गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत

Submitted by पीनी on 11 December, 2014 - 04:42

नमस्कार,
मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल.
कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही.
आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.
१. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे.
२. एल. आय. सी. मधूनच राहिलेल्या कर्जाइतकेच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले.
३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील.

सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का?
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही LIC मधुन होम लोन transfer करायचे आहे. ICICI आणि HDFC यापैकी एका बँकेचा विचार करत आहे.
यातली कोणती बँक चांगली आहे?

ICICI मध्येच माझे सॅलरी खाते आहे. HDFC मध्ये अजुन काहीच खाते नाही. तरीही लोन मिळू शकते का?

<<मलाही LIC मधुन होम लोन transfer करायचे आहे. ICICI आणि HDFC यापैकी एका बँकेचा विचार करत आहे.
यातली कोणती बँक चांगली आहे?>>

ICICI आणि HDFC पेक्षा LIC उत्तम आहे.

<>

होय मिळु शकते.

Pages