...का आज सारे गप्प

Submitted by कोकणस्थ on 26 December, 2014 - 05:57

...का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?

तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?

तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!

ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?

ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?

माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली आणि पटली.

सर्वप्रथम आसाममधील घटनेचा निषेध!

देशात सतत अस्थिर वातावरण निर्माण करत राहणं हाच पाकीस्तान-चीन-बांग्लादेश (नावापुरता वेगळा असला तरी तो मला आजही पाकीस्तानचाच भाग वाटतो) यांचा एकमेव अजेंडा आहे. चीनकडे पैसा आणि मनुष्यबळ असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमकपणे भारताला घेरण्याचे त्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्या दृष्टीने पूर्वेला ब्रम्हदेश, दक्षिणेला श्रीलंका, पश्चिमेला लहानसा मालदीव आणि उत्तर पश्चिमेला पाकीस्तान! त्याशिवाय देशातील नक्षलवाद्यांना फूस आहे ती वेगळीच! पाकीस्तान आणि बांग्लादेश यांची निर्मितीच धर्माधारीत फाळणीमुळे झाली असल्याने धार्मिक उन्मादातून निर्माण करता येणार्‍या दहशतवादापलीकडे त्यांच्याकडे दुसरा मार्गच नाही.

लोकहो,

श्री भरत मयेकरांनी एक मुद्दा मांडला आहे :

>> डिसेंबर २०१४ मध्ये होणार्‍या हत्याकांडाबद्दल राजदीप सरदेसाई यांनी जुलै २०१२ मध्येच ट्विट केलं होतं?

मी दिलेले चित्र राजदीप सरदेसाई यांचे वक्तव्य दर्शवते. ते २०१२ सालच्या आसाम दंगलींबाबत केलेले होते. ते तेव्हा एका प्रमुख वाहिनीच्या वरिष्ठ पदावर रुजू होते. आज आसामच्या हत्याकांडाबाबत सरदेसायांनी यथोचित वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. मात्र आज ते त्या वाहिनीत नाहीत. सांगण्याचा मुद्दा काये की प्रसारमाध्यमांचा दृष्टीकोन आजही फारसा बदलला नाही.

आ.न.,
-गा.पै.

छान कविता! भावना अगदी समर्पकरित्या मांडल्यात. आसाममध्ये हत्याकांडाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच.

आसामबाबतची आपली भूमिका अगदी स्तुत्य आहे. किंबहुना, आसाम किंवा नक्षलवाद याबाबत मिडियाचे नेहेमीच दुर्लक्ष होत आले असे वाटते. ज्यादिवशी हत्याकांड झाले त्यादिवशी पहिली न्यूज हत्याकांडाची दाखवून सगळे सरळ काश्मिरात नवे सरकार कसे बनेल ह्यावर चर्चा (?) करीत बसले.

आणि संवेदनशील फेसबूकी लोकांना आसामचा विसर पडला एवढे मात्र खरे. बाकी सगळे नववर्षाच्या स्वागतात मग्न असल्यानेही असे होत असेल कदाचित.

असो.

संवेदनशील फेसबूकी लोकांना आसामचा विसर पडला एवढे मात्र खरे >> तसा तो आसारामचाही पडला आहे. शेवटी ती मिडीया आहे. ट्यारपी रेंटींगच्या मागे धावणारी. आणि मॅनेज केलेली सुद्धा! आसाम हिंसाचारच्या बातम्या दाखवल्या तर सरकारकडे बोटे रोखली जातील. शिवाय झारखंड-काश्मिरात मिळवेलेल्या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांना कसा लुटता आला असता?

अगदी सत्यवचन. निवडणुक विजय आणि भारतरत्न यांच्या आनंदावर विरजण पडु नये. म्हणुन इतका खटाटोप

आसाम अन आसाराम … जोरदार! ही नवीच बातमी दिलीत श्री. सत्यवादी तुम्ही! धन्यवाद.
देशमुखसाहेब, अगदी खरे.

Sarkarkade bote dakhavli jateel mhanun nahi.
Tar media aaplya lokanchya virodhaat totally biased aahe mhanun.

Mudde barech aahet, pan tumchyakade te samajnyachi kuvat naslyane tumchyashi vaad chalu shakat nahi Happy

तुमची पातळी कितपत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. स्क्रिनशॉट अ‍ॅडमिनच्या विपुतला सगळ्या मायबोलीने पाहिला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार आधी बघा मग दुसर्यांना बोला. अश्या विचाराच्या लोकांना काय म्हणतात माहीत आहे ना? दुसर्यांच्या खानदानावर लिहायला मज्जा वाटते स्वतःवर आले की लगेच थयथयाट चालु ?

aaplya lokanchya virodhaat >> आपल्या म्हणजे नक्की कोणाच्या, कोकणस्थ चित्पावन??

