जुन्या मालिका - काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21

जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा Happy

१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?

२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.

अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुगु कोण दाखवला होता मुलगा? मला चेहेराच आठवत नाहीये. मुलगी आठवतेय. शर्वरी पाटणकर होती ना.

टिकेल ते political मध्ये समीर पाटील पण होताना.

जौदे.. त्या संथ चालती... च्या धाग्यावरच्या कमला शिरेलीवरच्या पोस्टीवरुन पिंपळपानची आठवण झाली.... त्यात शेवटची गोष्ट कोणती होती.. मला जास्त आठवत नाहीये फक्त भक्ती बर्वे, मृणाल कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णी यांच्या भुमिका असलेली गोष्ट आठवते... मला वाट्ट प्रसाद ओक मृ.कूचा नवरा होता त्यात... बॅरिस्टर का ती?

हो. पण ती कथा शेवटची होती का नाही मला माहिती नाही.

माझ्याकडे केबल नव्हती तेव्हा. मी आईकडे गेले असेन तर पिंपळपान बघितले जायचे.

ती बहुतेक पहीली गोष्ट होती.. कारण त्याची खूप जाहीरात झालेली होती.. मी फक्त मृ.कु आहे म्हणुन पाहीली होती.. अवंतिका पण तिच्यासाठीच पाहीली पण नंतर नंतर तिच उसासे सोडण अती व्हायला लागल होत...

ह्म्म्म. खरं म्हणजे तिच्यापेक्षा मधुरा चांगली अभिनेत्री होती पण तिने लिमिटेड काम केलं. पण त्यात ती बहिणीपेक्षा उजवी वाटली मला. Happy

लिमिटेड म्हणजे अगदीच लिमिटेड काम केल मधुराने.. माझ्या आठवणीत तिच्या दोनच मालिका आहेत, एक ४०५ आनंदवन आणि दुसरी सह्याद्रिवर चंद्रकांत काळेंबरोबर तिने काम केलेल होत.. मालिकेच नाव माहीत नाही, पण मोठी बहीण गायिका असते, फेमस असते आणि तिच्या कार्यक्रमाच्या तारखा वै. ही सांभाळत असते.. चंद्रकांत काळे बहीणीचा मित्र किंवा कार्यक्रम अरेंज करणारा असतो.. अजुन बरच कै कै आठवतय पण नंतर लिहेन..

सस्मित, गुगलवर फोटो ओपन होत नाहीये माझ्याकडे. नेट स्लो आहे.

वीणा देवबरोबर फार पूर्वी पडघवली कादंबरीचे वाचन करायची मधुरा. हल्ली बरीच वर्षे नाही ते वाचन. त्याच्या add यायच्या पेपरला.

अरूण गोविल आणि अर्चना जोगळेकर यांची एक मालिका होती. त्यात शास्त्रीजी (अरूण गोविल) अर्चना ला भर सभेत बेताला म्हणतात, आणि मग स्वतः संगीत शिकतात वगैरे वगैरे आणी सिद्ध करतात की तु बेताला होतीस.
कुणाला नाव माहीत आहे का त्या मालिकेचं?

अरूण गोविल आणि अर्चना जोगळेकर यांची एक मालिका होती. त्यात शास्त्रीजी (अरूण गोविल) अर्चना ला भर सभेत बेताला म्हणतात, आणि मग स्वतः संगीत शिकतात वगैरे वगैरे आणी सिद्ध करतात की तु बेताला होतीस.
कुणाला नाव माहीत आहे का त्या मालिकेचं?>>> फुलवंती.

