जुन्या मालिका - काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21

जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा Happy

१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?

२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.

अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अवो मारी साथे असा पण एक कार्यक्रम असायचा , गुजराथी समजून घ्यायचा प्रयत्न करायचो

आदी मर्झबान म्हणून होते ते सादर करायचे. त्यात काय असायचं ते मात्र आता आठवत नाही.

>>"ज्ञानदीप" नावाचा एक छान कार्यक्रम असायचा , त्यावरून बऱ्याच ठिकाणी ज्ञानदीप मंडळ स्थापन झाली होती ते समाजोपयोगी कामे करायचे

आकाशानंद सादर करायचे. ह्यातही काय होतं आठवत नाही.

>>"गप्पागोष्टी" नावाचा एक छान कार्यक्रम असायचा त्यात रवी पटवर्धन होते (बबडया च्या सिरीयल मधले आजोबा) , मानसिंग पवार लेखक होते खूप छान संवाद असायचे

माया गुर्जर आणि राजा मयेकरही असायचे ना?
आमची माती आमची माणसं हा पण एक कार्यक्रम असायचा.

>>"गप्पागोष्टी" नावाचा एक छान कार्यक्रम असायचा त्यात रवी पटवर्धन होते (बबडया च्या सिरीयल मधले आजोबा) , मानसिंग पवार लेखक होते खूप छान संवाद असायचे

माया गुर्जर आणि राजा मयेकरही असायचे ना?
आमची माती आमची माणसं हा पण एक कार्यक्रम असायचा. >>>
फारच मस्त असायच्या त्यातील गप्पागोष्टी. त्यात शेवटी त्या अक्का एक उखाण्यातून कोडं द्यायच्या आणि मग बरोबर उत्तर पाठवणार्‍यांची नावं जाहीर करायचे Happy

तृष्णा सिरियल youtube वर आहे का?
तसंच चंद्रकांता (जुनी सिरियल) चे काही भाग दिसतायत तिकडे. सगळे भाग कुठे बघायला मिळतील?
ती एक जुनी सिग्मा म्हणून सिरियल होती (व्हिलन चं नाव जखाखू होतं!) ती कुठे बघता येईल का?

advance मधे धन्यवाद!

कप्पा गोष्टी आमची माती आमची माणसं मध्येच असायच्या.
सुनील बर्वेचा पहिला टीव्ही appearance असावा.

आवो मारी साथे गजरा सारखं होतं.

लहान मुलांसाठी संताकुकडी गुजरातीत आणि खेल खिलौने(?) हिंदीत होतं. ॅॅंॅॅॅॅंॅॅॅंॅॅॅॅंॅॅंॅॅॅॅॅॅंॅॅॅॅंॅॅॅंॅॅॅॅंॅॅंॅॅ
गोलमाल मधली अमोल पालेकर ची बहीण हिंदीत सूत्रसंचालन करीत असे.

कोणाला what's the good word आठवतंय? सबीरा मर्चंट

गप्पागोष्टी मधे निवेदिता जोशीपण होती गुजराथी सुन.

ज्ञानदीप मध्ये डोंबिवलीच्या भारती पवार असायच्या, कसले भारी वाटायचं. किलबिल मधे १९८९- ९० च्या दरम्यान आमच्या शाळेचा कार्यक्रम झालेला, त्यात वाघ्या मुरळी डान्समधे माझी बहिणी वाघ्या झालेली Lol , छान नाचते ती. अजून काही डान्स होते आणि त्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन ऐश्वर्या नारकर म्हणजे तेव्हाची पल्लवी आठल्ये हिने केलेलं, ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी, बहिणीची batchmate. आमच्या शाळेच्या काळे बाई सांस्कृतिक कार्यक्रमासाठी फार मेहनत घ्यायच्या.

ओशीन तसंच कोरीयन दुसरी सिरीयल मला आठवत का नाहीये. आय लव लुसी, चार्ली चॅप्लिन, डल्लास, ऑड कपल, स्टार ट्रेक, ओल्ड फॉक्स, शेरलॉक होम्स, स्पायडरमॅन वगैरे बाकी सगळ्या आठवतायेत.

गुजराथी छायागीत का चित्रहारमुळे बरीच गाणी पाठ झालेली त्यावेळी, तीच तीच दाखवायचे Lol

कोणाला what's the good word आठवतंय? सबीरा मर्चंट >>> हो आठवतंय ना. सबिरा मर्चंट कसली दिसायची, अजुनही आठवते, मस्त करायची anchoring.

