..
स्थळ - स्वत:चेच घर.!
काळ - आई घरी नसतानाचा ..
वेळ - भूक लागण्याच्या जराशी आधीची (कारण हा पदार्थ केल्याकेल्या थेट गरमागरम खाण्यातच मजा आहे)
साध्य - वेळ पडल्यास आपणही काही करू शकतो हे ग’फ्रेंडला दाखवून देणे.
साहित्य - चूल, लायटर, भांडीकुंडी... भात, कालवण, अर्धा डझन अंडी... आणि आईचा आशिर्वाद!
फोटो - शेवटी टाकलाय (अर्थात, तुमचा आधीच बघून झाला असेल)
.......
क्रमवार पाकृ :-
१) आपल्या नेहमीच्याच पद्धतीने पांढरा वाफाळलेला भात (प्लेन स्टीम राईस) करून घ्या. मी कूकरमध्ये आईने शिकवलेल्या फळफळीत भाताच्या मापानुसार केला.
२) अंड्याचे कालवण तुमचे तुम्हालाच करता येत असेल तर उत्तमच. मला नाही जमत, पण घरात आदल्या रात्रीचे कांद्याचे कालवण होते. (हे आईने केलेले होते, म्हणून वर साहित्यात उल्लेखलेला आईचा आशिर्वाद!) तर, त्यातलेच थोडेसे एका टोपात घेऊन गॅसवर गरम करायला ठेवले. जेव्हा त्याला उकळ्या, (आनंदाच्या नाही हं) फुटू लागल्या तेव्हा त्यात पटकन वरतून एक अंडे फोडून सोडले. एकसंधच सोडायचे म्हणजे एकसंधच राहते. थोड्याच वेळात ते मस्त रटरटून शिजते. अंड्याची चव कालवणात भिनते आणि कालवण अंड्यात मुरते.
३) एक आणखी टोप घेत त्यात तेल तापायला ठेवायचे. दोन अंडी त्यातही फोडत ती मस्त भुर्जीसारखी फ्राय करून घ्यायची. मात्र मीठ-मसाला किंवा कसलेही लाड त्यांचे करायचे नाहीत. अंड्याची प्लेन चव येणे गरजेचे. तसेच फ्राय सुद्धा जेमतेमच करावे. किंबहुना थोडाफार ओलसरपणा त्यात शिल्लक राहिलेला चांगलाच. जेणेकरून त्यात भात मिसळल्यावर अंड्याची चव भातभर पसरते.
४) आता त्याच फ्राय अंड्याच्या टोपात, भात घेऊन त्याला खरपूस परतून घ्यावे.
५) शिर्षकात लसूण फ्लेवर नमूद केले आहे, त्याला अनुसरून लसूण फ्लेवर शेव-फरसाण त्या भातात मिसळून घ्यावी. हि शेव खाण्याच्या वेळी कुरकुरीत न राहता तिचे नरम पीठ झालेले असते, तसेच त्यातील लसणाचा ठसका देखील भातात मुरला जातो आणि हेच यात अपेक्षित असते, अन्यथा कांदेपोह्यावर शेव भुरभुरतात तशी शेवटाला टाकण्यात काही अर्थ नाही.
६) आता हा भात तळता तळताच त्यात वरतून अंड्याचे कालवण सोडावे. त्यातील शिजलेल्या अंड्याचे काविलत्याने / चमच्याने तुकडे तुकडे करून ते भातात इत्र तित्र सर्वत्र मिसळले जातील हे पहावे.
७) कालवणाचे प्रमाण भात बरेपैकी ओला होईल असेच घ्यावे. अन्यथा सुकेसुके झाले की मजा गेली. त्यानंतर हे मिश्रण रटरटून वर यायला लागले की थांबावे. मिश्रणाला वरवर पाहता खिमाट लूक आलेला असतो पण भात पुरेसा फळफळीत बनवला असल्यास अॅक्चुअली ते तसे नसते. त्यातील शेव-फरसाणाच्या नरम झालेल्या पीठाने भाताला मस्तपैकी बांधून ठेवलेले असते.
