आणखी एक विमान लुप्त?

Submitted by गजानन on 29 December, 2014 - 05:21

या वर्षातली आणखी एक विमान दुर्घटना काल घडली. इंडोनेशियातील सुराबया येथून सिंगापूरच्या दिशेने निघालेले एअर एशिया कंपनीचे विमान रविवारी सकाळी अर्ध्या वाटेतच बेपत्ता झाले. सगळे मिळून १६२ लोक होते या विमानात.
लोकसत्तेत दिलेल्या माहितीनुसार या वर्षातली हे सहावी विमान दुर्घटना. Sad

http://www.loksatta.com/desh-videsh-news/airasia-flight-qz-8501-from-ind...

http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/AirAsias-missing-...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच अस्वस्थ आहेत. आता याहूवर वाचल्याप्रमाणे समुद्रात काहीतरी दिसतंय. पण अजून नक्की सांगता येणार नाही.

विमानात ज्या घोषणा होतात त्यानुसार पाण्यावर विमान सुरक्षितपणे उतरवता येते असा समज होतो पण तसे झालेले मात्र बघितले नाही कधी.

मागे एक विमान नदीत उतरवले आहे आणि जवळच्या बोटिंनी सर्वाँना बोटीवर घेतल्यावरच तो म्हातारा पट्ठ्या वैमानिक बाहेर आला. पाउण तासाने ते विमान पाण्यात गेले.

विमानात ज्या घोषणा होतात त्यानुसार पाण्यावर विमान सुरक्षितपणे उतरवता येते असा समज होतो पण तसे झालेले मात्र बघितले नाही कधी.

>> हडसन रिव्हर लँडिंग. Happy

>>हडसन रिव्हर लँडिंग <<
दोन्ही घटनांमध्ये फरक असावा. हडसन घटनेच्या बाबतीत टेक ऑफ घेतल्यावर बर्ड स्ट्राइकमुळे इमर्जंसी लँडिंग करावं लागलं; वेदर काम असल्याने पायलटने विमानावर ताबा ठेवुन सेफ लँडिंग केलं.

एअर एशियाच्या बाबतीत लायटनिंग स्ट्राइक, हेवि स्टॉर्म ची शक्यता नाकारता येत नाहि...