अजून एक कॉलेज क्विझ असायचं, anchor दोघे कसले भारी होते. कौन बनेगा करोडपती त्यानेच काढलं ना. नाव आठवत नाहीये. राजदीप सरदेसाईला त्यात पहिल्यांदा बघितलं, दिलीप सरदेसाई यांचा मुलगा आहे हे तिथे समजलं. कुठल्या कॉलेजात होता, आठवत नाहीये. विल्सन का झेवियर्स असावा.

तृष्णा सिरियल youtube वर आहे का? >>> आहे, मी एक भाग शेअर केलाय वर मंजुताईला reply देताना. पण फार भयाण दिसतेय, बघावीशी वाटत नाहीये मला. क्लियर नाहीये फार.

लहान मुलांसाठी मराठी किलबिल होतं. मीनाताई म्हणजे मीना नाईक असायच्या. नंतर गजेंद्र अहिरे संचालन ंंकरायचा.
घेरबेठा सारखे मराठीत "सुंदर माझे घर" होते.
अम्रुतकुंभ म्हणून एक कार्यक्रम होता जो वसुंधरा पेंडसे सादर करत.
अशोक खरे नाट्यावलोकन सादर करायचे.

ती एक जुनी सिग्मा म्हणून सिरियल होती (व्हिलन चं नाव जखाखू होतं!) ती कुठे बघता येईल का? >>> मी पण शोधते आहे. अजून तरी सापडली नाहीये कुठे.

किल्ले का रहस्य आठवते का? हॉररमालिका म्हणून फेमस होती.पण 13व्या म्हणजे शेवटच्या भागात पचका झाल्याच आठवत आहे.काहीतरी फालतू सस्पेन्स दाखवला होता.पण ती कुठेच दिसत नाही.
आणखी ती स्पॉक नावाच कँरँक्टर असलेली सिरियल कोणती,त्यातले ते फोन का काहीतरी होत ते जाम फेमस झाल होत.
आम्ही काड्यापेट्यांच बनवायचो.
मालगुडी डेज पण छान.
ही मँन,स्पाइडरमँन,विक्रम वेताळ,मोगली यांनी पण खूप मजा आणली होती.

संस्कार >>> ही मालिका आत्ता यूट्यूबवर आहे.
नींव >> आत्ता यूट्यूबवर आहे.
मिट्टी के रंग >> प्रसार भारती अर्काईवज चॅनलने यूट्यूबवर अपलोड केली आहे
इधर उधर >> आत्ता यूट्यूबवर आहे.

किले का रहस्य, होनी अनहोनी, चुनौती कोणाला सापडल्या तर प्लीज सांगा.

मी यापेक्षाही जुन्या मालिका शोधते आहे त्या पण कधीच कुठे आल्या नाहीत - छोटी बडी बातें, ऐसाभी होता है, खेल खेलमें, एक दोन तीन चार, दादा दादी की कहानियाँ, दूरचे दिवे, द्विधाता, प्रतिबिंब, एक शून्य शून्य
आताच्या मालिका पाहिल्या की या जुन्याच परत पहायला मिळाव्यात असं वाटतं

एकदम नॉस्टॅल्जिक झाले. किती मस्त सिरीज होत्या सगळ्या.

ती एक जुनी सिग्मा म्हणून सिरियल होती >>>>>>>>> मला आठवतंय यात एक यक्क विचित्र आकार जो छोटा मोठा होत असायचा उकळत्या दुधावरच्या साईसारखा तो कोणाच्या तरी गालावर येऊन बसला की तो माणूस मरायचा असं काहीतरी अंधुक आठवतंय.

किलबिल, सुंदर माझे घर अगदी त्या पाट्यांसकट आठवलं. ग्रे बॅकग्राऊंड आणि वर पांढरी अक्षरं. दोन कार्यक्रमांच्या मधे भजनासारखं काहीतरी लागायचं त्यातलं "विठ्ठ्ल आवडी प्रेमभावे" खूप आठवतंय. "विठ्ठल नामाचा रे टाहो" वाक्य फार आवडायचं.
सुराग मधला सुदेश बेरी तेव्हाचा हार्टथ्रॉब अगदी! त्याची दोन बोटे तो ओठावरून गोल फिरवायचा ती स्टाईल फार आवडायची.

द्विधाता कसली सुपर्ब वाटलेली त्यावेळी, ड्युएल पर्सनॅलिटीवर होती ना. विक्रम गोखले, स्मिता तळवळकर.

एक शून्य शून्य पण फार आवडायची.

कहानी चे सर्वच प्रकार आवडायचे मला. एक कहानी पण. देशा विदेशातल्या कुठल्याही कथा असुदेत, आवडायच्या बघायला.

मला आठवतंय यात एक यक्क विचित्र आकार जो छोटा मोठा होत असायचा उकळत्या दुधावरच्या साईसारखा तो कोणाच्या तरी गालावर येऊन बसला की तो माणूस मरायचा असं काहीतरी अंधुक आठवतंय. >>> मला आठवत नाहीये हि.

