पेट्रोलचे गौडबंगाल.

Submitted by हतोडावाला on 21 December, 2014 - 23:40

सध्या आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत पेट्रोलचे दर दणाणून आपटले असून सगळे पेट्रोल सप्लायर्स देश हादरुन गेले आहेत. ओपेकनी तर चक्क पेट्रोलचे उत्पादन कमी करुन बाजाण्यारात कृत्रीम तुटवडा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सौदी अरिबीयाने हा प्रस्ताव धुडकावताना एक विचित्र युक्तीवाद मांडला तो म्हणजे 'जर ओपेकनी सप्लाय कमी केला तर इतर पेट्रोल उत्पादक देश बाजार काबीज करतील व परत एकदा ओपेकला तो बाजार काबीज करायला काही वर्षे लोटतील. ही वेळ येऊ नये म्हणून अजून सहा महिने पडलेल्या भावात पेट्रोल विकणे कधीही बेहत्तर" विशेष म्हणजे सौदी अरेबियानी सांगितलेला हा धोका इतर सर्व ओपेक देशाना पटला. अन त्यानी पुढचे सहा महिने नुकसान झेलायच्या त॑यारीने सध्याचे उत्पादन स्थीर ठेवण्याचे मान्य केले आहे.

किती आहे सध्याचे उत्पादन?
ओपेक संघटनेचे उत्पादन ३० मिलियन बॅरल प्रतिदिन. ( ३ कोटी बॅरल प्रतिदिन) आहे.
१२ देशाच्या या संघटनेत वरील उत्पादनात सौदीचा एकट्याचा वाटा आहे १ कोटी बॅरल्स प्रतिदिन.

(एक बॅरलात १५८ लिटर तेल असते. उत्सूकता असणार्‍यानी लिटरात आपापली गणिते मांडावी)

संपुर्ण जगाला रोज ९२ मिलियन बॅरल ( ९ कोटी २० लाख बॅरल) प्रतिदिन पेट्रोलची गरज असते. त्यातील ३० मिलियन (३ कोटी ) बॅरल एकटा ओपेक पुरवतो. यातील मजेदार भाग असा की अमेरीका एकटा १८ मिलियन ( १ कोटी ८० लाख ) बॅरल्स फस्त करतो. तसं पाहता अमेरीका सुद्धा पेट्रोलचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात करते. २०१३ च्या शेवटी अमेरीकेचे रोजचे उत्पादन होते ८ मिलियन (८० लाख) बॅरल्स प्रतिदिन. तरी पिण्याचे प्रमाण पाहता अमेरिकेला रोज १ कोटी पेट्रोल बाहेरुन मागवावे लागते. संपुर्ण जगाची पेट्रोलची तहान आहे ९.२० कोटी बॅरल्सची अन अमेरीका एकटा त्यातले जवळपास २ कोटी पिऊन घेतो हे एक भयानक वास्तव आहे. इतर सगळ्यानी ७ कोटी बॅरल्समध्ये भागवायचे असते.

सध्या पेट्रोलचे भाव जे आपटत आहेत त्यावर जगभारतील तज्ञांचे मत असे आहे की अमेरीकेत प्रचंड प्रमाणात पे ट्रोलचे साठे सापडल्यामुळे त्यानी बाजारात पुरवठा वाढविला आहे. त्यातूनच भाव पडायला सुरुवात झाली वगैरे. सध्या अमेरीका रोज ४ मिलियन ( ४० लाख) बॅरल्स बाजारात ओतत आहे अशा बातम्या आहेत. पण यात एक विसंगती आहे जे कोणी सांगायला तयार नाहीत. प्रत्येकजण ही विसंगती टाळून अमेरीकेच्या वाढीव पेट्रोलचे गुणगाण गात आहेत. ही विसंगती म्हणजे ८ मिलियन बॅरल्स प्रतिदिन उत्पादन करणारा अमेरीक अचानक १५ मिलियन बॅरल्स प्रतिदिन एवढे वाढीव उत्पादन कुठे व कसे करु लागला हे कोणीच सांगत नाही.

