येईल का?
म्हणून भीती वाटते….

कधी कधी वाटत करावी शब्दाची तलवार आणि म्हणावे…

"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे
चिंधड्या उडविन राई राई एवढ्या! "

लेखणीत इतका दम जरूर आहे
पण कुणाला काही देण घेण नसत.
डोक्यावर घेवून मिरवणारे…
कधीतरी केसाने गळा कापणार…
का कापणार? तेही नाही सांगणार…
(प्रत्येकाला याचा अनुभव असतो)
आपला समाज आता समाज राहिला नाही.
इतका सुधरला कि कधी बिघडला हेच आठवत नाही.
शेवटी काय शेकोटी पेटवून थंडी गायब होत नाही?
तात्पुरती उब म्हणून मी कविता लिहत असतो.
जखमेवर मलम म्हणून शब्दांची फुंक मारतो
नाही वाटत आता लिहावसं
पण……?
तरीही लिहत असतो
वेळ जात नाही निघून,
म्हणून उगाच वही ओरखडत करत असतो.

कवी - गणेश पावले
९६१९९४३६३७
१३-०९-२०१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users