हुरहूर

Submitted by डॉ अशोक on 28 December, 2014 - 08:03

------ हुरहूर ------
हुरहूर कसली ही, जीवा लागलेली
उडे नीज तरी ना स्वप्न संपलेली !
*
कां होते असे, तुला पाहतांना
घसा कोरडा अन, तहान हरपलेली !
*
कर पास दैवा, परिक्षा पूरे जीवनाची
समोरी लक्ष्य अन, वाट हरवलेली !
*
उलटेच सदा सारे, इथे कां घडावे?
ठिणगीच विझवते, ही आग भडकलेली !

-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users