जगातली सर्वात मोठी पेट्रोल उत्पादन कंपनी 'सौदी-एरामको' जिची एकून संपत्ती आहे ३० ट्रिलियन डॉलर. म्हणजे अमेरीकेच्या वार्षीक जीडीपीच्या दुप्पट. म्हणजे नेमके किती? 3 00 00 00 00 00 000/- (तीन पद्म अमेरिकन डॉलर) एवढी मोठी. हे गणित सोपं जावं म्हणून मायक्रोसॉफ्टचे आकडे बघू या. मायक्रोसॉफ्टची संपत्ती आहे १७२ बिलियन म्हणजे 1 72 00 00 00 000 /- ( एक खर्व बाहत्तर अब्ज). सौदी-एरामको' व मायक्रोसॉफ्टची % मध्ये तुलना केल्यास मायक्रोसॉफ्ट ही फक्त 0.0000016% एवढी टक्के कंपनी ठरते. यातून एरामकोचा आवाका लक्षात येतो. तर ही एवढी अजस्त्र एरामको ४.४ मिलियन ( ४४ लाख) बॅरल प्रतिदिन उत्पादन करते. अमेरीकेला स्वतःची तहान भागवून बाजारात जर ४ मिलियन बॅरल उतरवायचे झाल्यास स्वतःची १० मिलियन ( १ कोटी) ची भूक भागवून वरचे ४ मिलियन ( ४० लाख) बॅरल्स एवढे उत्पादन वाढवायला हवे. याचाच अर्थ एवढे उत्पादन वाढण्यासाठी वर उल्लेखित 'सौदी-एरामको' सारख्या तीन कंपन्या अमेरीकेत उभ्या व्हायला हव्यात. अन अशा तीन 'सौदी-एरामको' उभ्या झाल्या असत्या तर अमेरीकेची मंदी पार पाय लावून पळाली असती. बेरोजगारी शोधून सापडली नसती. अन एवढ्या आवाढव्य कंपन्या काय रातोरात उभ्या होत नसतात. तयार पैसा ओतला तरी त्याला किमान १० वर्षे लागतील एवढा मोठा तो सेटप असतो. म्हणजे अमेरिकेनी १.४ कोटी बॅरल्स प्रतिदीन एवढे उत्पादन वाढविलेले नाही हे स्पष्ट आहे.

वरील सर्व निरिक्षण केल्यावर दोन प्रश्न अनुत्तरीत राहतात.

१) अमेरीकेची १ कोटी बॅरल्सची भूक कुठून भागविली जात आहे?
२) ९ कोटीच्या बाजारात ४० लाख अधीकचे बॅरल्स कुठून येत आहेत?

=======

रशिया हा सौदी अरेबीयापेक्षाही मोठा पेट्रोल उत्पादक आहे. २०१३ च्या आकडेवारी नुसार रशियाचे एकून प्रतिदिन उत्पादन १० मिलियन ( १ कोटी) बॅरल्स प्रतिदिन होते तर सौदीचे ९.७ मिलियन ( ९७ लाख) बॅरल्स प्रतिदीन. उत्पादित १ कोटी बॅरल्सपैकी रशीया स्वतः ४० लाख बॅरल्स वापरतो व उरलेले ६० लाख बॅरल्स एक्स्पोर्ट करतो. याच्या उलट अमेरीका मात्र कायम १ कोटी बॅरल्स आयात करत असे. रशियाला उत्पादन व बाकी सगळे खर्च मिळून ९० डॉलर प्रतिबॅरल पडत असे. म्हणजे बाजारात पेट्रोलचे भाव ९० च्या खाली गेल्यास रशियाला तोटा होणार होता. हा डाव ओळखून अमेरीकेनी काहितरी डाव खेळला आहे अशी शंका येते.

अमेरीकेने उत्पादन वाढविले असे तर दिसत नाही. म्हणजे यानी काही देशाना हाताशी धरुन मागच्या दोनचार वर्षात पेट्रोलचे साठे करवून घेतले व आज ते अचानक बाजारात उतरवायला सुरुवात केली असून रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अमेरीकेने खेळलेला सर्वात मोठा गेम दिसतोय.

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुबेरांना मी पत्र लिहिले होते तेच इकडे टाकतो आहे. मी मागिल ६ वर्षांपासून अमेरिकेतील उत्तर डाकोटा राज्यात राहत होतो त्यामुळे हे वाढलेले तेलाचे उत्पादन खरोखर पहिलेले आहे.

