गीत भावानुवाद १: रे कबीरा मान जा...

Submitted by saakshi on 8 December, 2014 - 07:46

तसा तू स्वार्थीच पहिल्यापासून. हो आणि हे लेबल लावणंही तुला न पटणारं.

कैसी तेरी खुदगर्ज़ी
ना धूप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्ज़ी
किसी ठोर टीके ना पाऊँ

मी आज असा आहे उद्या वेगळा असेन. मनाला वाटेल तसं वागेन, तरलो तरी स्वतःच्या दमावर आणि बुडालो तरी स्वतःच्या दमावर असं म्हणणारा तू.
पण याच एका गोष्टीत काहीच का निवडत नाहीस? ना हे ना ते.
तसा तुझा पाय कधी एका ठिकाणी टिकला नाहीच म्हणा.
मोठी स्वप्नं बघायचास. भरभरून बोलत राहायचास त्यांच्याबद्दल.
जगभर भटकायचं तुझं स्वप्न.
ते पूर्ण करायला जे घराबाहेर पडलास ते पडलासच.

बन गया अपना पैगम्बर
तर लिया तू सात समंदर
फिर भी सुखा मन के अंदर
क्यूँ रह गया
रे कबीरा मान जा
रे फ़कीरा मान जा
आजा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ
रे कबीरा मान जा
रे फ़कीरा मान जा
कैसा तू है निर्मोही कैसा हरजैंया

स्वतःच स्वतःच्या होडीचा दीपस्तंभ बनलास तू.
जगभर फिरलास.
पाखरंही सकाळी घरट्याबहेर पडली की सांजेला घरात परत येतात, ती ओढ त्यांना मागे खेचून आणते.
तुझं तसं काही नाहीच. सगळं मागे टाकून निघालेला निर्मोही फकीर जणू.
येते का रे तुला आठवण? इथल्या सगळ्याची?
मागे फिरावंस वाटतं?
ऐक ना मग... ये ना परतून.

टूटी चारपाई वोही
ठंडी पुरवाई रस्ता देखे
दूधों की मलाई वोही
मिट्टी की सुराही रास्ता देखे

आठवतात का रे त्या सगळ्यांनी अंगणात बसून मारलेल्या गप्पा?
ती आंब्याच्या थंड सावलीत बसून मोजलेली आकाशातली वर्तुळं?
खेळून आल्यावर धुळीने माखलेल्या हातांनी पिलेल्या माठातल्या गार पाण्याचे गटगट आवाज?
ती तुझ्या आईच्या हातची चव? तिने रोज हातात ठेवलेली ती साय साखर?
तिची तरी आठवण येते का?
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोत सगळे. वाटतं तू कधीतरी येशील..

कैसी तेरी खुदगर्ज़ी
लब नमक रमे ना मिसरी
कैसी तेरी खुदगर्ज़ी
तुझे प्रीत पुरानी बिसरी
मस्त मौला, मस्त कलंदर
तू हवा का एक बवंडर
बुझ के यूँ अन्दर ही अन्दर
क्यूँ रह गया...

तुझं असं कसं रे?
गोडाला ही आपलं म्हणत नाहीस आणि खारयाला ही दूर लोटत नाहीस.
सगळं चाखूनही अलिप्त असल्यासारखा.
जुन्या सगळ्या गोष्टी विसरल्यासारखा.
स्वतःतच रमणारा तू.
मग तुझ्यात रमणार्याचं काय? त्यांनी कुठं जायचं?
तुझ्यातलं ते भांडण तुलाच सोडवावं लागेल रे. आणि तुला असं विझलेलं पहाणं शक्य नाहीये आम्हाला.
मग ऐक ना...
सोडव तो तिढा..
ये ना परतून..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच . छान लिहिलय .हे गाणे अतिशय आवडते .आणि दिपुही :स्मित:.रेखा भारद्वाज आणि तोची रैना यांचे अप्रतिम आवाज आहेत या गाण्याला. लिंक दिली तर चालेल का?

हेही छानयं Happy
हा पुर्ण अल्बमच मस्त होता .. अगदी पार्टीची ढिंच्याक गाणी नि ही दोन्ही अगदी विरुद्ध पण अप्रतिम!

धन्यवाद सिनि, चनस आणि सुमुक्ता Happy
>>> लिंक दिली तर चालेल का?>>> कसली लिंक ते कळालं नाही सिनि.

तुम्ही दिलेल्या गाण्याची, लिहायचं राहुन गेलं.

देतेच https://www.youtube.com/watch?v=jHNNMj5bNQw या गाण्यात सुरवातीला रणबीर च्या मागच्या लाईट्स एक एक करुन बंद होतात आणि गाण्याच्या शेवटी तो निघुन जताना त्याच्या वरती आकाशात लाईट्स चे फटाके फुट्तात तो सीन खुप अर्थपुर्ण आणि खुप छान चित्रीत केलाय त्यामुळे मस्त वाटतो .पुर्ण गाणंच सुंदर चित्रीत केलं आहे. मला तर हा पुर्ण चित्रपट पाठ आहे . Happy

तुझं असं कसं रे?
गोडाला ही आपलं म्हणत नाहीस आणि खारयाला ही दूर लोटत नाहीस.

हे काय शब्दश अनुवाद केलाय का ?

नाही आवडला हा लेख ... इलाही मात्र झकास ...

एक उत्तम गाणी/ उत्तम चित्रित केलेली गाणी असा बाफ आहे तिथे पोस्ट लिहीता येइल म्हणजे प्रत्येक गाण्यासाठी बाफ काढला नाही तरी चालेल. गाणे छान आहे. मराठी करण फार जमलेले नाही.

धन्यवाद मयुरी, च्रप्स, अमा Happy

>>>>>हे काय शब्दश अनुवाद केलाय का ? नाही आवडला हा लेख ... इलाही मात्र झकास ...>>>> गाणी ऐकता ऐकता जे मनात आलं ते लिहिलंय, दोन्ही गाण्यांसाठी.