कविता आवडली. आपण जागतिक आतंकवादावर भाष्य करतो पण आपल्या देशात का कमी आतंकवाद आहे. आता हे बोडो अतिरेकीही आपलेच नि त्यांनी कत्तल केलेले आदिवासीही.देशात नक्षलवाद फोफावलाय ह्याला जबाबदार कोण इथली व्यवस्था, धार्मिकता कि राजकारण ?

<<<आपण जागतिक आतंकवादावर भाष्य करतो पण आपल्या देशात का कमी आतंकवाद आहे. आता हे बोडो अतिरेकीही आपलेच नि त्यांनी कत्तल केलेले आदिवासीही.देशात नक्षलवाद फोफावलाय ह्याला जबाबदार कोण इथली व्यवस्था, धार्मिकता कि राजकारण ?>>>>

युप्प, यू सेड इट !
गंमतच आहे. शेजारी बळी पडलेल्या लेकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक इथे आपल्या घरात बळी गेलेल्या लोकांबद्दल चकार शब्द का काढत नाहीत ? असे विचारणारे तथाकथीत देशभक्त लोक 'तिथे पाकिस्तानने जे पेरले त्याची फळे ते भोगताहेत, त्यांच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची' असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडात बळेी गेलेल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय.

अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडाबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय.>>

अर्थात तसा तो आहेच. आणि तोच आहे. का नसावा? आपल्या लोकांच्या हत्या दिसत नाहीत आणि पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल पुळका आहे अशा भंपक लोकांच्या वृत्तीवर प्रहार करणे हाच उद्देश आहे मुळात कवितेचा.

असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. >>
हे कसं काय बुवा ठरवलंत? ते अतिरेकीही वाईटच. दुसरं म्हणजे भारत सरकार पूर्वोत्तर रा़ज्यांच्या परवडीबद्दल जबाबदार असेलही, नव्हे आहेच, पण अतिरेकी निर्माण, प्रोत्साहन आणि ट्रेनिंगचे काम भारताने आजवर कधीही केलेले नाही. तेव्हा भारताच्या बाबतीत सरसकटीकरण करताच येणार नाही. तिसरं, असंख्य ठिकाणी निषेध व्यक्त केलेलाच आहे. पण खरी गंमत म्हणजे पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल गळे काढणारेच लोक आसामच्या हत्त्याकांडाबाबत मौन बाळगून आहेत..

तुमच्याकडून काही वेगळी अपेक्षा सुद्धा नाहीये. तेव्हा चालु द्या..

फक्त एकच सांगायचे होते की तुम्ही तुमच्या तथाकथीत राष्ट्रवादाचे कितीही गोडवे गायलेत तरी , कितीही गळे काढलेत तरी ज्या माणसाला हृदय आहे, मानवी भावना आहेत त्याचे मन असेच आक्रंदणार मग बळी जाणारे हिंदू असोत, आसामी असोत, पाकिस्तानी असोत की जगाच्या पाठीवरील कुठल्याही धर्माचे असोत.

शत्रू विषयी फार ममत्व ठेऊ नये. आपलाच घात होतो. अर्थात, या बाबतीत अनेकांची मते वेगवेगळी असू शकतात. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः Happy

शत्रू विषयी फार ममत्व ठेऊ नये. आपलाच घात होतो.

......

मग पाकडे म्हणाले आमच्या ऐवजी तुमची पोरे मरायला हवी होती , तर रडताय कशाला ? तुमचेच तत्व त्यांच्या तोंडुन आले ना ?

परफेक्ट काऊ
त्यांच्यात आणि यांच्यात काहीच अंतर नाही
लवकरात लवकर ही विकृत जमात नष्ट व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

त्यांची अशीच नियत आहे, म्हणूनच आपण फुकटचा पुळका बाळगू नये. सापाच्या पोटी ससे जन्माला येत नसतात. असो. तुमची समजावून घेण्याची कुवत नाही हे माहीत असतानाही हे बोललो. Happy

बरोबर अतिरेक्यांच्या घरी अतिरेकीच जन्माला येतात म्हणून ते त्यांचे समर्थन करतात
कळलं Wink

खरा साप परवडला . काही झाले तर स्वतः फुस्स करुन चावायला जातो... प ण फुस्स करायचे हुशारजनाने आणि चावायला जायचे बहुजनाने , असला लबाड साप नको.

खरा साप परवडला . काही झाले तर स्वतः फुस्स करुन चावायला जातो... प ण फुस्स करायचे हुशारजनाने आणि चावायला जायचे बहुजनाने , असला लबाड साप नको.>>+११११११११११११११

काउ मला उद्देशुन आहे का?

Pages