बालचित्रवाणीचं टायटल song छान होतं. त्यात कधी कधी उर्मिला मातोंडकरची लहान बहिण ममता मातोंडकर असायची.

किल्ले का रहस्य आठवते का? >>> हो. पण शेवट आठवत नाहीये. तो मोठं कपाळवाला आठवतो, तो नंतर खूप सिरियल्समधे होता. अजुनही असतो, charactor रोल करतो. वीरेंद्र सिन्हा का सक्सेना असं नाव असावं.

बालचित्रवाणी लागायच्या आधी टी व्ही वर 'पुढील कार्यक्रम' अशी पाटी यायची. मला लहानपणी वाटायचं की त्या कार्यक्रमाचं नाव 'पुढील कार्यक्रम' आहे. तेव्हा पुढील चा अर्थ माहीत नव्हता.

Lol मस्तच हरचंद. बालपणातली निरागसता.

आपण यांना पाहिलंत का पण बघायचो आवर्जून.

ती सिरीयल स्पेस सिटी सिग्मा होती. पीव्हीसी पाईपाचे असल्यासारखे टनेल. होज पाईपातले वायरिंग. सरकती दारे असा त्या स्पेस सिटीचा तामझाम होता. कॅप्टन तारा की कायतरी मुख्य असतो. त्यांचा सिक्युरिटी चीफ शक्ती म्हणून असतो तो युनिव्हर्सल सोल्जार सारखा मृत सैनिकाला रोबोट केलेला असतो. तो मरत नसतो. चकचकीत सिंथेटिक कपडे असायचे सगळ्यांचे. ते दुधाच्या साईसारखे गालाला चिकटणार नसून थोडेसे मानवी मेंदुसारखे लिबलिबीत असे होते कायतरी. जवळपास तीन एपिसोड त्याचा थरकाप दाखवलेला. एरव्ही एका एपिसोडमध्ये एक संकट निपटायची बोत होती.

अशोक खरे नाट्यावलोकन सादर करायचे. >> वा ! खूप छान आठवण !! खूपच छान प्रश्न विचारायचे , उच्चर स्वछ , नेमके प्रश्न ! फारच आवडायचा तो कार्यक्रम

"ज्ञानदीप" >> छोट्या बोधप्रद नाटिका असायच्या त्यात व्यसनमुक्ती , साक्षरता , बचत , स्वछता असे संदेश देणारी नाटिका , छान असायचा कार्यक्रम

छोटी बडी बातें >> हो आठवतोय , त्यात अरविंद देशपांडे होते बहुधा

एक दोन तीन चार>> हो हो ! रविवारी असायची

स्पायडरमॅन , चिमणराव आठवत आहेत , आमची पंचविशी , प्रतिभा आणि प्रतिमा !

दूरदर्शन ने प्रेक्षक शरण न जाता प्रेक्षकांची अभिरुची वाढवली !

मला रविवार सकाळ ८.३० ची हसत खेळत सिरियल आठवते. त्यात खूप मोठे कलाकार होते. विक्रम गोखले,विजय पटवर्धन,विजय पाटकर्,निवेदिता,प्रशांत दामले वगैरे. रविवार मस्त प्रसन्न चालू व्हायचा. पण त्यानंतर माझी नीता ही कॅन्सर पेशंट वाली सिरियल लागायची आणि परत मनाला थोडी टोचणी लागायची. दुर्गा झाली गौरी चे बरेच एपिसोड पण लागायचे.
दुपारी जेवण झाल्यावर झोपाळत २ वाजता दूरचे दिवे नावाची एक खेल पिक्चर सारखी पैसे, चोरी अशी कथा असलेली सिरियल होती.
या सगळ्यात मुख्य स्पॉन्सर असलेल्या विको वज्रदंती आणि हलदी चंदन चे गुण वाली जाहिरात ही त्या सिरियल इतक्याच प्रेमाने बघण्याची गोष्ट होती.
प्रशांत दामले प्रदीप पटवर्धन ची दोघे एकमेकांना न कळता एकाच घरात पेइंग गेस्ट (एक रात्री एक सकाळी) वाली सिरियल पण धमाल होती.बहुतेक मंगळ वारी रात्री लागायची.