८) आता त्याला सुटलेला वास पाहता हावरटासारखे त्यावर तुटून पडायची लाख इच्छा होईल, मात्र इथेच खरी संयमाची गरज असते. त्यातील थोडा थोडा भात एका पसरट ताटलीत घेऊन खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे थालीपीठासारखे थापून घ्यावे. जाडसर थर केल्यास त्यातील वाफ लवकर बाहेर न पडता पदार्थ जास्त वेळ गरम राहतो.
सजावट (खाण्यासाठी किंवा फोटोसाठी) - सजावट म्हणून काकडी गाजर बीट टमाटर जे उपलब्ध असेल ते खाद्यपदार्थ उगाचच कॉंम्बिनेशनमध्ये बसत असो वा नसो, चकत्या करत आसपास पसरवावेत. कोबी असल्यास उभा चिरून पसरवू शकता. मी तसे केले नाही, कारण मला पाहुण्यांना न देता स्वत:लाच खायचे होते. (अर्थात, पाहुण्यांना द्यायचे असते तरी मी एवढी मेहनत घेतली असती का, हा वेगळा मुद्दा झाला.) याउपर एखादे खेळणे वा आकर्षक शोपीस ताटाभोवती ठेऊ शकता, जसे की मी केलेय. लहान मुलांना हि मांडणी लुभावू शकते. (ईथे लहान मूल मी स्वत:च होतो) याउपर पाटाभोवती जी काही रांगोळी काढायची असेल ती विविध प्रकारचे फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरून थेट फोटोवर सजावट करू शकता. कारण या अतिसजावटीच्या नादात मूळ पदार्थ थंड होता कामा नये, अन्यथा मजा गेली हे आता मी तिसर्यांदा सांगतोय!..
फोटो - फोटोवर असलेले माझे नाव मोबाईलवरती टाकल्याने ते कॉम्प्युटरवर अंदाजापेक्षा मोठे दिसू लागलेय. तरी यामागे आपले नाव मोठे करायचा माझा कोणताही हेतू नव्हता याची नोंद घ्यावी.
तोंडी लावायचे पदार्थ - कैरीचे लोणचे फोटोमध्ये दिसत असेलच. याउपर भाजलेला पापड यावर छान लागतो. मसाला पापड करता आल्यास उत्तमच. सोबतीला कोणतेही फसफसणारे पेय न घेता कैरीच्या पन्ह्याला पसंती द्यावी.
वाढायचे प्रमाण - समोरच्याच्या पोटाचा घेर पाहून ठरवावे. ठेंगा नियमानुसार किमान तेवढ्या क्षेत्रफळाचे थालीपीठ थापावे.
लागणारा वेळ - जेवढा मला हे लिहायला लागला, त्यापेक्षा कमीच! ..आणि माझा लिखाणाचा वेग अफाट आहे!..
अधिकच्या टेपा - जर तुम्ही खरेखुरे शाकाहारी असाल तर अंड्याचे (माबो आयडी नव्हे) नाव पाहताच हा धागा उघडलाच नसता, पण तसे झाले असल्यास या पदार्थाच्या निमित्ताने अंडे चाखून मनातली सुप्त इच्छा पुर्ण करायला हरकत नाही.
सामाजिक संदेश - यंदाच्या ख्रिस्तमस्तला आपली संस्कृती जपत केक ऐवजी हे थालीपीठ थापून कापा, कापून चाखा आणि ख्रिस्ती नववर्षाचा आनंद द्विगुणित करा.
माहीतीचा सोर्स -- ईश्श.! अर्थातच, माझी (शाकाहारी) ग’फ्रेंड
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
ता.क. - पाकृती विभागात हि माझी पैलीच एंट्री. लोकांना आवडली तर मस्तच. पण न आवडल्यास, मी हार न मानता पुन्हा नवीन जोमाने प्रयत्न करेन, दॅटस द ऋन्मेऽऽष's स्पिरीट !