फुलवंती म्हणजे अर्चना जोगळेकर. ती नृत्यांगना असते. तिचा ताल चुकतो तेव्हा ती आह्वान देते आणि अरुण गोविल मृदंगावर तोच ताल वाजवून तिला हरवतात. पण त्यांच्या मनात कसलीही ईर्ष्या नसल्यामुळे ते मनात काही कटुता ठेवत नाहीत. पण "हरले तर तुमच्या घरी नोकर म्हणून राहीन" असं फुलवंतीनेच सांगितलेलं असतं म्हणून ती स्वतः त्यांच्या घरी जाते. त्यांची पत्नी (सविता प्रभुणे) आणि ते तिला सन्मानाने परत पाठवतात. ती त्यांच्या मोठेपणामुळे त्यांना शरण जाते आणि त्यांची शिष्या म्हणून विद्या शिकायची इच्छा व्यक्त करते. एवढं मला आठवतंय. सिरिअल इथेच पूर्ण झाली की अर्ध्यावर बंद झाली की पुढे अजून काही वेगळा शेवट झाला हे माहिती नाही.

स्वतः प्रतिमा कुलकर्णी यांना त्यांच्या मालिका मिळू शकत नाहीत (मी स्वतः प्रत्यक्ष भेटीत त्यांना विचारलं आहे) तर आपली काय कथा? झी वाल्यांनी पुनःप्रक्षेपित करण्याचा विचार केला तरच काहीतरी होऊ शकेल!

पिंपळपान मधील भक्ती बर्वे, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, अतुल कुलकर्णी ह्यांची भूमिका असलेली तेरा भागांची पहिली कादंबरी म्हणजे दळवींची 'अंधाराच्या पारंब्या'. जयवंत दळवींनी स्वत:च्याच ह्या कादंबरीवरुन पुढे 'बॅरिस्टर' हे नाटक लिहिले.
ह्यातला वाडा कसा खास शोधून काढला ( मला वाटतं कोल्हापूर-गगनबावडा भागाच्या आसपास हा वाडा मिळाला. चुभूद्याघ्या ) शहराच्या गजबटापासून दूर शूटिंगसाठी सगळे तिथे जाऊन राहिले त्यामुळे त्या काळात शिरणं कसं सोपं गेलं अशा सगळ्या आठवणी मृणाल कुलकर्णीने त्यावेळी सांगितल्या होत्या. आलवण नेसलेल्या विधवा मावशींचा रोल करणार्‍या भक्ती बर्वेंनी एका शॉटमध्ये खूप लोणचं खाल्लं होतं अशी एक आठवण त्यांनी सांगितली होती.
मला आठवतंय त्याप्रमाणे बॅरिस्टरांच्या ( अतुल कुलकर्णी ) तरुणपणच्या मैत्रिणीचे काम स्मिता सरवदे ( होसुमी मधली सरुमावशी ) हिने केले होते.

मटामध्ये 'झिम्मा' ह्या पुस्तकातला बॅरिस्टरच्या आठवणी सांगणारा एक उतारा दिला आहे.

ह्यानंतर श्री. ना. पेंडसे ह्यांच्या कादंबरीवर पुढचे कथानक होते ज्यात प्रतिक्षा लोणकर आणि मोहन आगाशे, नेहा पेंडसे ( ? ) ह्यांनी काम केले होते. पण 'अंधाराच्या पारंब्या' इतकी पकड नंतर ह्या मालिकेने घेतलीच नसावी बहुतेक. त्यामुळे पुढे किती कथानकं सादर झाली ते आठवत नाही.

वीणा देवबरोबर फार पूर्वी पडघवली कादंबरीचे वाचन करायची मधुरा >>> ती भारतात नाहीये.. आधी यु.केला होती आता अमेरीकेत आहे.. मुलीबरोबर...

ए अगो.. बरोबर आठवल मला पण.. आणि बॅरिस्टर वरुन अल्फाने पिंपळपान मध्ये अंधाराच्या पारंब्या ही गोष्ट दाखवली.. कारण त्याच्या जाहीरातीत तसा स्पष्ट उल्लेख असल्याच मला आठवतय

मधुरा देव डहाणूकर असं देऊन बघा. माझ्याकडे ओपन होत नाहीयेत.

मुग्धा हो, ती यु.के. मध्ये उच्चशिक्षण घेत होती तेव्हा वीणा देव तिथे गेल्या होत्या तेव्हा त्यांनी लोकसत्तेत लेख लिहिले होते वेगवेगळे. ते मी वाचले होते.

Pages