बोलाची कढी नावाची एक छान मालिका होती. विनय आपटे, वंदना गुप्ते आणि सुलेखा तळवलकर होती का? विनय आपट्यांची तरुणपणीची एक प्रेयसी असते पण त्यांचं तिच्याबरोबर लग्न होत नाही. मग ते लग्न करतच नाहीत. ती मात्र दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करते. मग खूप वर्षांनी ते तिच्या कुटुंबाचा शोध घेतात. ती गेलेली असते. तिची मुलगी वंदना गुप्ते, जावई बहुतेक प्रदीप वेलणकर आणि नात सुलेखा तळवलकर (ही आपल्या आजीसारखीच दिसत असते) असतात. त्यांना आपली ओळख न देता ते त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. मग पुढे बहुतेक सुलेखा तळवलकरचा प्रियकर सुनील बर्वे असतो. त्यांचं लग्न होण्यासाठी विनय आपटे त्यांना मदत करतात.
ही सीरियल मला खूप आवडलेली तेव्हा!

विनिताजी क्या बात, चला कोणीतरी हे लक्षात ठेवलाय. कुठल्या कथेत? लिंक असल्यास द्या.

वाह स्वस्ति - माहिती साठी काही एपिसोडस आहेत तुनळी वर सुराग चे . CID Officer vidhan हि मालिका सुराग नंतर ६ महिन्यांनी सुरु केली होती साधारण तशीच होती.

कुठल्या कथेत? लिंक असल्यास द्या. >> 'धनंजय २०११' मधे माझी पहिली गुप्तहेरकथा प्रसिध्द झाली आहे. त्या कथेत आहे ते पात्र Happy

ती सिरीयल स्पेस सिटी सिग्मा होती. पीव्हीसी पाईपाचे असल्यासारखे टनेल. होज पाईपातले वायरिंग. सरकती दारे असा त्या स्पेस सिटीचा तामझाम होता. कॅप्टन तारा की कायतरी मुख्य असतो. त्यांचा सिक्युरिटी चीफ शक्ती म्हणून असतो तो युनिव्हर्सल सोल्जार सारखा मृत सैनिकाला रोबोट केलेला असतो. तो मरत नसतो. चकचकीत सिंथेटिक कपडे असायचे सगळ्यांचे. ते दुधाच्या साईसारखे गालाला चिकटणार नसून थोडेसे मानवी मेंदुसारखे लिबलिबीत असे होते कायतरी. जवळपास तीन एपिसोड त्याचा थरकाप दाखवलेला. एरव्ही एका एपिसोडमध्ये एक संकट निपटायची बोत होती.>>
हो आठवते ते. यानाचा मुख्य तारा, रोबोट शक्ती, अजून एक हीरी म्हणून कोणीतरी टेक्निकल अनालिस्ट सारखी होती. ती खूप सुरेख होती दिसायला. आमच्या काकांच्या मते तिच्यासमोर त्यावेळच्या तमाम हिरॉइनी फिक्या पडतील Happy आणि मिता वसिष्ठही होती scientist होती बहुतेक. जखाखू आणि त्याच्या टीमचा मेकप एकदम भारी वाटायचा!
बघायला मिळाली पुन्हा तर मस्त वाटेल Happy

तृष्णा सिरियल youtube वर आहे का? >>> आहे, मी एक भाग शेअर केलाय वर मंजुताईला reply देताना. पण फार भयाण दिसतेय, बघावीशी वाटत नाहीये मला. क्लियर नाहीये फार.>>
धन्यवाद अन्जू! मी ही सिरियल आधी बघितली नव्हती पण pride and prejudice वर बेतलेली आहे असं ऐकलं होतं. पहिले १-२ भाग बघायचा प्रयत्न केला पण फारशी भावली नाही. पुढचे अजून बघायचे आहेत.

धन्यवाद विनीता झक्कास आणि वर्षा तहकिकात लिंकसाठी.
Jewel in the palace आमची पण आवडती सिरीयल होती.
कॅप्टन व्योम आणि स्कूल डेज आठवतेय का कोणाला.

बोलाची कढी नावाची एक छान मालिका होती >> आठवते आहे थोडी थोडी बाकी कथा अजिबात आठवत नव्हती पण विनय आपटे आणि मालिकेचे नाव आणि चांगली होती एवढे आठवत आहे !

हा धागा कमाल आहे !

ती एक जंतर मंतर म्हणूनही सायन्स फिक्शन वरील जुनी सिरीयल होती. त्यात जंतर नावाच्या ग्रहावरचे लोक स्पेसयानातून सहलीला निघतात आणि मंतर ग्रहावरचे लोक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना कैद करतात. त्यात अश्विनी भावे होती, बहुतेक हिंदीतील तिची पहिली सिरीयल. youtube वर बघितलं तर नवी कोणतीतरी comedy serial येते, त्याचंही तेच नाव आहे.

द्विधाता आणि विक्रम गोखले तसंच प्रतिबिंबमधला डबलरोल..दोन्ही खूप आवडत्या मालिका Happy

वर्षा उसगावकरची पहिली मराठी सिरियल कोणती? त्याचे खूप कमी भाग होते पण त्यात ती प्रचंड आवडली होती.

Pages