घोगल्याफोड्या करकोचा/Asian Open bill Stork

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 December, 2014 - 02:55

आमच्या घराच्या मागे एक शेत आहे. त्या शेतात जवळ जवळ ऑक्टोबर पर्यंत काही प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असते. त्यामुळे तिथे भरपूर हिरवळ आहे. ह्या पाण्यासाठी अनेक पक्षी तिथे विहार करतात. ऑक्टोबर मध्ये हा घोगलफोड्या करकोचा पक्षी अचानक सकाळी दृष्टीस पडला. पाण्यातील किटक वा छोटे मासे यांच्यासाठी त्याचा संथगतीने शोध चालू होता. एक एक पाऊल आवज न करता टाकत सावध गतीने आपली शिकार जाऊ नये यासाठी त्याची संथ धडपण चालू होती आणि माझी तशीच संथ धडपण त्याचे फोटो काढण्यासाठी चालू होती.

१)

२) चोच तर पहा काय लांबलचक आहे.

३)

४) काय सुंदर रुप आहे पहा ना.

५) पंखांचा रंग.

६) पायांचीही लांबी बघा

७) मिळाले भक्ष

अचुक नावासाठी नि.ग. धाग्यावरील नि.ग. करांचे आभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोचीची लांबी, पायांची लांबी, पंखाचा रंग, आणि त्याचे रूप... सारे एकाच फोटोत दिसत होते हो Wink
जोक्स अपार्ट, घराच्याच मागे शेत, पावसाचे पाणी, हिरवळ आणि त्यावर येणारे असे पक्षी.. लकी आहात Happy

सारे एकाच फोटोत दिसत होते हो
ऋन्मेश माबो स्पेशल कमेंट Lol हे पण जोक्स अपार्ट. धन्यवाद.

बी, दिनेशदा, साधना, शांकली, मानुषी, सुमुक्ता धन्यवाद.

चौथ्या फोटोत एकदम, पाचवीसहावीच्या वर्गावर आलेला 'हं, चला बाळांनो आज काय शिकायचे?' असं वर्गाला उद्देशून म्हणणारा वरून भोळा आव आणणारा पण आतून मारकुटा शिक्षक वाटतोय. Lol

केपी अजुन हळद्या, कोकिळ, भारद्वाज, खंड्या, घुबड, धनेश, दयाळ, चातक, सनबर्ड यांची ये-जा ही असते.

मस्त आहे नाव.. कोल्हा आणि करकोचा गोष्टीतला लांब चोचवाला करकोचा
>> +१
छान प्रचि आहेत Happy या करकोच्याला पाहुणचाराला बोलवायचे आणि थाळीत खिर वाढायची Wink

मस्त फोटो आहे , सुस्पष्ट!!!
चोच कसली भक्कम दिस्तेय

पंखांवर कुणीतरी शाई सांडल्यासारखी वाटतीये . Happy

गजानन Lol

घोगल्या फोड्या?? म्हंजे एक्जॅक्टली काय फोड्या???

सगळ्यांचे धन्यवाद.

नितीन तो मासे सोडून खिर खाईल का? Lol

मला पण कोणीतरी सांगा घोगल्या म्हणजे काय? सर्च करून पण तेच नाव आल गुगलवर. घुगर्‍या म्हणजे बारशाला वाटतात ते चणे माहीत आहे. ते काही फोडावे नाही लागत. पण घोगल्या म्हणजे काय प्रकार आहे माहीत नाही.

जागू, फोटो नेहमीप्रमाणेच छान!
घोगल्या म्हणजे काय ते किरण पुरंदरेंच्या 'पाणथळीतले पक्षी' पुस्तकात दिलेले आहे. मी ते बघून इथे लिहिन पण बहुदा घोगल्या म्हणजे शंखातली कालवं किंवा गोगलगाई आहेत. हा ती कवचं फोडून आतले प्राणी खातो असा समज होता पण खरेतर याच्या अधिवासशेजारी ही कवचे फुटलेली दिसत नाहीत, अखंड असतात आणि आतला प्राणी मात्र गायब असतो. त्यामुळे कवच न फोडता आतला खाऊ गट्टम करण्याची काहीतरी कला याच्यकडे असावी असे त्यात दिलेले आहे.