अंडाराईस की "अंड्या" राईस
अंडाराईस की "अंड्या" राईस
दिदे, अंड्याच.. वाचा तर,
दिदे, अंड्याच.. वाचा तर, वाचल्यावर समजेलच
बाकी अंडा की अंडे? किंबहुना एग राईस हा योग्य शब्द असावा, एकाच भाषेत.
कु.ऋ., तू अंड्यातून पूर्ण
कु.ऋ., तू अंड्यातून पूर्ण बाहेर आलास की एक पेसल माबो "षेक" ड्यु.
ताटली लपवायला केवढे ते कष्ट.
अच्छा अंड्याच असे तर असोच
अच्छा अंड्याच असे तर
असोच
ख्रिस्त मस्त !
ख्रिस्त मस्त !
प्रचंड कन्फ्युजिंग रेसिपी
प्रचंड कन्फ्युजिंग रेसिपी आहे...
अंडी सहा घेतली.. तीनच वापरली
अंडी सहा घेतली.. तीनच वापरली का ? तीनच का वापरली ?
विळ्या-भोपळ्याचे सख्य,
विळ्या-भोपळ्याचे सख्य, आल्या-लिंबाचा रस, तसे हे अंड्या-राईसचे थालीपीठ.
करायला अतिशय कठिण दिसतेय. कांद्याचे कालवण करून ठेवणारी आई आयत्यावेळी आणायची कुठून?
पा.कृ.च्या साहित्यात 'आईचे आशीर्वाद' ऐवजी 'आई' असे हवे होते.
विनिता, कन्फ्युजिंग नाहीये,
विनिता, कन्फ्युजिंग नाहीये, किंवा माझा पाकृ लिखाणाचा अननुभव नडला असावा..
काऊ, सहा अंडी हे दोघांचे प्रमाण, तीन अंडी एकाचे, आता दुसरा कोण हे सांगायची गरज नसावी..
हीरा, आपण काय आईला कुठून आणनार, तीच आपल्याला या जगात आणते ना..
सध्या अतिमहत्वाच्या कामात बिजी असल्याने हि घाईघाईत उत्तरे.. क्षमस्व!
तुम्ही आधी रावडा चिवडा की काय
तुम्ही आधी रावडा चिवडा की काय अशी रेसिपी पण लिहिली होती ना?
चित्रात डोनट का आहे?
चित्रात डोनट का आहे?
तो डोनट नसून लगोरीचा पीस आहे
तो डोनट नसून लगोरीचा पीस आहे
>> चित्रात डोनट का आहे?>> असा
>>
चित्रात डोनट का आहे?>> असा धेडगुजरी प्रकार बिघडला/आवडला नाही तर तो बॅकअप प्लॅन म्हणून असेल.
पाकृती विभागात हि माझी पैलीच
पाकृती विभागात हि माझी पैलीच एंट्री. >> हे कसे काय ?
तुम्ही आधी रावडा चिवडा की काय अशी रेसिपी पण लिहिली होती ना? >> +१
तुमचा अभिषेकचा पासवर्ड विसरला आहे का ? तुम्ही त्या आयडीनेच लिखाण केल तर बर होईल..जरातरी क्वालिटी असते त्यातून उतरलेल्या लिखाणाला.
चैत्रगंधा
चैत्रगंधा
मला वाट्ट तुमचा/ आपला अभिषेक
मला वाट्ट तुमचा/ आपला अभिषेक वेगळा आहे पण अन्ड्या आणी ऋन्मेष एकच आहे.:फिदी: म्हणून तो सारखे अन्ड्यावरचे प्रेम व्यक्त करतो.
आओ सिखा दु तुम्हे अन्डेका फन्डा
ये नही प्यारे कोई मामुली बन्दा
इसमे छुपा है ड्यु आयडीका फलसफा....