नमस्कार संपादक महोदय,

आपला १४ डिसेंबर चा अग्रलेख वाचला. काही मुद्दे पटले आणि काही चुका वाटल्या म्हणून आपल्याला पत्र लिहितो आहे. भारत आणि रशियाच्या व्यापाराबद्दल तुम्ही जे म्हणता आहात ते पटते आहे परंतु सौदी आणि अमेरिकेच्या तेल उत्पादनाबाबत तुमची माहिती अपुरी किवा चुकीची आहे.

आपण लिहिता " समुद्रतळाच्याही शेकडो मीटर खोलीवर सांदीकपारीत दडलेले तेल, इंधन वायु बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेने विकसित केले आणि बघता बघता चित्र पालटले. गेले दोन महिने तर ऐतिहासिकच म्हणायला हवेत. या दोन महिन्यांत अमेरिकी तेलाचे उत्पादन सौदी अरेबियाशी स्पर्धा करेल इतके झाले आहे." प्रत्यक्षात अमेरिकेचे तेल उत्पादन हे जमिनीवरील आहे. विशिष्ट खडकातील तेल हे हायड्रोलिक फ्रेकिंग hydraulic fracturing या प्रक्रियेने ते बाहेर काढतात. आणि हे उत्पादन मागील ३-४ वर्षे वाढत आहे ते काही २ महिन्यात एकदम वाढलेले नाही.हे उत्पादन वाढलेले आहे अमेरिकेच्या उत्तर डाकोटा, ओल्काहोमा आणि टेक्सास राज्यांमध्ये. या पैकी दोन राज्ये ही पूर्णतः जमिनीने वेढलेली आहेत.

आपण म्हणता "रशियाची जास्तीत जास्त कोंडी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिका, सौदी अरेबिया आदींनी सध्या तेलाचे उत्पादन इतके वाढवले आहे, की दर प्रति बॅरल ७० डॉलर्स इतके विक्रमी घसरले." परंतु सौदी ने उत्पादन वाढवलेले नाही तर कमी करण्यास नकार दिलेला आहे. उत्पादन कमी केले असते तर किमती वाढल्या असत्या पण सौदी आपल्या खिशाला झळ पोहोचवून अमेरिकेतील तेल कंपन्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सौदी ला शक्य आहे कारण मागील २- ३ वर्षात त्यांनी तेलावर अमाप नफा कमावून बँकेत ठेवला आहे. त्यामुळे मला तरी आपले गृहीतक चुकीचे वाटते. तेलाचा असा बादरायण संबध पुतीन यांच्या भेटीशी लावण्याचा आपला प्रयत्न मला तरी पटत नाही.

पेट्रोलचे गौडबंगाल या धाग्यावर मोदी नि ५जी कुठून आले? काही संबंध असेल तर सांगा ना. का उगीचच कुठेतरी तंगडी वर करून....?
ते जाऊ दे.
अश्विनी के - तुम्हाला काय त्रास झाला? अमेरिकेने जे केले ते उत्तम केले.
आश्विनींबद्दल माहित नाही, पण अमेरिकेतल्या असंख्य लोकांवर बरेच वाईट परिणाम झाले नि अजूनहि होतच आहेत. त्यात बरेचसे भारतीय हि आहेत.

तेलाचे राजकारण अत्यंत जटील असते. कोण कशाकरिता करतय हे कळायला वेळ लागेल. अनेक तर्क होउ शकतात पण सत्य बाहेर येईलच असे नाही.

अमेरिकासाठी तेल हा जिवन-मरणाचा प्रश्न आहे. हे जाणुन अमेरिकेने २००१ नंतर हळूहळू स्वावलंबी होण्यास सुरुवात केलेली आहे. अलाक्सा आणि गल्फ ऑफ मेहिको (मेक्सिको) येथे २००३-२००४ पासून नव्या तेलसाठ्यांचा शोध सूरू झाला. यात भरपुर पैसा ओतला गेला. त्यात अमेरिकेला भयंकर यश मिळाले आहे. मी स्वतः तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधणे संबंधीत नोकरीत आहे. २००६ ते २०११ या ५ वर्षात गल्फ ऑफ मेहिको येथे एका कंपनीकरिता कार्यरत होतो.