बाकी पाककृती सोपी आहे, पण म्या अन्डे खात नाय. पुढल्या टायमाला शाकाहारी कृती टाकावी.
पण म्या अन्डे खात नाय.
पण म्या अन्डे खात नाय. पुढल्या टायमाला शाकाहारी कृती टाकावी.>>>>अन्डे च्या ऐवजी बटाटे टाक हाकानाका
अन् विडंबन कवितांचे सत्र भन्नाट आहे तुझे, कीप ईट अप!
रश्मी, अभिषेकच्या ब्लॉगवर
रश्मी, अभिषेकच्या ब्लॉगवर होते पूर्वी अंड्याचे फंडे .. आता उडवले असतील तर माहित नाही.
सो.... अंड्या = अभिषेक = ऋन्मेष बाळ
अन्डे च्या ऐवजी बटाटे टाक
अन्डे च्या ऐवजी बटाटे टाक हाकानाका
अन् विडंबन कवितांचे सत्र भन्नाट आहे तुझे, कीप ईट अप! >>>> बटाटे फोडून कालवणात कसे ओतायचे?
अर्र! असे आहे का? अग
अर्र! असे आहे का? अग चैत्रगन्धा, मागे अभिषेकने त्याला कन्यारत्न झाल्याचे ललित आणी ट्रिपला जाऊन आल्यावर बायकोबरोबरचे फोटो टाकले होते. पण इथे ऋन्मेष सारखा ग''फ्रेन्डचाच उल्लेख करतो आणी म्हणतो की तिच्याशीच लगीन करणार, म्हणून मला वाटले की अभिषेक वेगळा आहे.:स्मित:
विनीता धन्यवाद.:स्मित:
अश्विनी.:फिदी:
याचाच अर्थ असा की आई घरी
याचाच अर्थ असा की आई घरी नसताना तुम्ही तिच्या मे बी होणार्या सुनेला घरी आणुन अंड्याचे पदार्थ करुन दाखवुन देता की वेळ पडल्यास तुम्ही काहिही करु शकता.
पिश्तमय पदर्थ
पिश्तमय पदर्थ
परीचं खेळणं आहे ते डोनेट नाही
परीचं खेळणं आहे ते डोनेट नाही
बिचारी परी
वेलकम टु द क्लब !
वेलकम टु द क्लब !
अर्र! असे आहे का? अग
अर्र! असे आहे का? अग चैत्रगन्धा, मागे अभिषेकने त्याला कन्यारत्न झाल्याचे ललित आणी ट्रिपला जाऊन आल्यावर बायकोबरोबरचे फोटो टाकले होते. पण इथे ऋन्मेष सारखा ग''फ्रेन्डचाच उल्लेख करतो आणी म्हणतो की तिच्याशीच लगीन करणार, म्हणून मला वाटले की अभिषेक वेगळा आहे >> अग वरती खेळणे बघितलेस ना?
ख्रिस्तमस्त अस का लिहल
ख्रिस्तमस्त अस का लिहल आहे?
डोनट नाहीच का? जाउद्या, पीके सापडला तर हेच खाऊ घालीन त्याला नक्की. ये राँग नंबर है.
बटाटे फोडून कालवणात कसे
बटाटे फोडून कालवणात कसे ओतायचे? >>:D
ती ऋन्मेषची डोकेदुखी
मस्तच. तोपासु. मी बर्याचदा
मस्तच. तोपासु.
मी बर्याचदा शिळ्या भाताचा म्हणजे फोडणीच्या भाताला पर्याय म्हणून हा राईस करते.
राईस आणि करी का नाही खायची
राईस आणि करी का नाही खायची मग?
शब्द खुणात पण जी. एफ. आली आहे आता :))
अग माझे वर फोटोतल्या त्या
अग माझे वर फोटोतल्या त्या रिन्गकडे लक्षच गेले नाही, रिया ने लिहीले तेव्हा कळले.:फिदी:
Pages