अमेरीकेची १ कोटी बॅरल्सची भूक कुठून भागविली जात आहे?
ते काही अमेरिका जगाला सांगणार नाही.
ज्या अरामको बद्दल तुम्ही बोलता आहात, त्यात अमेरिकेचा फार मोठा वाटा आहे. तुम्हाला काय वाटले, तेल आहे हे कळ्ल्यावर ते जमिनीतून काढायचे कसे आणि पुढचे सगळे कसे करायचे ही अक्कल त्या अरब लोकांना होती का? एका तेलीयाने नावाचे एक मराठी पुस्तक आहे ते वाचा, अमेरिकेनी काय लुबाडले आहे त्यांना, नि जगाला सुद्धा खोड्यात टाकले आहे ते वाचा.
इराक वगैरे सगळे तेलासाठी, किंवा त्या धंद्यावर असलेला आपला प्रभाव तसाच चालू रहावा म्हणून. त्यापायी अमेरिकेतल्या सामान्य माणसाचे वाईट झाले, पण श्रीमंत अधिकच श्रीमंत झाले. त्यामुळे अमेरिकेतल्या राजकारणी नि श्रीमंत लोकांचे त्या युद्धाने कल्याण झाले.
गरीबांना मदत करा म्हंटले की हे सगळे कम्युनिझम, कम्युनिझम म्हणून बोंब मारतात! तेंव्हा केले ते चांगलेच म्हणणारे नि अजूनहि रिपब्लिकन पक्षाचे गोडवे गाणारे लोक इथे आहेत.

हे वाढीव तेल येत कुठून आहे हे सर्वात मोठे गूढ आहे!

>>> ह्यात काहीही गुढ नाहिये. गेली १० वर्षाचे अथक प्रयत्न आहेत स्वावलंबी होण्याचे.

ज्या अरामको बद्दल तुम्ही बोलता आहात, त्यात अमेरिकेचा फार मोठा वाटा आहे. तुम्हाला काय वाटले, तेल आहे हे कळ्ल्यावर ते जमिनीतून काढायचे कसे आणि पुढचे सगळे कसे करायचे ही अक्कल त्या अरब लोकांना होती का? <<< अनुमोदन.

सेनापती,

१०००००००००००००००००००० %

अरामकोत कोणाचा वाटा आहे हा विषय ईथे गैरलागू आहे.
माझा प्रश्न एवढाच आहे की अरामको सारखी महाकाय कंपनी दिवसाला ४५ लाख बॅरल पेट्रोल काढते तर अमेरीकेला दिवसाला १ कोटी ४५ लाख बॅरल पेट्रोल काढायला अरामकोच्या ताकदीच्या किमान तीन कंपन्या काढव्या लागल्या असत्या. त्या न काढता जे काही पेट्रोल काढले जात आहे व अचानक दीड कोटी बॅरल्स पेट्रोलची जी भर दिसत आहे ती हायड्रोलिक फ्रेकिंगनी होत असेल तर मग ३० ट्रिलियनची गुंतवणूक करुन दिवसाला ४५ लाख बॅरल काढणारे अरामकोवाले मुर्ख ठरतात.

त्याच बरोबर अजून एक मुद्दा उपस्थीत होतो की अमेरीकेत जर १.५ कोटी बॅरल्स प्रतिदीन एवढे पेट्रोलचे उत्पादन वाढले असेल तर बेरोजगारी मोडून काढायला हा बदल पुरेसा होता.

अमेरिकेच्या नॅशनल बजेट मध्ये ६५० बिलियन डॉलरचा तुटवडा आहे. रोज १ कोटी बॅरल्सची आयत थांबली तर प्रति बॅरल १०० डॉलरचा रेट धरला तरी रोज एक अब्ज डॉलरची बचत होते. म्हणजे वर्षाला ३६५ अब्ज डॉलरची बचत व्हायला हवी होती. याच बरोबर जे ४५ लाख बॅरल्स अमेरीके द्वारे बाजारात उतरविले जात आहेत त्याचा नफा जोडल्यास येणार्‍या वर्षात बजेटमधली डेफिशिअन्सी नाहिशि व्हायला हवी. त्याच बरोबर देशा तील वाढती बेरोजगारी थांबून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती व्हायला हवी होती. ती झालेली दिसत नाहीये.

आता अमेरीकेच्या बजेटची वाट पाहूया.

हायड्रॉलिक फ्रेकींग हा कनवेंशनल ऑईल ड्रीलींगला मिळालेला नविन पर्याय आहे. मुळात "हायड्रॉलिक फ्रेकींग" हा प्रकार जुनाच होता पण टेकनिकल बाबी विकसीत नसल्याने आणि दुसर्या काही कार णामुळे "हायड्रॉलिक फ्रेकींग" हा वापरात नव्हता.

अमेरिकेने क्रूड ऑईलच महत्व दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर ओळखल होतच त्यामुळे त्यांची जागतीक राजनीती ह्या एका अजेंडावर बनवलेली होती. मध्यपुर्व देशांतील पहीली क्रुड ऑईल रिफायनरी १९५४ मध्ये बिपी
(ब्रिटीश पेट्रोलीयम) ने येमेन मधल्या एडनमध्ये उभारली. त्यानंतर अमेरिकेने सौदी मधिल तेलाच्या शोधाचा फायदा घेत तेथेच आपली बस्तान बसवले. मध्य पुर्वेत बाकि च्या देशात शेल सारख्या कंपन्या तेल का ढायच काम करत त्यावेळी अमेरिकंन कंपन्या सौदीवर नजर ठेऊन होत्या.

क्रुड ऑईल च्या वापरात अमेरिका जगच्या पटलावर सर्वात पुढे आहे. आणि ह्या तेलाच्या स्वावलंबना सकट बर्याच पॉलिसी ते सतत राबवत असतात. क्रूड ऑईलच्या महत्वामुळेच अमेरिका आता पर्यंत तेलाचा साठा ते करत होते.

आता हायड्रॉलिक फ्रेकींगच्या रुपाने अमेरिकेला तेलाचा चांगला पर्याय सापडला आहे. त्यामुळे आता अमेरिकेला
क्रूडतेल तसेच गॅस दोन्ही अमेरिकेतच मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जे तेल साठे अमेरिकेने
ईतकी वर्षे सांभाळुन ठेवले होते त्याची आता त्यांना गरज नाही. पण ती शेवटी "अमेरिकाच" आहे, आणि ती काहीही करेल ते काही विशिष्ठ कारणासाठीच करेल. त्यामूळे त्यांनी आता क्रूड ऑईल जागतीक बाजारात उतरवायला सुरुवात केलेली असेल तर त्याचा दुरागामी परीणाम होणारच आहे आणि तो काळच ठरवेल.

३० ट्रिलियनची गुंतवणूक करुन दिवसाला ४५ लाख बॅरल काढणारे अरामकोवाले मुर्ख ठरतात.>>>>>>>
३० ट्रिलियन ही गुंतवणूक नसून कच्चे तेल २०० डॉलर प्रति बेरल होते तेव्हाच्या अरामको च्या अंडर ग्राऊंड अ‍ॅसेट ची अंदा जे किंमत आहे.

>>च बरोबर अजून एक मुद्दा उपस्थीत होतो की अमेरीकेत जर १.५ कोटी बॅरल्स प्रतिदीन एवढे पेट्रोलचे उत्पादन वाढले असेल तर बेरोजगारी मोडून काढायला हा बदल पुरेसा होता.>>
कंझुमर बेस्ड इकॉनॉमीमधे निव्वळ पेट्रोलचे वाढीव उत्पादन एवढीच गोष्ट पुरेशी नाही. क्रेडीटची उपलब्धता, नाफ्टा, इतर आउटसोर्सिंगही वगैरे बर्‍याच गोष्टी आहेत. पण रिकवरी होतेय. अमेरीका ऑइल एक्स्पोर्ट करत नाही. आयात कमी झाली एवढेच . क्रुड ऑइलच्या घसरणार्‍या किमती या अमेरीकन फ्रॅकर्ससाठी देखील वाईटच आहेत. कारण हाय प्राईसच्या आशेवर कर्ज घेतले गेले. ऑइलवर इकॉनॉमी अवलंबून असणार्‍या राज्यांत या घसरणार्‍या किमतीमुळे घराच्या किमती घसरणे ते एनर्जी टॅक्स रेवेन्युत कमतरता अशा विविध कारणांमुळे वाईट परीणाम सोसावे लागू शकतात.

स्वाती,

१००००००००००००००००००००००००००००%

Pages